SSC HSC Exam Pract Intl Marks Online
SSC HSC Exam 2024 Pract Intl Marks Online Submit
Also Read -
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education S.R.No.832-A, Final Plot No. 178,179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Pune 411 Bhamburda, Shivajinagar,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, स.न.८३२ ए. फा.प्लॉ.नं.१७८, १७९, बालचित्रवाणी शेजारी, आघारकर रिसर्च इनिटट्यूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे- ४११००४ पुणे
परीक्षा प्राधान्य/महत्वाचे
क्र.रा.मं./परीक्षा-२/72
पुणे-४११००४
दिनांक-१६/०२/२०२४
प्रति,
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय मंडळे.
विषय - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबत.....
संदर्भ - १. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं./परीक्षा-२/५५०८ दि.२६/१२/२०२३
२. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं./गणकयंत्र/१/१७८ दि.१५/०१/२०२४
३. या कार्यालयाचे पत्र क्र. रा.मं./परीक्षा-२/५७२ दि.०९/०२/२०२४
उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रे पहावीत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरणेबाबतच्या सूचना संदर्भिय पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.
या संदर्भात सूचित करण्यात येते की, इयत्ता १२ वी परीक्षेतील प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण भरण्यासाठी गुरूवार दिनांक २९/२/२०२४ पर्यंत कालावधी देण्यात येत आहे. या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांनी ऑनलाईन पध्दतीने गुण नोंदवून मंडळाकडे ऑनलाईन पाठवावयाचे आहेत.
तसेच संदर्भीय पत्र क्र. २ सोबत जोडलेल्या कार्यपध्दतीमधील सुचना क्र. ८ नुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांनी खालील प्रमाणे कार्यवाही करावयाची आहे.
आपल्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकानिहाय ऑनलाईन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेऊन त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी (आवश्यक त्या विषयाच्या बाबत) व तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन सदर गुणतक्त्यावर प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय / उच्च माध्यमिक शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक्ते प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकिटामध्ये, पाकिटावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, Index No. घालून सोमवार दिनांक ०४/०३/२०२४ पर्यंत विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत. तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे. सदर बाब आपल्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.
प्रत माहितीस्तव-व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे.
(अनुराधा ओक) सचिव
राज्य मंडळ, पुणे ०४.
Also Read 👇
SSC HSC Exam 2024 Practical Internal Evaluation Marks Grade Online Submission Link
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary
Education Pune
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
परीक्षा प्राधान्य/महत्वाचे
क्र.रा.मं./परीक्षा-२/ 572पुणे-४११००४
दिनांक-०९/०२/२०२४
प्रति,
विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सर्व विभागीय
मंडळे.
विषय - माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत
(Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण
भरणेबाबत.....
उपरोक्त विषयी संदर्भिय पत्रे पहावीत.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा मार्च २०२४ चे प्रात्यक्षिक,
तोंडी
व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण
भरणेबाबतच्या सूचना संदर्भिय पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार
कार्यवाही करण्यात यावी.
१) मार्च २०२४ मधील इयत्ता १० वी
प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इ. परीक्षेचे गुण भरण्यासाठी
"Internal/Practical Marks & Grades" (SSC) ही लिंक मंडळाचे
संकेतस्थळ
२ ) इ.१२वी परीक्षेतील ऑनलाईन गुण नोंदविण्याकरीता Login id
(Jxxxxxx_1) हा प्राचार्य/उपप्राचार्य यांचेसाठी असून इ.१०वी करीता Login
id (Sxxxxxx_1) हा शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी असून त्यांनीच Checker म्हणून
काम करावयाचे आहे व गुण मंडळाकडे तपासून अग्रेषित करावयाचे आहेत.
३ ) गुण नोंदविताना त्याची पूर्णतः गोपनीयता राहील याची सर्व संबंधित
प्राचार्य / मुख्याध्यापक यांनी दक्षता घ्यावी.
४) अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये भरलेल्या व या Online
System मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झाले नाहीत अथवा
विद्यार्थ्याने विषय बदल केला आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पध्दतीने
निर्धारित तारखेस विभागीय मंडळामध्ये जमा करावयाचे आहेत.
उपरोक्त प्रमाणे इ.१०वी व इ.१२वीच्या ONLINE गुणांसंदर्भातील सर्व बाबी आपल्या कार्यकक्षेतील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात.
(अनुराधा ओक)
सचिवराज्य मंडळ, पुणे ०४.
Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education. S.R.No.832-A, Final Plot No. 178, 179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar,
Pune-411004
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. स.न.८३२-ए, फायनल. प्लॉ. नं. १७८, १७९, बालचित्रवाणी शेजारी, आधारकर रिसर्च इनिटटयूटच्या मागे, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे ४११००४
Tel: Chairman (P): STD. (020)-25651751 Secretary (P): 25651750 EPABX-25705000
Email: secretary.stateboard@gmail.com
Fax: 25665807
क्र.रा.म./गणकयंत्र/01/178 पुणे - ४११ ००४.
दिनांक -१५/०१/२०२४
प्रति,
विभागीय सचिव,
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, सर्व विभागीय मंडळे
विषय-माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा २०२४ चे प्रात्याक्षिक व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण घेणेबाबतच्या सुचना निर्गमित करणेबाबत.
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) फेब्रु मार्च २०२४ परीक्षेचे प्रात्याक्षिक व अंतर्गत मुल्यमापन तथा श्रेणी विषयाच्या श्रेणी या OMR पध्दतीने न घेता ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. त्या अनुषगांने सर्व शाळा व क. महाविद्यालयांना ऑनलाईन पध्दतीने गुण भरून मंडळाकडे कशाप्रकारे पाठवावयाचे आहेत याबाबतचा सर्वसाधारण सूचना या पत्रासोबत देण्यात येत आहेत.
सदर सर्वसाधारण सूचना सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्याबाबत उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळ कार्यालयास सादर करावा.
(अनुराधा ओक)
सचिव,
राज्य मंडळ, पुणे-०४.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र फेब्रुवारी-मार्च-२०२४ प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती
२. गुण नोंदविण्याकरीता Maker-Checker कार्यपद्धती वापरावयाची असून, त्याकरीता सध्याच्या Login Id जसे इ.१२ वी (Jxxxxxxx_1) तसेच ३.१० वी (Sxxxxxxx_1) हा अनुक्रमे प्राचार्य / मुख्याध्यापक यांचेसाठी असून, त्यांनी Checker म्हणून काम करावयाचे आहे.
३. या मुख्य Login Id मधून सर्वप्रथम शाळा/महाविद्यालयाच्या अधिकृत Email व जबाबदार प्रतिनिधीचा Mobile Number यांची नोंद करावयाची आहे. दिलेला Mobile Number व E-mail हा OTP द्वारे सत्यापीत (Validate) केला जाईल.
४. या मुख्य Login Id मधून कमीतकमी एक किंवा एकापेक्षा अधिक आवश्यकतेनुसार Maker User (गुण नोंद करणारा) तयार करणे आवश्यक राहील. त्याकरीता मुख्य Login मधील Users Link मधून Users Add करावा, त्याकरीता संबधीत User चे नाव, मोबाईल क्रमांक व ई-मेल ची आवश्यकता आहे. तद्नंतर त्याखालील Maker and Checker Link वरून त्या User ला Maker असा Role Assign करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत केवळ Maker हा Role Assign करावा. तसेच नव्याने add केलेल्या User चा Password हा त्याच्या नोंदविलेल्या Email वर प्राप्त होईल. (मुख्य Inbox मध्ये E-mail प्राप्त न झाल्यास Spam Folder मध्ये सुध्दा पहावे.)
६. विषयनिहाय प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकावर (Blank Marksheet) बैठक क्रमांकानुसार (Seat no wise) गुणांच्या / श्रेणीच्या नोंदी घेऊन Maker Login मधून त्याची HSC Marks/Grade या Option मधून Online Entry करायची आहे. सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत Printout काढून खात्री करता येईल. एका विषयाच्या सर्व गुणांची/श्रेणीची Online नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरीता "Send for Approval to checker" हा option Enable होईल. त्याव्दारे सर्व पृष्ठे ही Checker कडे तपासणीसाठी पाठविता येतील, अशाप्रकारे सर्व विषयांची पृष्ठे Entry पूर्ण करून Checker कडे तपासणीसाठी पाठवावयाची आहेआहे
७. Checker User ला इ.१२ वी (Jxxxxxxx_1) तसेच इ.१० वी (Sxxxxxxx_1) त्याचे Login मध्ये Maker User ने पाठविलेली सर्व पृष्ठ HSC Marks/Grade या Option मध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील. Checker User ने सर्व विषयाच्या गुणाच्या / श्रेणीच्या नोंदी तपासून पृष्ठनिहाय मान्य (approve) करावयाच्या आहेत सर्व पृष्ठे मान्य (approve) झाल्यानंतर "Send for Board Approval" हा Option Enable होईल. त्या Option मधून सर्व विषयांचे अंतिम गुण व श्रेणी मंडळाकडे पाठवावयाच्या आहेत.
८. आपल्या कनिष्ठ महाविद्यालय / शाळेमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकनिहाय ऑनलाईन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेवून त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी (आवश्यक त्या विषयाच्या बाबत) व तोंडी, अंतर्गत मुल्यामापन, श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेवून सदर गुणतक्त्यावर प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय/शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारीत तारखेस प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकीटामध्ये, पाकिटावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव, Index No घालून जमा करावयाचे आहेत. तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे.
९. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यामापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देवू न शकलेल्या विद्यार्थ्यासाठी सदरची परीक्षा ऑउट ऑफ टर्न लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळाने कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल.
१०. नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेल्या आहेत अशाच विद्यार्थ्याचे बैठक क्रमांक सदर ऑउट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय / शाळांना उपलब्ध करून दिले जातील. सदर विद्यार्थ्याचे गुण ऑनलाईन पध्दतीने "Out of Turn marks" या Option द्वारे नोंदविण्याची कार्यवाही शाळा व महाविद्यालयानी उपरोक्त पद्धती प्रमाणेच Maker व Checker Login चा वापर करून करावयाची आहे.
११. अतीविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्रे भरलेल्या व या गुणांच्या Online System मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक (Additional Seat No) उपलब्ध झालेले नाहीत, अथवा विषयबदल केला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलीत पद्धतीने निर्धारीत तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत.
STEPS IN ONLINE INTERNAL/GRADE MARKS SUBMISSION
START
↓
Login with existing user name and password
↓
your mobile & email id with OTP
↓
Add one user & assign him as maker
↓
Login with MAKER user & download Blank mark list for exam
↓
After exam, enter marks with MAKER login in HSC mark/grade menu
↓
After entry of all marks for any of the subject is completed. Send these marks to CHECKER by pressing "SEND FOR APPROVAL TO CHECKER" button
↓
Login with CHECKER login. Check & approve each page, marks entered by MAKER.
↓
After all pages approved by CHECKER. Submit all pages to Board by clicking on "SEND FOR BOARD APPROVAL" link
↓
Take final subject wise printouts and submit to divisional boards with signature and stamps on given date
↓
FINISH
👇👇👇
सदरचे परिपत्रक आपल्याला पीडीएफ मध्ये डाऊनलोड करावयाचे असल्यास या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon