Marathi Bhasha Abhijat Bhasha Darja GR
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला
माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातें ही पैजा जिंके ॥
समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!
अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री. गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!
भारतात किती अभिजात भाषा आहेत?
तामिळ, तेलगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भारतातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता.
मराठी,पाली, बंगाली, आसामी , प्राकृत आज या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
एकूण ११ अभिजात भाषा झाल्या आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा..
भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून दिला जातो.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात राज्य शासनाने १० जानेवारी २०१२ रोजी प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञ संशोधकांची समिती स्थापन केली होती.
हेही वाचायला आपल्याला आवडेल
महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरण
आजचा हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाईल वाचा सविस्तर 👇
२०२४ ला पुन्हा केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याकरिता सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली.
ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा (Classical Languages) दर्जा प्राप्त झालेला आहे.
१) तमिळ (२००४)
२) संस्कृत (२००५)
३) कन्नड (२००८)
४) तेलगू (२००८)
५) मल्याळम (२०१३)
६) ओडिया (२०१४)
२०२४ :
७) मराठी
८) पाली
९) बंगाली
१०) आसामी
११) प्राकृत
अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पुढील ४ निकष लावले जातात :
१) भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान १५००- २००० वर्षे प्राचीन असावा.भाषेचे साहित्ये हे किमान १५०० - २००० वर्षे प्राचीन असावे लागते.
२) हे साहित्य महत्वाचे, मौल्यवान असावे.भाषेतील प्राचीन साहित्य मौल्यवान असावे.
३) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
४) सध्याच्या भाषेपासून स्वरुप वेगळे असावे.भाषेचे स्वरुप इतर भाषेपासून वेगळे असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?
१) अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
२) अभिजात भाषेचा दर्जा मिळल्यानंतर सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते.
३) अभिजात भाषेला प्रत्येक विद्यापीठात एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि
उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे
मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
०३ ऑक्टोबर २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. देशातील अभिजात भाषा या भारताच्या पुरातन आणि प्राचीन सांस्कृतिक वारशाच्या संरक्षकाची भूमिका पार पाडत आल्या आहेत. यासोबतच या भाषा म्हणजे प्रत्येक समुदायाने गाठलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वाटचालीतील मैलाच्या टप्प्यांचे सार आणि मूर्त रूप आहेत.
मुद्देनिहाय तपशील आणि पार्श्वभूमी :
भारत सरकारने ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषा म्हणून भाषांची एक नवीन श्रेणी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अंतर्गत अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी खाली नमूद निकष निश्चित केले आणि याच निकषांवर तमिळ या भाषेला अभिजात भाषा म्हणून घोषित केले होते.
एखादी भाषा 'अभिजात' कशी ठरते?
कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत. गृह मंत्रालयाने २००५ साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले. त्याचे काय निकष आहेत?
•भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे १५००- २००० वर्षं जुना हवा.
•प्राचीन साहित्य हवं, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं.
•दुसर्या भाषासमूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी.
•'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
भारतात आत्ताच्या घडीला ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तामिळ (२००४), संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४)
आणी आता मराठी सुद्धा अभिजात भाषा म्हणून जाहीर करण्यात आली आहे
Granting the status of classical language to Marathi language
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon