DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shikshk Bharti Pavitra Portal

Shikshk Bharti Pavitra Portal 

Shikshk Bharti Pavitra Portal

दिनांक : २०/०१/२०२५

व्यवस्थापनांसाठी सूचना

स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना

१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यांपैकी २,१६,४४३ उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते.

या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरत्तीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्व-प्रमाणपत्रे (Self Certificates) पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत.

या माहितीच्या आधारे यापूर्वी जानेवारी २०२४ अखेर आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशींची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ दिलेल्या उमेदवारांमधून शिक्षक पदभरती करण्याकरिता टप्पा दोन मधील जाहिरातींची कार्यवाही करण्यात येणार आहे.

२. पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशींसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून पोर्टलवर माध्यमनिहाय, आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी जाहिराती देणे आवश्यक आहे.

३. रिक्त पदांच्या जाहिरातींसाठी संबंधित व्यवस्थापनाने "पवित्र पोर्टल" वर पहिल्या टण्यामध्ये नोंदणी केली असल्यास त्यांना यापूर्वी नोंदणी केलेला user id व password वापरून लॉगिन करता येईल. नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सरल प्रणालीतील user id हाच या पोर्टलचा user id असेल. व्यवस्थापनास forgot password यावर क्लिक केल्यानंतर option for reset password मध्ये using onetime password (otp) sent via sms खाली व्यवस्थापनाचा सरल पोर्टलचा user id नोंद करावा, त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व captcha टाकून proceed वर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर otp येईल, आलेला otp नोंद करून verify वर क्लिक करावे. त्यानंतर reset password मध्ये new password/confirm new password नमूद करून captcha टाकून change password वर क्लिक करावे, त्यानंतर नव्याने reset केलेला password टाकून लॉगीन करता येईल.

पवित्र पोर्टलसाठी सरल पोर्टलवर नोंद असलेला व्यवस्थापनाचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे. पूर्वीचा सरल पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने password reset होत नसल्यास खाजगी व्यवस्थापनाने त्यांच्याशी

संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या लॉगीनवरून मोबाईल क्रमांकात बदल करून नव्याने password reset करता येईल.

४. व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाच्या बिंदुनामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहायक आयुक्त, (मावक), मा. विभागीय आयुक्त कार्यालय यांचेकडून अद्ययावत करून प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.

५. पूर्वी प्रमाणित केलेल्या बिंदुनामावालीमध्ये SEBC या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास बिंदुनामावली अद्ययावत करून दिनांक २७/२/२०२४ नंतर प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.

६. पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठीच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ सोबतच्या परिशिष्ट-अ मध्ये देण्यात आला आहे, या शासन निर्णयामध्ये सक्षम प्राधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये बिंदुनामावली भरणारे प्राधिकारी, तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राधिकारी निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधितांना लॉगीनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

बिंदुनामावली व विषयनिहाय रिक्त पदांची नोंद करणारे व मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी खालील प्रमाणे आहेत.
पवित्र पोर्टल शिक्षक भरती स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना



७. व्यवस्थापनाकडे एकापेक्षा जास्त माध्यमांच्या शाळा असल्यास बिंदुनामावलीची माध्यमनिहाय माहिती नोंद करावी.

८. रिक्त पदांची मागणी नोंदविताना सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी. तथापि, सन २०२३-२४ मध्ये शिक्षक पद कमी झाल्यास व भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदांसाठी मागणी नोंदवू नये.

९. रिक्त पदांपैकी एखाद्या/काही पदांबाबत मा. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणाने अशी पदे भरणे शक्य नसल्यास सदर पदे वगळून बिंदुनामावलीतील आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंदवावी.

१०. रिक्त पदांची मागणी करताना शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- २०२३/प्र.क्र.१७४/टीएनटी-१ दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदींनुसार रिक्त पदांच्या ८० टक्केच्या मर्यादेत मागणी नोंद करावी.

११. इ१ ली ते इ ५ वी / इ६ वी ते इ८ वी / इ९ वी ते इ १० वी /इ ११ वी ते इ १२ वी / अध्यापक विद्यालये या गटातील रिक्त पदांसाठी व्यवस्थापनास जाहिरात देता येईल.

१२. अध्यापनाच्या विषयांची जाहिरात देताना शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९, २५/०२/२०१९, १२/०६/२०१९, १३/१०/२०२३ व इतर अनुषंगिक तरतुदींनुसार कार्यवाही करावी.

१३. इ. ६ वी ते इ. ८ वी या गटातील भाषा, गणित-विज्ञान, गणित, विज्ञान, सामाजिक शाखे या प्रमाणे अध्यापनाच्या विषयांसाठी मागणी करता येईल.

अ) फक्त "गणित" विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास "गणित" असा विषय निवडावा.

आ) फक्त "विज्ञान" विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास "विज्ञान" असा विषय निवडावा.

इ) "गणित विज्ञान" हे दोन्ही विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास "गणित-विज्ञान" असा विषय निवडावा.

१४. इ. ९ वी ते इ. १० वी या गटातील भाषा विषय, गणित, विज्ञान, गणित विज्ञान, सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, शारीरिक शिक्षण, संरक्षण शास्त्र या विषयांसाठी मागणी करता येईल.

१. फक्त "गणित" विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास "गणित" असा विषय निवडावा.

२. फक्त "विज्ञान" विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास "विज्ञान" असा विषय निवडावा.

३. "गणित- विज्ञान" हे दोन्ही विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास "गणित-विज्ञान" असा विषय निवडावा.

४. इतिहास, भूगोल इत्यादी सामाजिक शास्त्रातील सर्व विषय शिकविण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास "सामाजिक शास्त्र" असा विषय निवडावा.

५. फक्त "इतिहास" विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास "इतिहास" असा विषय निवडावा.

६. फक्त "भूगोल" विषय शिकविण्यासाठी शिक्षक पाहिजे असल्यास असा "भूगोल" विषय निवडावा.

७. "शारीरिक शिक्षण" या विषयाचा पूर्णवेळ कार्यभार उपलब्ध होत असल्यास "शारीरिक शिक्षण" असा विषय निवडावा.

१५ इ. ११ वी ते इ. १२ वी या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांची मागणी नोंद करता येईल.

१६. शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ मधील तरतुदींनुसार उच्च माध्यमिक /कनिष्ठ महाविद्यालयाच्या अर्धवेळ व दोन विषयांतील कार्यभारामुळे पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करता येतील.

१७. अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ मंजूर असलेली रिक्त पदांच्या मागणीची नोंद करता येईल.

१८. जाहिरातींसाठी बिंदुनामावलीची माहिती भरल्यानंतर ती तपासून मान्य केल्यानंतरच विषयाचा गट व विषयाची माहिती नोंद करता येते व त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतरच जाहिरात तयार करता येईल.

१९. जाहिरात जनरेट होण्यासाठी बिंदुनामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून मान्य (approve) करून घेणे आवश्यक आहे.

२०. जाहिरात जनरेट करण्याची सुविधा ही माहिती भरणाऱ्या प्राधिकारी यांच्या लॉगीनवर उपलब्ध आहे.

२१. पोर्टलवर जाहिरात जनरेट झाल्यानंतर शासन निर्णय दिनांक ०७/०२/२०१९ मधील तरतुदींनुसार सदर जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करावी.

२२. जाहिरात तयार करण्यासाठी पोर्टलवर Guidelines/Instruction टॅब अंतर्गत Flow Mechanism/User Manual उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी.

हेही वाचा 👇

सूचना पत्र

सदर सूचना पत्र फक्त पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती २०२२ अंतर्गत रयत शिक्षण संस्थेत शिफारस झालेल्या उमेदवारांसाठी आहे. आस्थापना बदलून इतर ठिकाणी रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचेच समायोजन केले जाईल. जे उमेदवार अर्ज सादर करणार नाहीत त्यांची रयत शिक्षण संस्थेत झालेली शिफारस अबाधित राहिल.

पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती २०२२ अंतर्गत रयत शिक्षण संस्थेत शिफारस झालेल्या उमेदवारांना रिक्त पदाच्या ऐच्छिक समायोजनासाठी खालील सुचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. आस्थापना बदलून नियुक्तीसाठी आवश्यक माहिती भरण्यासाठी दिलेल्या अर्जाचा नमुना प्रपत्र अ, प्रपत्र ब आणि प्रपत्र क सूचना पत्रास जोडलेले आहे. सदर प्रपत्रात महिती भरून आयुक्त शिक्षण कार्यालय पुणे येथे प्रत्यक्ष येऊन कार्यालयीन वेळेत द्यावे किंवा आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयीन ई मेल पत्त्यावर स्कॅन करून पाठवावे.

• कार्यालयीन पत्ता : शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११००१

• कार्यालयीन ई-मेल :
Email ✉️ LINK 

 

• विहित नमुन्यात अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २८/१०/२०२४

प्रपत्र अ

प्रति,

मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे

 

विषय : रयत शिक्षण संस्थेत शिफारस झालेल्या उमेदवारांना आस्थापना बदलून मिळणे बाबत.

माननीय महोदय,

वरील विषयांन्वये विनंती करण्यात येते की, माझी रयत शिक्षण संस्थेमध्ये दिनांक: २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीनुसार नियुक्ती करिता शिफारस करण्यात आलेली आहे. तथापि न्यायालयीन स्थगिती असल्यामुळे मला रयत शिक्षण संस्थेकडून पदस्थापना देण्यात आलेली नाही. माझी निवड होऊन बऱ्याच महिन्यांचा कालावधी उलटला तरी मला अद्याप नियुक्ती न मिळाल्यामुळे इतर पुर्णतः अनुदानित आस्थापनाकडे निवड झालेला प्रवर्ग, गट व विषयाच्या नियुक्तीसाठी माझा विचार करून मला तात्काळ पदस्थापना देण्याबाबत कार्यवाही करावी ही नम्र विनंती. आदरपूर्वक सादर.

आपला विश्वासू,

उमेदवाराचे पूर्ण नाव :

कायम पत्र व्यवहाराचा पत्ता :

दिनांक : / /२०२४.

प्रपत्र ब

माझा तपशील खालील प्रमाणे आहे. (लागू नसलेल्या जागी "निरंक" असे लिहा.)

रयत शिक्षण संस्थेच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीचा दिनांक : /२०२४

उमेदवाराचे पूर्ण नाव (इंग्रजीत मोठ्या लिपीत लिहा)

TAIT परीक्षा क्रमांक:

TAIT परीक्षेतील प्राप्त गुण:

शिफारस झालेल्या पदाचा गट (प्राथमिक / माध्यमिक उच्च माध्यमिक):

अध्यापनाचा विषय :
शिफारस झालेला प्रवर्ग :
समांतर आरक्षण प्रवर्ग:
नोंदणीकृत संपर्क :
पवित्र पोर्टलवरील नोंदणीकृत ई मेल:
तुम्ही रयत शिक्षण संस्थेत शिफारस झालेल्या गटावर समायोजनाव्दारे नियुक्त न झाल्यास सदर गटा पेक्षा खालील
गटावर पदावनतीसाठी (Demotion) इच्छुक आहात का? (होय/नाही):

स्वाक्षरी
नाव:


प्रपत्र क 

विकल्प देण्यासाठी खालील प्राधान्य तक्ता भरा.

अ. क्र
जिल्हा

जि. प./मनपा/नपा/ कटक मंडळ / अनु. संस्था

घोषणापत्र

माझी रयत शिक्षण संस्थेत निवड झालेल्या गटातील पदावर अन्य व्यवस्थापनाकडे शिफारस करून नियुक्ती झाल्यानंतर सदर रयत शिक्षण संस्थेतील यापूर्वी शिफारस झालेल्या पदावर माझा कोणताही हक्क असणार नाही. याची मला जाणीव आहे.

ठिकाण :
दिनांक :

अर्जदाराची सही :
अर्जदाराचे नाव :

प्रपत्र अ ब क पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध त्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 



हेही वाचाल 👇 

दिनांक १४/०९/२०२४
प्रेस नोट

दि.१४/०९/२०२४

पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षण सेवक/शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमीबाबत खुलासा

स्थानिक स्वराज संस्था तसेच खाजगीशैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर २१,६७८ रिक्त पदांसाठी एकूण १९,९८६ पदांकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक १९/०६/२०१३ अन्वये विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासन पत्र दिनांक २५/०१/२०२४ अन्वये निर्देश आहेत. तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्याची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिनस्त प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी सबंधित तज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आले आहेत. सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये यादृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळवण्याच्या हेतूने ही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे.

या संदर्भात दिनांक ३०/०१/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोट द्वारे स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत.

त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमांच्या रिक्त पदासाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण १२८८ उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टल मार्फत शिफारस झाली आहे.

एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे. पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यताधारकांचा काहीही संबंध नाही असे असतानाही वस्तुस्थितीची कोणतीही खातरजमा न करता अथवा शासन निर्णय न वाचता काही मंडळींनी समाज माध्यमांद्वारे, काही वर्तमानपत्रांमध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षकांना पुन्हा एक परीक्षा द्यावी लागणार असल्याचे वृत्त प्रसारित केले आहे.

साधनव्यक्ती संदर्भात करावयाच्या कार्यवाही संदर्भात शासन स्तरावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. याबाबत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुलेटीन द्वारे अधिकृत माहिती प्रसारित केली जाईल.

शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचना, बुलेटिनद्वारे दिल्या जातात अथवा मंत्री कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रेस नोट द्वारे अथवा वार्तालापाद्वारे दिल्या जातात, त्यामुळे कोणत्याही अन्य प्रकारे प्रसारित होणाऱ्या धोरणात्मक निर्णयाची पुष्टी झाल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन मा मंत्री (शिक्षण) यांनी केलेले आहे.

सूचना
दिनांक ०७/०९/२०२४

शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनांसाठी सूचना 'मुलाखतीसह' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत.

शिक्षक अभियोग्यता व बु‌द्धिमत्ता चाचणी-2022 नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी चाचणी परीक्षेतील गुणवतेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 07/08/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

"मुलाखत अध्यापन कौशल्य यांसाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक 09/08/2024 ते 31/08/2024 असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे.

सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनस्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक 07/09/2024 पर्यंत पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती.

परंतु पोर्टल वरील निवड प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करणे व निवड केलेल्या उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे तपासून घेणे ही कार्यवाही पूर्ण करण्यासाठी अजून कालावधी देणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी दिनांक 13/09/2024 पर्यंत मुदत वाढविण्यात येत आहे.

पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतर व निवड झालेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेची कागदपत्रे शिक्षणाधिकारी यांचे कडून पडताळणी केल्यानंतर संस्थास्तरावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील.

"मुलाखतीसह" या प्रकारातील "मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीच्या नोंदी दिनांक 13/09/2024 नंतर व्यवस्थापनस्तरावरून करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.


दिनांक ०१/०९/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनांसाठी सूचना 'मुलाखतीसह' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक ०७/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

"मुलाखत अध्यापन कौशल्य" यांसाठीची कार्यवाही व्यवस्थापनांकडून करण्यास दिनांक ०९/०८/२०२४ ते ३१/०८/२०२४ असा देण्यात आलेला कालावधी संपुष्टात आला आहे.

सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी, निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी शैक्षणिक संस्था/व्यवस्थापनस्तरावरील मुलाखत व अध्यापन कौशल्यनंतर पोर्टलवर गुणदान, निवड, प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक ०७/०९/२०२४ पर्यंत पोर्टलवर सुविधा सुरू राहील.

पवित्र पोर्टल वरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच, निवड केलेल्या उमेदवारांना संस्थास्तरावरून प्रत्यक्ष नियुक्त आदेश निर्गमित करता येतील.

"मुलाखतीसह" या प्रकारातील "मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीच्या नोंदी दिनांक ०७/०९/२०२४ नंतर व्यवस्थापनस्तरावरून करता येणार नाहीत याची नोंद घ्यावी.

दिनांक : १९/०८/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

"मुलाखतीसह" पर्याय निवडलेल्या शैक्षणिक संस्था / व्यवस्थापन व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्यासाठी सूचना

अ) शैक्षणिक संस्था/व्यवस्थापन यांचेसाठी सूचना

1. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीकरिता मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे.
2. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी प्राप्त गुण व इतर तपशील नोंद करण्याची सुविधा व्यवस्थापनाच्या लॉगीनवर देण्यात आली आहे, त्यामध्ये Data Entry for Interview Marks, Applicant Interview Details या दोन मेनुतील माहिती नोंद करून, भरलेली माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच Lock Round-1 Selected Candidate या मेनुद्वारे व्यवस्थापन स्तरावरील माहिती Lock करावी. एकदा माहिती Lock केल्यानंतर यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही, त्यामुळे माहिती Lock करण्यापूर्वी आवश्यक ती दक्षता घ्यावी.
3. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश देऊन त्याबाबतचा तपशील Applicant Interview Details for Joining या मेनुद्वारे नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारास दिलेल्या शाळेचा व नियुक्ती आदेशाचा तपशील नोंद करावयाचा आहे. यासाठी आपणास आवश्यक असणारे विविध रिपोर्टस आपणास Reports या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
4. पवित्र पोर्टलवर संस्था व शाळा यांच्यासाठी स्वतंत्र युजर मॅन्युअल दिलेले आहेत.
1. Sanstha Login Applicants Interview status 2. School Login Applicant joinging and shalarth ID याचे अवलोकन करावे.

पुढील  Update माहितीसाठी समुहात सामील व्हा 


ब) शाळा मुख्याध्यापक यांचेसाठी सूचना

5. व्यवस्थापनाच्या नियुक्ती आदेशानुसार संबंधित उमेदवार शाळेत रुजू बाबतचा तपशील नोंद करण्याची सुविधा शाळा/मुख्याध्यापक यांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
6. मुख्याध्यापक यांना लॉगीन करण्यासाठी school portal साठी वापरात असलेला user ID (Udise code) हा या पोर्टलसाठी लॉगीन id असेल. मुख्याध्यापकांनी forgot password यावर क्लिक केल्यानंतर option for reset password मध्ये using
onetime password (otp) sent via sms to registered mobile number है
निवडून proceed या बटणवर क्लिक करावे. त्यानंतर reset password using otp
sent via sms खाली शाळेचा udise code नोंद करावा व त्यानंतर school portal
साठी नोंद असलेला मोबाईल क्रमांक नोंद करावा व captcha टाकून proceed या बटणवर क्लिक केल्यानंतर नोंद केलेल्या मोबाईलवर otp येईल. आलेला otp नोंद करून verify या बटण वर क्लीक करावे त्यानंतर reset password मध्ये new password/confirm new password नमूद करून व captcha टाकून change password या बटण वर क्लिक करावे. नव्याने reset झालेला password टाकून लॉगीन करता येईल.
7. वर नमूद केल्याप्रमाणे पूर्वीचा School Portal वरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने Password Reset होत नसल्यास आपल्याशी सबंधित शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या लॉगीनवरून मोबाईल क्रमांक बदल करून नव्याने Password Reset करता येईल.
8. नवीन Password वापरून लॉगीन केल्यानंतर Applicant Joining Details या मेनुंतर्गत व्यवस्थापनाने शाळेत नियुक्ती दिलेल्या सर्व उमेदवारांची यादी दिसेल. त्यातील उमेदवाराचे नाव निवडून त्याच्या रुजू अहवालाबाबतची माहिती नोंद करावी. उमेदवार रुजू झाला असल्यास शालार्थ प्रणालीसाठी आवश्यक माहिती भरावी, त्यानंतर अनुदानित, अंशतः अनुदानित प्रकारातील पदावर रुजू झाला असल्यास सदर माहिती शालार्थ प्रणालीकडे जाईल.
9. सदर माहिती शालार्थ प्रणालीकडे जुळल्यास काही तासात शालार्थ id ऑनलाईन Generate होईल. तसेच शालार्थ id आपल्या शाळेच्या शालार्थ प्रणालीतील लॉगीनवर देखील दिसेल. त्यानंतर शालार्थ प्रणालीतील मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करावयाची आहे.
10. सदर उमेदवाराची माहिती शालार्थ प्रणालीकडे न जुळल्यास काही तासात Report या मेनूमध्ये Remark by Shalarth team या अंतर्गत तसा त्रुटींचा तपशील दिसेल, त्यानंतर आपण पुढील २ दिवसांत आपल्या शाळेशी सबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून सदर त्रुटी दूर करावयाची आहे.
।।. सबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे लॉगीन वरून त्रुटी पूर्तता झाल्यानंतर काही तासांत शालार्थid ऑनलाईन Generate होईल. तसेच शालार्थ id आपल्या शाळेच्या शालार्थ प्रणालीतील लॉगीनवर देखील दिसेल. त्यानंतर शालार्थ प्रणालीतील मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करावयाची आहे.

मुलाखतीसह शिक्षक भरती संदर्भात सविस्तर सूचना व्यवस्थापनांना तसेच अभियोग्यताधारकांना देण्यात आलेल्या आहेत. काही मंडळी त्यातील काही सूचनाचा विपरित अर्थ लावून खोडसाळपणाने अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टता देण्यासाठी पुढील मुद्दे नमूद करण्यात येत आहे..

कोणत्याही आरक्षित प्रवर्गातील उमेदवार असेल आणि खुल्या जागांच्या निकषांची पूर्तता करीत असेल तर त्यांचा समावेश खुल्यात होणार आहे. गुणवत्तेनुसार खुल्या जागासाठी पात्र असल्यास खुल्या जागेवर व तसे पात्र नसल्यास आरक्षित प्रवर्गातील जागेवर

नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या जागा व आरक्षित प्रवर्गातील जागा या दोन्ही

प्रकारातील जागा उपलब्ध होणार आहेत.

२०१९ मधील पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीसह पदभरतीच्यावेळी देखील वरीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे व त्यानुसारच त्यावेळी भरती झाली आहे.

काही व्यक्ती अर्धवट तरतूद नमूद करून अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशा खोडसाळपणापासून सावध राहावे.

शिक्षक वअभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर १:१० या प्रमाणात उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पाठविण्यात येत आहे. याचबरोबर प्रत्येक अभियोग्यताधारकास देखील कमाल दहा संस्था निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. उमेदवारांना १० प्राधान्यक्रम आणि संस्थांनाही प्रत्येकी १० उमेदवार उपलब्ध करून द्यायचे असल्याने शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची संख्या ही जागांचे दहापट येणे अपेक्षितच नाही तसे झाल्यास एकूण उमेदवारापैकी केवळ १०% उमेदवार निवडले जातील व ९०% उमेदवारांना या प्रक्रियेतून काहीही लाभ होणार नाही. पूर्वीच्या भरतीमध्ये देखील अशाच प्रकारची कार्यपद्धती अनुसरली गेलेली आहे.

एखाद्या उमेदवाराची एकापेक्षा अनेक पदांवर मुलाखतीसह या निवड प्रक्रियेत निवड झाल्यास संबंधित व्यवस्थापनास गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देता येईल त्यामुळे कोणाचाही अधिकार डावलला जाणार नाही व पदेही रिक्त राहणार नाहीत.

व्यवस्थापनामार्फत होणाऱ्या ३० गुणदानाबाबतचे स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) प्रथमच करण्यात आलेले असून, त्यातील तरतुदी विचारात घेता भरतीमध्ये एकसूत्रपणा व पारदर्शकता राहून गुणवत्तापूर्ण भरती होईल याची खात्री वाटत असल्याची भावना अनेक अभियोग्यताधारकांकडून तसेच शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

• न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.

दिनांक ०७/०८/२०२४
शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पद भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील १६७९९ या जाहिरातीच्या रिक्त पदभरतीची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

आता 'मुलाखतीसह' पदभरतीची कार्यवाही करण्यासाठी व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ मध्ये एकूण ३० गुणांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र उमेदवाराची शिक्षक पदावर निवड करण्यासाठी शैक्षणिक संस्थास्तरावर विविध प्रकारची कार्यपद्धती अवलंबिण्यात येते. अशा परिस्थितीत शिक्षक पदभरतीमध्ये एकसुत्रता (Uniformity) राखण्याच्यादृष्टीने व उमेदवारांचे योग्यरित्या वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यासाठी मानक कार्यपद्धतीचा (SOP Standard Operating Procedure) अवलंब करणेत येत असून यासाठी शासन पत्र दिनांक ०६/०८/२०२४ अन्वये मानक कार्यपद्धती (SOP_Standard Operating Procedure) निश्चित केली आहे.

'मुलाखतीसह' पदभरती मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी/ इयत्ता अकरावी ते बारावी या गटातील शिक्षणसेवक/शिक्षकांच्या ४८७९ रिक्त पदांच्या पदभरतीसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. १०९६ व्यवस्थापनातील ४८७९ रिक्त पदांसाठी ७८०५ उमेदवारांची त्यांनी निवड केलेल्या प्राधान्यक्रमातील जास्तीतजास्त १० प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली आहे.

नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती, परंतु विविध कारणास्तव ११ शैक्षणिक संस्थांच्या एकूण ४३ पदासाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही. अशा शैक्षणिक संस्थातील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे.

सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी संबंधित शैक्षणिक संस्थेकडे संपर्क साधावा, निवडप्रक्रियेबाबत

जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांना सविस्तर सूचना देण्यात येत आहेत. जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवडप्रक्रिया पार पाडण्याचे दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

निवडप्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना काही अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

निवडप्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांचेकडे अर्ज करता येईल. उमेदवारांनी तक्रारीबाबत अर्ज करताना योग्य तो पुरावा कागदपत्र सोबत जोडावेत. शिक्षणाधिकारी यांनी अशा तक्रार अर्जाची शहानिशा तातडीने करावी व तीन दिवसात याबाबत संयुक्तिक निर्णय संबंधितांना कळवावा संबंधित शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून निराकरण न झाल्यास उमेदवारांनी संबंधित विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे आवश्यक त्या पुराव्यांसह व शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारअर्जासह अपील अर्ज दाखल करता येईल. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी तीन दिवसात अशा अपीलावर शहानिशा करून यथोचित निर्णय द्यावा व प्रचलित नियमाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी.

ही सर्व प्रक्रिया गुणवत्तापूर्ण व पारदर्शक रित्या पार पडेल यासाठी सर्वच घटकांनी सर्वंकष प्रयत्न करावेत. कोणत्याही बाह्य दबावास, प्रलोभनास बळी पडू नये

शिक्षक पदभरतीच्या 'मुलाखतीसह' या प्रकारातील सर्व साधारण गुणवत्ता यादीची सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरीदेखील या संदर्भात अभियोग्यता धारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committe) कडे pavitra2022groo@gmail.com या ई-मेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कुणीही ग्रुप ई-मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत. विहित मुदतीनंतर प्राप्त ईमेल तसेच

अन्य मार्गांनी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

याशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा इतर कोणत्याही माध्यमातून व्यक्तिगत संपर्क साधू नये.

मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व निवडीसाठी शुभेच्छा.
📌  मुलाखत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे


• न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.

Also Read 

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक
दिनांक ३०/०७/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र प्रणाली' अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील 'सर्वसाधारण' मध्ये रूपांतरित करून दिनांक २५/०६/२०२४ व दिनांक ११/०७/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्या मध्ये अनुक्रमे ३,१५० व १५६ अशा एकूण ३.३०६ रिक्त पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शासन निर्णय दिनांक ०६/०८/२००१ व ०७/१२/२००१ मधील तरतुदी विचारात घेऊन शासन पत्र दिनांक १४/०३/२०२४ नुसार 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण/सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक १२/०७/२०२४ ते १५/०७/२०२४ या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.

सदर प्राधान्यक्रम विचारात घेऊन मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

सदर यादीमध्ये एकूण ८७२ रिक्त पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या स्व-प्रमाणपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवडीकरिता शिफारशी होत आहेत. सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडून उमेदवारांच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करून नियुक्तीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदींनुसार समुपदेशन पद्धतीने नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

उर्दू माध्यमातील रिक्त पदांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा.

मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवडप्रक्रियेसाठी स्टेंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) विकसित करण्यात आली आहे व शासन मान्यतेच्या अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभियोग्यता
धारकांची निवड संस्थांकडून करण्यात येईल. यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे. 'माजी सैनिक' या समांतर आरक्षणातील १० टक्के रिक्त ठेवलेल्या जागांसाठी 'माजी सैनिक' यांच्यासाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.
न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.



दिनांक १२/०७/२०२४
शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

"मुलाखतीसह" पदभरती हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांनी पोर्टलवर जाहिराती दिलेल्या आहेत, अशा संस्थांना जाहिरातीतील विषय व आरक्षण विचारात घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवार उपलब्ध होणार आहेत.

शासन निर्णय दिनांक १३/१०/२०२३ नुसार रिक्त पदभरतीबाबत "विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल", अशी तरतूद आहे.

"मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह" पदभरतीतील दोन स्वतंत्र प्रकार असून जाहिरातीदेखील स्वतंत्र आहेत. त्यातील 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील उमेदवारांच्या शिफारशीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. आता मुलाखतीसह या प्रकारातील कार्यवाही सुरू करावयाची आहे. दोन्ही निवड प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आहेत. जाहिराती स्वतंत्र असल्याने त्यांची निवडप्रक्रियादेखील स्वतंत्रपणे होत असते.

उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेताना उमेदवार पात्र असल्यास "मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह" या दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत दिनांक ११/०२/२०२४ रोजीच्या शिक्षक पदभरतीबाबत करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे.

फेब्रुवारी २०२४ मध्ये मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारच्या पद भरतीचे प्राधान्यक्रम स्वतंत्रपणे घेण्यात आलेले आहेत. त्यावेळी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-२०२२) दिलेल्या व पदभरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत. अशा परिस्थितीत सर्वच उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेतल्यास त्यापैकी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले उमेदवार देखील गुणवत्तेनुसार पात्र असल्यास वरच्या गटासाठी निवडले जातील, यामुळे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांच्या संधी नाहक हिरावल्या जातील. यासाठी मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेले व त्यांच्या पात्रतेनुसार खरोखरच "मुलाखतीसह" या प्रकारातील वरच्या गटातील पदांसाठी इच्छुक असतील अशा उमेदवारांची पोर्टलवर इच्छुकता घेण्यास शासनाने दिनांक २८/०६/२०२४ अन्वये मान्यता दिली आहे.

"मुलाखतीसह" पदभरती या प्रकारात सहभागी होण्यास इच्छुक असतील केवळ अशाच उमेदवारांना मुलाखतीशिवाय प्रकारातील शिफारस झालेल्या पदापेक्षा वरच्या गटातील पदांसाठी मुलाखतीसह प्रकारातील प्राधान्यक्रमासाठी विचारात घेता येईल.

यासाठी ज्या उमेदवारांची 'मुलाखतीशिवाय' या प्रकारात शिफारस झालेले आहे, अशा उमेदवारांना "मुलाखतीसह" निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असल्यास लॉगिनवर त्यांनी तशी इच्छुकता दर्शविणे अनिवार्य आहे. जे उमेदवार 'मुलाखतीसह' निवड प्रक्रियेत सहभागी होण्यास कोणतीही इच्छुकता पोर्टलवर दर्शविणार नाहीत, अशा उमेदवारांचे फेब्रुवारी २०२४ मध्ये 'मुलाखतीसह' या प्रकारातील त्यांनी यापूर्वी नोंद केलेले प्राधान्यक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत याचीही उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सदरची सुविधा दिनांक १२/०७/२०२४ ते १५/०७/२०२४ या कालावधीसाठी उपलब्ध राहील.

वरील प्रकारे कार्यवाही केल्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनुसार केवळ इच्छुक उमेदवारच त्याच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होईल.२) मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेल्या उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही, त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियोग्यताधारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोग्यताधारकांना संधी मिळेल.

'मुलाखतीसह' या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध

करताना सविस्तर सूचना देण्यात येतील.

न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.

-//-

दिनांक १२/०७/२०२४
उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय या प्रकाराच्या उर्दू माध्यमातील शिक्षक पदभरतीसाठीच्या जाहिरातीमधील रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत.

१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरतीसाठी माहे फेब्रुवारी २०२४ मध्ये मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारासाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आले होते. त्यानुसार दिनांक २५/२/२०२४ व २५/६/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२. शासन पत्र दिनांक १४/०३/२०२४ अन्वये सदर जाहिरातीतील सामाजिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या प्रवर्गातील बिंदू अनारक्षित समजून खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारातून भरण्यात यावेत. या तरतुदी विचारात घेऊन रिक्त राहिलेल्या पदांबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानुसार वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या पदांसाठी सदर पदे खुल्या प्रवर्गात रूपांतरित केल्यानंतर पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेणे आवश्यक आहे.

३. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त पदांबाबत सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २५/०६/२०२४ रोजी सर्व माध्यमांची राखून ठेवलेली तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पदे वगळून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित फेरीतून भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

४. सध्या पदभरतीसाठी उपलब्ध असलेल्या आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदांचा तपशील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंद करताना संबंधित व्यवस्थापनांची मूळ जाहिरात त्यानंतर विविध फेरीमध्ये शिफारस करण्यात आलेली पदे व त्यानंतर सद्यःस्थितीत पदभरतीसाठी उपलब्ध असलेली रिक्त पदे विचारात घेऊन प्राधान्यक्रम नोंद करावेत.

५. उमेदवारांनी प्राधान्यक्रम भरण्यापूर्वी पोर्टलवरील दिनांक ०१/०९/२०२३, ०५/०२/२०२४ व वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांसाठीच्या सूचनांचे अवलोकन करून प्राधान्यक्रम लॉक करावेत.

६. उमेदवारांना त्यांचे लॉगिनवर प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यासाठी दिनांक १२/०७/२०२४ ते दिनांक १५/०७/२०२४ या कालावधीत सुविधा देण्यात येत आहे. जे उमेदवार प्राधान्यक्रम विहित मुदतीत लॉक करणार नाहीत, असे उमेदवार उर्दू माध्यमातील उर्वरित रिक्त पदांसाठी विचारात घेतले जाणार नाही.

७. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

८. प्राधान्यक्रम Generate करणे, lock करणे इत्यादींबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edupavitra२०२२@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधता येईल.

दिनांक ११/०७/२०२४
शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

'पवित्र प्रणाली' अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी 'मुलाखतीशिवाय' या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त पदे त्या त्या सामाजिक आरक्षणातील 'सर्वसाधारण' मध्ये रूपांतरित करून दिनांक २५/०६/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये ३,१५० रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे.

'मुलाखती शिवाय' हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक २५/०६/२०२४ रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगांमध्ये दर्शविण्यात आलेले होते व ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते.

. मुलाखती शिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक १८०/२०२४ व अन्य संलग्न याचिकांप्रकरणी दिनांक ०५/०७/२०२४ रोजी सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये मा. न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करणेवर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधीज्ञ यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे कळविण्यात आले होते.

समांतर आरक्षणातील रिक्त पदांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे, मूळ जाहिरातीतीलच असल्याने दिनांक २५/०२/२०२४ रोजी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे या समांतर आरक्षणातील रिक्त पदांच्या शिफारसीबाबत कार्यवाही करता येईल, तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत मा. उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही करता येणार नाही असे मत शासकीय विधीज्ञ यांनी व्यक्त केले आहे.

खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 'मुलाखतीशिवाय' समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मा. उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.

न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.

//

दिनांक २५/०६/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) -२०२२ नुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी दिनांक २५/०२/२०२४ रोजी ११,०८५ उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर ६,१८२ शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे.

वरील प्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत. सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

शासनाकडे सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक ०७/०६/२०२४ व १४/०६/२०२४ अन्वये माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले.

माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागविली. जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाकडे सादर केली त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रक विभागाने म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक २५/०६/२०२४ रोजी माजी सैनिकांची ४८४ पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे.

तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्व-प्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आली.

स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात शासन पत्र दिनांक १०/०६/२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

माजी सैनिक या प्रवर्गासाठी दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणमध्ये रूपांतरीत करून पदभरती करण्यात येत आहे.

शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली.

'रूपांतरित फेरीमध्ये एकूण ५.७१४ रिक्त पदांपैकी ३,१५० पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे. रिक्त राहणाऱ्या २.५६४ पदांच्या विषयांसाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत. शिफारस

होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे. इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील इंग्रजी माध्यम-७०२, उर्दू माध्यम-१५. हिंदी माध्यम-११. मराठी माध्यम-७६०, कन्नड माध्यम-

९. अशी एकूण- १,६५७ रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे .

इयत्ता सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमांची गणित-विज्ञान, गणित, विज्ञान- १,३८२, सामाजिक शास्र ३. भाषा-९८ अशी

एकूण- १,४८३ रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे.

इयत्ता नववी ते दहावी या गटातील सर्व माध्यमांतील १० रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे. मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाचाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४ व २५८५/२०२४ मध्ये दिनांक ०७/०३/२०२४ रोजी

दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

तदनंतर, मा. उच्च न्यायालयात शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहेत. यात मा. उच्च न्यायालय खंडपीत नागपूर येथे याचिका क्रमांक २७८४/२०२४, २७५२/२०२४ व अन्य याचिका दाखल आहेत. सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथील दाखल याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.

शिक्षक पद भरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committee) कडे pavitra2022groc@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत उमेदवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी, संस्थांनी संघटनांनीही या ईमेलवर मेल पाठवू नयेत, पाठविल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील, वाशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये विहित मुदतीनंतर प्राप्त ई-मेल तसेच अन्य मार्गानी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणाली द्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबाबत

कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये. सदरच्या पदभरती प्रक्रियेत मुलाखती शिवाय भरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे, राखून ठेवलेली

पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे.

स्व-प्रमाणपत्रांमध्ये चुकीची अर्धवट / अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये झाली

नसेल, अशा व अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्व-प्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

नव्याने जाहिराती घेऊन निवडप्रक्रिया करताना स्व. प्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. 'माजी सैनिक' या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी 'माजी सैनिक' यांचेसाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.

निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे.

न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल. याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.

दिनांक २१/०६/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


दिनांक २१/०६/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक २१/०६/२०२४ ची मुदत जिल्ह्यांना दिलेली होती.

त्यानुसार जिल्हांकडून त्यांना आवश्यक माहिती प्राप्त झाली झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून, पदे त्या त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक २०/०६/२०२४ रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित विभागाकडे सादर केला आहे.

सदर प्रस्तावास त्वरेने मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडूनही मा.अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आली आहे व त्याबाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे.

रूपांतरण यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय तांत्रिक बाबींची तजवीज ठेवलेली आहे.

एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे.

काही मंडळी दिशाभूल करणारे संदेश समाज माध्यमांवर प्रसारित करून अभियोग्यताधारकांमध्ये निराशेचे वातावरण तयार

करीत आहेत. त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करावे.

. बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.

दिनांक १८/०६/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

हे ही वाचा - 

समांतर आरक्षणाबाबत शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये (समांतर आरक्षणाशिवाय) गुणवत्तेनुसार रूपांतरित करून भरण्याच्या तरतुदी आहेत, त्यानुसार कार्यवाही करण्यात येते.

माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रूपांतरित करावयाच्या जागांसाठी सैनिक कल्याण बोर्ड कडे आज दिनांक १८/०६/२०२४ रोजी आयुक्तालयातील संबंधित उपसंचालक यांनी ना हरकत प्रमाणपत्रबाबत पाठपुरावा करण्यासाठी भेट दिली आहे. तसेच आयुक्त शिक्षण यांनी देखील संचालक सैनिक कल्याण बोर्ड यांच्याशी आज चर्चा केली आहे. सैनिक कल्याण बोर्ड त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेत असून सर्व जिल्ह्यांची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दिनांक २१/०६/२०२४ ची अंतिम मुदत त्यांनी जिल्ह्यांना दिलेली आहे.

शासन पत्र दिनांक १४/०६/२०२४ नुसार उपलब्ध भूकंपग्रस्त उमेदवाराबाबत पोर्टलवरील अंतर्गत कार्यवाही तपासून पूर्ण झाली आहे.

ही रूपांतरण फेरी घेत असताना सर्व तांत्रिक बाबींची, कायदेशीर तरतुदींची पूर्तता करणे अनिवार्य असते त्यामुळे शासनाने देखील शासन स्तरावरील अन्य विभागांशी समन्वय करून या संदर्भातील आदेश दिनांक ७ जून रोजी व १४ जून रोजी निर्गमित केले आहेत. ते आदेश निर्गमित झाल्यानंतर क्षेत्रीय स्तरावरील कार्यवाही त्या आदेशातील निर्देशांनुसार तातडीने सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात दैनंदिन पाठपुरावाही करण्यात येत आहे.

संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त होतात यादी जाहीर करण्याची कार्यवाही करण्याची तजवीज ठेवलेली आहे. बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.


हे ही वाचा - 

दिनांक १७/०६/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शासनाने दिनांक ०७/०६/२०२४ च्या पत्राने माजी सैनिक या समांतर आरक्षणातील माजी सैनिक यांचेसाठी जाहिरातीतील जागा त्या त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून भरण्यासाठी मान्यता दिली. त्यापत्रामध्ये दिलेल्या सूचनेनुसार संबंधित सक्षम अधिकारी यांचे कार्यालयास दिनांक १०/०६/२०२४ रोजी प्रस्ताव देण्यात आला तसेच दिनांक १४/०६/२०२४ पर्यंत पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावाही करण्यात आला. संबंधित विभागाने देखील त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाकडून माजी सैनिक व शहीद सैनिकांचे वारस यांचेतून शिक्षक पदासाठी पात्र असणाऱ्या माजी सैनिक या समांतर आरक्षणास पात्र असणाऱ्या उमेदवारांची माहिती मागविलेली आहे.

शासनाने दिनांक १४/०६/२०२४ च्या पत्राने त्या त्या सामाजिक प्रवर्गाअंतर्गत भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली आहे. गुणवत्तेनुसार आरक्षण व विषयनिहाय पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबत पुनश्च खात्री करून सदर रिक्त जागांपैकी १० टक्के जागा राखून उर्वरित प्रकल्पग्रस्त या समांतर आरक्षणातून व तदनंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध होत नसल्यास त्या त्या सामाजिक प्रवर्गातील

अन्य उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्याबाबत निर्देश आहेत त्यानुसार आयुक्तालयस्तरावरील अंतर्गत कार्यवाही सुरू आहे. वर नमूद केल्याप्रमाणे दोन्ही प्रवर्गाच्या समांतर आरक्षणाच्या संदर्भात काही अटींची पूर्तता केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश असल्याने ती कार्यवाही जलद गतीने पूर्ण करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित रिक्त पदांसाठी व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या याद्यांसंदर्भात कोणताही कायदेशीर विवाद निर्माण होऊ नये यासाठी शासन आदेशामधील अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. दिनांक ७ जून व दिनांक १४ जून रोजी आदेश प्राप्त झाल्यानंतर दररोज या संदर्भात पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच याद्या प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने पोर्टल वरील आवश्यक तांत्रिक चाचणी देखील सोबत करण्यात येत आहे.

वरील अटींची पूर्तता तसेच या संदर्भातील विविध परस्पर विरोधी मागण्या या सर्वांसंदर्भात सुयोग्य कार्यवाही प्रशासकीय स्तरावरून केली जात असतानाही या गुणवत्ता यादी संदर्भात काही घटकांकडून अभियोग्यताधारकांमध्ये नैराश्याचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे ही बाब योग्य नाही.

. बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.

//

हे ही वाचा - 
दिनांक १०/०६/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झाली आहे.

दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती बाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल.

दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे.

त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे.

समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये.

बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल.

हे ही वाचा -
👇

दिनांक ०७/०६/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, कोकण व नाशिक विभागातील शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांमुळे लागू असलेल्या आचारसंहिते मधून शिक्षकपद भरतीस मा.भारत निवडणूक आयोगाकडून सूट मिळवण्या संदर्भातील कार्यवाही राज्य शासनाकडून सुरू आहे.

शिक्षक भरती संदर्भात व पवित्र पोर्टलचे अपडेट प्राप्त करण्यासाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समूहात सामील होऊ शकता


दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयांप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत परवानगी दिली आहे. तथापि, आचारसंहितेतील सुटीबाबत निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्व तयारी करण्यात येत आहे. कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये.

बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल.

-//-


दिनांक २६/०५/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

दिनांक २६/०५/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून मा. भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती.

दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक २४/०५/२०२४ अन्वये निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. दिनांक २४/०५/२०२४ पासूनच या क्षेत्रासाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असे आयोगाच्या प्रेस नोट मध्येच स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे.

समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे. त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे.

समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रुपांतरीत करून भरण्याच्या प्रस्तावास शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आदर्श आचारसंहितेमधून वरील नमूद प्रमाणे यापूर्वीची निवड यादी व रूपांतरित जागा संदर्भातील कार्यवाही करण्यास मा. भारत निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळविण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत.

काही मंडळी अभियोग्यताधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहेत हे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयत्न केले जात असताना अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची दिशाभूल करणे, चुकीची माहिती पसरवणे व आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे. ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.

-//-


दिनांक २०/०५/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

. दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांचेस्तरावर सुरु आहे. आज अखेर प्राप्त माहितीनुसार ४४७४ अभियोग्यता धारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. त्यातील ४०९३ उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत.

राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक २०/०५/२०२४ रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक पद भरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.

. विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबवण्यात आली आहे. त्याच प्रकारे शासन निर्णय दिनांक 6 जुलै 2023 मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्ता पूर्ण पद्धतीने राबवण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे. या प्रकारातील पद भरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी एकूण 30 गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती (Standard Operating Procedure) तयार करण्यात येत आहे.

समांतर फेरी, न्यायिक प्रकरणे व तत्सम बाबीसंदर्भात शासन स्तरावरून काही बाबींवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासंदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल.

समाज माध्यमां‌द्वारे काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात. कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्यांची खात्री करून माहितीची विश्वासार्हता पडताळावी.

ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्या वेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.

दिनांक १४/०५/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

राज्यातील विधान परिषदेच्या कोकण विभागातील शिक्षक व पदवीधर तसेच नाशिक विभागातील शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक ०८/०५/२०२४ रोजी प्रसिद्ध झाला होता व तात्काळ आदर्श आचारसंहिता लागू झाली होती त्यातून शिक्षक पदभरती साठी सूट देण्यासाठी शासनाकडे दिनांक १०/०५/२०२४ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

दरम्यान सदर निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे असे भारत निर्वाचन आयोगाकडील दिनांक १४/०५/२०२४ रोजीच्या प्रेस नोट मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक संबंधी आदर्श आचारसंहितेचा अंमल आता लागू राहणार नाही.

त्यामुळे शिक्षक नियुक्ती संदर्भातील यापूर्वी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात सर्व शिक्षणाधिकारी यांना स्प्रेडशीटद्वारे (Google Sheet) माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून याचा आढावा एक आठवड्यात आयुक्त स्तरावरून घेतला जाणार आहे.

शिक्षक भरती गतीने व्हावी या दृष्टीने वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून या संदर्भात राज्यस्तरावरून दिनांक १०/०५/२०२४ रोजी सर्व शिक्षणाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये काही जिल्ह्यांनी त्यांच्याकडील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेबाबत अडचणी उपस्थित केल्या होत्या. त्या सोडविण्यासाठी शासनाकडे

अडचणींबाबत करावयाच्या संभाव्य उपाययोजनांचा प्रस्ताव पाठवण्यात येत आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने शासन प्रशासन स्तरावरून अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू आहेत. त्याबाबत ठळक निष्पत्ती घडेल त्या त्या प्रमाणे बुलेटीन निर्गमित केले जात आहे.

अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक वेगवेगळे मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. भरती प्रक्रिया न्याय्य व कोणत्याही खोडसाळपणाला थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहावे.

ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.

हे ही वाचा -
👇


दिनांक २६/०४/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शिक्षक भरती २०१७ साठी सन २०१९ मध्ये जाहिरात दिलेल्या पैकी ज्या जिल्हा परिषदेच्या ५०% रिक्त पद भरतीची कार्यवाही झाली आहे त्या पदभरतीच्या वेळी राखून ठेवण्यात आलेल्या ५० % जागाबाबत शासनाकडे पुढील प्रक्रिया करण्यास आवश्यक प्रस्ताव व माहिती सादर करण्यात आली आहे. यावर शासन स्तरावरून निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यात येईल.

अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम अथवा निराशा निर्माण होईल असे काल्पनिक मुद्दे काही मंडळी रोज उपस्थित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. भरती प्रक्रिया न्याय्य व कोणत्याही खोडसाळपणाला थारा न देता पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे संभ्रम अथवा निराशा पसरवणाऱ्या प्रवृत्तींपासून सावध राहावे.

ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.



दिनांक २५/०४/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

दिनांक २५/०२/२०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवड यादीतील अभियोग्यताधारकांना यथाशीघ्र नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भात मा. केंद्रीय निवडणूक आयोग यांनी प्रत्यक्ष मतदान झालेल्या ठिकाणातील नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यास दिलेली परवानगी विचारात घेता, मा प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग यांना विनंती करण्यात आली असून त्याप्रमाणे सर्व संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांचेकडून निर्देश दिले जात आहेत.

पहिल्या फेरीतील कार्यवाही सुरू असतानाच पुढील निवड फेरी घेण्याच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून प्रशासकीय प्रक्रिया करण्यात येत आहे. पुढील फेरीमधील माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व तत्समपदातील वेगवेगळ्या घटकांच्या मागण्या विचारात घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही भविष्यात कोणतीही न्यायालयीन गुंतागुंत होऊ नये याची योग्य ती दक्षता घेऊन करण्यात येत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन पुढील निवड फेरी सुद्धा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

सन २०१७ भरती मधील दिनांक २९/११/२०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रकरणांमधील स्थागनादेश उठवणेच्या दृष्टीने सिविल एप्लीकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे.

उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियम याची जुजबी माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे पासून सावध राहावे.

ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिन द्वारे माहिती दिली जाईल.

हे ही वाचा -
👇

दिनांक १९/०४/२०२४

शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र पोर्टल मार्फत दिनांक २५/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती.

दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा- २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले.

तथापि, या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.

यासंदर्भात मा. भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणेस परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक १९/०४/२०२४ अन्वये या

कार्यालयास कळवणेत आले आहे.

त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.

दिनांक ०५/०४/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

• शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ नुसार शिक्षक पदभरतीची पहिली शिफारस यादी - दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध केल्यानंतर ज्या उमेदवारांना स्वतःच्या निवडीबाबत काही शंका असल्यास, त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे तक्रार/निवेदन करण्याची सुविधा देण्यात आली होती. अधिकृत ईमेल आयडीवर विहित नमुन्यात प्राप्त अर्जाची छाननी जवळपास पूर्ण झाली आहे,


• दिनांक ०४/०४/२०२४ अखेर विहित नमुन्यात प्राप्त तक्रार अर्जावर कार्यवाही करून उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा निर्णय दिनांक ०२/०४/२०२४ पासून कळविण्यात येत आहे. दिनांक ०४/०४/२०२४ अखेर पर्यंत निर्णय कळविलेल्या अर्जाची संख्या ४५३ इतकी आहे. तसेच अन्य ईमेलवर वेळोवेळी योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे.


• उर्वरित तक्रार अर्जावर पुढील काही दिवसांत समितीचा निर्णय कळविण्यात येणार आहे.


लोकसभा २०२४ च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे. यास्तव निवडणूक आयोगाकडून शिक्षक पदभरतीबाबत परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.


महत्त्वाच्या बाबींची माहिती "न्यूज बुलेटीन" द्वारे आवश्यकतेनुसार प्रसारित केली जाईल.

हे ही वाचा -

दिनांक १४/०३/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


पवित्र पोर्टल द्वारे दिनांक २५.२.२०२४ रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादीसंदर्भात याचिका मा. उच्च न्यायालय मुंबई व मा. खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झालेल्या आहेत.


या संदर्भात मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादाअंती मा. उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत. (प्राप्त दि. १२ मार्च २०२४)


न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार पुढील कार्यवाही होईल.


तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जाची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळविण्यात येत आहेत.


तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ई-मेल ऍड्रेस चाच वापर करावा.


माननीय न्यायालयाचे आदेश पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा



दिनांक २८/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

• मुलाखतीशिवाय पदभरतीच्या दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या या निवड यादीमध्ये आरक्षित प्रवर्गातील अनेक अभियोग्यताधारक खुल्या प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत. ज्या अभियोग्यताधारकांनी निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर आरक्षणाच्या सवलतींचा लाभ घेतला आहे ते त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गातून निवडले गेलेले आहेत. त्यामुळे दोन्हीकडे आरक्षित प्रवर्गातील अभियोग्यताधारकांना त्यांच्या गुण व अर्हता याचा एकत्रित विचार करून सामावून घेण्यात आलेले असल्याने कोणत्याही आरक्षित प्रवर्गावर अन्याय झालेला नाही.

• खुल्या प्रवर्गातून निवडले जात असताना संबंधित अभियोग्यताधारकाने आरक्षणाच्या कोणत्याही सवलतीचा लाभ घेतलेला असणे अनुज्ञेय नसल्याचा निर्वाळा मा सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे दिलेला आहे. याबाबत केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे ही धोरण तेच आहे. याबाबी विचारात घेऊन संपूर्ण प्रक्रिया केली आहे.

• आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतलेले आणि आरक्षणाचा लाभ न घेतलेले यापैकी आरक्षणाचा लाभ न घेतलेल्या उमेदवारांचा वरील न्यायनिवाडे व शासन धोरणानुसार खुल्या प्रवर्गातून निवडीचा धिकार आहे हे पुनरुदृत करण्यात येत आहे.

• निवड यादी चे अवलोकन केले असता आरक्षित प्रवर्गातील पात्र अभियोग्यताधारकांचा खुल्या प्रवर्गात झालेला समावेश लक्षणीय असल्याचे दिसून येईल.


हे ही वाचा 👇

दिनांक २७/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्यातील मुलाखतीशिवाय पदभरती याप्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरी देखील यासंदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे edupavitra2022@gmail.com या ई-मेलवर तक्रार अर्ज सादर करता येईल. त्याचा नमुना विहित करण्यात आला असून News Bulletin मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या नमुन्यात आपला अर्ज त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. केवळ या ईमेल ऍड्रेस चाच वापर करावा. त्या ईमेल ऍड्रेसवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत. तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व्यक्तिगत व्हॉटसअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये.

शिक्षक भरती संदर्भात व पवित्र पोर्टलचे अपडेट प्राप्त करण्यासाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समूहात सामील होऊ शकता

जिल्हा परिषदेकडील बिंदुनामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करुन भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या १० टक्के जागांबाबत संबंधित जिल्हयांकडून अहवाल घेण्यात येत आहेत, काही जिल्हयाचा अहवाल अप्राप्त आहे त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रिक्त १० टक्के जागांबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल.

अनुसूचित जमातीच्या पेसा क्षेत्रातील १३ जिल्हयातील रिक्त जागांबाबत उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी यापुर्वीच पूर्ण झाली आहे. परंतु मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे विशेष अनुज्ञा याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची पदभरती पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदांवर रूजू होता येईल तसेच पेसा क्षेत्राबाबत मा. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. यास्तव अनुसूचित जमाती प्रवर्गात नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्हयाकडे उपस्थित राहन करून घ्यावी.

भाषा विषय-इंग्रजी साठी निवडलेल्या या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवावयाचे आहेत. उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू शिक्षक उपलब्ध आहेतच. केवळ एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होतोय, त्यामुळे भाषा विषय अथवा सेमी इंग्रजी यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नाही.

साधन व्यक्ती या पदासाठी शासन पत्र दिनांक २५/०१/२०२४ नुसार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेस्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील यथोचित निर्णय घेण्यात येईल.

याभरतीमध्ये रिक्त राहिलेली पदे (माजी सैनिक, अंशकालीन इ.) याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेथून पुढे टप्पा-२ मधील जाहिराती असतील.

शासन निर्णय दिनांक १०/११/२०२२ मधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येतील. पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील.

Also Read 👇



Also Read 👇

पवित्र पोर्टल शिक्षक भरती सठी लागणारे कागदपत्रे खालील प्रमाणे

टिप :- पात्र उमेदवारांनी पुढिलप्रमाणे मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी उपल्बध करून दयावी व एक संच झेरॉक्स आपल्या पासपोर्ट साईज फोटोसह सादर करणे आवश्यक राहील.

चेक लिस्ट

कागदपत्रांचा तपशिल

- पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्व प्रमाणपत्राची प्रत (Certified copy) मूळ प्रत फोटोस्वाक्षरीसह शैक्षणिक अर्हता

एस.एस.सी. गुणपत्रक (दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)

एस.एस.सी. प्रमाणपत्र (दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)

एच.एस.सी. गुणपत्रक (दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)

एच.एस.सी. प्रमाणपत्र (दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)

पदवी परीक्षा गुणपत्रक (संबधित विषयात किमान ५०% गुर्णासह उतीर्ण)

पदवी परीक्षा प्रमाणपत्र ( दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)

पदव्युत्तर परिक्षा गुणपत्रक ( दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)

पदव्युत्तर परिक्षा प्रमाणपत्रक ( दि.१२/०२/२०२३ पूर्वीचे)

व्यावसायीक अर्हता१२/०२/२०२३ पूर्वीची

| शिक्षणशास्त्र पदविकागुणपत्रक D.ed/D.L.Ed/D.T.Ed/T.C.H.

● शिक्षणशास्त्र पदविकाप्रमाणपत्र D.ed/D.L.Ed/D.T.Ed/T.C.H.

शिक्षणशास्त्र पदवी गुणपन्नक B.Ed/B.Led/B.sc. Ed.

शिक्षणशास्त्र पदवी प्रमाणपत्र B.Ed/B.Led/B.sc.Ed.

एम.एस.सी. आय. टी. प्रमाणपत्र

शिक्षकपात्रता परीक्षापेपर-१ (T.E.T.) प्रमाणपत्र (इ.१ते ५वी)

केंद्रीय परिक्षा पात्रता परिक्षा पेपर-1 (CTET) प्रमाणपत्र (इ.१ते ५वी)

केंद्रीय परिक्षा पात्रता परिक्षा TET-२ (भाषा- कोणताही विषय उत्तीणं, गणित-गणित व विज्ञान पेपर उत्तीर्ण आवश्यक)

केंद्रीय परिक्षा पात्रता परिक्षा CTET-२ (भाषा- कोणताही विषय उत्तीर्ण, गणित-गणित व विज्ञान पेपर उत्तीर्ण आवश्यक)

२ अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक (T.A.I.T.) गुणपत्रक/यादी

इतर आवश्यककागदपत्र

जातीचे प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र (ST अनिवार्य आहे)

नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (SC,STवगळून)

लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र

शाळा सोडल्याचा दाखला

जन्म प्रमाणपत्र (शालांत प्रमाणपत्र/शाळा सोडलेचा दाखला (दि.१६/१०/२०२३ रोजीचे वय)

महाराष्ट्रातील रहिवाशी असलेचा अधिवास दाखला (सोमा भागातील ८६५ गावातील असल्यास रहिवाशी दाखला)

आधारकार्ड / पासपोर्ट/पॅनकार्ड/ड्रायव्हींग लायसन्स

अपंगत्वाचा दाखला (संगणकीय प्रणाली नार्फत बितरीत प्रमाणपत्र) (किमान ४०% दिव्यांग)

माजी सैनिक दाखला

खेळाडू प्रमाणपत्र (विभागीय क्रिडा उपसंचालक यांचा पडताळणी अहवाल अथवा प्रस्ताव दाखला पोच पावती)

प्रकल्पग्रस्त दाखला

भूकंपग्रस्त दाखला

अनाथ प्रमाणपत्र

आत्महत्या त्रस्त शेतकरांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र

१९९१ जनगणना/१९९४ निवडणुक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र

अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र (सक्षम प्राधिकारी तहसिलदार प्रमाणपत्र)

विवाहानंतर नावात बदल असल्यास राजपत्र

हमीपत्र (सादर केलेले दस्तऐवज वैद्य असलेबाबतचे हमीपत्र)

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रायगड जिल्हा परीषद, अलिबाग,

दिनांक २६/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

• पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
• सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत, पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या अभियोग्यताधारक यांना त्याच्याकडून स्वतंत्रपणे कळविले जाईल त्यानुसार सर्व संबंधितांनी त्या त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करावे.
• व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होवू नये यास्तव आरक्षणाचे कटऑफ व विषयाचे कटऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरवातीस दर्शविण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांची स्थिती पाहणे सुकर झाले आहे.
• सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे व अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरी देखील यासंदर्भात अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ई-मेलवर विहित नमुन्यात (लवकरच पुरविला जाईल) अर्ज करून त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. केवळ त्या ईमेल ऍड्रेस चाच वापर करावा. त्या ईमेल ऍड्रेसवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत. तसेच कोणत्याही अधिका-यांच्या व्यक्तिगत व्हॉटसअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये.
• खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कटऑफ खुल्या पेक्षा काही ठिकाणी जास्त आल्या बाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करीत आहेत
• या संदर्भात पुढील प्रमाणे वस्तुस्थिती आहे. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुज्ञा याचिका क्र. ११२५४/२०१९ मधील सिविल अर्ज क्र. ८२५९/२०१९ मध्ये दि. २४/१०/२०१९ रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता धारण करण्यामध्ये त्या त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार अनारक्षित (खुला) प्रवर्गासाठी पात्र ठरत नाहीत.
• केंद्र शासनाच्या दि ०१/०७/१९९८ व दि. ०४/०४/२०१८ च्या ज्ञापनामध्ये देखील अशाप्रकारे सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे. राज्यशासनाच्या विविध प्रकारच्या उदा. तलाठी भरती ग्रामविकास विभागाकडील विविध पदांच्या पदभरतीमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व इतर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातून अन्यथा त्या त्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरविण्याची तरतूद आहे.या व अन्य 
    प्रचलित तरतुदी विचारात घेण्यात आल्या आहेत. या शिक्षकभरतीसाठी टीईटी ही अर्हता परीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाले असेल तर जरी त्यांना टी ए आय टी या परीक्षेत जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे वरील विविध न्याय निवाडे व शासनाचे आदेशानुसार त्यांच्या त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले गेलेले आहे. त्यामुळे कट ऑफ मध्ये हा फरक दिसतो परंतु तो पूर्णपणे विधीसंमत आहे.

• मराठी, उर्दू वा अन्य माध्यमांमध्ये इ.६ वी ते इ ८ ची/इ ९ वी ते १० वी/इ ११ ते इ १२ वी या गटातील भाषा विषयाच्या अभियोग्यताधारकाची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेतील त्याची पदवी/पदव्युत्तर पदवी ज्या विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमात संबंधित अभियोग्यताधारकांची निवड होवू शकते.

• मराठी, उर्दू वा अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजी साठी अभियोग्यताधारक यांची शिफारस करताना संबंधित अभियोग्यताधारक यांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातील आवश्यक ही बाब विचारात घेवून करण्यात आलेली आहे. यास्तव कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी संबंधित अभियोग्यताधारकांची निवड होवू शकते.

• गुणवत्तेनुसार अभियोग्यताधारक यांचे निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला वा स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उलपब्ध असेल तर अभियोग्यताधारक यांची शिफारस होते त्यामुळे काही विषयांच्या बाबतीत कटऑफ गुण कमी आल्याचे दिसत आहे.

• काही प्रवर्गाच्या बाबतीत जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असेलेल्या पदांपेक्षा अधिक पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दिसून येत आहे.

• मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील योग्य अभियोग्यताधारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याचे दिसून येत आहे. समांतर आरक्षणाबाबत प्रचलित तरतूदी विचारात घेवून शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित निर्णय घेण्यात येईल. मुलाखतीसह पदभरती पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांना मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद 

• येथील याचिका क्रमांक ७६२७/२०२३ मधील आदेशानुसार प्रचलित तरतूदी विचारात घेता १:१० या मर्यादेत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. वाचाबत वेळोवेळी अपडेट देण्यात येतील.

• वस्तुस्थितीची व्यवस्थीत माहिती न घेता अभियोग्यताधारकांना संभ्रमित करून याचिकांसाठी वर्गणी गोळा करणे हा एक आक्षेपार्ह प्रकार या भरतीप्रकिया दरम्यान दिसून आलेला आहे. याचिका करणे हा जरी हक्क असला तरी तत्पूर्वी कायद्यातील तरतुदींची पडताळणी स्वतः अभियोग्यताधारकानी करावी. सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्याची शहानिशा करूनच पुढील निर्णय घ्यावेत.
Also Read 👇

दिनांक २२/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

• पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरतीबाबत समाजातील विविध घटकांतून आलेल्या सर्व निवेदनांचा, सूचनांचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. योग्य व प्रचलित शासन नियमांशी सुसंगत असणाऱ्या सर्व सूचनांची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

• नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. शिफारसपात्र उमेदवारांची ज्या व्यवस्थापनाकडे शिफारस करण्यात येईल त्या व्यवस्थापनामार्फत सर्व मूळ कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत.

• स्वप्रमाणपत्रात नमूद केल्यानुसार आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे पडताळणीसाठी अभियोग्यताधारकांनी, नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निश्चित मुदतीत उपलब्ध करून द्यावयाची आहेत. ती सर्व कागदपत्रे तातडीने तयार ठेवावीत.

• पडताळणीसाठीच्या आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी पवित्र पोर्टलवरील दिनांक १/०९/२०२३ व इतर मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करावे.

Also Read 👇

पवित्र पोर्टल शिक्षक भरती-2022

मुलाखतीचे दोन भाग करणे करणे:-

१) मुलाखतीच्या एकूण ३० गुणांचे विभाजन करणे.

२) १५ मार्क - डेमो + १५ मार्क मुलाखत - ३०

४) सुरुवातीला मुलाखत होईल

५) शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी होईल.

६) मूळ कागदपत्रे तपासणी करावी

७) दोन अँटेस्टेड शैक्षणिक कागदपत्रे घेणे.

८) अनुभव प्रमाणपत्र.

९) स्वतः विषयी, अनुभवाविषयी, वर्तणूक, पेहराव, नम्रता, विषयाच्या संदर्भात प्रश्न विचारणे, सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारणे- शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, शाळा प्रगतीबाबत काय करू शकतात, उपक्रम, कल्पना, विद्यार्थीसंख्या वाढविण्याबाबत काय करू शकतात, खाजगी शाळा आणि संस्थांच्या शैक्षणिक कामाबाबत

मत विचारणे,

१०) अध्यापनाचा डेमो - १५ मार्क

११) पाठ निरीक्षण करणे

१२) विषयाचे ज्ञान व शैक्षणिक साहित्य वापर

१३) विद्यार्थ्यांना समजून सांगण्याची पद्धती.

१४) तयारी केलेल्या पाठाचे निरीक्षण-संस्था देईल

१५) फलकलेखन व मूल्यमापन

१६) कोणताही घटक अध्यापनासाठी देता येईल.

१७) वर्ग नियंत्रण व हालचाल.

१८) हेतूकथन व विविध कौशल्य

१९) २० मिनिटांचा डेमो घेणे.

२०) पॅनेल मुलाखतीसाठी पॅनेल बनवावे लागेल..

२१) अभियोग्यता चाचणीचे गुण फक्त प्राधान्यक्रमासाठी असतील.

२२) एका जागेसाठी किती उमेदवार असणार : ३

२३) मुलाखत अध्यापन कौशल्य हे एकूण ३० गुणांसाठी आहे.
१५+ १५ = ३०. गुण

A-160

B-159

C-158

२४) कमी मार्काच्या उमेदवाराची निवड केल्यास त्याचे कारण शाळा समितीस लिखित स्वरूपात शासनाला दयावे लागेल.


२५) निवड झालेल्या उमेदवारांची गुणयादी पवित्र पोर्टलवर लावण्यात येईल.

२६) मुलाखतीसाठी - ३ उमेदवार येतील तर वेटींग लिस्टमध्ये ७ उमेदवार असतील.

9:90

२७) निवड केलेल्या उमेदवारास ७ दिवसांत हजर राहावे लागेल.

Also Read 👇
अमृत महोत्सव
कार्यालय-शिक्षणाधिकारी (मा.) 
जिल्हा परिषद, नांदेड. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ, नांदेड-

Office of the Education Officer (Sec.) Zilha Parishad, Nanded Near Chhatrapati Shivaji Maharaj Statue, Nanded-431602

431602. 1/893 जा.क्र. जिपना/शिअ (मा.) मा-7/2024/

दिनांक- /2024. 1

9 FEB 2024

प्रति,

अध्यक्ष / सचिव, शाळा व्यवस्थापन, मार्फत मुख्याध्यापक, अनुदानित / अंशतः अनुदानित/ विना अनुदानित जिल्हा नांदेड.

विषयः- पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीकरिता विहित कालावधी जाहिरान नोंद न केलेल्या व्यवस्थापनांकरिता आवश्यक कार्यवाही करणेबाबत.

संदर्भ:- मा. शिक्षण सहसंचालक, (प्रशासन, अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय, म.रा.पुणे) यांचे पत्र क्र.प्राथ १०६/ उर्व व्यस्था/ पवित्र पोर्टल / २०२४/१००८, दि.०७ फेब्रुवारी २०२४.

उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, राज्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग्यता चाचणी-२०२२ नुसार कार्यवाही करण्यात येत आहे. याकरिता दिनांक १६/१२/२०२३ ते २२/०१/२०२४ या कालावधीकरिता पवित्र पोर्टलवर शिक्षकांची रिक्त पदांची जाहिरात देण्याची सुविधा देण्यात आलेली होती. दि.२२/०१/२०२४ पर्यंत पोर्टलवर आरक्षण विषयक माहितीची नोंद केलेल्या व्यवस्थापनांना पहिल्या टप्यातील रिक्त पद भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे.

तथापि संच मान्यता, बिंदुनामावली / रोस्टर अद्यावत नसल्याने, किंवा अन्य कारणास्तव काही व्यवस्थपनांना सदर विहित कालावधीत पोर्टलवर जाहिरात नोंदविणे शक्य झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

तरी जिल्ह्यातील अशा व्यवस्थपनांना भरतीच्या पुढील प्रक्रीयेमध्ये सहभागी होण्यासाठी आपलेस्तरावरुन आवश्यक ते नियोजन करुन सदर इच्छुक व्यवस्थापनांचे जाहिराती विषयक कार्यवाहीची पुर्व तयारी करण्यात यावी. जिल्ह्यातील संस्थेमध्ये / शाळेमध्ये शिक्षक पदे रिक्त आहेत. सदरील शिक्षक पदे रिक्त राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी आपणांवर राहील.

तसेच सोबत दिलेल्या विहित नमुन्यात आपल्या बिंदुनामावलीची सद्यस्थितीत नमुद करुन या कार्यालयास तात्काळ सादर करावी.

सोबतः-१. रिक्त पदांची तालुकानिहाय शाळांची यादी. २. बिंदुनामावलीची सद्यस्थितीचा विहित नमुना

प्रत माहितीस्तव सविनय सादरः-

शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद, नांदेड

१. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे. २.मा.शिक्षण सहसंचालक, (प्रशासन, अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे. ३. मा. शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग, लातूर.


पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे
how to check Maha Teacher Recruitment Vacancy

वरील एकत्रित जाहिराती या लिंकवर क्लिक केल्यानंतर आलेल्या वेब पेज वर Download या tab वर क्लिक करून Approved

Advertisement with Interview Phase1 आणि Approved

Advertisement without Interview Phase । अशा प्रकरचे जाहिरातीचे सदर येईल. त्यावरून डाउनलोड करता येतील


लिंक:-👉  Link 

• पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना व User Manual देण्यात आलेले आहे प्राधान्यक्रम जनरेट करून घ्यावेत. त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा अधिक वाचा 

लिंक:-👉  Link 

दिनांक : २३/०१/२०२४

व्यवस्थापनांसाठी सूचना

स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना


१. स्थानिक स्वराज संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १५/०१/२०२४ पर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीतजास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत दिनांक २२/०१/२०२४ पर्यंत वाढविण्यात आली होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे.

२. वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया दिनांक २४/०१/२०२४ पर्यंत पूर्ण करता येईल.

३. विभागीय शिक्षण उपसंचालक/ शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)/शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात व तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णय दिनांक ७/२/२०१९ मधील तरतुदींनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धीस देण्याची कार्यवाही करावी.

४. विहित मुदतीत पोर्टलवर जाहिराती दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा दिनांक २९/०१/२०२४ पर्यंत देण्यात येईल.

५. पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील.

६. वर दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही होण्यासाठी आपणास दिलेल्या मुदतीचे पालन करावे.

दिनांक : १४/०१/२०२४

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार याचिकेतील उमेदवारांकडून स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.

मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्र ८५३४/२०२३ व ११७३२/२०२३ मधील आदेश अनुक्रमे दिनांक १४/०९/२०२३ व दिनांक २०/०९/२०२३ व अन्य याचिकातील व मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र ६५३५/२०२३ व इतर तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र १२४२४/२०२३ या याचीकांतील आदेशानुसार उमेदवारांना आवश्यक त्या बाबींची पूर्तता होत असल्याची खात्री संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी केल्यानंतर न्यायालयाने निश्चित केलेल्या केवळ गैरप्रकारातील महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना वगळून अन्य उमेदवारांना स्व-प्रमाणन करण्याबाबत सोय उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने दिले होते.
          मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार याचीकादारांचे email प्राप्त झाले आहेत. सदर प्राप्त email नुसार आवश्यक ती छाननी करून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण असलेल्या किंवा B.Ed. ही अर्हता असल्याचे नमूद केलेल्या उमेदवारांच्या email वरून प्राप्त माहितीच्या आधारे नोडल अधिकारी म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे स्तरावर तपासणी करण्यात आली आहे.
शिक्षण आयुक्तालयाकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता, दरम्यानच्या कालावधीत मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक ३१/२०२४ व संलग्न अवमान याचिका दाखल झाल्या आहेत. सदर अवमान याचिकेमध्ये दिनांक १२/०१/२०२४ रोजी सुनावणी झाली त्यानुसार शासन पत्र दिनांक १२/०१/२०२४ अन्वये सदर याचिकेतील उमेदवारांना चारित्र्य पडताळणीच्या अधीन राहून स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
त्यानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण असलेल्या किंवा B.Ed. ही अर्हता धारण केलेल्या याचिकेतील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र नोंदणी करण्यास याद्वारे सुविधा देण्यात येत आहे व तसे उमेदवारांना त्यांनी यापूर्वी माहिती पुरविलेल्या email वर कळविण्यात आलेले आहे.
याचिकेतील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्राकरिता नोंदणी करणेसाठी दिनांक १६/०१/२०२४ पर्यंत मुदत राहील. पवित्र पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करून स्व- प्रमाणपत्र पूर्ण करावे.

दिनांक : ३१/१०/२०२३

उमेदवारांसाठी सूचना

सन २०१९ मधील शिक्षक पद भरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणास्तव रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत.

१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पद भरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे.

२. सन २०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न झालेल्या तसेच माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त जागांसाठी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारामधून शिफारस करण्यासाठी पोर्टलवर रिक्त पदांची माहिती संबंधित जिल्हा परिषद, महानगर पालिका व नगर पालिका यांनी भरलेली आहे.

३. यापूर्वी मुलाखतीसह पदभरतीमध्ये खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील केवळ इ १ ली ते इ ५ वी या गटातील रिक्त पदांसाठी जाहिरात असलेल्या पदांसाठी देखील कार्यवाही करण्यात येत आहे. या व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी यापूर्वीच्या तरतुदीनुसार १:१० या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

४. मा उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक ११०८१/२०१९ विचारात घेऊन त्या त्या समांतर आरक्षणाची शिल्लक पदे ही पात्र उमेदवार यांना उपलब्ध होण्यासाठी माजी सैनिक या समांतर आरक्षणातून उपलब्ध होणारी पदे त्या त्या समांतर आरक्षणात विचारात घेण्यात आलेली आहेत.

५. मा. सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा क्र. २०७४३/२०२१ व अन्य याचिकेतील आदेश दिनांक ११/०८/२०२३ रोजी दिलेल्या निर्णयानुसार ई १ ली ते ई ५ वी या गटातील रिक्त पदांबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

६. अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणास्तव एसईबीसी प्रवर्गातील रिक्त

असलेल्या पदांसाठी ईडब्लूएस / खुला प्रवर्गासाठी विचारात घेण्यात आली आहेत.
प्रिय उमेदवार, पात्र नसलेल्या, गैरहजर असलेल्या आणि सामील न झालेल्या उमेदवारांच्या जागी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती फेरी 31/10/2023 पासून सुरू होत आहे. हे फक्त TAIT 2017 च्या उमेदवारांसाठी आहे. इच्छुक उमेदवारांनी 03/11/2023 रोजी किंवा त्यापूर्वी त्यांचे प्राधान्य नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी  


ला भेट द्या.

 -शिक्षण आणि क्रीडा विभाग
वरील मॅसेज 2017 च्या भरती मधील विद्यार्थ्यांना येत आहेत.

Dear Candidate, The teacher recruitment round through pavitra portal in place of not eligible, absent and not joined candidates is commencing from 31/10/2023. This is only for TAIT 2017 candidates. The interested candidates are required to register their preferences on or before 03/11/2023. For more details visit 


-Sch Edu and Sports dept



महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय 
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)

Also read 
27 OCT 2023

प्रति,

१. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा, (सर्व )

२. विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय (सर्व)

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषदा (सर्व)

४. शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम / उत्तर/दक्षिण) सर्व

५. प्रशासन अधिकारी / शिक्षणाधिकारी (मनपा) सर्वृ

६. प्रशासन अधिकारी, नगरपालिका/नगरपरिषदा (सर्व)

विषय : शिक्षक पदभरती २०२२ शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबत.

संदर्भ :- १. शासन निर्णय दिनाक ७/२/२०१९, दि. १०/११/२०२२ व दि. १३/१०/२०२३ २. शासन पत्र क्र संकिर्ण-२०२३ / प्रक्र ५०९/टिएनटी-१ दि. १४/०९/२०२३. ३. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र आस्था क / प्राथ-१०६ / पवित्र सुधारित तरतूदी / २०२३ / ५९८१ दि. २७/०९/२०२३

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी - २०२२ चे आयोजन दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ या कालावधीमध्ये करण्यात आलेले होते, सदर परिक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर त्यांचे पदभरतीसाठी आवश्यक असणारे स्वप्रमाणपत्र पूर्ण करुन घेण्यात आलेले आहेत.

तदनंतर आता राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी 
 

या संकेतस्थळावर आरक्षण व विषय नोंद करुन जाहिरात देण्याची सुविधा दिनांक १६/१०/२०२३ पासून देण्यात आलेली आहे.
जाहिरात देण्यासाठी आवश्यक असणारे युजर मॅनुअल व सूचना पोर्टलवर देण्यात आलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच व्यवस्थापनाने त्यांच्याकडील शिक्षक प्रवर्गाची बिंदूनामावली सहायक आयुक्त, मावक यांच्याकडून प्रमाणित करुन घेणे अनिवार्य आहे. सन २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार विषयनिहाय रिक्त शिक्षक पदांची मागणी पोर्टलवर करण्यात यावी.
पोर्टलवर जाहिराती देण्याची जबाबदारी खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाची आहे. खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाने दिलेली जाहिरात संबंधित सक्षम प्राधिकारी तपासून पोर्टलवर मान्य (Approve) करतील. खाजगी शैक्षणिक संस्थांतील जाहिरात मान्य (Approve ) करताना मागासवर्ग कक्षाने मंजूर केल्याप्रमाणे भरती वर्षातील आरक्षणाची रिक्त पदे नोंद केल्याची तसेच गट व विषयनिहाय रिक्त पदे यांची नोंद करणे आवश्यक आहे. नोंद केलेल्या विषयाचे शिक्षक अतिरिक्त नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित मान्यता देण्याया सक्षम प्राधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक व प्रकरणपरत्वे विभागीय शिक्षण उपसंचालक यांची आहे.

व्यवस्थापनाने मान्यतेसाठी पाठविलेल्या प्रारूप जाहिरातीतील विषयाचे शिक्षक अतिरिक्त असल्यास कारण नमूद करुन सदर प्रारूप जाहिरात अमान्य (Reject) करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. प्रारुप जाहिरातीमध्ये मागणी केलेल्या विषयाचे शिक्षक अतिरिक्त असल्यास सदर शिक्षकाचे नियमानुसार समायोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत संबंधित विषयाचा शिक्षक अतिरिक्त असताना सदर विषयास पोर्टलवरील

जाहिरातीस परवानगी देऊ नये. खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी संस्था ज्या जिल्हयामध्ये नोंदणी झालेली आहे त्या जिल्ह्याचे संबंधित शिक्षणाधिकारी यांनी पोर्टलवरील जाहिरातीस परवानगी देण्याची कार्यवाही करावी. खाजगी शैक्षणिक संस्थांना पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी दोन टप्प्यात कार्यवाही करावयाची आहे. १. बिंदूनामावली मान्य (Approve ) करून घेणे २ बिंदूनामावली मान्य (Approve ) झाल्यानंतर गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती मान्य करून घेणे.

संस्थेने बिंदूनामावली पोर्टलवर भरून संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे फॉरवर्ड केल्यानंतर शिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवर येईल. त्यानंतर शिक्षणाधिकारी पोर्टलवर व्यवस्थापनाने अपलोड केलेली बिंदूनामावलीची प्रत डाऊनलोड करुन प्रमाणित बिंदूनामावलीमध्ये नोंद असलेली पदे तसेच संस्थेने पोर्टलवर नोंद केलेली आरक्षणाची रिक्त पदे व संख्या योग्य असल्याची खात्री करुन पोर्टलवर भरलेली बिंदूनामावलीची माहिती मान्य (Approve ) करतील.

पोर्टलवर बिंदूनामावली मान्य (Approve ) केल्यानंतरच संबंधित व्यवस्थापनास गट व विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरता येईल अशी भरलेली माहिती संबंधित शिक्षणाधिकारी यांचे लॉगीनवर उपलब्ध झाल्यानंतर सदर भरलेल्या माहितीमध्ये विषयाचे शिक्षक अतिरिक्त नसल्याची खात्री करुन संबंधित व्यवस्थापनाची विषयनिहाय माहिती मान्य (Approve ) करता येईल. संबंधित विषयांचे शिक्षक अतिरिक्त असल्यास संबंधित व्यवस्थापनाने भरलेली विषयनिहाय रिक्त पदांची माहिती कारणासह संबंधित शिक्षणाधिकारी यांनी अमान्य (Reject ) करावी. अतिरिक्त शिक्षक असल्याने नाकारलेली पदे वगळून संस्था पुन्हा गटव विषयनिहाय रिक्त पदांची माहिती भरून पुन्हा संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडे ऑनलाईन पाठवतील. त्यानंतर भरलेली माहिती योग्य असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी मान्य (Approve) करतील.

आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदे या दोन्ही प्रकारची माहिती मान्य (Approve ) झाल्यानंतर संबंधित संस्थेच्या लॉगीनवर जाहिरात जनरेट (Generate Advertisement) करण्याची सुविधा आहे. या सुविधेचा वापर करुन व्यवस्थापन जाहिरात जनरेट करु शकतील. संबंधित व्यवस्थापनाची जाहिरात जनरेट झाल्याशिवाय उमेदवारांचे प्राधान्यक्रम संबंधित व्यवस्थापनास येणार नाहीत. त्यामुळे बिंदूनामावली व गट व विषयनिहाय रिक्त पदांची अशी दोन्ही माहिती मान्य (Approve ) झाल्यानंतर जाहिरात जनरेट करणे आवश्यक राहील.

खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पोर्टलवर पदभरतीकरिता जाहिरात देण्यासाठी मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह पदभरती असे दोन पर्याय आहेत. खाजगी व्यवस्थापन यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतील. तथापि, स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र मुलाखतीशिवाय पदभरती हा एकच पर्याय निवडणे बंधनकारक आहे.

आपल्या अधिनस्त स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठी बिंदुनामावली प्रमाणित करण्याच्या तसेच त्यानुसार शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात देण्याची कार्यवाही करण्याबाबतच्या आवश्यक त्या सूचना आपल्यास्तरावरुन तात्काळ देण्यात याव्यात.

(शरद गोसावी)
शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय,
(संपत सूर्यवंशी) शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय

Also read 

दिनांक : १६/१०/२०२३

व्यवस्थापनांसाठी सूचना

स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील

जाहिरात विषयक सूचना

१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते.

या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्व-प्रमाणपत्रे पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत.

२. पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी माध्यमनिहाय जाहिरात देणे आवश्यक आहे.

२. रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनास पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सरल प्रणालीतील user id हा या पोर्टलचा देखील user id असेल. व्यवस्थापनास forgot password यावर क्लिक केल्यानंतर option for reset password मध्ये using onetime password (otp) sent via sms खाली व्यवस्थापनाचा सरल पोर्टल चा user id नोंद करावा व त्यानंतर मोबाईल क्रमांक नोंद करावा व captcha टाकून proceed यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलवर otp येईल, आलेला otp नोंद करून verify यावर क्लिक करावे त्यानंतर reset password मध्ये new password/confirm new password नमूद करून captcha टाकून change password यावर क्लिक करावे त्यानंतर नव्याने reset केलेला password टाकून लॉगीन करता येईल.

सरल पोर्टलवर नोंद असलेला संपर्काचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे. पूर्वीचा सरल पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने password reset होत नसल्यास खाजगी व्यवस्थापनाने आपल्याशी संबंधित शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात जाऊन त्यांचे लॉगीनवरून मोबाईल क्रमांक बदल करून नव्याने password reset करता येईल.

३. व्यवस्थापनास जाहिरात देण्यापूर्वी त्यांच्या व्यवस्थापनाची बिंदूनामावलीची तपासणी संस्थेच्या मुख्यालयाशी संबंधित विभागाच्या सहायक आयुक्त, (मावक), मा. विभागीय आयुक्त कार्यालय यांचेकडून अद्ययावत प्रमाणित केलेली असणे आवश्यक आहे.

अधिक वाचण्यासाठी व पीडीएफ फोटो डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

CLICK HERE For pdf  👇



पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करणे/वगळणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे.
दि १३ ऑक्टोंबर २०२३
शिक्षक भरती बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय पीडीएफ मध्ये डाऊनलोड करा


CLICK HERE For pdf  👇


TAIT २०१७ नुसार १९६ व्यवस्थापनातील मुलाखती सह पदभरती यादी जाहीर झालेली असून त्यासाठीच्या उमेदवारांसाठी सूचना दिनांक १५/०७/२०२३ 

या व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी यापूर्वीच्या तरतुदीनुसार एका जागेकरीता १:१० या मर्यादित (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादित) उमेदवार उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही व्यवस्थापनांकडून  १८/०७/२०२३ ते ११/०८/२०२३ या कालावधीत करण्यात येईल.

१९६ व्यवस्थापनातील ७६३ रिक्त पदासाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर आज जाहीर करण्यात आली आहे. 

मुलाखतीसह पदभरतीमध्ये SEBC प्रवर्गासाठी जागा असणाऱ्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांकडे जाहिरातीमध्ये खुला (समांतर आरक्षणाशिवाय) प्रवर्गासाठी जागा नाहीत अशा उर्वरित १९६ व्यवस्थापनांसाठी SEBC प्रवर्गासाठीच्या जागा योग्य त्या प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवाराकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत. आता या १९६ व्यवस्थापनांसाठी मुलाखतीसह पदभरतीकरीता ७६३ पदांवर निवडीसाठी अध्यापन व कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे.

मुलाखतीसह पद भरतीमध्ये उर्वरित १९६ व्यवस्थापनांतील इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी गटातील रिक्त पदांसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

या व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी यापूर्वीच्या तरतुदीनुसार एका जागेकरीता १:१० या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी ७६३ पदांवर निवडीसाठी एकूण ५५३५ प्राधान्यक्रमावर उमेदवार शिफारस झाली आहे. 

मुलाखत व अध्यापन कौशल्यबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांकडून दिनांक १८/०७/२०२३ ते दिनांक ११/०८/२०२३ या कालावधीत करण्यात येईल.

उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील, उमेदवारांची अंतीम निवड या ३० गुणाच्या आधारे व्यवस्थापनाकडून  मुलाखतीसाठी शिफारस केलेला गट,विषय व आरक्षण विचारात घेऊन निवड केली जाईल.

मुलाखत व अध्यापन कौशल्यातून निवड होऊन शाळेत रुजू झालेल्या  उमेदवारांना शालार्थ प्रणालीमार्फत वेतन सुरु होईल.

सूरज मांढरे भाप्रसे 

शिक्षण आयुक्त  महाराष्ट्र

१९६ व्यवस्थापनातील ७६३ रिक्त पदासाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे निवड करण्यासाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर आज जाहीर करण्यात आली आहे.

CLICK HERE For pdf  👇



पवित्र प्रणाली अंतर्गत करण्यासाठी संगणकीय प्रणाली (software) कामकाज विकसित करणाऱ्या संस्थेस ५०% रक्कम अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: ईगव्ह ०२२३/प्र.क्र.०४ / संगणक
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
विस्तार इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक:- ३० मार्च, २०२३.
वाचा :-
१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१८ / प्र.क्र. ३९७/ टीएनटी-१, दि.०७ फेब्रुवारी, २०१९
२. दि.४ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या प्रकल्प अमलबजावणी समितीची बैठक,
३. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. आशिका / २०२२/ई-गव्ह./पवित्र/१४३/००७१६, दि. २५ जानेवारी, २०२३

प्रस्तावना :-
संदर्भ क्र.१ अन्वये "पवित्र प्रणाली व्दारे राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती निश्चित करण्यात आली आहे. सदर प्रणाली NIC, पुणे यांचेकडून विकसित करण्यात आली आहे. तथापि, काही कारणास्तव NIC, पुणे यांचेकडून पवित्र प्रणालीचे काम काढून घेण्यात आले आहे.
    संदर्भ क्र.२ अनुसार दि.४.०२.२०२२ रोजीच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीमध्ये पवित्र प्रणालीतील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत आयुक्त, शिक्षण यांना निर्देश देण्यात आले. त्यानुसार "पवित्र प्रणाली" अंतर्गत कामकाज करण्यासाठी संगणकिय प्रणाली (Software) विकसित करण्याकरिता पात्र व अनुभवी सॉफ्टवेअर डेक्टलमेंट कंपनीची शासन तरतूदीनुसार निवड करण्याची कार्यवाही शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून करण्यात आली. या अनुषंगाने संचालनालय स्तरावरून मे.तलिस्मा कॉर्पोरशन प्रा.लि. बेंगलुरु या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
    आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी संदर्भ क्र.३ येथील पत्रान्वये प्रस्तुत कंपनीला देय असलेली रक्कम वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे. त्याअनुषंगाने पवित्र प्रणाली अंतर्गत कामकाज करण्यासाठी संगणकिय प्रणाली (Software) विकसित करून घेण्याकरिता येणाऱ्या खर्चाची रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. 
शासन निर्णय:-
    पवित्र प्रणाली अंतर्गत कामकाज करण्यासाठी संगणकिय प्रणाली (Software) विकसित करुन घेण्याकरिता येणाऱ्या खर्चास याव्दारे मान्यता देण्यात येत आहे. तसेच त्यासाठी येणाऱ्या एकुण खर्चापैकी ५० टक्के म्हणजेच रु.४,९९,७३०/- (चार लाख नव्यानव हजार सातशे तीस ) एवढ्या खर्चास व सदर रक्कम में तलिस्मा कॉर्पोरेशन पा. लि. बेंगलुरु यांना अदा करण्यास याव्दारे मान्यता देण्यात येत आहे.
२. सदरचा खर्च मागणी क्रमांक. ई-२. २२०२ सर्वसाधारण शिक्षण, ८० पंचवार्षिक योजनांतर्गत योजना (०२) (५१) ई-गव्हर्नन्स कार्यक्रम २२०२४५४) ३१ सहायक अनुदाने या लेखाशिर्षातून सन २०२२-२३ च्या उपलब्ध तरतुदीमधुन भागविण्यात यावा. सहायक संचालक (लेखा) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदर निधी कोषागारातून आहरीत करुन संबंधितांना वितरीत करण्याची कार्यवाही करावी,
3. हा शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका २०१५ दिनांक १७ एप्रिल २०१५ मधील उपविभाग २ मधील अनुक्रमांक २० अ मधील नियम क्र. ७६ अन्वये विभागास प्रदान करण्यात आलेल्या वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४०५/व्यय-५, दिनांक २८.०३. २०२३ अन्वये  प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णयया संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा  CLICK HERE 👇  





पवित्र पोर्टल संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी👉  CLICK HERE  येथे टिचकी मारा

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
(विवेक सपकाळ)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शिक्षक भरती संदर्भात व पवित्र पोर्टलचे अपडेट प्राप्त करण्यासाठी आपल्यासाठी तयार करण्यात आलेल्या समूहात सामील होऊ शकता


Shikshk Bharti Talisma Corporation NIC Pavitra Portal Pavitra Pranali TAIT MSCE IBPS Teacher Recruitment Software
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon