DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SSC EXAM FEB MAR 2025 FORM LINK इ १० वी फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत

SSC EXAM FEB MAR 2025 FORM LINK

फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत


क. रा.मं./परीक्षा-३/४२४६ पुणे

दिनांक - ४/११/२०२४


विषय माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत व विलंब शुल्काच्या तारखांबाबत.

संदर्भ - १.रा.मं./ले-पे०६/परीक्षाशुल्क २०२४-२५/१७८८, दि.३०/०४/२०२४ चे पत्र. २.क.रा.मं./परीक्षा-३/३८८३, दि.०३/१०/२०२४ चे पत्र.

    उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे Saral Database वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.

Also read -
HSC EXAM FEB MAR 2025 FORM LINK
सुधारित सूचना
इ. १२ वी फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत व विलंब शुल्काच्या तारखांबाबत

विषय सन २०२४-२५ परीक्षा शुल्क जमा करणेसाठी ICICI बँकेत नव्याने उघडण्यात आलेले खाते क्रमांकाचा वापर करणेबाबत.

नवीन खाते क्रमांकाची यादी सोबत पाठविण्यात येत आहे.सविस्तर परिपत्रक वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

इयत्ता दहावी व बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 च्या वेळापत्रकाबाबत अधिकृत सूचना वाचा या ओळीला स्पर्श करून

    तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने दि.०५/११/२०२४ पर्यंत भरावयाची होती. 

सदर नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढ, विलंब शुल्काच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे -

शुल्क प्रकार
विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा
नियमित शुल्क (मुदतवाढ)
बुधवार, दिनांक ०६/११/२०२४ ते मंगळवार, दिनांक १९/११/२०२४

विलंब शुल्क - बुधवार, दिनांक २०/११/२०२४ ते शनिवार, दिनांक ३०/११/२०२४ 


माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS / NEFT पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख बुधवार दि.०४/१२/२०२४
पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे
१ माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे व सदर Saral Database वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे.
२ पुनर्परिक्षार्थी.. नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate). श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, III (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) यांची माहिती Saral Database मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.
३ कौशल्य सेतू अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन विषयासमोर Transfer of Credit ची नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी.
४ सर्व माध्यमिक शाळांनी Website द्वारे प्राप्त Online चलनावर नमूद केलेल्या ICICI बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून RTGS/NEFT द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा व चलनाची प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी. रक्कम जमा केल्यानंतर
त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या application status मध्ये " Draft" to "Send to Board" व Payment status मध्ये "Not Paid" to "Paid" असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा "Send to Board" व "Paid" Status प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. व उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही
कार्यवाही होणार नाही.
५ यापूर्वी वापरात असणाऱ्या Bank Of India/ HDFC Bank/Axis Bank च्या जुन्या चलनांचा वापर करण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही.
६ माध्यमिक शाळांना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड करून एक किंवा एकापेक्षा अधिक चलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक चलन स्वतंत्रपणे भरण्यात यावे. जेणेकरून त्यात समाविष्ट
विद्यार्थ्यांचे Status Update होईल. ७ आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संगणकीय चलन Download करून चलनावरील virtual account मध्ये RTGS/NEFT द्वारे भरावयाचे आहे. उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT द्वारे भरणा केलेली रक्कम त्यांच्या बँक खात्यातून प्रत्यक्ष वजा झाली आहे किंवा नाही तसेच account number व IFSC code चूकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली आहे किंवा नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक/प्राचार्य यांची राहील. ८ माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व आवेदनपत्रांचे विहीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत.
९ विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी.
१० अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील.
( देविदास कुलाळ )
सचिव,
राज्य मंडळ, पुणे

Also Read - 

Dates for Submission of Applications for Secondary School Certificate (Std10th) February March 2025 Examination

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे Saral Database सरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.


    तसेच पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय III (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit मेणारे विद्यार्थी) ने विषय घेऊन प्रविष्ट होऊ इमिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयानी असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे

शुल्क प्रकार - माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी तसेच ITI (औद्यागिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) 

नियमित शुल्क - विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा

सोमवार, दिनांक ०७/१०/२०२४ ते मंगळवार, दिनांक ०५/११/२०२४

    माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे व RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व माध्यमिक शाळा प्रमुख यांनी नोंद घ्यावी.

हेही वाचा 👇 

    सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिन (School Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी प्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत मुख्याध्यापक यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

    इ. १० वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळेमार्फत भरावी. सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे 

१ माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांनी अद्ययावत नोंद असणे आवश्यक आहे व सदर Saral Database वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्यानी सोय उपलब्ध करुन दिलेली आहे.

२ पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार व त्रळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) यांची माहिती Saral Database मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीने निश्चित केलेल्या तारखांना ऑनलाईन पध्दतीने भरावयाची आहेत.



👇👇👇👇👇

SSC EXAM BOARD TIME TABLE


३ कौशल्य सेतू अभियानाचे Transfer of Credit मागणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरून विषयासमोर Transfer of Credit भी नोंद करावी. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी प्रचलित पध्दतीने आवेदनपत्र व आवश्यक कागदपत्रे यांची हार्ड कॉपी (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी.

Circular pdf copy link 


(अनुराधा ओक)
 सचिव,
राज्य मंडळ, पुणे
दिनांक ०३/१०/२०२४
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon