Maharashtra SSC and HSC Students to Get an Additional Extra 10 Minutes in 2024 Exam
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Educat
S.R.No.832-A, Final Plot- No. 178,179, Near Balchitrawani,
Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar,
Pune-411004.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
स.नं. ८३२-ए, फा. प्लॉट नं. १७८, १७९, बालचित्रवाणी शेजारी,
आघारकर रिसर्च इन्स्टिटयूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर,
पुणे-४११००४.
क. रा.मं./परीक्षा-८/२८२ पुणे - ४११००४ दिनांक -२३/०१/२०२४
प्रति,
१ मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई- ४०००३२.
२ मा. विभागीय प्रसिध्दी उपसंचालक, पुणे/नागपूर/छत्रपती संभाजीनगर/मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण,
३ मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई ४०००३०,
४ मा. संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र, नविन प्रसारण भवन, बॅक्वे रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई-४०००३०.
५ मा. संचालक, आकाशवाणी केंद्र.
६ सर्व जिल्हा प्रसिध्दी अधिकारी.
७ मा. संपादक, सर्व वृत्तवाहिनी व वृत्तपत्र.
विषय :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी विद्याच्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत.
महोदय,
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) फेब्रु मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी विद्याथ्यांना द्यावयाच्या दहा मिनिटे वाढीव वेळेबाबतचे प्रकटन सोबत जोडले आहे.
सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रांनी त्यांच्या वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी त्यांच्या प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
(अनुराधा ओक)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे - ४
प्रत माहितीसाठी व योग्य कार्यवाहीसाठी:-
१ विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर/मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण विभागीय मंडळ. पुणे/नागपूर/छत्रपती संभाजीनगर/मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण विभागीय मंडळ
यांनी स्थानिक स्तरावर प्रकटन प्रसिध्द करावे व सर्व मान्यता प्राप्त शाळाच्या / कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणावे. २ व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे.
प्रकटन
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त
प्रमाणपत्र फेब्रुवारी-मार्च-२०२४ प्रात्यक्षिक, तोंडी,
अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे
गुण ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती
☝☝☝☝☝☝☝☝☝☝☝
विषय :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना द्यावयाच्या वाढीव वेळेबाबत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.
इ. १० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.
तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षांचे वेळीही सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल.
सकाळ सत्रात स. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
परीक्षेची सध्याची वेळ
सकाळ सत्र
स. ११.०० ते दु. २.००
स. ११.०० ते दु. १.००
स. ११.०० ते दु. १.३०
दुपार सत्र
दु. ३.०० ते सायं. ६.००
दु. ३.०० ते सायं. ५.००
दु. ३.०० ते सायं. ५.३०
परीक्षेची सुधारित वेळ
स. ११.०० ते दु. २.१०
स. ११.०० ते दु. १.१०
स. ११.०० ते दु. १.४०
⏰
दुपार सत्र
दु. ३.०० ते सायं. ६.१०
दु. ३.०० ते सायं. ५.१०
दु. ३.०० ते सायं. ५.४०
(अनुराधा ओक)
दिनांक - २३/०१/२०२४.
सचिव,
राज्य मंडळ, पुणे ४.
प्रत माहितीसाठी सविनय सादर :-
१. मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व किडा विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०००३२.
२ मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र शासन, शिक्षण आयुक्तालय कार्यालय, पुणे ४११००१
३ अस्वीस, सस्वीस, राज्य मंडळ, पुणे.
४ ऑनलाईन विभाग, राज्य मंडळ, पुणे.
५. लेखाधिकारी, राज्य मंडळ, पुणे. ६. ग्रंथालय, राज्य मंडळ, पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon