DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

NMMS Examination




National Means cum Merit Scholarship Scheme Exam 

National Scholarship Scheme Examination for Economically Weaker Students

परीक्षेचे नाव : NMMS 
National Means Cum Merit Scholarship
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना
१. योजनेची उद्दिष्टे :-

a) इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने आर्थिक सहाय्य करणे.
b) विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत करणे.
c) विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता विकसित होऊन त्या विद्यार्थ्यांकडून आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा घडावी.

२. परीक्षेचे स्वरुप :- 

केंद्रशासनामार्फत (शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली) २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दर महा रु. १०००/- (वार्षिक रु. १२०००/-) शिष्यवृत्ती दिली जाते.
३. पात्रता :-

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापनाप्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठ्यांचा सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थीनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.
• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.
• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.
• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.
• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

परीक्षेचे वैशिष्ट्ये
ही परीक्षा आठवीतील विद्यार्थ्यांना देता येते.
ज्या पालकांचे आर्थिक उत्पन्न साडे तीन लाखा पेक्षा कमी आहे त्या सर्व पालकांच्या पाल्यांना ही परीक्षा देता येते.
दर वर्षी नोव्हेंबर/डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी ही परीक्षा घेतली जाते. (कोरोना कालावधी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल झाला)
या परीक्षेच्या अभ्यासातून विविध स्पर्धा परीक्षेची माहिती व विविध स्पर्धा परीक्षेचा स्वरूप / पॅटर्न समजण्यात निश्चित मदत होते.
१८० गुणाची बहुपर्यायी ही परीक्षा होते.

परीक्षेची सुरुवात : 2008 - 09 

महाराष्ट्रसाठी जवळ-जवळ १२००० विद्यार्थ्यांना ही scholarship मिळते

अभ्यासक्रम : 
विषयाचे नाव
 बौद्धिक क्षमता चाचणी Mental Ability Test [MAT] 

एकूण गुण ९० असून एकूण प्रश्न ९० आहेत व कालावधी दीड तास (फक्त दृष्टी अपंगासाठी ३० मिनिटे जादा वेळ)  परीक्षा वेळ साडे दहा ते बारा 

 शालेय क्षमता चाचणी Scholastic Aptitude Test [SAT] 

एकूण गुण ९० असून एकूण प्रश्न ९० आहेत व कालावधी दीड तास (फक्त दृष्टी अपंगासाठी ३० मिनिटे जादा वेळ)  परीक्षा वेळ दिड ते तीन 


पात्रता गुण - 
एकत्रित ४०% सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत एससी एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण बत्तीस टक्के मिळणे आवश्यक आहे

परीक्षेसाठी विषय - सदर परीक्षेसाठी दोन विषय असतील 

१) बौद्धिक क्षमता चाचणी - ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारणभाव,  विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात
1) Mental / Intellectual Ability Test – It is a psychological test consisting of 90 multiple choice objective questions based on the concept of causality, analysis, synthesis etc.

२) शालेय क्षमता चाचणी - ही सामान्यतः इयत्ता सातवी व इयत्ता आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल त्यामध्ये 
2) Scholastic Aptitude Test – This will usually be based on the syllabus of Class VII and Class VIII
१.सामान्य विज्ञान एकूण गुण ३५ 
२.समाजशास्त्र एकूण गुण  ३५ 
३. गणित एकूण गुण २० 
असे तीन विषय असतील या तीन विषयाचे एकूण ९०  प्रश्न सोडवायचे असतात 
1.General Science Total Marks 35
2.Sociology Total Marks 35
3. Mathematics Total Marks 20
There will be three such topics and a total of 90 questions have to be solved in these three topics

 उपविषयवार गुणाची विभागणी खालील प्रमाणे असेल 

The sub-subject wise division of marks will be as follows

१. सामान्य विज्ञान  ३५ गुण भौतिकशास्त्र ११ गुण रसायनशास्त्र ११ गुण जीवशास्त्र १३ गुण
२. समाजशास्त्र ३५ गुण -  इतिहास १५ गुण नागरिकशास्त्र ०५ गुण भूगोल १५ गुण 
३. गणित २० गुण
1. General Science 35 marks - Physics 11 marks Chemistry 11 marks Biology 13 marks
2. Sociology 35 marks - History 15 marks Civics 05 marks Geography 15 marks
3. Mathematics 20 marks


एन एन एम एस परीक्षा 
कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी आवश्यकता असते सरावाची आपणास एन एन एम एस परीक्षेत यश संपादन करावयाचे असेल तर अधिका-अधिक सराव करणे गरजेचे असते इयत्ता आठवीच्या विद्यार्थाना एन एन एम एस परीक्षेत कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात वेळेचे नियोजन करणे सोयीचे व्हावे यासाठी अधिकच्या सराव प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव असला पाहिजे त्यासाठी उपघटक निहाय सर्व विषयाच्या प्रश्नमंजुषा सोडवा आणि एन एन एम एस परीक्षेची भक्कम तयारी करून घ्या 
NNMS Exam
Practice is needed to succeed in any exam If you want to succeed in NNMS exam then you need to practice more and more What type of questions are asked in NNMS exam for class 8th students Practice solving more practice questions to make time planning easier Solve all the subject wise question papers and prepare strongly for the NNMS exam.
 

आवश्यक बाबी :
1)  उत्पन्न 3,50,000 पेक्षा कमी
2)  वर्ग 7 मध्ये कमीत कमी 55 %
3) Form शाळेच्या माध्यमातून Online भरावा लागतो
4) आधार कार्ड 
5) Bank Pass Book ( नसल्यास आई / वडिलांचे सुद्धा चालेल)
6) उत्पन्न दाखला 
7) फोटो, सही
8) आई किंवा वडील सरकारी सेवेत नसावे
9) ही परीक्षा फक्त वर्ग 8 मधीलच विद्यार्थी देऊ शकतात 
10) या परीक्षेत करीता विद्यार्थी हा जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा इतर शासनमान्य शाळेत शिकणारा असावा 
11) विद्यार्थी Student ID
12) एकूण बहीण भाऊ
13) परीक्षा फी 100 रु  (Online खर्च व Late fees सोडून )
( वरील document मध्ये बदल होऊ शकतो )

NMMS परीक्षा पास झाल्या नंतर पुन्हा Online apply करावा लागतो
   
परीक्षेचे फायदे : 
1)  ६०.०००रु. शिष्यवृत्ती (वार्षिक रु १२०००/- ) वर्ग : ९ ते १२ वी पर्यंत
2)  शालेय अभासक्रम दर्जेदार पद्धतीने होतो 
3)  विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते
4)  विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास, निर्णय क्षमता, आकलन क्षमता वाढते 
5)  महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC ) तसेच केंद्रिय लोकसेवा आयोग  ( UPSC ) ची तयारी होते 
6)  सर्वच स्पर्धा परीक्षेत उपयुक्त अभ्यासक्रम 



NMMS EXAM PREVIOUS QUESTION PAPER SET WITH ANSWER KEY  LINK

माहितीपत्रक

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी परीक्षा दि. २२ डिसेंबर २०२४

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या
🌐👉 LINK


🌐👉 LINK

४. ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत: दिनांक ०५/१०/२०२४ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या 
LINK व LINK


या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची खात्री करुनच जात व दिव्यांगत्वाची माहिती भरावी. विद्यार्थ्यांचे जात व दिव्यांगत्व प्रमाणपत्राची एक प्रत मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवणे बंधनकारक आहे. मुख्याध्यापक व विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्र भरताना स्कॅन (Scan) करुन अपलोड करणे आवश्यक आहे. अपूर्ण भरलेले आवेदनपत्रे संगणक स्विकृत करणार नाही. ऑनलाईन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांच्या माहितीत चुका दुरुस्त करावयाच्या असल्यास सदर चुकांची दुरुस्ती प्रवेशपत्र मिळण्यापूर्वी शाळांना शाळा लॉगीनवरुन Edit करता येईल. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली जाणार नाही व याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल, याची नोंद घ्यावी. सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

५. शुल्क :- 

परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

अ.क्र. १ ऑनलाईन आवेदनपत्र भरणे तपशील नियमित शुल्कासह दिनांक ०५/१०/२०२४ ते ०४/११/२०२४ शुल्क रु.१२०/-

अ.क्र २ विलंब शुल्कासह  दिनांक ०५/११/२०२४ ते ०९/११/२०२४ शुल्क रु. २४०/
अ.क्र ३ अतिविलंब शुल्कासह दिनांक १०/११/२०२४ ते १४/११/२०२४ ३६०/- (शाळा/संस्था जबाबदार असेल तर (४८०/-)

शाळा संलग्नता फी संलग्लता फी रु.२००/- प्रति संस्था शैक्षणिक वर्षासाठी

६. परीक्षेचे वेळापत्रक :- सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.


पात्रता गुण 
*सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

७. परीक्षेसाठी विषय: सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT):- ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT):- ही सामान्यतः इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण ३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण ३५) ३. गणित (एकूण गुण - २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

a. सामान्य विज्ञान ३५ गुण: भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.

b. समाजशास्त्र ३५ गुण : इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण

c. गणित २० गुण.

८. माध्यम :-

परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

९. प्रवेशपत्रे :- 

१०. परीक्षेचे मूल्यमापन:- 

विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकामार्फत OMR पध्दतीने करण्यात येते. उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना वजा गुण (Negative Marking) पध्दतीचा अवलंब केला जात नाही. खबरदारीचे सर्व उपाय योजना यांचा विचार करुन बिनचूक गुणयादी तयार करण्यात येते. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या व अनुसूचित जमातीच्या, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गीयांसह दिव्यांग विद्यार्थी आरक्षणातील केंद्रशासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार जिल्हयानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

११. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या : अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी (अपंगासाठी) प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्हयासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

१२. निकाल घोषित करणे : सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

१३. शिष्यवृत्ती दर :- शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.

शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ.९ वी व इ. ११ वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)

सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.

१४. अनधिकृततेबाबत इशारा -
शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.

विद्यार्थ्यांची निवड :- विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon