Maratha Arakshan Update Information
Watch Live Now
LIVE विशेष अधिवेशनविधानमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण…
(सूरज मांढरे मा.प्र.से.)
आयुक्त शिक्षण
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव - मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
राज्यात कार्यरत असलेल्या शासकीय, निमशासकीय व अनुदनित संस्थामधील अधिकारी व कर्मचारी यांची माहिती
हेही वाचाल
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब
वर्ष १०, अंक १४]
शुक्रवार, जानेवारी २६, २०२४/माघ ६, शके १९४५
[पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ४९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
मादाम कामा मार्ग, हतात्मा राजगरू चौक, मंत्रालय,
मुंबई ४०००३२, दिनांक २६ जानेवारी २०२४.
अधिसूचना
मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण
👇👇👇👇👇
=====================================================
नवीन प्रशासकीय इमारत खोली क्र. ३०७, तिसरा मजला, विधान भवना समोर,
पुणे- ४११००१
दूरध्वनी क्र. ०२०- २६०५३०५६
ई.मेल msbccpune@gmail.com
जा.क्र.प्र.क्र.३५१/२०२३/प्रशिक्षण/१९९
दिनांक : २४ जानेवारी २०२४
प्रति,
१. मा. जिल्हाधिकारी (सर्व)
२. मा.महानगरपालिका आयुक्त (सर्व)
विषय : सर्वेक्षणामध्ये नवबौद्धांच्या समावेशाबाबत
महोदय,
सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणा-या प्रश्नावलीमध्ये आरक्षित जातीच्या यादीत नवबौद्ध जातीच्या समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या सर्वेक्षणात अडचणी येत आहेत. हा मुद्दा दि.२४ जानेवारी २०२४ रोजीच्या Online बैठकीत उपस्थित करण्यात आला होता.
अनुसूचित जाती व जमाती आदेश (सुधारणा) कायदा १९७६ नुसार महाराष्ट्र राज्याच्या अनु. जातीच्या यादीत नवबौद्ध या जातीचा समावेश नाही. सद्यस्थितीत नवबौद्ध व्यक्तींना धर्मांतरापुर्वीच्या जातीचे जात प्रमाणपत्र देण्यात येते. यास्तव या प्रश्नावलीमधील जातीच्या यादीत नवबौद्ध जांतीचा समावेश नाही. त्यामुळे त्यांच्या धर्मातंरापूर्वीच्या जातीची नोंद सर्वेक्षणामध्ये घेण्यात यावी.
आपली,
(आ.उ.पाटील)
सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
प्रत
माहिती तथा उचित कार्यवाहीस्तव सादर मा. विभागीय आयुक्त (सर्व)
=====================================================
Maratha Kranti Morcha YCEW Traffic Notification
महाराष्ट्र पोलीस
अपर पोलीस महासंचालक (वाहतुक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, मोती महल, ६ वा मजला, १९५, जे. टाटा, मार्ग, सी. सी. आय. क्लब जवळ, सम्राट रेस्टॉरंट समोर, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०.
जा.क्र. अपोमसं (वा.)/४५/मुं. पु. दु. मार्ग/मराठा आरक्षण-वाहतुक अधिसुचना / ३०२/२०२४, मुंबई दि. २३/०१/२०२४
"वाहतुक अधिसुचना"
अधिसुचना :-
ज्याअर्थी, महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या नागरीकांना आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली "मराठा क्रांती मोर्चा" दिनांक २०/०१/२०२४ रोजी आंतरवली सराठी जि. जालना येथुन उपोषण आंदोलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलक / मोर्चेकरी मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत.
ज्याअर्थी लोणावळा पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे वाघसई, ता. मवाळ, जि. पुणे येथील रिझवी मैदान जमलेले आंदोलक दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी सोईनुसार वळवण येथुन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबई कडे मार्गस्थ होणार असल्याने दिनांक २५/०१/२०२४ रोजी दुपारी ०६:०० वाजेपासुन दिनांक २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन ब्रिज कि.मी. ४५.५०० ते कळंबोली कि.मी. ००.००० पर्यंत पुणे बाजुकडुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी (मराठा आंदोलकांच्या वाहनाखेरीज) वाहतुक पुर्णतः बंद करणे गरजेचे आहे. दरम्यान वाहतुक कोंडी होऊ नये, वाहन चालकांची गैरसोय तथा वाहतुक सुरळीत व सुनिश्चित राहणे आम जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे.
त्याअर्थी, मी रविंद्र कुमार सिंगल, अपर पोलीस महासंचालक (वाहतुक), महाराष्ट्र राज्य, मुंबई याद्वारे शासन अधिसुचना क्र. एम. व्ही.ए. ०५८९/सीआर: १०६१/टीआर-२ दिनांक १९/०५/१९९० परिशिष्ट, दिनांक ३०/०९/२००२ नुसार मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जुना मुंबई-पुणे (एन.एच. ४८) वर दिनांक २५/०१/२०२४ रोजी दुपारी ०६:०० वाजल्यापासुन दिनांक २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन ब्रिज कि.मी. ४५.५०० ते कळंबोली कि.मी. ००.००० पर्यंत पुणे बाजुकडुन मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी (मराठा आंदोलकांच्या वाहनाखेरीज) वाहतुक पुर्णतः बंद करण्यात येत आहे. तरी जनतेला वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग वापरणेबाबत अधिसुचना जारी करीत आहे.
पर्यायी मार्ग
१. दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते दिनांक २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. या कालावधीत पुणे बाजुकडून मुंबई बाजुकडे येणारी हलकी वाहने ही यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कि.मी. ५५.००० येथुन वळवुन मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरून मार्गस्थ करता येतील.
२. दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते दिनांक २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. या कालावधीत मराठा आंदोलकांचा मोर्चा खोपोली एक्झीट-कि.मी. ३९.८०० चे पुढे गेल्यानंतर पुणे बाजुकडून मुंबई बाजुकडे येणारी हलकी वाहने व बसेस हया खोपोली एक्झीट-कि.मी. ३९.८०० येथुन वळवुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.
३. दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते दिनांक २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. या कालावधीत मराठा आंदोलकांचा मोर्चा खालापुर एक्झीट कि.मी. ३२.५०० चे पुढे गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुणेहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस हया खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापुर एक्झीट कि. मी. ३२.५०० येथुन वळवुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडूंग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.
४. दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते दिनांक २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. या कालावधीत मराठा आंदोलकांचा मोर्चा कळंबोली एक्झीट कि.मी. ००.००० चे पुढे गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुणेहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस हया द्रुतगती मार्गावरून कि.मी. ००.००० येथुन राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून मुंबई वाहिनीवरून मार्गस्थ करण्यात येतील.
५. दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते दिनांक २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. या कालावधीत वाकण-पाली-खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-ए मार्ग मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई बाजुकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (मराठा आंदोलकांच्या वाहनांखेरीज) बंदी असेल.
६. दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते दिनांक २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. या कालावधीत पेण-खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६-डी मार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई बाजुकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (मराठा आंदोलकांच्या वाहनांखेरीज) बंदी असेल.
७. दिनांक २५/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते दिनांक २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वा. या कालावधीत गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मार्गे नवी मुंबई, मुंबई बाजुकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना बंदी असेल.
सदरची वाहतुक अधिसुचना दि. २५/०१/२०२४ रोजी दुपारी ०६:०० वाजेपासुन दि. २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२:०० वाजेपर्यंत अंमलात राहील.
(डॉ. रविंद्र कुमार सिंगल) अपर पोलीस महासंचालक (वाहतुक), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
=====================================================
यंत्रणा सज्ज ठेवा, गावोगावी दवंडी द्या, नागरिकांना माहिती द्या
अचूक, कालबद्धपणे काम व्हावे
चोवीस तास कॉल सेंटर सुरु ठेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मराठा सर्वेक्षण GR वाचा त्यासाठी या ओळीला स्पर्श करा
मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसेच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज निर्देश दिले. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीस निवृत्त न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, महसूल अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे, नगरविकास प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज, इतर मागास विभागाचे सचिव अंशू सिन्हा, विधि व न्याय सचिव श्री कलोते, यांची उपस्थिती होती. प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव ( साविस) सुमंत भांगे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आजवर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.
मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम २३ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येईल अशारीतीने राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटूंबांचे सर्वेक्षण होणार आहे. याकामी गोखले इन्स्टिट्युट, आयआयपीएस, या नामांकित संस्थांची मदत होणार आहे.
सामाजिक भावनेने काम करण्याचे आवाहन
मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासन कटीबध्द असून प्रशासनाने सुध्दा या अतिशय महत्वाच्या कामामध्ये पूर्णशक्ती एकवटून एक सामाजिक भावनेने हे काम करावे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या
यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले. ते म्हणाले की, हे सर्वेक्षण अतिशय महत्वाचे असून तीनही शिफ्ट्समध्ये काम करावे. गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्या, ग्रामपंचायतीच्या फलकांवर सुचना द्या तसेच विविध माध्यमातून लोकांना याविषयी माहिती द्या. सर्वेक्षणाला येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल. सर्वेक्षणाच्या काळात तहसीलदार आणि सर्व संबंधितांनी दररोज आपल्या कामच अहवाल द्यायचा आहे.
२४ तास कॉल सेंटर सुरु ठेवा
यावेळी गोखले इन्स्टिट्यूटचे श्री अजित रानडे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाख पेक्षा जास्त प्रगणक आठ दिवसात हे काम पूर्ण करणार आहे असे ते म्हणाले. ३६ जिल्हे, २७ नगरपालिका, ७ कॅन्टोनमेंट क्षेत्रात प्रशिक्षण आजपासून सुरु झाले आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, प्रगणकांचे तसेच अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण अतिशय व्यवस्थितपणे करा तसेच आपल्या अहवालात देखील प्रशिक्षण सत्र, बैठका या सर्व बाबींचे रेकॉर्ड ठेवा. न्या गायकवाड अहवालातील त्रुटी दूर करणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, २००८ मधील अहवाल आणि सध्याचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल यात नेमका काय फरक आहे आणि नव्याने कसा हा इंटेन्सिव्ह डेटा संकलित करण्यात येत आहे हे व्यवस्थित तयार करण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा
कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळविणे महत्वाचे असून नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ, तहसीलदार यांचा समावेश करा. ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, दवंडी द्या, तसेच पोलीस पाटील व खासगी व्यक्तींकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा असे मुख्यमंत्री म्हणाले.
ऑक्टोपासून १ लाख ४७ हजार कुणबी प्रमाणपत्रे वितरीत
निवृत्त न्या, संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरु केल्यापासून १ लाख ४७ हजार कुणबी नोंदी प्रमाणपत्रे संबंधिताना वितरीत करण्यात आले आहेत. एकट्या मराठवाड्यात ३२ हजार नोंदी आढळल्या असून १८ हजार ६०० कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. न्या संदीप शिंदे समितीने लातूर, मराठवाड्यात बैठकीची दुसरी फेरी पण पूर्ण केली आहे अशी माहिती सुमंत भांगे यांनी यावेळी दिली
Application Download Process
MSBCC SURVEY
Maharashtra State Backward
Class Commission
👆
२३ जानेवारी पासून मराठा सर्वेक्षणाला सुरुवात
● लवकरच शासकीय कर्मचारी सर्वेक्षण कामी तुमच्या घरी येतील
● त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मोठेपणाचा आव आणू नका
● सुप्रीम कोर्टात मराठा समाजाची बाजू अधिक भक्कम व्हावी म्हणून या सर्वेक्षणातील माहिती इम्पेरिकल डेटा म्हणून वापरली जाणार आहे.
● खालील लिंकवर जाऊन सर्वेक्षणाची प्रश्नावली डाऊनलोड करू शकता
👇👇👇👇👇
मराठा सर्वेक्षण प्रश्नावली डाउनलोड लिंक फक्त या ओळीला स्पर्श करा
👇👇👇👇👇👇👇
या ई-मेलवर संबंधित सूचना पाठविण्याचे आवाहन आयोगाने केले आहे
हेही वाचाल
कुणबी नोंदी शोधा वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
हेही वाचाल
कुणबी नोंदी मोडीलिपी कागदपत्रात कुणबी शब्द शोधा वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon