State Level Innovation Competition Link Year 2024-25
राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.
१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या सेविका व पर्यवेक्षिका)
२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)
३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)
४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट
५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)
प्रस्तुत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा पहिल्या टप्प्यात उपरोक्त गट क्र. १ ते ३ साठी जिल्हा स्तरावर व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (विभाग) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी whats app, वर्तमानपत्र यासारख्या प्रसार माध्यमांच्याद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी. यासाठी प्राचार्य, डाएट व संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद यांनी एकमेकांशी समन्वय साधावा, आपल्या स्तरावरून स्पर्धेबाबत आणि सोबत दिलेले माहितीपत्रक अवलोकन करून राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेविषयी अधिनस्त कार्यालयातील सर्व गटातील स्पर्धकांना याबाबत अवगत करावे.
हे ही वाचा 👇
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२३-२४ मधील नवोपक्रम अहवाल
सविस्तर वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व) यांनी आपल्या कार्यालयातील एका सक्षम अधिकाऱ्याकडे नोडल अधिकारी म्हणून या स्पर्धेची जबाबदारी देण्यात यावी, तसेच सदर नोडल अधिकाऱ्याचे नाव, संपर्क क्रमांक यासह नवोपक्रम
स्पर्धेची माहिती पोहचविण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास researchdept@maa.ac.in या ई-मेल पत्त्यावर कळविण्यात यावा. प्रस्तुत स्पर्धा ही सन २०२४-२५ साठी मराठी माध्यमासह इतर सर्व माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी आयोजित करण्यात येत आहे. इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करण्याविषयी संबंधितांना अवगत करण्यात यावे.
त्यानुसार आपल्या अधिनस्त उपरोक्त नमूद पाच गटात समाविष्ट अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांसह सर्व स्पर्धक नवोपक्रमशील घटकांना सोबतचे माहिती पत्रक निदर्शनास आणून द्यावे. संबंधित स्पर्धकांनी माहिती पत्रकाचे अवलोकन करावे. आपले नवोपक्रम नोंदवण्यासाठी लिंक देण्यात येईल. दिलेल्या लिंकवर नवोपक्रम सादर करण्याविषयी सूचित करण्यात यावे. दिलेल्या मुदतीत संबंधितांनी आपले नवोपक्रम सादर करण्याबाबत आपले स्तरावरून योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
सोबत : राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२४-२५ संभाव्य वेळापत्रक आणि माहिती पत्रक
Circular Pdf Copy Link
(राहूल रेखावार/भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
संशोधन विभाग
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५
माहितीपत्रक
राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. याच बरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी
१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)
२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)
३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)
४. विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट
५.अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता) सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :
१. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे.
२. शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.
३. शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने घेणा-या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे.
४. शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे, ५. शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे.
नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.
१) नवोपक्रमाचे शीर्षक उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.
२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व उपक्रम निवडण्याचे कारण, गरज, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. तपशील.
३) नवोपक्रमाची उद्दिष्टे हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.
१) उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण
२) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा
३) आवश्यक साधनांचा विचार
४) करावयाच्या कृतींचा क्रम
५) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण
६) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)
७) उपक्रमासाठी इतरांची मदत
८) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे
1. पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
11. कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन
III. उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी
IV. कार्यवाही करताना आलेल्या अडचणी
v. माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)
६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार)
नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :
१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.
२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)
३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा, याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.
४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.
५. नवोपक्रम लेखन मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.
६. नवोपक्रम टाईप केलेला असावा, टाईपिंग साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू १.५ इंच व उजवी बाजू, वरील बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन/समास असावा,
७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही. ८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२३-२४ किंवा २०२४-२५ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.
९. नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी, फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ६ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.
१०. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये १०० शब्द मर्यादित नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.
११. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम फाईल PDF व MS WORD स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.
१३. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम दिलेल्या लिंकवर अपलोड करावेत.
१४. जिल्हास्तर, विभाग स्तरावर प्रथम ७ व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे सादरीकरण करणे बंधनकारक असेल. १५. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिके व उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.
स्थळ:
राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही :
पहिला टप्पा :
अ) जिल्हास्तरावरील पुरस्कार-
पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक गट, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५ % पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील. त्यामुळे केवळ उत्कृष्ट नवोपक्रम राज्यस्तरावर येण्यासाठी उपयोग होईल. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल.
आ) विभागस्तरावरील पुरस्कार -
विषय सहायक व विषय साधन व्यक्ती तसेच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी यांचे नवोपक्रम प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या लिंकवर जातील व त्यामधून प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७५% पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठविले जातील. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. (टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटाचे मूल्यांकन प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई या स्तरावर करण्यात येईल)
राज्यस्तरावरील पुरस्कार -
दूसरा टप्पा :
नवोपक्रम अहवाल लेखन व नवोपक्रम सादरीकरण या आधारित पुढील पाच गटातील पारितोषिकांचे वितरण केले जाईल.
अ.नं. ०१ स्तर पूर्व प्राथमिक गट पारितोषिक प्रथम ५ उत्तेजनार्थ पुढील २ सादरीकरण प्रमाणपत्र प्रथम ५
अ.नं. ०२ स्तर प्राथमिक गट पारितोषिक प्रथम ५ उत्तेजनार्थ पुढील २ सादरीकरण प्रमाणपत्र प्रथम ५
अ.नं. ०३ स्तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गट पारितोषिक प्रथम ५ उत्तेजनार्थ पुढील २ सादरीकरण प्रमाणपत्र प्रथम ५
अ.नं. ०४ स्तर विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्तीगट पारितोषिक प्रथम ५ उत्तेजनार्थ पुढील २ सादरीकरण प्रमाणपत्र प्रथम ५
अ.नं. ०५ स्तर अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट पारितोषिक प्रथम ५ उत्तेजनार्थ पुढील २ सादरीकरण प्रमाणपत्र प्रथम ५
नवोपक्रम बैंक :
राज्य स्तरावर पुरस्कार प्राप्त सर्व नवोपक्रमांचा तसेच जिल्हा व विभाग स्तरावरील प्रत्येक गटातील गुणानुक्रमे पहिल्या पाच नवोपक्रमांचा समावेश राज्याच्या नवोपक्रम बैंक (Innovation Bank) मध्ये करण्यात येईल. हे नवोपक्रम SCERT, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयाच्या वेबसाईट वर Innovation Bank मध्ये प्रसिध्द करण्यात येतील.
(राहूल रेखावार भा.प्र.से.)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon