Modilipi kagatpatart Kunbi Shabd Shodha
Modi junya kagatpatart Kunbi Shabd kasa Shodhava
how to find word kunbi in old
modilipi documents
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्दती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीची व्याप्ती संपुर्ण राज्यासाठी वाढविण्याबाबत..
महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक : मआसु- २०२३/प्र.क्र.०३/१६-क
दिनांक : ०३ नोव्हेंबर, २०२३
संदर्भ : सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : मआसु- २०२३ / प्र.क्र.०३/१६-क. दि.७.९.२०२३
प्रस्तावना :
राज्याच्या मराठवाडा विभागातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा
जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजामकाळात झालेले करार,निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणीअंती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहित करण्यासाठी मा. न्यायमुर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागाच्या दि.७.९.२०२३ च्या संदर्भीय शासन निर्णयान्वये समिती स्थापन करण्यात आली आहे. २. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने मा. न्यायमूर्ती शिंदे समितीची व्याप्ती वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.
शासन निर्णय :
सदरचा हा शासन निर्णय आपल्याला पीडीएफ मध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
मराठवाडा विभागातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात
समितीची कार्यपद्धती यापूर्वीच दि. ०७.०९.२०२३ च्या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. आता, या शासन निर्णयान्वये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मराठा समाजातील संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडेसादर केलेल्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणीअंती कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करून अहवाल शासनास सादर करण्यासाठी मा. न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त) समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार, आता समितीची रचना खालीलप्रमाणे राहील.-
मा. न्यायमुर्ती श्री संदीप शिंदे (निवृत्त) अध्यक्ष
अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग सदस्य
प्रधान सचिव, विधि व न्याय विभाग सदस्य
सर्व विभागीय आयुक्त सदस्य
सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी
सदस्य सह सचिव, सामान्य प्रशासन विभाग (सा.वि.स.) मंत्रालय, मुंबई
सदस्य सचिव
प्रत,
२. समितीची कार्यकक्षा समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहील.
संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणीअंती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करणे.
३. समितीचा कार्यकाळ - प्रस्तुत समितीने आपला अहवाल दिनांक २४ डिसेंबर, २०२३ पर्यंत शासनास सादर करावा
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या
सदर शासन निर्णय पीडीएफ मध्ये हवा असल्यास या ओळीला स्पर्श करा
या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३११०३२२३१०४९६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने
साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(सुमंत भांगे)
शासनाचे सचिव
कुणबी हा शब्द मोडी कागदपत्रांमध्ये कसा शोधावा?
आता जर कधी एखाद्या शब्दावर अडला असाल तर नक्कीच इथे शोधून बघा....
‘कुणबी हा शब्द उपलब्ध जुन्या कागदपत्रांतून शोधून काढण्यासाठी केवळ एक शब्द शोधून काढण्यासाठी आणि गरजवंताला थोडी मदत व्हावी म्हणून ही अल्पशी मदत ज्यांना आपल्या जवळील उपलब्ध कागदपत्रांमधून हा शब्द शोधून काढायचा असतो त्यांच्यासाठी सोबतच्या फोटोमध्ये डाव्या बाजूला प्रत्यक्ष मोडी कागदपत्रांमधील ‘कुणबी’ हा शब्द कसा दिसतो ते चार वेळा दाखवले आहे. त्यावरुन आपल्या कागदपत्रांमध्ये कुणबी या शब्दाचा शोध घेता येईल.
कुणबी शब्द हा शोध सोपा व्हावा म्हणून आणखी एक टीप कागदपत्रांमध्ये शक्यतो व्यक्तींची नावे जिथे लिहिलेली असतात तिथेच पुढे त्या व्यक्तीच्या जातीचा, वयाचा व व्यवसाय/नोकरीचा उल्लेख केलेला असतो आणि ते कागदपत्रे वाचण्याचा प्रयत्न करा. नक्कीच जमेल
Modi Kagatpatrat Kunbi Shabd Shodha
how to find word kunbi in old modilipi documents
वरील छायाचित्रांमध्ये जुन्या कागदपत्रात मोडी लिपी मध्ये कुणबी शब्द चार प्रकारे लिहून दाखवलेला आहे ते नक्कीच तुमच्या उपयोगी पडेल ही माहिती जशीच्या तशी समाज माध्यमावर लिंक शेअर करायला हरकत नाही
Image credit to Google
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon