DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

NMMS Exam

NMMS Exam


        सूचना

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२६-२७परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सूचना

खाली नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.

१ शाळा नोंदणी करणे. School Profile, Principal Details व शाळा संलग्नता शुल्क ऑनलाईन भरणे.

२ विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व ऑनलाईन अर्ज भरणे.

३ विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणे.

A. शाळा नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे

परिषदेच्या
 www.mscepune.in. 

व
 https://mscenmms.in 

या संकेतस्थळाच्या Homepage च्या लिंक वर क्लिक करुन दिसणाऱ्या पेज च्या डाव्या बाजूस असलेल्या उपक्रम मधील शाळा नोंदणी (School Registration) या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील पुढील सूचना काळजीपूर्वक वाचून शेवटी असलेल्या नवीन नोंदणीला जा (Click here to Register) व अर्ज भरा या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर उघडलेल्या पेजवरील Click here to Register या Tab वर क्लिक करा नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.

१ शाळेचा युडायस (UDIES) नंबर अचूक नमूद करणे.

२ शाळेचा युडायस (UDIES) नंबर नमूद केल्यानंतर SARAL वरून आलेली (Auto generate झालेली) शाळेची सर्व माहिती अचूक आहे याची खात्री करावी. जी माहिती आलेली नसेल/अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर सदर माहिती Edit करून अचूक नमूद करावी.

३ शाळेचे माध्यम (School Medium) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

४ शाळेचा Area (Rural/Urban) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

५ शाळेचा Syllabus Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

& School Type Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

७ शाळेचा टेलीफोन नंबर अचूकपणे नमूद करा.

८ शाळेत निवासी सोय असल्यास Yes व नसल्यास No हा पर्याय Hostel Facility Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

९ आपला शाळेचा Email ID अचूकपणे नमूद करा.

१० शाळेचे पूर्ण पत्ता अचूक पणे नमूद करा, ठिकाण लँडमार्क, रस्ता, पेठ, गाव तालुका, जिल्हा व पिनकोड (६ अंकी) या अचूकपणे नमूद करा

११ पिनकोड नमूद करताना तो ४ ने सुरु होईल याची खात्री करा.

१२ संपर्क माहितीमध्ये मुख्याध्यापकांचा दहा अंकी मोबाईल क्रमांक अचूक नमूद करा.

१३ तालुका, जिल्हा व पिनकोड SARAL वरून Auto Generate झालेला आहे.

१४ मुख्याध्यापकांची माहितीः मुख्याध्यापकांचे नाव, ई-मेल, मोबाईल क्रमांक, पर्यायी संपर्क क्रमांक अचूकपणे नमूद करा.

14 Upload Principal's /Head Master's Photo with Signature: मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती ८.५ सें.मी. x ४.५ सें.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी इमेज २ kb ते १०० kb या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.

१६ वरील सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर Preview या बटनावर क्लिक करा.

१७ एकदा भरलेली शाळेची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच असेल.

१८ वरील सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर Submit या बटनावर क्लिक करा.

१९ Submit बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- भरण्यासाठी Proceed to pay हा पर्याय उपलब्ध होईल.

२० Proceed to pay या बटनावर क्लिक केल्यास ऑनलाईन पद्धतीने शाळा संलग्नता शुल्क भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम पिन व UPI असे पर्याय उपलब्ध होतील. आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन शुल्क भरावे.

२१ चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही, याची नोंद घ्यावी.

२२ ऑनलाईन शुल्क भरतेवेळी इंटरनेट, वीज जाणे यामुळे शुल्क जमा न झाल्यास पुन्हा लॉगीन करून शुल्क ऑनलाईन भरावे.

२३ शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर, ईमेलवर व मोबाईलवर Payment Successful असा मेसेज येईल. आणि

Transaction Details स्क्रीनवर दिसतील.

RY Transaction Details Download करा व Print काढा..

२५ आपण नमूद केलेल्या मुख्याध्यापकांचा Email ID व मोबाईल वर शाळा लॉगीनचे User Name व Password प्राप्त होईल.

२६ शाळा नोंदणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही.


B. School Profile ची माहिती भरणे.

१ शाळेच्या Email ID व मोबाईलवर प्राप्त झालेल्या User Name व Password द्वारे लॉगीन करावे.

२ लॉगीन केल्यांनतर School Profile ची माहिती भरण्याबाबतचा फॉर्म उपलब्ध होईल.

३ सदर फॉर्म मध्ये School UDISE Code, School Name, Principal/Head Master Mobile No. व Email या क्रमाने सदरच्या शाळेची माहिती automatically येईल. जी माहिती आलेली नसेल/अपूर्ण असेल किंवा चुकीची असेल तर सदर माहिती Edit करून अचूक नमूद करावी.

४ शाळेचे माध्यम (School Medium) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

५ शाळेचा Area (Rural/Urban) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

६ शाळेचा Syllabus Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

७ School Type Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

८ शाळेचा टेलीफोन नंबर अचूकपणे नमूद करा.

९ शाळेचा पत्ता ठिकाण/लँडमार्क, गाव, अचूकपणे नमूद करा.

१० तालुका, जिल्हा व पिन कोड SARAL वरून Auto generate झालेला आहे.

११ Upload Principal's /Head Master's Photo with Signature: मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी

अपलोड करण्याची कार्यपद्धती ८.५ सें.मी. x ४.५ सें.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी इमेज २ kb ते १०० kb या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.

१२ वरील सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर Save या बटनावर क्लिक करा.

१३ एकदा भरलेली शाळेची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच असेल.

C. विद्यार्थ्यांची नोंदणी करणे व ऑनलाईन आवेदनपत्र भरणे.

School Profile ची माहिती भरून Save या बटनावर क्लिक केल्यानंतर, School Dash board वरील बाजूस असलेल्या Student Registration Form या बटनावर विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा.

२ Student Registration Form या बटनावर क्लिक केल्यानंतर Student Registration हे पेज उघडेल.

Student Details: (प्रथम विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे.)

UDISE Code Automatically येईल.

२ Standard Automatically येईल (8 th).

३ विद्यार्थी विनाअनुदानित शाळेत शिकत आहे का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय

Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा

४ विद्यार्थी केंद्रीय विद्यालयात शाळेत शिकत आहे का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा

५ विद्यार्थी जवाहर नवोदय वि‌द्यालयात शाळेत शिकत आहे का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

६ विद्यार्थी शासकीय वसतिगृह सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शेक्षणिक सुविधांचा लाभ घेत आहेय का? लाभघेत असेल तर yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूक पाने निवडा.

७ विद्यार्थी सैनिक शाळेत शिकत आहेय का? शिकत असेल तर Yes व शिकत नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

Upload Student Photo with Signature: विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती ८.५ सें.मी. x ४.५ सें.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी इमेज २ kb १०० केबी या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी.

९ विद्यार्थ्यांचे आडनाव, नाव, वडीलांचे, आईचे अचूक नमूद करावे.

१० विद्यार्थ्याचे Gender Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

११ विद्यार्थ्यांची जन्मतारीख DD, MM, YYYY या प्रमाणे अचूकपणे नमूद करावे. Online जन्मतारीख निवडताना सर्वप्रथम वर्ष, महिना आणि जन्मतारीख याप्रमाणे निवडावे.

१२ आधार कार्ड असल्यास आधार क्रमांक अचूकपणे नमूद करा. आधार कार्ड नसल्यास सदरचा रकाना रिकामा सोडावा.

१३ विद्यार्थीच्या इ. ७ वी ची श्रेणी / Grade dropdown list मधून निवड करावी. आणि इ. ७ वी मिळालेले टक्के नमूद करावे.

१४ विद्यार्थी राहत असलेला विभाग (Area) शहरी / ग्रामीण (Rural/Urban) Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

१५ Differently Abled Disabled मध्ये दिव्यांगत्व Dropdown लिस्ट मधून दिव्यांग असेल तर Yes निवडा. व विद्यार्थी दिव्यांग नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

१६ Yes, पर्याय निवडला असेल तर Type of Disability मध्ये दिव्यंगत्व ड्रॉपडाउन लिस्ट मधून अचूकपणे निवडा विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांग प्रमाणपत्रावर नमूद असलेली दिव्यांगत्वाची टक्केवारी नमूद करावी.

१७ Need a Writer for Exam या रकान्यात विद्यार्थ्यास Writer पाहिजे असेल तर Yes व writer पाहिजे नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूक पाने निवडा.

१८ विद्यार्थ्यांची जात संवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

१९ Caste Name पुढील रकान्यात आपली जात नमूद करा. (उदा. माळी, सोनार, शिंपी.....

२० भारत सरकार यांचे No. ३६०३९/१/२०१९ -Estt (Res) दि. ३१ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार Economically Weaker Section (EWS) च्या आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असेल तर Yes हा पर्याय आणि घायवयाचा नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा आरक्षणाचा लाभसक्षम अधिकारयाचा EWS प्रमाणपत्र मुख्याध्यापकांकडे जमा करणे आवश्यक आहे

२१ विद्यार्थाचा राहत असलेल्या ठिकाणाचा पूर्ण पत्ताः ठिकाण लँडमार्क, गाव, तालुका व जिल्हा या क्रमाने अचूकपणे नमूद करावा.

२२ राहत असलेल्या ठिकाणाचा ६ अंकी पिनकोड अचूकपणे नमूद करावा.

२३ राज्यस्तर परीक्षेसाठी MAT आणि SAT या विषयासाठी माध्यम Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

२४ Bank Account Information या रकान्यात विद्यार्थ्यांचे बँकेचे खाते असेल तर Yes व बँकेचे खाते नसेल तर No हा पर्याय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

२५ Bank Account Information Yes पर्याय निवडला असेल तर Bank Account Number, IFSC code, Name of Bank, Branch and Full Address of Branch अचूकपणे नमूद करा.

    Family Details:

२६ Father's Education: वडिलांचे शिक्षण Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

२७ Father's Occupation: वडिलांचा व्यवसाय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

२८ Mother's Education: आईचे शिक्षण Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

२९ Mother's Occupation: आईचा व्यवसाय Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

३० कुटुंबात किती व्यक्ती आहेत Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

३१ विद्यार्थ्यास किती भाऊ आहेत Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

३२ विद्यार्थ्यास किती बहिणी आहेत Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

३३ कुटूंबातील एकूण बहिण भाऊ यामध्ये विद्यार्थ्यांचा कितवा क्रमांक आहे Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

३४ संपर्क माहितीमध्ये पालकांचा दहा अंकी मोबाईल क्रमांक अचूकपणे नमूद करा.

३५ पालकाचा Email ID अचूकपणे नमूद करा.

३६ परिवाराचे उत्पन्न Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.

     Declaration: -

३७ सदरच्या Declaration फॉर्ममध्ये मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याची इ. ७ वी च्या गुणांची टक्केवारी, एकूण मिळालेले गुण व एकूण गुण ही माहिती अचूकपणे नमूद करावी.

३८ वरील सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर Preview या बटनावर क्लिक करा.

३९ Preview या बटनावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांचे भरलेले आवेदनपत्र दिसेल.

४० सदर आवेदनपत्रात विद्यार्थ्याची भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करणेकरीता Save / Preview बटनावर क्लिक करावी.

४१ जर विद्यार्थ्याची कोणती माहिती चुकीची भरलेली असेल व ती दुरुस्त करावयाची असेल तर Edit बटनावर क्लिक करावे व सदर दुरुस्ती करून Save / Preview या बटनावर क्लिक करावे.

४२ Save / Preview या बटनावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचे भरलेले आवेदनपत्र दिसेल.

४३ विद्यार्थ्यांची सर्व माहिती भरलेले बरोबर असल्यास Submit या बटनावर क्लिक करा.

४४ डाव्या बाजूस Dash Board या बटनावर क्लिक केल्यानंतर वर नमूद केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Dash Board वर Pending Payment Student list या मध्ये दिसेल.

४५ ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेवटच्या तारखेपर्यंत विद्यार्थ्याची कोणतीही माहिती Edit करता येईल. याची नोंद घ्यावी.

४६ उपरोक्त प्रमाणे या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरावे.


   BD. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ऑनलाईन भरणे.

१ डाव्या बाजूस Dash Board या बटनावर क्लिक केल्यानंतर वर नमूद केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Dash Board वर Pending Payment Student list यामध्ये दिसेल.

२ Dash Board वर उजव्या बाजूस असलेल्या Make Payment या बटनावर क्लिक करावे.

३ प्रत्येक विद्यार्थ्याच्या माहिती समोर Check Box

आहे. Check Box मध्ये टिक करून विद्यार्थ्याचे

४ वैयक्तिक / सामूहिक शुल्क भरण्यासाठी Proceed to payment या बटनावर क्लिक करावे.

Proceed to payment या बटनावर क्लिक केल्यास ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचे शुल्क भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, एटीएम पिन व UPI, असे पर्याय उपलब्ध होतील.

५ आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन शुल्क भरावे.

६ चलनाद्वारे / ऑफलाईन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही.

७ ऑनलाईन शुल्क भरतेवेळी इंटरनेट, वीज जाणे यामुळे शुल्क जमा न झाल्यास पुन्हा लॉगीन करून शुल्क ऑनलाईन भरावे.

८ शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर, ईमेलवर व मोबाईलवर Payment Successful असा मेसेज येईल. आणि Transaction Details स्क्रीनवर दिसतील.

९ Transaction Details Download करा व Print काढा.

१० Payment details जर पुन्हा पहावयाचे असतील तर Dash Board वर डाव्या बाजूस असलेल्या Transaction History या बटनावर क्लिक करावे.


Also read 

दिनांक : १९/०८/२०२४

जा.क्र.शिसंयो/एन.एम.एम.एस/२०२४-२५/यो-२/०१७९५

विषय : NSP 2.0 पोर्टलवरील एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणेबाबत.

    शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी NSP 2.0 पोर्टलवर एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्याथ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरणे दिनांक ३०/०६/२०२४ पासून सुरु झाले असून एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१/०८/२०२४ आहे. एन.एम.एम.एस व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठीचे नवीन व नुतनीकरण अर्ज शाळा स्तर अर्ज पडताळणी अंतिम दिनांक १५/०९/२०२४, जिल्हा स्तर अर्ज पडताळणी अंतिम दिनांक ३०/०९/२०२४.
    एन.एम.एम.एस मध्ये सन २०२३-२४ मध्ये परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्याथ्यांची (इयत्ता ९वी) नवीन मधून अर्ज आधार नुसार भरणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता १०वी, ११वी व १२वी मधील विद्यार्थ्यांनी नुतनीकरण मधून भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन मध्ये ११,६८२ विद्यार्थी पात्र आहेत तर नुतनीकरण मध्ये २८,८६८ विद्यार्थी पात्र आहेत. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीमधील नुतनीकरण मध्ये ५२४ विद्यार्थी पात्र आहेत. NMMS मधील नवीन अर्ज सादर करणाऱ्या विद्याथ्यांची माहिती आधारनुसार नसल्यास तसेच ज्या विद्याथ्यांनी शाळा बदलली आहे व चालु वर्षी १०वी व १२वी मध्ये शिक्षण घेत आहे, तसेच नुतनीकरण मधील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज डिफेक्ट झाल्यामुळे शाळेच्या नावामध्ये बदल करता येत नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती विहीत नमुन्यात विहीत कालावधीत दुरुस्तीसाठी पाठविण्यात यावी.
सर्व पात्र विद्याथ्यर्थ्यांचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. 


विहित मुदतीपूर्वी शाळा व जिल्हा स्तरावरुन नवीन व नुतनीकरण अर्जाची पडताळणी करण्यात यावी. डिफेक्ट केलेले अर्ज आवश्यक ती दुरुस्ती करुन मुदतीपूर्वी ऑनलाईन भरुन पडताळणी पूर्ण करण्यात यावी. दिनांक १९/०८/२०२४ रोजीची नवीन व नुतनीकरणाची सद्यस्थिती सोबत जोडण्यात आलेली आहे. (परिशिष्ट १ ते ४)
नवीन व नुतनीकरणामधील विद्यार्थी सध्या शिकत असलेल्या शाळांमध्ये आपल्या जिल्ह्याद्वारे व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी. जेणे करुन नवीन व नूतनीकरणमधील विद्यार्थी NSP 2.0 पोर्टलवर स्वतःची नोंदणी करतील. विहीत कालावधीमध्ये नवीन व नूतनीकरणचे अर्ज ऑनलाईन NSP 2.0 पोर्टलवर भरणे व पडताळणी करणे याबाबत आपल्या स्तरावरुन संबंधित गटशिक्षणाधिकारी/शाळा यांना सूचना देण्यात याव्यात व Timeline चे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.
👇👇👇👇👇
👆👆👆👆👆
शिक्षण संचालक
शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे

महाराष्ट्र शासन Government of Maharashtra
Directorate of Education, (Scheme) Maharashtra State, Pune 
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे

प्रति,
१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक/योजना) जिल्हा परिषद सर्व
२. शिक्षण निरिक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
३. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी/शिक्षण प्रमुख/मनपा/नपा/नप सर्व

संदर्भ : 
१. केंद्रशासन स्तरावरुन वेळोवेळी प्राप्त निर्देश.
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक ३०/०६/२०२४ रोजीचा ई-मेल.
३. संचालनालयाने वेळोवेळी व्हि.सी द्वारे दिलेल्या सूचना.

Also Read 👇 

विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना (NMMSS) सन २०२४-२५ साठी पूर्वतयारी व अंमलबजावणीबाबत.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन २००७-०८ या वर्षापासून सुरु करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता ८वी मध्ये शिकत असलेले नियमित विद्यार्थी/विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित (आई-वडिलांचे) रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे.

शासन निर्णय क्र.२० ऑगस्ट, २०१८ पासून NMMSS परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इ.९वी ते इ.१२ वी अखेर ४ वर्ष दरमहा रु.१,०००/- प्रमाणे (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती मिळते. सन २०१७-१८ पासून या योजनेची अंमलबजावणी केंद्रशासनाच्या www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांने नवीन व नुतनीकरण अर्ज दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याने भरलेल्या अर्जाची शिष्यवृत्तीच्या निकषानुसार पडताळणी विहीत मुदतीमध्ये शाळा व जिल्हा स्तरावर करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्र सर्व विद्याथी / विद्यार्थीनींचे अर्ज NSP 2.0 या पोर्टलवर भरण्याबाबत विविध माध्यामातून जाहिरात करुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच कार्यालयाच्या व शाळेच्या दर्शनीभागामध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMSS) शिष्यवृत्तीसाठी सन २०२४-२५ साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाची प्रक्रिया केंद्रशासनाकडून NSP 2.0 या पोर्टलवर सुरू करण्यात आल्यानंतर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (NMMSS) शिष्यवृत्तीचे वाटप केंद्रशासनाकडून DBT (Direct Benefit Transfar) मोडद्वारे विद्यार्थी / विद्यार्थीनींच्या आधार लिंक बँक खात्यावर होत असल्याने विद्याथी / विद्यार्थीनींचे आधार कार्ड असणे व विद्यार्थी / विद्यार्थीनींच्या बँक खात्यास लिंक असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे -

• पात्रतेचे निकष

१. पालकाचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा जास्त नसावे. उत्पन्नाचा दाखला हा सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा आवश्यक आहे.

२. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित (अंशतः अनुदानित सहित) शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजना लागू आहे.

३. केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय तसेच राज्य शासनाकडून वसतिगृहाची सवलत घेत असलेल्या शासकीय तसेच खाजगी विनाअनुदानित शाळेतील, खाजगी अनुदानित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.

४. इयत्ता १०वी नंतर शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्यास त्यास पुढील शिष्यवृत्तीसाठी अपात्र करण्यात येईल.

५. इयत्ता १०वी मध्ये सर्वसाधारण (जनरल) विद्यार्थ्यास ६० टक्केपेक्षा अधिक गुण (अनुसूचित जाती/जमातीच्या विद्यार्थ्यास ०५ टक्के सुट.) इयत्ता ९वी मधून १०वी मध्ये गेलेले विद्यार्थी व ११वी मधून १२वी मध्ये गेलेले विद्यार्थी प्रथम प्रयत्नात पास होणे आवश्यक आहे.

६. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँकेतील विद्यार्थ्याच्या नावाचेच खाते असावे, संयुक्त खाते नसावे.

७. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असावे.

८. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा व जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

९. विद्यार्थ्यांकडून शाळेच्या शिस्तीचा अथवा शिष्यवृत्तीच्या कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास शिष्यवृत्ती स्थगित करण्यात येईल अथवा संपुष्टात आणण्यात येईल.

१०. जर एखाद्या विद्यार्थ्यास चुकीच्या माहितीच्या आधारे शिष्यवृत्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ रद्द करण्यात येईल व त्यास प्रदान करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची वसूली करण्यात येईल.

११. कोणत्याही कारणामुळे एका शैक्षणिक वर्षाचे अंतर पडल्यास नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरता येणार नाही. तसेच शिष्यवृत्तीच्या नियमांच्या आधारे एकदा बंद केलेली शिष्यवृत्ती कोणत्याही परिस्थितीत पुनरुज्जीवित केली जाऊ शकत नाही.

१२. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या फरकासाठी विद्यार्थ्याचा दावा विचारात घेतला जाणार नाही.

• आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे -

१. सध्या शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट .
२. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे एन.एम.एम.एस. परीक्षेचे गुणपत्रक.
३. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे गतवर्षाचे (इयत्ता ९वी, १०वी, ११वी) गुणपत्रक.
४. सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा पालकाचा रु. ३,५०,०००/- आतील उत्तपन्नाचा दाखला.
५. ज्या प्रवर्गातून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाला त्या प्रवर्गाचा (जातीचा) सक्षम प्राधिकारी यांच्या सहीचा दाखला.
६. आधार कार्ड प्रत.

सन २०२४-२५ मध्ये NSP 2.0 या पोर्टलवर एका विद्यार्थ्याला कोणतीही एका शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. तसेच कॉमन स्टेंडर्ड अॅप्लिकेशन फॉर्म एन.आय.सी कडून विकसित करण्यात आलेला आहे. तसेच केंद्र शासनाकडून लाभार्थ्याच्या आधार लिंक बैंक खात्यामध्ये Aadhar base Payment System (ABPS) द्वारेच शिष्यवृत्ती जमा करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आधार हा ओळखीचा पुरावा म्हणून आवश्यक आहे. एन.एस.पी पोर्टलवर विद्यार्थ्याच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी विद्यार्थ्याच्या लॉगिन मध्ये डॅशबोर्ड उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वेळोवेळी SMS द्वारे अपडेट्स पाठविले जातील.

विद्याथी /विद्यार्थीनींचे नविन अर्ज रजिस्टर करण्यासाठी :-

१. एन.एस.पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये New Registration या लिंकवर क्लिक करणे.

२. सर्व मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा व Continue बटणावर क्लिक करा.

३. विद्यार्थ्याचे आधारकार्ड असेल तर I have Aadhar हा पर्याय निवडणे, विद्यार्थ्याचे आधारकार्ड नसेल पण आधारसाठी विद्यार्थ्याने नोंदणी केली असल्यास Aadhar not assigned (I have EID) हा पर्याय निवडणे, विद्यार्थ्याचे आधारकार्ड नसल्यास तसेच नोंदणी देखील केली नसल्यास I don't have Aadhar/EID हा पर्याय निवडणे.

४. विद्यार्थ्याचा/पालकांचा मोबाईल क्रमांक नोंद करावा. मोबाईलवर OTP प्राप्त करण्यासाठी Get OTP या बटणावर क्लिक करावे.

५. OTP टाईप करुन Verify या बटणावर क्लिक करावे.

६. आधारवरील सर्व माहिती तपासण्यात यावी.

७. स्कॉलरशिप Type मध्ये स्कॉलरशिप स्किम निवडा.

८. स्कॉलरशिप Category मध्ये इयत्ता ९वी, १०वी साठी प्रि-मॅट्रिक निवडा व इयत्ता ११वी, १२वी साठी पोस्ट मॅट्रिक निवडा.

९. State Of Domicile मध्ये विद्यार्थी ज्या राज्याचा रहिवाशी आहे ते राज्य निवडा.

१०. Father Name मध्ये विद्यार्थ्याच्या वडिलांचे नाव, Mother Name मध्ये विद्यार्थ्यांच्या आईचे नाव, विद्यार्थ्याचा ई-मेल आयडी असल्यास ई-मेल आयडी भरुन रजिस्टर या बटणावर क्लिक करणे.

११. विद्यार्थ्यास रजिस्ट्रेशन/अॅप्लिकेशन आयडी मिळेल. सदर आयडी जतन करुन ठेवावा

विद्याथी / विद्यार्थीनींचे नविन अर्ज भरण्यासाठी :-

१. एन.एस.पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये Fresh Application या लिंकवर क्लिक करणे.

२. विद्यार्थ्याचा अॅप्लिकेशन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करा. (रजिस्टर मोबाईलवर SMS द्वारे आयडी व पासवर्ड प्राप्त होतो.)

३. रजिस्टर मोबईलवरील प्राप्त OTP टाकून Confirm OTP या बटणावर क्लिक करा.

४. विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी Application Form या मेनूवर क्लिक करा.

५. General Information मध्ये आधार नुसार विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख व लिंग भरावे.

६. धर्म, जात, पालकांचे वार्षिक उत्पन्न, विद्यार्थी Day scholar / hosteller हे नमूद करावे.

७. Academic Details मध्ये विद्यार्थ्याची शाळा निवडण्यासाठी Select Your Institute या बटणावर क्लिक करावे.

८. शाळेच्या यु-डायस नुसार शाळा शोधून Select या बटणावर क्लिक करावे.

९. विद्यार्थ्यांचा जनरल रजिस्टर नंबर, शाळा प्रवेश वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी, सध्या शिक्षण घेत असलेली इयत्ता, शाळा सुरु झालेली तारीख, मागील इयत्ता, पास झालेले वर्ष, मागील इयत्तेमधील गुणांची टक्केवारी इ. माहिती भरावी.

१०. Competitive Exam Qualified मध्ये NMMS निवडावे.

११. Exam Conducted by मध्ये विद्यार्थ्याने ज्या राज्यातून परीक्षा दिली आहे ते राज्य निवडावे.

१२. Competitive Exam Roll No मध्ये NMMS रिझल्ट मधील सीट क्रमांक नमूद करावा (फक्त अंकी असाव. उदा. ३३९२******)

१३. Competitive Exam Year मध्ये '2023' नमूद करावे.

१४. Other Details मध्ये विद्यार्थी अनाथ असल्यास पालकांचे नाव, विद्यार्थी दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्राचा प्रकार, UDID क्रमांक, दिव्यंगत्वाचा प्रकार, दिव्यांगाची टक्केवारी, पालकांचा व्यवसाय इ. माहिती भरुन Save & Continue या बटणावर क्लिक करावे.

१५. Contact Details मध्ये जिल्हा, शहर/ग्रामीण, संपूर्ण पत्ता व पिनकोड नमूद करावा.

१६. विद्यार्थ्यांनी भरलेल्या माहितीच्या आधारे केंद्रशासनाच्या कोणकोणत्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो याची यादी दिसेल. त्यामधील विद्यार्थ्यास आवश्यक असलेली शिष्यवृत्ती योजना निवडण्यात यावी.

१७. Upload Document मध्ये विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, गुणपत्रक इ. कागदपत्रे अपलोड करावी. (फाईल साईज ५० ते २५० के.बी दरम्यान असावी.)

१८. Print Your Application या मेनूवर क्लिक करुन विद्यार्थ्याच्या अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्ज व कागदपत्रे शाळेमध्ये जमा करण्यात यावी. शाळेने सदर कागदपत्रे किमान ०५ वर्षे जतन करुन ठेवावीत.

विद्याथी / विद्यार्थीनींचे नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी :-

१. एन.एस.पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये Renewal Application या लिंकवर क्लिक करणे.

२. विद्यार्थ्याचा अॅप्लिकेशन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करा.

३. विद्यार्थी/विद्यार्थीनींनी शाळा बदलली असल्यास Update Institute या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर Select Your Institute या बटणावर क्लिक करुन शाळेच्या यु-डायस नुसार शाळा शोधून Select या बटणावर क्लिक करुन शाळा निवडावी व Update या बटणावर क्लिक करावे.

४. विद्यार्थी/विद्यार्थीनीचे E-KYC करण्यासाठी Update E-KYC OTP या बटणावर क्लिक करुन आधार लिंक मोबाईल क्रमांकावरील प्राप्त OTP च्या आधारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी किंवा Face Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. (Face Authentication साठी मोबाईल वर गुगल प्ले स्टोअर मधून NSP FaceAuth हे अॅप्लिकेशन Install करावे व विद्यार्थ्यांचे लॉगिन करुन Face Authentication प्रक्रिया पूर्ण करावी.)

५. विद्यार्थी/विद्यार्थीनीचा नूतनीकरणाचा अर्ज भरण्यासाठी Apply for Renewal या मेनूवर क्लिक करावे.

६. पालकांचे वार्षिक उत्पन्न, Day scholar / hosteller, शाळा सुरु झालेली तारीख, मागील इयत्तेतील गुणांची टक्केवारी, विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर, शाळा प्रवेश वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडी इ. माहिती नमूद करावी.

७. Upload Document मध्ये विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र अपलोड करावी. (फाईल साईज ५० ते २५० के.बी दरम्यान असावी.)

८. Save as Draft या बटणावर क्लिक करावे.

९. भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करुन Final Submit या बटणावर क्लिक करावे.

१०. Print Your Application या मेनूवर क्लिक करुन विद्यार्थ्याच्या अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्ज व कागदपत्रे शाळेमध्ये जमा करण्यात यावी. शाळेने सदर कागदपत्रे किमान ०५ वर्षे जतन करुन ठेवावीत.

A. K.Y.C. फॉर्मबाबत :-

NSP 2.0 या पोर्टलवरती अद्याप ज्या शाळांनी K.Y.C. फॉर्म भरलेला नाही अशा सर्व शाळांनी K.Y.C. फॉर्म भरणे बंधनकारक आहे.

NSP 2.0 या पोर्टलवरती शाळांनी K.Y.C. फॉर्म भरण्यासाठी पोर्टलवरती सर्व्हिसेस या मेनू मध्ये Institute KYC Registration Form यावर क्लिक करुन शाळेचा यु-डायस क्रमांक व Captcha कोड टाकून सबमिट करावा. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे नोडल ऑफिसर यांची आधार नुसार माहिती व शाळेची सर्व माहिती भरुन K.Y.C. फॉर्म सबमिट करावा. सोबत नोडल ऑफिसर यांचे आधार कार्ड स्कॅन करुन अपलोड करावे.

K.Y.C. फॉर्म भरुन झाल्यानंतर त्याची प्रिंट काढावी व सदर प्रिंटवर नोडल ऑफिसर यांचा फोटो, नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक यांची सही तसेच शाळेचा शिक्का मारुन स्कॅन करुन (फाईल साईज ५० ते २५० के.बी दरम्यान असावी) पुन्हा एन.एस.पी पोर्टलवर नोडल ऑफिसर यांच्या मोबाईल वरील ओ.टी.पी पडताळणी करुन फॉर्म अपलोड करावे. मुख्याध्यापक यांच्या मोबाईल वरील आलेल्या ओ.टी.पी आधारे K.Y.C. फॉर्म मधील माहिती तपासून Approve करण्यात यावा. K.Y.C. फॉर्म Approve करण्यासाठी शिक्षणाधिकारी योजना कार्यालयामध्ये तपासणीसाठी पाठवावे. शिक्षणाधिकारी कार्यालयामधून K.Y.C. फॉर्म Approve करण्यासाठी शाळेचा यु-डायस क्रमांक टाकून भरलेली माहिती तपासून, नोडल ऑफिसर यांचा मोबाईल क्रमांक बरोबर आहे याची खात्री करुनच Approve करावे. (टिप: सर्व शाळांची पोर्टलवरती भरणे आवश्यक आहे. शाळेमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी नसले किंवा शाळेमधू 5/13 अर्ज नसला तरीही पोर्टल वरती K.Y.C. फॉर्म भरणे आवश्यक आहे. यापूर्वी K.Y.C. फॉर्म ल जिल्हास्तरावरुन त्याची पडताळणी झाली असेल तर त्या शाळांना K.Y.C. फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.)

शाळेचे नोडल ऑफिसर व शाळेचे मुख्याध्यापक यांची आधार नुसार माहिती भरण्याची प्रक्रिया.

• सन २०२४-२५ साठी प्रत्येक शाळेने Login केल्यानंतर शाळेचे प्रोफाईल अद्यावत करणे बंधनकारक आहे. (शिष्यवृत्तीसाठी अर्ज नसले तरीही)

• शाळेचे Nodal Officer यांनी शाळेचा Login ID व Password वापरुन NSP पोर्टलवर शाळा Login करावे व शाळेच्या प्रोफाईल मध्ये शाळेची सर्व माहिती भरावी व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी नेमलेल्या नोडल ऑफिसर यांची माहिती किंवा मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार contact person details मध्ये भरावी. यामध्ये नोडल ऑफिसर यांचा आधार क्रमांक, आधार वरील नाव, जन्मतारीख, लिंग, आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक, पद इ. माहिती भरावी.

• नोडल ऑफिसर यांच्या मोबाईल क्रमांका वरती OTP येईल तो Verify झाल्यानंतर प्रोफाईल अद्यावत होईल.

• Head Of Institution Details मधील माहिती यामध्ये बदल करावयाचा असल्यास नोडल ऑफिसर लॉगिन मधून प्रोफाईल अपडेट करणे बंधनकारक आहे. नोडल ऑफिसर लॉगिन मधून प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर हेड लॉगिन मधून शाळेच्या कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक यांची माहिती आधार वरील माहिती नूसार अद्यावत करावी.

• शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक बदलले असल्यास नविन कार्यरत असणारे नोडल ऑफिसर यांची माहिती आधार नुसार इनस्टिटयूट नोडल ऑफिसर लॉगिन मधून व मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार इनस्टिटयूट हेड लॉगिन मधून अद्यावत करण्यात यावी.

शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे E-KYC करण्याबाबत :-

शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे E-KYC करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये जाऊन बायोप्रमाणिकरण द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी किंवा Face Authentication द्वारे E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी मोबाईल वर गुगल प्ले स्टोअर मधून NSP FaceAuth हे अॅप्लिकेशन Install करावे व शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे लॉगिन करुन Face Authentication प्रक्रिया पूर्ण करावी. याबाबत अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याशी संपर्क साधावा.

NSP Portal वरील शाळा स्तरावरील कामकाज :-

१. शाळेची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

२. शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे E-KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

३. नोडल ऑफिसर यांचा आयडी व पासवर्ड प्राप्त झाल्यानंतर एन.एस.पी. पोर्टलवर नोडल ऑफिसर यांच्या लॉगिन मधून Administration या मेनू अंतर्गत Add update Details या मेनूमधून आवश्यकतेनुसार Course Level निवडणे, शाळेचे वर्ग वाढविणे, वर्गानुसार शुल्क update करणे इ. प्रक्रिया पूर्ण करावी.

४. विद्यार्थी/विद्यार्थीनीचे नवीन व नुतनीकरणाचे प्राप्त अर्जाचे शिष्यवृत्तीच्या निकषानुसार व कागदपत्रांनुसार पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी.

NSP Portal वरील जिल्हा स्तरावरील कामकाज :-

१. शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे आयडी, पासवर्ड आधारवरील माहितीची पडताळणी करुन Reset करणे.

२. शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे E-KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास E-KYC प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी.

३. शाळेची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास KYC प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी.

४. शाळेचे नोडल ऑफिसर बदलले असल्यास पूर्वीचे नोडल ऑफिसर Administration या मेनू अंतर्गत Detach INO for Institute या मेनूआधारे Detach करावे.

५. विद्यार्थी/विद्यार्थीनीचे नवीन व नुतनीकरणाचे प्राप्त अर्जाचे शिष्यवृत्तीच्या निकषानुसार व ऑनलाईन अपलोड केलेल्या कागदपत्रांनुसार पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी.

६. संचालनालय स्तरावरुन वेळोवेळी निर्देशित केलेल्या सूचनांनुसार अंमलबजावणी करावी.

सन २०२४-२५ मधील एन.एस.पी पोर्टल वरील ठळक वैशिष्ट्ये -

१. आधार नुसार बायोप्रमाणीकरण (चेहरा प्रमाणीकरण (Face Authentication)) करण्यात येईल.

२. One Time Registration (OTR) ची सुविधा देण्यात येईल. या आधारे विद्यार्थ्याला त्याच्या सर्व शिष्यवृत्तीची माहिती घेता येईल.
३. OTR विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वैध राहील.

४. १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना आधार अनिवार्य आहे. परंतु १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या विद्यार्थ्यांचे आधार नसल्यास, EID नसल्यास पालकांचे आधार वापरता येईल. (अर्जामधील नमूद आधार लिंक बँक खात्यामध्ये शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्यात येईल.)

५. ज्या विद्यार्थ्यांनी EID वापरुन अर्ज भरले आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक वर्षात ३१ ऑक्टोबर पूर्वी आधार सबमिट करावे लागेल.

६. ज्या विद्यार्थ्यांनी EID वापरुन अर्ज भरले आहेत परंतू आधार सबमिट केलेले नाहीत त्यांची शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्यात येणार नाही.

७. शिष्यवृत्तीची रक्कम Aadhar Based Payment System (ABPS) द्वारेच वितरीत करण्यात येईल.

महत्वाच्या बाबी -

> असे लक्षात आले आहे की, शिष्यवृत्तीसाठी शाळास्तरावरती प्राप्त झालेले अर्ज पडताळणीची अंतिम मुदत संपूनही शाळास्तरावर नविन व नूतनीकरणाचे अर्ज पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहिलेले आहेत. सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक/योजना यांनी संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थी / विद्यार्थीनींचे अर्ज विहीत मुदतीमध्ये पडताळणी पूर्ण करण्याबाबत सूचना द्याव्यात.

शाळा स्तरावरुन विद्यार्थी / विद्यार्थीनींचे अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत तसेच विद्याथी / विद्यार्थीनी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी. शाळास्तरावरती एकही अर्ज पडताळणीसाठी प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व अर्जामधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विद्यार्थी / विद्यार्थीनींना एक संधी देण्यात यावी. विद्यार्थी / विद्यार्थीनी शाळेत शिक्षण घेत नसल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज डिफेक्ट करुन आवश्यक ती दुरुस्ती पूर्ण करावी.

➤ NSP 2.0 Portal वर विद्यार्थी / विद्यार्थीनींचे अर्ज कोणत्याही एका शिष्यवृत्तीसाठी भरण्यात यावा. (एकापेक्षा अधिक शिष्यवृत्ती अर्ज भरु नये)

> ज्या शाळा बंद झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही अशा संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्विकारु नये तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग नसतानाही त्या वर्गामधून अर्ज प्राप्त झाल्यास असे सर्व अर्ज डिफेक्ट करुन आवश्यक ती दुरुस्ती पूर्ण करावी.

> शाळांचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर तसेच जिल्हयाचे नोडल ऑफिसर यांची आधार नुसार माहिती NSP 2.0 या पोर्टलवर भरावी.

विद्यार्थ्याने नवीन मधून अर्ज करत असताना सर्व कागद‌पत्रे शाळेमध्ये देणे बंधनकारक आहे. तसेच शाळेने किमान ५ वर्षे सर्व कागदपत्रे इयत्तानिहाय, वर्षनिहाय जतन करुन ठेवावे. नुतनीकरण विद्यार्थ्यांसाठी सर्व कागदपत्रे घेण्याची आवश्यकता नाही. सदर विद्यार्थ्याने नविन मध्ये अर्ज करत असताना दिलेल्या कागदपत्रामध्ये काही बदल असल्यास संबंधित कागदपत्रे शाळेमध्ये विद्यार्थ्यास जमा करावे लागतील.

> विद्यार्थ्यांची Digi Locker मध्ये आधार नुसार A/c open करावे व सर्व कागदपत्रे यामध्ये store करुन ठेवण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करत असताना Digi Locker चे A/c आधार सोबत अर्जामध्ये जोडण्यात यावे. जेणेकरुन शाळा व जिल्हा स्तरावरुन सर्व कागदपत्रांची ऑनलाईन तपासणी करता येईल.

शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व पात्र इच्छुक विद्यार्थी/विद्यार्थीनींचे अर्ज ऑनलाईन भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात याव्यात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात येतील याची दक्षता घ्यावी.

विद्यार्थ्याने कोणत्याही कारणास्तव शाळा बदलल्यास विद्यार्थी पूर्वी ज्या शाळेत शिक्षण घेत होता त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याला दाखला देत असताना विद्यार्थी कोणत्या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे किंवा विद्यार्थ्याचा नूतनीकरणामध्ये शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणे आवश्यक आहे त्या शिष्यवृत्तीचे माहिती, निकष आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया इ. माहिती सोबत पत्राद्वारे देण्यात यावी.

केंद्रशासनाकडून शिष्यवृत्तीचे निकष, आवश्यक कागदपत्रे यामध्ये काही बदल झाल्यास तसेच अंमलबजावणीबाबतच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर यथावकाश कळविण्यात येईल.

सोबत जोडण्यात आलेल्या प्रपत्र-अ, प्रपत्र-ब मध्ये शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यात यावी. तसेच सोबत जोडलेले प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडून भरुन घेण्यात यावे. शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन अर्ज विहित कालावधीमध्ये भरण्याची

जबाबदारी विद्यार्थी ज्या शाळेमध्ये सध्या शिक्षण घेत आहे त्या शाळेचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांची राहील. तसेच संबंधित शाळेकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज भरुन घेणे, अर्जाची पडताळणी पूर्ण करुन घेणे इत्यादी जबाबदारी शिक्षणाधिकारी योजना यांची राहील. विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहील्यास संबंधितांवार नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी.

सोबत आवश्यक विहित प्रपत्र व प्रमाणपत्र जोडले आहेत.

१. प्रपत्र अ, प्रपत्र ब.

२. प्रमाणपत्र

३. योजनेचा फ्लो चार्ट

४. एन.एस.पी पोर्टलवरील कामकाजाचा फ्लो चार्ट

५. एन.एन.एम.एस निकालामध्ये नावात दुरुस्तीबाबत अर्जाचा नमुना

६. DNO/HOI/INO यांचा आयडी, पासवर्ड मिळविण्यासाठीचा अर्जाचा नमुना.

७. एन.एस.पी पोर्टलवर शाळा विलिनीकरण झाली असल्यास अर्जाचा नमुना.

८. एन.एस.पी पोर्टलवर बंद झालेल्या शाळेचे INO Detach करण्याबाबतचा अर्जाचा नमुना.

९. वार्षिक वेळापत्रक

शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे.

Also Read 👇 


परीक्षेबद्दल जाणून घ्या सविस्तर पणे माहिती 


NMMS Exam Fee NMMS Exam Declaring NMMS Exam Result NMMS Exam Scholarship Rate Warning regarding NMMS Exam Unauthorized
संबंधी प्रसिद्धी पत्रक सविस्तर वाचा
Read the related press release in detail


एनएमएमएस  परीक्षा अर्ज करण्याची पद्धत एनएमएमएस  परीक्षा पात्रता एनएमएमएस  परीक्षा कोणते विद्यार्थी सदर परीक्षेसाठी अपात्र आहेत एनएमएमएस  परीक्षा विद्यार्थ्यांची निवड एनएमएमएस  परीक्षा परीक्षेचे वेळापत्रक एनएमएमएस  परीक्षा माध्यम आरक्षण एनएमएमएस  परीक्षा शिष्यवृत्ती संख्या एनएमएमएस  परीक्षा शुल्क एनएमएमएस  परीक्षा एनएमएमएस  परीक्षा निकाल घोषित करणे एनएमएमएस  परीक्षा शिष्यवृत्ती दर एनएमएमएस  परीक्षा अनाधिकृत बाबत इशारा
संबंधी प्रसिद्धी पत्रक सविस्तर वाचा
Read the related press release in detail

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon