DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Blended Mode Course For Need Based Training of Primary and Secondary Teachers Under STARS Project

Blended Mode Course For Need Based Training of Primary and Secondary Teachers Under STARS Project

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे

जा.क्र.राशैसंप्रपम/संशोधन / ब्लेडेड मोड प्रशिक्षण /२०२४-२५/०५६८६

दि.२९/११/२०२४

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
३) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका.
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), सर्व

विषय : STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्ससाठी मुदतवाढ देणे बाबत..

संदर्भ : प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र.राशैसंप्रपम/संशोधन / ब्लेंडेड मोड प्रशिक्षण/२०२४-२५/०४८४५ दि.०९/१०/२०२४ आणि ०५५०९ दि.१८/११/२०२४

    उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ a तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे. सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस पूर्ण करण्यासाठी दि.११.१०.२०२४ ते दि.३०.११.२०२४ हा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि आपल्या जिल्ह्याची कोर्स नोंदणी संख्या कमी असल्याने शिक्षकांना सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी देण्यात येत आहे.
    दि.१०.१२.२०२४ पर्यंतची मुदतवाढ आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या ब्लेंडेड कोर्सेसला नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.

Circular pdf Copy LINK

(अनुराधा ओक)
सहसंचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र ७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे 

दूरध्वनी क्रमांक: (020) 2447 6038

E-mail: researchdept@maa.ac.in

जा.क्र. राशेसंप्रपम संशोधन ब्लेडेड मोड प्रशिक्षण २०२४-२५/०५५०९

दि.१३/११/२०२४

प्रति.

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)

२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)

३) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका.

४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), सर्व

विषय : STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्ससाठी मुदतवाढ देणे बाबत.. 

संदर्भ : प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र. राशैसंप्रपम संशोधन / ब्लेंडेड मोड प्रशिक्षण/२०२४-२५/०४८४५ दि.०९/१०/२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे.



REGISTRATION LINK

अधिक माहिती व नोंदणी साठी या ओळीला स्पर्श करा

सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस पूर्ण करण्यासाठी दि.११.१०.२०२४ ते दि.२०.११.२०२४ हा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि आपल्या जिल्ह्याची कोर्स नोंदणी संख्या अत्यल्प असल्याने शिक्षकांना सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी दि.३०.११.२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे.

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या ब्लेंडेड कोर्सेसला नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी.
सोबत - ब्लेंडेड कोर्सची स्मार्ट Pdf.


(राहूल रेखावार भा.प्र.से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


Also Read 👇 

STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स उपलब्ध करून देणे बाबत..

ब्लेंडेड व ऑनलाईन कोर्स प्राथमिक व माध्यमिक स्तर

महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 
पुणे 

जा.क्र. राशेसंप्रपम संशोधन/ ब्लेडेड मोड प्रशिक्षण/२०२४-२५/०४८४५

दि.०९/१०/२०२४


विषय : STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स उपलब्ध करून देणे बाबत..

संदर्भ : १. STARS प्रकल्प अंतर्गत संशोधन विभागाचे वार्षिक अंदाजपत्रक व कार्य योजना २०२४-२५

२) STARS प्रकल्प मान्यता मंडळ इतिवृत्त सन २०२४-२५ दि.३१ जानेवारी २०२४

३. प्रस्तुत कार्यालयाची मंजूर टिपणी दि. ३०/०९/२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की, सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ a तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे.

    त्यानुसार सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शाख या विषयांचे ब्लेंडेड कोर्सेस हे दि. ११/१०/२०२४ पासून ते दि. २०/११/२०२४ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व शिक्षकांनी आपल्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सीपीडी) सदर कोर्स करणे आवश्यक आहे. यासाठी DIKSHA वर नाव नोंदणी करून विहित मुदतीमध्ये कोर्स पूर्ण करावा. तसेच सदरच्या कोर्सेससाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी. ऑनलाईन कोर्स पूर्ण केलेल्या शिक्षकांची त्यांच्या संबधित BRC/URC स्तरावर दि.२१/११/२०२४ ते दि.२९/११/२०२४ या कालावधीत एक दिवशीय PLC चे आयोजन करण्यात यावे. 

उपलब्ध कोर्स पूर्ण करणेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे.

शिक्षकांसाठी सूचना :

1. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी सदर ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स साठी नोंदणी करावी.

2. सदर कोर्स मराठी माध्यमात उपलब्ध आहेत तथापि इतर माध्यमातील शिक्षक हा कोर्स करण्यास इच्छुक असल्यास सदर कोर्सला नोंदणी करू शकतात व ती पूर्ण करू शकतात.

3. इयत्ता पहिली ते आठवी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकानी प्राथमिक स्तर कोर्स साठी नोंदणी करावी.

4. इयत्ता नववी व दहावी ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी माध्यमिक स्तर कोर्ससाठी नोंदणी करावी

5. सद्यस्थितीत एका शिक्षकाला एका वेळी एकाच कोर्ससाठी नोंदणी करता येईल.

6. सदर कोर्स पूर्ण करताना कोर्समधील सर्व व्हिडीओ पूर्णपणे पाहून विषयाची माहिती मिळवणे महत्वाचे आहे. सर्च व्हिडिओ पाहून झाल्यावरच मूल्यमापनासाठी प्रश्न उपलब्ध होतील.

7. सदर ब्लेंडेड कोर्समध्ये पाच तास व्हिडिओ अवलोकन, मूल्यमापन व एक विषसांची PLC पूर्ण करणे अनिवार्य आहे.

8. NEP २०२० च्या निर्देशानुसार सदरचा एक कोर्स पूर्ण केल्यानंतर एका शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी (सिपीडी) आवश्यक ५० तासांपैकी १० तास ग्राह्य धरण्यात येतील,

9. PLC सह कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना कोर्स पूर्णत्वाचे राज्यस्तरीय प्रमाणपत्र मिळेल व प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तकात घेण्यात येईल.

10. ब्लेंडेड कोर्स पूर्णत्वाचे प्रमाणपत्र राष्ट्रीयस्तर, राज्यस्तर, जिल्हास्तर शिक्षक पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येतील,

गटसाधन केंद्र/शहर साधन केंद्र (BRC /URC) स्तरावरील समन्वयकांची भूमिका व जबाबदारी :

1. राज्यस्तर/जिल्हास्तर वरून प्राप्त झालेल्या ब्लेंडेड कोर्स संदर्भातील पत्रांनुसार कार्यवाही करणे,

2. आपल्या बीआरसी युआरसी कार्यक्षेत्रातील शिक्षकांनी ऑनलाईन ब्लेंडेड कोर्सला नोंदणी करण्यासंदर्भातील पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे.

3 . ब्लेंडेड कोर्ससाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे विषयनिहाय व्हाट्सअप गट तयार करून कोर्स बावत वेळोवेळी मार्गदर्शन, आढावा व सनियंत्रण करणे,

4. वरिष्ठ स्तरावरून कोर्स संदर्भातील आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार PLC चे आयोजन करणे,

5. पीएलसी च्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित विषयाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पीएलसी पूर्ण करणे,

6. सदर ब्लेंडेड कोर्स संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित झालेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे.

ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणी संदर्भात शिक्षणाधिकारी (प्राथ. माध्य.) यांची भूमिका : 

1. शिक्षकांनी ब्लेडेड कोर्स करण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये पत्र, व्हिडिओजची लिंक यांचा प्रसार करणे व शिक्षकांना प्रोत्साहन देणे,

2. ब्लेंडेड कोर्स संदर्भात नोंदणी, कोर्स माहिती, PLC माहिती बाबत केंद्र स्तरावर उदबोधन  सत्र आयोजन करणे.

3. बलेंडेड कोर्स मध्ये जस्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांना सूचित करणे

4. ब्लेंडेड कोर्स शिक्षकांच्या सीपीडी साठी तयार करण्यात आलेला असून जे शिक्षक कोर्स पूर्ण करतील त्यांच्या प्रमाणपत्राची नोंद आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेकडून सेवापुस्तकात घ्येण्याची  कार्यवात करणे

5. जिल्लास्तरीय पर्यवेक्षण यंत्रणेने तालुकास्तरीय पीएलसीला भेटी देण्याचे नियोजन करणे,

ब्लेंडेड कोर्स अंमलबजावणी मध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची भूमिका :

1. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील माहिती जिल्हास्तरावरून व्हाट्सअप, पत्र, ई-मेलद्वारे शिक्षकापर्यंत प्रसारित करणे. 

2. ब्लेंडेड कोर्स अमलबजावणीसाठी वरिष्ठ अधिव्याख्याता / अधिव्याख्याता यामधून एक अधिकारी समन्ययक म्हणून नेमून त्यांच्यावर जिल्ह्याची जवाबदारी सोपविणे,

3. ब्लेंडेड कोर्स संदर्भातील राज्यस्तरावरून प्राम होणाऱ्या मार्गदर्शक सूचना, नियोजन BRC/URC पर्यंत पोहोचवणे,

4. ब्लेंडेड कोर्स संदर्भात जिल्हास्तरीय आढावा मार्गदर्शन व सनियंत्रण करणे,

5. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमधील तालुका संपर्क अधिकारी यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यात पीएलसी चे नियोजन व आयोजन करणे,

6. तालुकास्तरीय पीएलसी भेटीसाठी नियोजन करणे,

उक्त नमूद सर्व बाबींच्या अधीन राहून प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चांनी वेळोवेळी आढावा घेऊन आपल्या विद्यालयातील शिक्षकांना कोर्सेस पूर्ण करणेसाठी योग्य समन्वय साधावा.

सोबत - ब्लेंडेड कोर्सची स्मार्ट Pdf.


राज्य रोक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, माहाराष्ट्र, पुणे

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे

ब्लेंडेड व ऑनलाईन कोर्स प्राथमिक व माध्यमिक स्तर

अ.क्र. कोर्स चे नाव मोडयूल संख्या वेळ (तास) जिल्हा लिंक QR Code
ब्लेंडेड व ऑनलाईन कोर्स प्राथमिक व माध्यमिक स्तर

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे
ब्लेंडेड व ऑनलाईन कोर्स: प्राथमिक व माध्यमिक स्तर

अ.क्र. कोर्स चे नाव मोडयूल संख्या वेळ (तास) जिल्हा लिंक

ब्लेटेड कोर्स प्राथमिक स्तर

कोर्स चे नाव कोर्स चे नाव  MH_ मराठी भाषा मुलभूत कौशल्य विकास चर्चा
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा वर्धा 


कोर्स चे नाव  MH DIETPUNE E-LAMP
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा पुणे


कोर्स चे नाव  MH हसत खेळत गणित शिक्षण प्राथमिक स्तर गणित
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा नांदेड


कोर्स चे नाव  MH_विज्ञान समजून घेतांना BLENDED COURSE)
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा धुळे


कोर्स चे नाव  MH_सामाजिक शास्त्र शिक्षक सक्षमीकरण ब्लेंटेड कोर्स (प्राथमिक स्तर)
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा पुणे



ब्लेडेड कोर्स: माध्यगिक स्तर

कोर्स चे नाव   MIH प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन ब्लेंडेड मोड कोर्स-उपयोजित लेखन आणि लेखन कौशल्य (अभिव्यवती)
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा सागली


कोर्स चे नाव   MH ELITES English Language Initiating in Teacher Education for Secondary Schools
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा छत्रपती संभाजीनगर


कोर्स चे नाव   MH_जाऊ गणिताच्या गावी (माध्यमिक स्तर-गणित)
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा रत्नागिरी


कोर्स चे नाव   MH ध्येय विज्ञान प्रशिक्षणाचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे (BLENDED)
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा हिंगोली


MH_सामाजिक शाखातील विविध संकल्पनाचे अध्ययन अध्यापन
मोडयूल ४  संख्या वेळ (तास) ५ जिल्हा अकोला




STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स उपलब्ध


Diksha Apps LINK

प्रति.

१) विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)

२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)

३) शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका.

४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), सर्व

Blended Mode Course For Teachers Under STARS Project Edition Registration Link 
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon