Shikshak Vinaanudanit Varun Anudanitvar Badli GR
मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरुन राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांच्या विनाअनुदानित/अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडी मधून अनुक्रमेअंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदलीचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करताना अनुसरावयाची कार्यपध्दती व तपासणी सूची विहीत करण्याबाबत.
प्रस्तावना:-
राज्यातील खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर बंदी असतानाच्या कालावधीत शासन अधिसूचना, दिनांक ०८.०६.२०२० अन्वये मूळ नियमावलीत समाविष्ट करण्यात आलेला उपनियम क्र. (४१-१) व त्याअनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय, दिनांक ०१.०४.२०२१ मधील तरतूदींचे पालन न करता विनाअनुदानित किंवा अंशतः
अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदली होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने शासन अधिसूचना, दि.०८.०६.२०२० मधील नियम क्र.५ मधील उपनियम (४१-१) व शासन निर्णय, दि.०१.०४.२०२१ यास दि.०१.१२.२०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. सदर परिपत्रक संदर्भ क्र. ८ येथील फ्रेंडस सोशल सर्कल, अकोला व इतर विरुध्द महाराष्ट्र राज्य रिट याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी दि.२१.०७.२०२३ रोजीच्या आदेशान्वये रद्दबातल ठरविले होते. असे असले तरी, यासंदर्भात शासनाचे आदेश नसल्यामुळे विनाअनुदानित वरुन अनुदानित तत्त्वावर केलेल्या बदल्यांच्या क्षेत्रीय स्तरावरुन मान्यता देण्यात येत नव्हती. या सर्व बाबींचा विचार करुन भविष्यातील अधिकची गुंतागुंत टाळण्यासाठी तसेच यासंदर्भात उद्भवलेल्या न्यायालयीन प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्याच्या दृष्टीने सदर बदलीच्या नियमाच्या अंमलबजावणीबाबत संदर्भ क्र. ९ च्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांचे विनाअनुदानित/अंशतः अनुदानित वरुन अंशतः अनुदानित/ अनुदानित पदावर बदली करण्याबाबतची अधिसूचना दि.०८.०६.२०२० मधील नियम क्र. ५ उपनियम (४१-१) व शासन निर्णय, दि.०१.०४.२०२१ मधील विहीत तरतुदीनुसार संस्थांनी केलेल्या बदल्यांचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविताना अनुसरावयाची कार्यपध्दती व प्रस्तावासोबत पाठवावयाच्या कागदपत्रासंदर्भातील तपासणी सूची सुनिश्चित करुन त्याप्रमाणे क्षेत्रीय प्राधिकाऱ्यांना सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रकः-
विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित पदावर बदली संदर्भातील प्रकरणे ज्यामध्ये मा. न्यायालयाने आदेश पारित केलेले नाही किंवा त्यामध्ये न्यायालयीन प्रकरणे दाखल झालेली नाही, अशी सर्व प्रकरणे शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्याच्या सूचना संदर्भ क्र. ९ येथील शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत. याअनुषंगाने उक्त बदली प्रस्ताव शासनास सादर करताना सोबत जोडलेल्या परिशिष्ट "अ" येथील तपासणी सूचीमधील संबंधित कागदपत्रांच्या प्रतीसह परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करावेत. यासंदर्भात खालीलप्रमाणे कार्यपध्दती अनुसरण्याबाबत सर्व संबंधित क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेतः-
१) शासन अधिसूचना क्र. संकीर्ण २०१९/प्र.क्र.३४१/टिएनटि-१, दि.०८.०६.२०२० व त्याअनुषंगाने शासन निर्णय, दि.०१.०४.२०२१ अन्वये विहीत केलेल्या तरतूदी, तसेच यापूढे शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना विचारात घेऊन संस्थेमार्फत आपणाकडे सादर केलेले बदली प्रस्ताव नोंदीकृत करावेत व अशा प्रत्येक प्रस्तावास स्वतंत्र नोंदणी क्रमांक द्यावा.
२) सोबतच्या परिशिष्ट-अ तपासणी सूची मध्ये नमूद केलेल्या कागदपत्रांच्या सत्यतेबाबत संबंधित संस्थेकडून रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रतिज्ञापत्र प्रस्तावासोबत असल्याची खातरजमा करावी.
३) प्रस्ताव सादर करण्यापूर्वी सोबतच्या परिशिष्ट-अ येथे नमूद केलेल्या तपासणी सूची मधील सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत किंवा नाही, याची खातरजमा करण्यात यावी. यामध्ये काही कागदपत्रे नसतील तर त्याबाबत संबंधित संस्थेस लेखी कळवावे व त्याची तातडीने पूर्तता करुन परीपूर्ण प्रस्ताव विहित मुदतीत शासनास सादर करण्यात यावेत.
४) प्रस्ताव सादर करताना एकाच संस्थेमधील शिक्षकांच्या बदल्यांचे प्रस्ताव वगळता, इतर संस्थांचे अनेक प्रस्ताव एकत्रित यादीने न पाठविता संबंधित शिक्षकांच्या बदलीबाबतचे वैयक्तिक प्रस्ताव स्वतंत्ररित्या आवश्यक कागदपत्रे जोडल्याची खातरजमा करुनच शासनास सादर करावेत.
५) अशा प्रत्येक वैयक्तिक प्रकरणास स्वतंत्र प्रकरण क्रमांक द्यावा व तशी नोंद प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या दिनांकास घ्यावी.
६) आपल्या कार्यालयाकडे प्रस्ताव ज्या दिनांकास प्राप्त झाला आहे त्या दिवसापासून १५ दिवसात शासनास सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण असलेला प्रस्ताव शासनास सादर करावा.
७) जे प्रस्ताव परिपूर्ण नसून त्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असल्यास, त्याबाबत उपरोक्त क्र.३ प्रमाणे कार्यवाही करावी व जास्तीत जास्त १ महिन्यात प्रस्ताव शासनास सादर करावा.
८) विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित पदावर बदली केलेल्या शिक्षकाचा विषय असलेल्या रिक्त पदासाठी त्याच विषयाचा पात्र अतिरिक्त शिक्षक उपलब्ध असणे किंवा नसल्याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रमाणित करावे.
९) सेवाज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकापेक्षा कनिष्ठ शिक्षकांची बदली करण्यात येत असल्यास सदर बदलीस सेवाज्येष्ठ शिक्षकाची हरकत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र संबंधित शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या समक्ष सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या हस्ताक्षरात लिहून घ्यावे. सदरचे प्रतिज्ञापत्र आपल्या समक्ष लिहून घेतल्याचे शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रमाणित करावे. परंतु बदलीबाबतची कार्यवाही विषय व अर्हता विचारात घेऊनच सेवाज्येष्ठतेच्या क्रमानुसार करण्यात यावी.
१०) बदली प्रस्ताव विलंबाने पाठविल्यास याबाबतचा खुलासा प्रस्तावासोबत सादर करण्यात यावा.
११) मा. न्यायालयाने आदेश दिलेल्या बदली प्रकरणांव्यतिरिक्त इतर सर्व बदली प्रकरणावर संदर्भ क्र. ९ येथील शासन परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेणे अभिप्रेत नाही. परंतु अशा कोणत्या प्रकरणी क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेतला असल्यास ती प्रकरणे कारणमिमांसेसह शासनास मान्यतेसाठी सादर करावेत. तसेच यापुढे अशा कोणत्याच बदली प्रस्तावावर क्षेत्रीय स्तरावर निर्णय घेण्यात येऊ नये अन्यथा संबंधितावर नियमोचित कारवाई करण्यात येईल.
१२) उपरोक्त प्रमाणे बदली प्रस्तावांच्या अनुषंगाने यापूढे शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे अनुपालन करावे.
१३) संस्थेने उक्त बदलीचा प्रस्ताव संबंधित शिक्षणाधिकारी/विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर करतांना शासनास प्रतिलिपी करावे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४१००३१८५१४७१६२२ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
Circular pdf copy link
(तुषार महाजन)
उप सचिव, महाराष्ट्र शासन
तपासणी सूची
१) संस्थेचे नाव
२) कार्यरत शाळेचे नाव व ठिकाण.
३) शाळा परवानगी आदेशाचा क्रमांक व दिनांक.
४) शाळा अल्पसंख्यांक असेल तर त्याबाबतचे प्रमाणपत्र
५) बदलीने रुजू होणाऱ्या शाळेचे नाव व ठिकाण.
६) संबंधित शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे,
७) शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव
८) संबंधित शिक्षकाचे विनाअनुदानित/अंशतः अनुदानित तत्वावरील मूळ नियुक्तीचे आदेश.
९) विनाअनुदानित/अंशतः अनुदानित तत्वावरील नियुक्तीस शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उप संचालक यांचेकडून देण्यात आलेल्या मान्यतेचे आदेश.
१०) संबंधित व्यवस्थापनाच्या विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेची/शाळांची सेवाज्येष्ठता सूची.
११) बदलीने रुजू होणारे पद रिक्त होण्याचे कारण व संबंधित कागदपत्रे.
१२) विनाअनुदानित/अंशतः अनुदानित शाळेमध्ये ५ वर्ष सेवा केली असल्याबाबतचे सेवा प्रमाणपत्र.
१३) बदलीने रुजू होणाऱ्या शाळेतील रिक्त पदे दर्शविणारी बिंदुनामावली.
१४) संबंधित शिक्षकाचे वैयक्तिक ना-हरकत प्रमाणपत्र (प्रपत्र -१)
१५) उक्त नमूद प्रस्तावातील कागदपत्रे खरी असल्याबाबतचे संबंधित संस्थेचे हमीपत्र (प्रपत्र -२)
१६) बदलीपूर्वी बिंदुनामावलीनुसार रिक्त पदाचा विषय व आरक्षण विचारात घेऊन, सदर रिक्त पदावर त्याच विषयाचा पात्र अतिरिक्त शिक्षक उपलब्ध आहे किंवा नाही याबाबतची खात्री केल्याचे प्रमाणपत्र. (प्रपत्र - ३)
महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ४१-१ नुसार बदली प्रस्तावासोबत जोडावयाच्या संबंधित शिक्षकाच्या वैयक्तिक ना-हरकत प्रमाणपत्राचा नमुना.
ना-हरकत प्रमाणपत्र (प्रपत्र-१)
मी, श्री/श्रीमती/कुमारी.. उपशिक्षक, सहशिक्षक/ (संस्थेचे व शाळेचे नाव आणि पत्ता) याद्वारे पुढीलप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक जाहिर करतो/करते की, माझा, संस्थेने महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ४१-१ नुसार विहीत केल्याप्रमाणे संस्थेच्या.. .(सद्य:स्थितीत संबंधित शिक्षक कार्यरत असलेल्या शाळेचे नाव व पत्ता) मधील विनाअनुदानित/अंशतः अनुदानित पदावरुन ..(बदलीने नियुक्ती द्यावयाच्या शाळेचे नाव व पत्ता) मधील उपलब्ध रिक्त अंशतः अनुदानित/अनुदानित पदावर बदलीबाबत संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावास माझी कोणतीही हरकत नाही.
स्वाक्षरी -
नाव - श्री/श्रीमती/कुमारी
पदनाम -
(सहशिक्षक/उपशिक्षक)
संस्थेचे व शाळेचे नाव आणि पत्ता -
महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ४१-१ नुसार बदली प्रस्तावासोबत जोडावयाच्या संस्थेच्या हमीपत्राचा नमुना
हमीपत्र (प्रपत्र-२)
मी, श्री/श्रीमती/कुमारी. पत्ता) याद्वारे पुढीलप्रमाणे प्रतिज्ञापूर्वक जाहिर करतो/करते की, अध्यक्ष/सचिव, (संस्थेचे नाव व
१. मी. श्री/श्रीमती/कुमारी..
सहशिक्षक/ उपशिक्षक,... (कार्यरत शाळेचे नाव व पत्ता) यांचा महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ४१-१ नुसार विहीत केल्याप्रमाणे संस्थेच्या.. ..(सद्य:स्थितीत संबंधित शिक्षक कार्यरत असलेल्या शाळेचे नाव व पत्ता) मधील विनाअनुदानित/अंशतः अनुदानित पदावरुन ..(बदलीने नियुक्ती द्यावयाच्या शाळेचे नाव व पत्ता) मधील उपलब्ध रिक्त अंशतः अनुदानित/अनुदानित पदावर सेवाज्येष्ठ शिक्षकाच्या बदलीचा प्रस्ताव संस्थेच्या ठरावानुसार सादर करीत आहे.
२. उक्त प्रस्तावासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे सत्य आहेत, अशी मी हमी देतो.
३. उक्त कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र भविष्यात असत्य/खोटी/चूकीची असल्याचे निदर्शनास आल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेची राहील, अशा परिस्थितीत सदर बदली रद्द करण्यास संस्थेची कोणतीही हरकत नसेल, अशी मी हमी देत आहे.
स्वाक्षरी -
नाव - श्री/श्रीमती/कुमारी
पदनाम -
संस्थेचे नाव व पत्ता -
(शिक्क्यासह)
..(सचिव/अध्यक्ष)
संस्थेचा शिक्का -
महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ४१-१ नुसार बदली प्रस्तावासोबत जोडावयाच्या सक्षम प्राधिकाऱ्याचे हमीपत्राचा नमुना
हमीपत्र (प्रपत्र-३)
असे प्रमाणित करण्यात येते की, अध्यक्ष/सचिव,. (संस्थेचे नाव व पत्ता) यांनी महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, १९८१ मधील नियम ४१-१ नुसार श्री/श्रीमती/कुमारी. सहशिक्षक/उपशिक्षक विनाअनुदानित/अंशतः अनुदानित पदावरुन (शाळेचे नाव व पत्ता) यांच्या (बदलीने नियुक्ती द्यावयाच्या शाळेचे नाव व पत्ता) मधील उपलब्ध रिक्त अंशतः अनुदानित/अनुदानित पदावर बदलीस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला असून अशा बदलीपूर्वी लगतच्या वर्षाच्या बिंदुनामावलीनुसार रिक्त पदाचा विषय व आरक्षण (प्रवर्ग) विचारात घेऊन तपासणी केली असता, सदर रिक्त पदासाठी पात्र अतिरिक्त शिक्षक उपलब्ध आहे/नाही.
स्वाक्षरी -
(शिक्क्यासह)
सक्षम प्राधिकाऱ्याचे नाव श्री/श्रीमती/..
पदनाम - (विभागीय शिक्षण उपसंचालक/शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य.) / शिक्षण
निरीक्षक)
कार्यालयाचा पत्ता -
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.१२०/टिएनटि-१ दालन क्र. ४३९, चौथा मजला, विस्तार इमारत, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई
दिनांक : ०३ ऑक्टोबर, २०२४.
वाचा:-
१) महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन अधिनियम, १९७७
२) महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शती) नियमावली, १९८१ ३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन अधिसूचना क्र. संकीर्ण-२०१९/
प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०८.०६.२०२० ) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण- ४
२०१९/प्र.क्र.३४१/टीएनटी-१, दि.०१.०४.२०२१
५) शासन परिपत्रक समक्रमांक, दि. ०१.१२.२०२२.
६) रिट याचिका क्र.१५५२६/२०२३ सौ. शिंदे प्रितम मंगेश विरुध्द महाराष्ट्र राज्य व इतर प्रकरणी मा. उच्च न्यायालयाचे दि.२२.०४.२०२४ चे आदेश.
७) श्री. नितीन भिका ताडगे व इतर रिट याचिका क्र. २०४/२०१९ प्रकरणी मा. न्यायालयाने दि.१६.०४.२०२४ रोजी दिलेले आदेश.
८) फ्रेंडस सोशल सर्कल, अकोला व इतर विरुध्द महाराष्ट्र राज्य रिट याचिका क्र.८२१५/२०२२ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.२१.०७.२०२३ रोजी दिलेले आदेश.
९) शासन परिपत्रक समक्रमांक, दि. २४.०४.२०२४.
Hon. In accordance with the order given by the High Court regarding prescribing the procedure and check list to be followed while submitting for the approval of the Government the proposal for transfer of the private school teachers from the unaided/partially aided school or batch to the partially aided or fully aided school or batch respectively for the approval of the Government.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon