DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Maratha Samaj Sarvekshan GR

Maratha Samaj Sarvekshan GR

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग

नवीन प्रशासकीय इमारत खोली क्र. ३०७, तिसरा मजला, विधान भवना समोर, पुणे- ४११००१

दूरध्वनी क्र. ०२०- २६०५३०५६

ई.मेल. msbeepune@gmail.com

जा.क्र. मरामाआ/प्र.क्र. ९९/२०२३/सर्वेक्षण/२८६ पुणे प्रति,


दिनांक: १.०२.२०२४

१. मा. जिल्हाधिकारी (सर्व)

२. मा. महानगरपालिका आयुक्त (सर्व)


विषय : सर्वेक्षण बंद करण्याबाबत.


संदर्भ : आयोगाकडील पत्र क्र. मरामाआ/प्र.क्र.३५१/२०२३/सर्वेक्षण/पुणे, दि.३०.१.२०२४


महोदय,

संदर्भाधीन पत्रान्वये दि.२.२.२०२४ रोजी सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार दि.२.२.२०२४ रोजीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणासाठी मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी मुदतवाढीची मागणी करण्यात येऊ नये.

दि.२.२.२०२४ रोजी रात्री २३.५९ मिनिटानी सदर Software Application (APK) बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याबाबत प्रगणकांना सूचना देण्यात याव्यात व संदर्भाधीन पत्रान्वये कळविल्यानुसार दि.३.२.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगाकडे पाठविण्यात यावे.


आपली, (आ.उ.पाटील)

सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे


प्रत :

१. मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

२. मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव

३. मा.सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

४. मा. सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

५. मा. विभागीय आयुक्त (सर्व)

-----------------------------------------------------------------------------------------------

हेही वाचा 👇

Maratha Aarakshan sarvekshan mudatwadh

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग नवीन प्रशासकीय इमारत खोली क्र. ३०७, तिसरा मजला, विधान भवना समोर, पुणे- ४११००१

दूरध्वनी क्र. ०२०- २६०५३०५६

ई.मेल. msbeepune@gmail.com

दिनांक: २०.०१.२०२४

जा.क्र. प्रति. मरामाआ/प्र.क्र.३५/२०२३/सर्वेक्षण/वि.माहिती/पुणे/

१. मा. जिल्हाधिकारी (सर्व)

२. मा. महानगरपालिका आयुक्त (सर्व)


विषय : सर्वेक्षणास दि.२.२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.


महोदय,

                महाराष्ट्रातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण दि.३१.१.२०२४ पर्यंत पूर्ण करण्याबाबत यापूर्वी कळविण्यात आले होते. तथापि काही ठिकाणी हे सर्वेक्षण ३१.१.२०२४ पर्यत पूर्ण होऊ शकत नसल्याने सर्वेक्षणास मुदतवाढ देण्याची आवश्यकता असल्याचे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे निदर्शनास आले आहे. यास्तव सर्वेक्षणास दिनांक २.२.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी आपल्या जिल्हा / महानगरपालिका क्षेत्रातील सर्वेक्षणाचे काम दि.२.२.२०२४ पर्यंत १००% पूर्ण करावे व दि.३.२.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत आपल्या क्षेत्रातील सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आयोगास पाठविण्यात यावे ही विनंती.

आपली,

(आ.उ.पाटील)

सदस्य सचिव 

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे

प्रत माहितीस्तव :

१. मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा. सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

३. मा. सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

४. मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२

५. मा. विभागीय आयुक्त (सर्व)

-----------------------------------------------------------------------------------------------

हेही वाचा 👇

मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने राज्यात करावयाच्या सर्वेक्षणाच्या कामकाजाबाबत.

-----------------------------------------------------------------------------------------------

हेही वाचा 👇

सातारा जिल्हा परिषद, सातारा शिक्षणाधिकारी (प्राथ.) ०२१६२- २३४८०७, शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद मुख्य इमारत, दुसरा मजला, तालुका जिल्हा सातारा.
ईमेल-eozpsatara@gmail.com
जा.क्र. शिक्षण/प्राथ./संकीर्ण / /2024
दिनांक -22/01/2024
प्रति,
गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व)

विषय - प्राथमिक शाळांच्या वेळेबाबत. 

संदर्भ - मा. जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडील निर्देश दि. २२/०१/२०२४
    उपरोक्त संदर्भिय विषयांनुसार कळविण्यात येते की मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षकांना प्रगणक म्हणून सर्वेक्षण करावयाचे आदेश आहेत. सदर विषयानुसार दि. २३/०१/२०२४ ते २५/०१/२०२४ या कालावधीत ज्या प्राथमिक शाळातील शिक्षकांना प्रगणक म्हणून नेमणूक दिलेली आहे त्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात. तसेच याबाबत प्राथमिक शाळांना आपल्या स्तरावरून अवगत करण्यात यावे.
(शबनम मुजावर) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सातारा जिल्हा परिषद सातारा

प्रत- माहितीस्तव सविनय सादर.
1. मा. जिल्हाधिकारीसो सातारा.
2. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा

-----------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक : मआसु-२०२४/प्र.क्र.१/१६-क मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. दिनांक : ०४ जानेवारी, २०२४

प्रस्तावना :
मा.मंत्रिमंडळाने दि.३१.१०.२०२३ रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार दि.३१.१०.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने इम्पेरिकल डाटा गोळा करण्याबाबत कळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला दि. १३.११.२०२३ रोजीच्या पत्रान्वये Terms of Reference निश्चित करून दिले आहेत. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने करावयाच्या सर्वेक्षणासाठी निकष निश्चित केले असून त्याबाबतची प्रश्नावली अंतिम केली आहे. सदर प्रश्नावली सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व सर्व महानगरपालिका यांना पाठविण्यात आलेली आहे. राज्य मागासवर्ग आयोगास मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी करावयाच्या सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

शासन निर्णय :
राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने राज्यात सर्वेक्षणाच्या कामासाठी विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त, जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी आणि शहरी भागाकरीता आयुक्त, महानगरपालिका यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर सर्वेक्षणासाठी राज्यातील महसूल व इतर प्रशासकीय यंत्रणेला खालील मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत-

१. गोखले इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेकडून सर्वेक्षण कामाकाजासाठीचे सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून सदर सॉफ्टवेअर युजर फ्रेन्डली असेल. राज्य मागसवर्ग आयोगाने तयार केलेल्या प्रश्नावलीतील माहिती हॅन्डहेल्ड डिव्हाईसद्वारे बहुपर्यायी स्वरूपात प्रगणक (Enumerators) यांनी भरावयाची आहे. सॉफ्टवेअरनुसार सर्व प्रगणकांना तात्काळ प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी. प्रगणकांना प्रशिक्षण देण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व आयुक्त, महानगरपालिका हे मास्टर ट्रेनर्स नियुक्त करण्याची शिफारस करतील. मोठ्या जिल्ह्यांकरीता दोनपेक्षा अधिक मास्टर ट्रेनर्स नियुक्त करता येतील.

२. मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणीसाठीच्या सर्वेक्षणाचे काम काटेकोरपणे युद्ध पातळीवर व विहित कालावधीत म्हणजेच ७ दिवसांत करावे. त्याकरीता प्रगणक (Enumerators) यांच्यामध्ये आवश्यक ती वाढ करण्याची मुभा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राहील.

३. प्रगणकांस सहाय्य करण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांचे आवश्यक ते सहकार्य प्राप्त करून घेण्यात यावे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक यांनी पोलीस बंदोबस्त आवश्यकतेनुसार उपलब्ध करून द्यावा.

४. सर्वेक्षणाच्या कामकाजासाठी जिल्हाधिकारी यांना शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अन्य आवश्यक त्या सर्व कर्मचारी/अधिकारी यांच्या सेवा अधिगृहित करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यांनी शासकीय वाहने व साधनसामुग्री यांचा उपयोग करून सर्वेक्षणाचे कामकाज विहित कालावधीत करण्याची दक्षता घ्यावी. तसेच सर्वेक्षणाचे कामकाज सुलभ व जलद गतीने व्हावे याकरीता अधिकचा राखीव कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात यावा व त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल याची दक्षता घेण्यात यावी.

५. तसेच सर्वेक्षणाबाबतच्या दैनंदिन कामकाजाची माहिती संबंधित यंत्रणेने सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व आयुक्त, महानगरपालिका व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद यांचेकडे पाठवावी व सर्व जिल्हाधिकारी, सर्व आयुक्त, महानगरपालिका व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी सदर माहिती त्याच दिवशी राज्य मागासवर्ग आयोगास तसेच अपर मुख्य सचिव (महसूल) महसूल व वन विभाग आणि सचिव (साविस), सामान्य प्रशासन विभाग यांना पाठविण्याची दक्षता घ्यावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या

CLICK HERE 

या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०१०४१४३८०१६००७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

SUMANT NAMDEORAO BHANGE


(सुमंत भांगे) 

महाराष्ट्र शासनाचे सचिव

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon