Pradhan Mantri Poshan Shakti Guidelines
महाराष्ट्र शासन
Pradhan manthi Poshan Shakt Neman PM POSHAN)
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४११ ००१.
दुरध्वनीक्र. (०२०) २६१२८१५७
ई-मेल mdmdep@gmail.com
दि. २२/०४/२०२४
जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण / २०२३-२४/०३२१७
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली.
विषयः- राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत.
संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. एसवीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७, दिनांक ३१/१०/२०२३.
राज्यातील तालुक्यांमध्ये माहे जून ते सप्टेंबर कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या १५ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांमध्ये संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयाद्वारे दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित केलेल्या भागाकरीता शासनाने विविध सवलती लागू केलेल्या आहेत.
संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. १० मध्ये नमूद केल्यानुसार दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यामधील शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजना (पीएम-पोषण योजना) दिर्घ सुट्टीच्या कालावधीत देखील राबविण्यात यावी. उक्त शासन निर्णयान्वये शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त भागामध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.
(शरद गोसावी)
प्रत माहितीस्तव सविनय सादर-
शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
Also Read -
प्राथमिक शिक्षण संचालनालय प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना लाल देऊळ समोर, डॉ. आंबेडकर रोड, पुणे-४११००१.
दूरध्वनी (०२०-२६१२८१५३)
जा.क्र. प्राशिस/ऑनलाईन /२०२४/02594
प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व
ईमेल- depmah२@gmail.com
दि. २६/०३/२०२४.
26 MAR 2024
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी ऑनलाईन भरलेल्या उपस्थिती माहितीची पडताळणी करणेबाबत.
संदर्भ: शासन निर्देश क्रः संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ६५/एस.डी. ३ दि. २१.०३.२०२४.
महोदय,
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती राज्यामधील प्रत्येक जिल्हयातील शाळांनी शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. शाळांनी दैनंदिन नोंदविलेली उपस्थितीची माहिती केंद्र शासनाच्या Automated Monitoring System प्रणालीवर दर्शविण्यासाठी पाठविण्यात येते. सदर प्रमाणे भरलेल्या माहितीचे केंद्र शासनाद्वारे दैनंदिन तपासणी केली जाते. तथापि, जिल्ह्यातील सर्व शाळांद्वारे सदर प्रमाणे माहिती नियमितपणे भरली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या दैनंदिन AMS अहवालामध्ये राज्यातील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, सदर योजनेंतर्गत लाभ दिलेल्या विद्यार्थीची दैनंदिन माहिती विहीत कालावधीत त्याच दिवशी भरण्याबाबत सर्व मुख्ययाध्यापक/शाळाप्रमुखांना आपल्या स्तरावरुन सूचना द्याव्यात. तसेच प्रस्तुत बाबतचे सनियंत्रण करणेबाबत गटशिक्षणाधिकारी / अधीक्षक यांना सूचना देणेत याव्यात. सदरप्रमाणे माहिती विहित कालावधीत न भरल्यास जबाबदार असणाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. सोबत : ऑनलाईन माहिती पाहावयाचे मॅन्युअल
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्रत माहितीस्तव सादर : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
Also Read -
Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Guidelines Circular
MDM Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon