Sanch Manyata
महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पहिला मजला, पुणे
२५/८/222 जा.क्र. शिसंमा/ संचमान्यता/कंप- २०२४-२५/
दिनांक 15 JAN 2025
प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व,
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व,
विषय : संचमान्यता सन २०२३-२४ मधील प्रलंबित शाळा व सन २०२४-२५ संचमान्यता बाबत.
संदर्भ : १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक तक्रार २०१९/प्र.क्र.७५/ टीएनटी-४. दिनांक २९/८/२०१९
२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. तक्रार २०१९/प्र.क्र.७५ टीएनटी-४. दिनांक १/१०/२०१९.
वरील विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२३-२४ च्या संच मान्यता तसेच, प्रलंबित संचमान्यता बाबत यापूर्वी माहे ऑक्टोबर, २०२४ मध्ये कॅप घेऊन आपणास सूचना देण्यात आल्या होत्या.
तसेच मागील २ महीन्यापासून वारंवार V.C घेऊन सूचना केल्या आहेत. तरीही अद्याप साधारण ३६०० शाळा वकींग पोस्ट (कार्यरत पदे) प्रलंबित असल्याने सन २०२४-२५ संचमान्यता उपलब्ध करून देणेस अडचणी निर्माण होत आहेत. प्रलंबित संच मान्यता कामकाज तत्परतेने निकाली निघण्याची कार्यवाही होत नसल्याने दिनांक २०.०१.२०२५ पासून पुनश्चः विभागनिहाय शिबीर ई-बालभारती पुणे येथे आयोजित केला असून सदर शिबोरासाठो संचमान्यता कामकाज हाताळणारे विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद स्तरावरील प्रत्येकी १ तज्ञ व्यक्ती (OTP) कामकाज करणारे खालील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून संबंधितास निर्देश देण्यात यावे.
अ.क्र.
विभागीय शिक्षण उपसंचालक
दिनांक
वेळ
मुंबई व लातूर.
२०.०१.२०२५
सकाळी १०.०० वा.
नाशिक व कोल्हापूर.
२१.०१.२०२५
सकाळी १०.०० वा.
नागपूर व अमरावती.
२२.०१.२०२५
सकाळी १०.०० वा.
छत्रपती संभाजी नगर व पुणे.
२३.०१.२०२५
सकाळा १०.०० वा.
तसेच सदर कामकाजासाठी आपल्या कार्यालयातील एकच कर्मचारी उपस्थित राहील याचो दक्षता घ्यावी तसेच शिबीरामध्ये आपल्या जिल्ह्यातील संबंधित शाळेतील अथवा अन्य कोणतीही व्यक्ती कर्मचारी येणार नाहो याची दक्षता घ्यावी.
(डॉ. श्रीराम पानझाडे)
शिक्षण सहसंचालक
मार्थ्यामक व उच्च माध्र्यामक
Also Read 👇
महाराष्ट्र शासन
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
क्रांक: प्राशिर्स/सं.मा.दु./२४/२-५००/7626
दिनांक 9 DEC 2024
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) जिल्हा परिषद, (सर्व)
विषय: सन २०२४-२५ ची संचमान्यता दुरुस्त करणेबाबत.
संदर्भ: शासन निर्णय क्रमांक एसएसएन-२०१५ (प्र.क्र १६/१५)/ टीएनटी-२, दिनांक २५.०३.२०२४
✴️ सरल प्रणालीतील संचमान्यता पोर्टलवर 01/10/2024 रोजी कार्यरत मान्यता प्राप्त शिक्षक संख्या अपडेट करण्यासाठी टॅब ऍक्टिव्ह झाला आहे
01 ऑक्टोबर 2024 रोजी शाळेवर working Teaching Staff व working Non-Teaching Staff
ही संख्यात्मक माहिती भरून Update करूनच फायनलाईज करावी
शाळेत Non Teaching Staff नसेल तरीही अपडेट करून Finalize करावी अन्यथा ती शाळा Non Teaching Staff update or Finilize नाही केली तर Beo Login ला पेंडिंग दिसते
संचमान्यता 2024-25 करिता सर्व माध्यमांच्या मुख्याध्यापकांनी Student Portal वर विद्यार्थी फॉरवर्ड करण्या करीता Tab active झाला आहे तरी स्टुडन्ट पोर्टल वरील विद्यार्थी पुढील केंद्रप्रमुख लॉगिन ला मुख्याध्यापकांनी फॉरवर्ड करावीत
केंद्रप्रमुखांनीही सर्व शाळा आपल्या लॉगिन वर आल्यावर पुढील Beo लोगिन करीता शाळा फॉरवर्ड कराव्यात
तसेच माननीय शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांनी दिनांक 5.12.2024 रोजी vc मध्ये दिलेल्या सूचनेनुसार सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील वर्किंग पोस्ट भरण्याची टॅब देखील ॲक्टिव्ह झालेली आहे.दोन दिवसांमध्ये सर्वांनी आजच्या वर्किंग पोस्ट भराव्यात.
वर्किंग पोस्ट भरल्याशिवाय संच मान्यता जनरेट होत नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
शाळा पुढील लॉगीन ला पाठवण्याकरिता मार्ग
Menu ➡️ Sanchamanyat ➡️ Forward Sanchmanyata 1-12➡️ Academic Year 2024-25 ➡️ Go ➡️ Forward Sanchamanyata
संच मान्यता
सर्वांनी लक्षात ठेवा
Sanchmantya portal वरून लॉगिन करून फक्त कार्यरत पदे भरायची आहेत
व नंतर स्टुडन्ट पोर्टल जाऊन संच मान्यता टॅब फॉरवर्ड करायची
दोन्ही कामांना फक्त प्रत्येकी २ मिनिटे लागतात
फक्त काळजीपूर्वक करा कारण एकदा फॉरवर्ड झाल्यानंतर पुन्हा रिजेक्ट मारायची सोय नाही
संचमान्यता पोर्टल
संच मानता पोर्टल मध्ये आपली कार्यरत पद भरल्यानंतर
आपले Medium निवडा
नंतर HM असेल तर भरा
Uder graduate teacher म्हणजे उपशिक्षक भरा
नंतर graduated teacher असेल तर भरा
सर्वात महत्वाचे म्हणजे भरल्यानंतर माहिती Update tab वर click करा
ते तपासूनच पुढे finazile करा
मग होईल
Direct finalised करू नका
प्रथम महिती भरल्यावर update करा व नंतर finalize करा
Also Read 👇
महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
दिनांक : शिआएका २०२४/संकीर्ण/आस्था क-माध्य/ ६३५३ १८.१०.२०२४
प्रति,
मा. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
18 OCT 2024
मा. शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, महाराष्ट्र राज्य, पुणे-१
विषय : सन २०२४-२०२५ च्या प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा संच मान्यता डिसेंबर २०२४ पूर्वी जनरेट करुन शाळांना संच मान्यता मिळणेबाबत
संदर्भ : श्री. साजिद निसार अहमद, राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांचे क्र.अभउशिस/रा.क्र./२०२४/१३१४,
दि.१७.१०.२०२४
महोदय,
उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे (सोबत प्रत संलग्न)
सदर विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार सन २०२४-२५ ची संच मान्यता डिसेंबर २०२४ पूर्वी करण्याबाबत यथानियम कार्यवाही करुन संबंधितांना कळविण्यात यावे.
(रजनी रावडे)
प्र. शिक्षण उपसंचालक (प्रशासन) तथा
प्रशासन अधिकारी (आस्थापना) शिक्षण आयुक्तालय, पुणे
हेही वाचा
दिनांक : ऑक्टोंबर, 2024
11 OCT 2024
विषय: संच मान्यताबाबत ...
1. शालेय शिक्षण विभाग, शा.नि.क्र. एसएसएन 2015/प्र.क्र.16/15/टीएनटी-2, दि.28.08.2015
संदर्भ:
2. शालेय शिक्षण विभाग, शा. नि. क्र. एसएसएन 2015/(प्र.क्र. 16/15) / टीएनटी-2, दि. 15.03.2024
3. शासन पत्र क्रमांक एसएसएम-2019/प्र.क्र. 111/19/टीएनटी-2, दि. 25.06.2024
4. शासन पत्र क्रमांक एसएसएन 2023/प्र.क्र. 126/टीएनटी-2, दि. 17.07.2024
5. शासन निर्णय क्रमांक एसएसएन 2015 (प्र.क्र. 16/15) / टीएनटी-2, दि. 19.09.2024
उपरोक्त विषवाबाबत शालेय शिक्षण विभागाचा संदर्भ क्र.2, दि. 15.03.2024 च्या शासन निर्णयान्वये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम, 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयानुसार सन 2024-25 पासूनच्या संच मान्यता सुधारित निकषानुसार ऑनलाईन करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय संदर्भ क्र.1, दि. 28.08.2015 मधील निकषानुसार सन 2014-15
पासून ऑनलाईन संच मान्यता शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सन 2014-15 च्या संच मान्यतेत गत शैक्षणिक वर्ष 2013-14 मध्ये शिक्षणाधिकारी यांचेमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या ऑफलाईन संच मान्यतेमधील मंजूर पदे नमूद करण्यात आलेली आहे.
हेही वाचाल संचमान्यता सन २०२४-२०२५ बाबत..या ओळीला स्पर्श करून
सन 2014-15 ते सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येमुळे कमी झालेली पदे विद्यार्थी संख्या असल्यास सन 2017-18 मध्ये मंजूर करणेसाठी शासनास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यास अनुसरून शासन पत्र संदर्भ क्र.3. दि.25.06.2020 अन्वये विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पूर्वीचीच मंजूर पदे व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे कमी झालेली पदे विद्यार्थी संख्येनुसार असल्यास 2013-14 मधील मंजूर पदांच्या मर्यादत सन 2019-20 मध्ये मंजूर करण्याऐवजी सन 2018-19 च्या स्थितीच्या अनुषंगाने मंजूर करण्यास मान्यता दिलेली आहे.
शासन पत्र संदर्भ क्र.4, दि.17.07.2023 नुसार सन 2014-15 ते सन 2021-22 या कालावधीत विविध कारणास्तव संच मान्यता प्रलंबित असलेल्या शाळांच्या सन 2022-23 च्या संच मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन मागील लगतच्या झालेल्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पायाभूत पदांच्या मर्यादित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
उपरोक्त नमूद शासन पत्र दि.25.06.2020 व 17.07.2023 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन संच मान्यता दुरुस्ती करांना काही शाळांना सन 2016-17 च्या संच मान्यतेमध्ये समायोजनाने दिलेल्या शिक्षकांची पदे दर्शविण्यात आली असून सदर शाळांना सन 2014-15 च्या ऑनलाईन संच मान्यतेमधील शै.वर्ष 2013-14 मधील नमूद मंजूर पदांपेक्षा जादा पदे अनुज्ञेय झाली असल्याचे दिसून येते.
शासन निर्णय संदर्भ क्र.5, दि.19.09.2024 अन्वये मुद्दा क्र. 7 सर्व साधारण शर्तीनुसार शासन निर्णय
दि. 15.03.2024 अन्वये संच मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांची पदे पायाभूत पदांच्या मार्यादित मंजूर करण्यात येतील. पायाभूत पदांपेक्षा वाढीव होणाऱ्या शिक्षकांच्या पदांच्या बाबतीत शासनाची मंजूरी आवश्यक असल्याबाबत निर्देश दिलेले आहे.
सन 2014-15 च्या ऑनलाईन संच मान्यतेमधील शै. वर्ष 2013-14 मधील नमूद मंजूर पदांच्या मर्यादपेक्षा सन 2016-17 व त्यानंतरच्या प्रत्येक वर्षी जादा पदे मंजूर झाली असल्याची शक्यता आहे.
सदर बाब विचारात घेता, शासन निर्णय दि. 15.03.2024 च्या सुधारित संच मान्यता निकषानुसार सन 2024-25 च्या संच मान्यतांबाबतची कार्यवाही करण्यापूर्वी सन 2014-15 च्या ऑनलाईन संच मान्यतेमधील शै. वर्ष 2013-14 मधील नमूद मंजूर पदांच्या मर्यादपेक्षा सन 2016-17 व त्यानंतरच्या संच मान्यतेमधील मूळ पायाभूत पदांपेक्षा जादा पदे मंजूर झाली असल्यास अशा शाळांच्या संच मान्यता निर्गमित न करता, तसेच पदभरती व तदनुषंगिक कोणतीही कार्यवाही न करता त्याबाबतची माहीती संचालनालयास तात्काळ सादर करण्यात यावी. तसेच पायाभूत पदापेक्षा जादा वाढलेल्या पदांना कोणत्याही प्रकारचे भरती व तदनुषंगिक लाभ दिले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. त्याबाबतची वस्तुनिष्ठ अहवाल/माहिती संचालनालयास तात्काळ सादर करण्यात यावी.
Circular pdf Copy Link
(संपत सूर्यवंशी)
शिक्षण संचालक
११/१०/२४
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)
महाराष्ट्र राज्य मध्यवती इमारत
पूणे
क. शिसंमा/2023-24/f2-8/संचमान्यता/५५९з
प्रति.
दिनांक : ऑक्टोंबर, 2024
1) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व) 2) शिक्षण निरीक्षक, (उत्तर/पश्चिम/दक्षिण), बृहन्मुंबई.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon