DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

TAIT Pavitra Portal Documents Verification of Candidates


महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय,

महाराष्ट्र राज्य, पुणे

बा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/रु.फे. पदभरती/२०२४/3996

दि.२५/०६/२०२४

प्रति,

१. आयुक्त, महानगरपालिका, (सर्व)

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व)

३. शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) (सर्व) / शिक्षण निरीक्षक (द/उ/प) बृहन्मुंबई

४. मुख्याधिकारी (सर्व) (नगरपालिका/नगर परिषदा)

विषय :- शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२२ 'मुलाखतीशिवाय'
शिक्षक पदभरतीचा विकल्प दिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 'पवित्र प्रणाली' अंतर्गत उर्वरित रिक्त पदांच्या रूपांतरित फेरीतील (Converted Round) निवडयादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबाबत व पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत. 


संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक सिईटी-२०१५/प्रक्र

१४९/टीएनटी-१ दिनांक ०७/०२/२०१९. २. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्रक्र३११/टीएनटी -१ दिनांक १/०१/२०१९.

३. शासन निर्णय क्र संकीर्ण-२०२२/प्रक्र १०६/टीएनटी-१ दिनांक १०/११/२०२२

४. शासन निर्णय क्र संकीर्ण-२०२३/प्रक्र१७४/ टीएनटी-१ दि.२१/०६/२०२३

५. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८/प्रक्र ३९७/टीएनटी-१ दि.०७/०२/२०१९, शुद्धिपत्रक दिनांक २५/०२/२०१९, दि.१६/०५/२०१९ व दि.१२/०६/२०१९

६. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्रक्र ५०९/टीएनटी-१ दि.१३/१०/२०२३

७. पवित्र पोर्टलवर मुखपृष्ठावरील उमेदवारांसाठी/व्यवस्थापनासाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना

८. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्रक्र १८४/टीएनटी-१ दि.०७/०६/२०२४, १०/०६/२०२४ व १४/०६/२०२४

९. संचालक, सैनिक कल्याण संचालनालय, पुणे यांचे पत्र १९०२२ दि.२०/०६/२०२४ १०. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र.संकीर्ण-२०२४/प्रक्र १२४ /२८ (मा.सै.क.) दिनांक २४/०६/२०२४.

उपरोक्त शासन निर्णय व 'पवित्र पोर्टल' वरील सूचनांचे अवलोकन करावे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी, तसेच 'शिक्षण सेवक' पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्यादृष्टीने 'अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) -२०२२' यामध्ये प्राप्त असलेले गुण, बिंदुनामावलीनुसार शिल्लक आरक्षण, जाहिरातीनुसार अध्यापनाचे उर्वरित विषय तसेच उमेदवाराने स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व लॉक केलेले प्राधान्यक्रम या सर्व बाबी एकत्रित विचारात घेवून सर्वसाधारण गुणवत्तायादी पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन तयार करून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT)-२०२२ मध्ये प्रविष्ट उमेदवारांना पवित्र प्रणालीमार्फत पदभरती करण्यासाठी त्यांची आवश्यक वैयक्तिक माहिती स्व-प्रमाणित करण्याची, तसेच त्यांची शैक्षणिक, व्यावसायिक व अन्य आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आलेली होती. यास्तरावरून उमेदवारांच्या कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली नाही. आपल्या स्तरावरून उमेदवारांच्या सर्व संबंधित कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पडताळणी करावयाची आहे.

निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

उक्त गुणवत्ता यादीतील उमेदवारांना नियुक्त्या देण्यापूर्वी त्यांच्या सदर निवडीसाठी शिफारस केलेल्या पदांकरिता उमेदवारांची पात्रता तपासून ते पात्र असल्यासच त्यांच्या नियुक्तीबाबतची पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवरील स्व-प्रमाणपत्र व त्यासोबत अपलोड केलेली कागदपत्रे आपल्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

याबाबत स्पष्ट करण्यात येते की, उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करताना त्यांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारावरच करण्यात आलेली आहे. परिणामी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीची व आवश्यक पात्रतेसाठीच्या मूळ कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने अपलोड केलेली कागदपत्रे/प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्रांशी विसंगत आढळल्यास कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरविता येणार नाही, याची

कटाक्षाने नोंद घ्यावी.

मा. उच्च न्यायलय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४ व २५८५/२०२४ मध्ये दि.०७/०३/२०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरती प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू
ठेवण्यास परवागनी दिली आहे. तसेच मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक २७५२/२०२४ मधील मा. न्यायालयाचे दिनांक ०८/०५/२०२४ च्या आदेशान्वये तसेच याचिका क्रमांक २७८४/२०२४ मधील दिनांक १२/०६/२०२४ च्या आदेशान्वये याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून उमेदवारांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश आहेत.

तसेच सदर नियुक्त्या देताना मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथील दाखल अन्य याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी. यास्तव नियुक्ती आदेशामध्ये त्याप्रमाणे नमूद करावे.

नियुक्तीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्रक्र १७४/टीएनटी-१ दिनांक २१/०६/२०२३ मधील मुद्दा क्रमांक ७ मधील तरतुदी व इतर तरतुदी विचारात घेऊन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची कार्यवाही करावी.

कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तीची कार्यवाही करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र क्रमांक १४०८ दिनांक २५/०२/२०२४ मध्ये (प्रत सोबत जोडली आहे) दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून आपल्या स्तरावरील पुढील कार्यवाही तात्काळ करावी.

आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्ये, पुणे-१

Also Read 👇 


https://www.dnyanyatritantrasnehi.com/2024/06/tait-pavitra-portal-documents.htmlVerification of Documents TAIT Pavitra Portal Selected Candidates

Regarding verification of documents and further necessary action of the candidates in the recommended list of teacher recruitment under "Pavitra 2022- Interviewless System" in the institutes where Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) has been prioritized for selection.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय,

महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत,पुणे

दि. ११/०६/२०२४

जा.क्र.आस्था-क/प्राथ १०६/स्था.स्व. पदभरती/२०२४/3716

प्रति,

11 JUN 2024

१. मा. आयुक्त,

महानगरपालिका, (सर्व)

२. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व)

३. शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) (सर्व) / शिक्षण निरीक्षक (द/उ/प) बृहन्मुंबई

४. मुख्याधिकारी (सर्व) (नगरपालिका/नगर परिषदा)

विषय: शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) पदनिवडीचा प्राधान्यक्रम दिलेल्या संस्थांमध्ये "पवित्र २०२२- मुलाखतीशिवाय प्रणाली" अंतर्गत शिक्षक पदभरती शिफारस यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीबावत व पुढील आवश्यक कार्यवाहीचायत.

संदर्भ : 
१. समक्रमांकांचे पत्र क्र १४०८ दिनांक २५/०२/२०२४ २.मा.उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४ मधील दिनांक ०७/०३/२०२४

३. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथील याचिका क्र. ४५३६/२०२३ मधील

आदेश दिनांक ११/०३/२०२४

४. शासन पत्र क. संकिर्ण-२०२४/प्र.क्र.१८४/टिएनटी-१ दिनांक १९/०४/२०२४.

५. समक्रमांकांचे पत्र क्र. २७७० दिनांक १९/०४/२०२४

६. शासन पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१७८/टिएनटि-१, दि.०७.०६.२०२४ ७. शासन पत्र क. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१८४/टिएनटि-१, दि.१०.०६.२०२४

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळीमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती "अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२" मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन निर्णयातील तरतुदी/विविध न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार करण्यात येत आहे.

संदभर्भाधीन पत्रामध्ये नमूद केलेले शासन निर्णय व शासन पत्रातील तरतुदीनुसार जानेवारी, २०२४ मध्ये पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातीनुसार उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रातील नोंद केलेल्या माहितीच्या आधारे व त्यांनी नोंदविलेल्या प्राधान्यक्रमानुसार मुलाखतीशिवाय पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना शिफारसपात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार दिनांक २५/०२/२०२४ रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रद्धि करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्यास्तरावर सुरू करण्यात आलेली होती.

दरम्यानच्या कालावधीत लोकसभा-२०२४ घ्या निवडणुकीधी आदर्श आचार संहिता लागू झाली होती. त्यानुषंगाने संदभी क्र.४ अन्वये त्या-त्या जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिका-यांनी करण्याबाबत पापूर्वी या कार्यालयचे संदर्भ क्र.५ अन्वये कळविण्यात आलेले आहे.

तनंतर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोजाण, मुंबई व नाशिक विभागातील पदवीधर/शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम दि.२४.०५.२०२४ रोजी घोषित झाल्याने सदर विभागात आदर्श आचार संहिता लागू झालेलो आहे.

संदर्भ क्र.७ दि.१०.०६.२०२४ रोजीच्या शासन पत्रान्वये पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रीयेवर प्रभाव पडून आदर्श आचार संहितेचे उत्नन्धन होईल अभी कोणतीही कृती घडणार नाही याबाबतची खबरदारी घेवून स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

संदर्भ क्र.६ व ७ वरील तरतूदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ जाहिरातीतील समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांच्या बाबतीत सदर जागा त्या-त्या प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये रुपांतरीत करुन गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांना विचारात घेवून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

पास्तव आपल्या अधिनस्त यापूर्वी दि. २५.०२.२०२४ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्त्या देण्याबाबतची कार्यवाही करावी. तसेच पवित्र पोर्टलवर शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी यांच्या लॉगीनबर दिलेल्या Applicant Joining Status वा सुविधेचा वापर करून उमेदवारांच्या रूजू अहवालाची नोंद पोर्टलवर करावी व केलेली कार्यवाही आयुक्तालयास अवगत करायी.(दिलीप ज्ञा. जगदाळे)

शिक्षण सहसंचालक (प्रशासन)

शिक्षण आयुक्तालय, म.रा., पुणे

परोक्त परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon