DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Vidyarthi Vigyan Manthan Pradnya Shodh Pariksha

Vidyarthi Vigyan Manthan Pradnya Shodh Pariksha

Vidyarthi Pradnya Shodh Pariksha  Vidyarthi Vigyan Manthan Examination

Vidyarthi Pradnya Shodh Pariksha 
Vidyarthi Vigyan Manthan Examination

               "विद्यार्थी विज्ञान मंथन" २०२४-२५
    विद्यार्थ्यासाठी घेतली जाणारी सर्वात मोठी विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा
                     संपूर्ण माहिती नोंदणी लिंक
विद्यार्थ्यांना आपल्या देशातील नामवंत संशोधन संस्थांमध्ये (ISRO, DRDO, CSIR, BARC इ.) स्वतः भेट देऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे
भास्कर शिष्यवृत्ती 
रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र 

विषय :- "विद्यार्थी विज्ञान मंथन" २०२४-२५ बाबत 

(नवभारत निर्मितीसाठी इ. सहावी ते अकरावीच्या विद्यार्थ्यासाठी घेतली जाणारी सर्वात मोठी विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा)

संदर्भ :- विज्ञान भारती, पुणे यांचे पत्र दि. ०६/०८/२०२४ विभागास प्राप्त दि. २०/०८/२०२४

    विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त विद्यमाने "विद्यार्थी विज्ञान मंथन" ही परीक्षा दरवर्षी इयत्ता सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, निरीक्षण आणि तर्काच्या आधारावर विश्लेषण करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी तसेच आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या भरीव योगदानाबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी ही या परीक्षेची उद्दिष्टे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
    
    इयत्ता सहावी ते अकरावीमधील मराठी तसेच इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी नोंदणी करू शकतील. यावर्षी मुख्य परीक्षा दि. २३ ऑक्टोबर २०२४ आणि २७ ऑक्टोबर २०२४ या दिवशी होणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका दिवशी आपल्या घरातून अथवा शाळेमधून मोबाईलद्वारे (अँड्रॉइड) परीक्षा द्यायची आहे. परीक्षेचा कालावधी हा दीड तास (९० मिनिटे) असणार आहे. विद्यार्थ्यांना मोबाईलवर सकाळी १०:०० ते सायं. ६:०० वाजेपर्यंत परीक्षेच्या अॅपवर लॉगिन करून कोणत्याही वेळी दीड तासामध्ये परीक्षा देता येणार आहे. मुख्य परीक्षा विद्यार्थ्यांना देणे सोपे व्हावे म्हणून चाचणी परीक्षा (मॉक टेस्ट) त्यासाठी या ओळीला स्पर्श करा दि. १ सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच अन्य ११ भारतीय भाषांमध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना या भाषांपैकी कोणत्याही भाषेत परीक्षा देता येईल.

हेही वाचाल 


    मुख्य परीक्षेचे स्वरूप हे बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असून यामध्ये १०० प्रश्न (१०० गुण) विचारले जातील. विभाग अ मध्ये भारताचे विज्ञानातील योगदान, श्री शांती स्वरूप भटनागर यांची जीवनगाथा यावर आधारित ४० प्रश्न विचारले जातील. विभाग अ हा ४० गुणांचा असून यासाठी वेळ ३० मिनिटे असणार आहे.
विभाग ब हा एकूण ६० गुणांचा असून यासाठी वेळ ६० मिनिटे असणार आहे. जर विभाग अ मध्ये विद्यार्थ्यास २० गुण किंवा अधिक गुण मिळाले तरच विभाग ब चे मूल्यांकन करण्यात येईल.
    राज्यातील सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येक इयत्तेतील २० विद्यार्थी हे राज्यस्तरीय शिबिरासाठी (State Level Camp) पात्र ठरतील. तसेच राज्यस्तरीय शिबिरामध्ये सर्वाधिक गुण मिळविलेले प्रत्येकइयत्तेतील २ विद्यार्थी हे राष्ट्रीय शिबिरासाठी (National Camp) पात्र ठरतील. राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन हे दि ८, १५ किंवा २२ डिसेंबर २०२४ या दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी किंवा दोन दिवसीय करण्यात येईल. राष्ट्रीय शिबीराचे आयोजन हे दि. १७ आणि १८ मे २०२५ या दिवशी करण्यात येणार आहे. राज्य स्तरीय शिबीर आणि राष्ट्रीय शिबीर हे प्रयोग क्रिया, निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता, परिस्थितीजन्य समस्येचे निराकरण करण्याची क्षमता, सर्जनशीलता, नेतृत्वगुण इ. घटकांवर आधारित असेल. या शिबिरांची विस्तृत माहिती मुख्य परीक्षेनंतर देण्यात येईल.

या वर्षीच्या परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये

१) सृजन प्रशिक्षण कार्यक्रम या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय आणि क्षेत्रीय पातळीवरील विजेत्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातील नामवंत संशोधन संस्थांमध्ये (ISRO, DRDO, CSIR, BARC इ.) स्वतः भेट देऊन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी साधारण १ ते ३ आठवडे असा असणार आहे.
२) भास्कर शिष्यवृत्ती : भास्कर शिष्यवृत्ती योजना राष्ट्रीय विजेत्यांसाठी आहे. एक वर्षासाठी रु. २००० प्रति महिना असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. सृजन प्रशिक्षणानंतर राष्ट्रीय विजेत्यांना एखादा प्रकल्प नेमून देण्यात येईल आणि त्या प्रकल्पाचे विषय तज्ज्ञांकडून मूल्यांकन केले जाईल. या मूल्यांकनानंतर विजेत्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.
३) रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र राष्ट्रीय, क्षेत्रीय व राज्य स्तरावरील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
सध्या परीक्षेसाठी नोंदणी चालू आहे. नोंदणीची प्रक्रिया (Registration) अत्यंत सोपी असून विद्यार्थ्यांनासंकेतस्थळावरच वैयक्तिकरित्या नोंदणी (Individual Registration) अथवा शाळेच्या माध्यमातून नोंदणी (Through School Registration) करता येईल. संस्थेमार्फत नोंदणीसाठी रु. २००/- शुल्क ठेवण्यात आलेले आहे.
नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.२५ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी विद्यार्थी विज्ञान मंथन च्या 
 LINK  या संकेतस्थळास भेट द्यावी. इयत्ता सहावी ते अकरावीच्या इच्छुक विद्यार्थ्यानी परीक्षेला नावनोंदणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही करण्यात यावी. कृपया या परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये याची नोंद घ्यावी.


(रमाकांत काठमोरे) 
सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. 
महाराष्ट. पुणे - ३०
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon