e-PPO, e-GPO, e-CPO बाबत सूचना
१. शासन निर्णय, वित्त विभाग, दि. २४.०८.२०२३ अन्वये e-PPO, e-GPO, e-CPO च्या अनुषंगाने निवृत्तीवेतनधारक यांना महालेखापाल कार्यालय, मुंबई यांचेकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर PPO Number बाबतची माहिती SMS द्वारे प्राप्त होईल. निवृत्तीवेतनधारक यांनी सदरील PPO Number चा वापर करून
login.jsp - निवृत्तीवेतनवाहिनी या संकेतस्थळावर User ID: PEN_PPO Number आणि Password : ifms123 द्वारे लॉगीन क०रून e-Library या टॅबमधून e-PPO, e-GPO, e-CPO ची PDF Copy Download करू शकतात.
२. महालेखापाल कार्यालय, मुंबई यांचेकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर e-PPO, e-GPO, e-CPO ची Digital Copy संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या सेवार्थ आज्ञावलीमधील लॉगीनमध्ये e-Library या टॅबमध्ये उपलब्ध होईल. त्यानंतर आहरण व संवितरण अधिकाऱ्याची नमुना स्वाक्षरी पडताळणी केलेले Form A, B, C व Form ४२-अ Online व प्रचलित (Physical) पध्दतीने विहित मुदतीत कोषागार कार्यालयास पाठविण्याची जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील. अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयास सदरील Forms Online व प्रचलित (Physical) पध्दतीने प्राप्त झाल्यानंतर e-PPO, e-GPO, e-CPO चे प्रदान अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयामार्फत करण्यात येईल.
३. दि. ०१.०९.२०२३ नंतर महालेखापाल कार्यालय, मुंबई यांचेकडून निवृत्तीवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर निवृत्तीवेतन प्रदान आदेश, उपदान प्रदान आदेश आणि अंशराशीकरण प्रदान आदेशाची मुद्रीत प्रत (Physical Copy of PPO, GPO and CPO) निवृत्तीवेतनधारक व अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयास प्रचलित (Physical) पध्दतीने प्राप्त होणार नाही.
४. दि. ०१.०९.२०२३ नंतर मंजूर करण्यात आलेल्या उपदान प्रदान प्रकरणी देयक आहरण व संवितरण अधिकारी यांनी सादर न करता निवृत्तीवेतनधारक ज्या कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणार आहे, त्याच अधिदान व लेखा कार्यालय / कोषागार कार्यालयातील सहायक अधिदान व लेखा अधिकारी / अपर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन) यांनी निवृत्तीवेतनवाहिनीमध्ये देयक तयार करून उपदानाचे प्रदान करावे.
५. निवृत्तीवेतनधारक यांना कोषागार कार्यालय यांचेकडून प्रथम प्रदान, उपदान व अंशदान रकमेचे प्रदान झाल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे माहिती प्राप्त होईल. तसेच निवृत्तीवेतनधारक यांना त्यांच्या निवृत्तीवेतनवाहिनीमधील वैयक्तिक लॉगीनमध्ये प्रदानचा तपशील पहाता येईल.
दिनांक 1/ 9/ 2023 नंतर निवृत्तीवेतन प्रस्ताव मंजूर झालेल्या कर्मचाऱ्यांना आता ऑनलाईन PPO, GPO, CPO ORDER Online Download करता येणार आहे
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon