DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Career Guidance Of Students Abhyas Kasa Karava

 Career Guidance Of Students Abhyas Kasa Karava

Career Guidance Of Students Abhyas Kasa Karava

Conducting Webinar Sessions for career guidance of students under State Council of Educational Research and Training Maharashtra, Pune for class 9th to 12th students


Career Guidance Webinar for students BY SCERT

SCERT PUNE आयोजित यापूर्वी झालेले सर्व वेबिणार या ओळीला स्पर्श करून बघू शकता  

Conducting Webinar Sessions for career guidance of students under State Educational Research and Training Council Maharashtra, Pune for Class 9th to 12th students

इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन
Vyavsay Din Margdarshan SaptahSCERT Guidelines

विषय : व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्याबाबत....

संदर्भ : जा क्र. रा शैसंप्रपम/व्यमावसमुवि/समुपदेशन केंद्र / २०२४-२५/०६२३९दिनांक २२/१२/२०२४
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या विविध संधी व कोर्सेसची माहिती व्हावी म्हणून राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रतिवर्षी १४ जानेवारी हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा म्हणून इयत्ता ९ ते १२ वीचे वर्ग असणाऱ्या संबंधित शाळांना खालील प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सांगून व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सूचित करण्यात यावे.

यासाठी खालीलप्रमाणे दिवसनिहाय नियोजन करून उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

१ एक दिवस करिअरच्या विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मदतीने करिअर विषय मार्गदर्शन
आयोजित करावे - दि. १४ जानेवारी २०२५

२ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे- दि. १५ जानेवारी २०२५

३ यशस्वी व्यावसायिकास विद्यालयात आमंत्रित करून यशस्वी व्यवसायाचा मंत्र या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करावे. दि. १६ जानेवारी २०२५

४ राज्यस्तरावर करिअर मार्गदर्शन संदर्भात प्रस्तुत परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या वेविणार मालिकेचे प्रसारण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे. शाळेत विद्यार्थ्यांना सदर प्रसारण उपलब्ध करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी- दि. १७ जानेवारी २०२५

५ विद्यालय स्तरावर जवळपास असणारे कारखाने, लघु उद्योग यांना भेट देण्यास विद्यालय स्तरावर सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसाय, उद्योग याबाबत सविस्तर अहवाल तयार करण्यास सांगावा. दि. १८ जानेवारी २०२५

६ इयत्ता ९ वी ते १२ वीच्या पालकांसाठी पालकांची अपेक्षा, विद्यार्थ्याची आवड व त्यांची क्षमता व उपलब्ध करिअर करिअर मार्ग याबाबत शाळा व्यवस्थापन / व्यवस्थापन विकास
समिती बैठकीत मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे दि. २० जानेवारी २०२५

७ येत्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरु होणाऱ्या १० वी व १२ वी च्या वोर्ड परीक्षांची पार्श्वभूमीनुसारमानसशास्रातील तज्ञांचे परिक्षा व ताण तणावाचे निवारण यावर सत्र आयोजित करावे.-दि.२१ जानेवारी २०२५उपरोक्त संदर्भानुसार सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या इयत्ता ९ वी ते १२ वीच्या शाळांमध्ये समुपदेशन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. सदर सप्ताह या केंद्राच्या सहाय्याने शाळेमध्ये रावविण्यास सांगण्यात यावे. सदर सप्ताहादरम्यान आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय अधिकारी यांच्या शाळा भेटीचे नियोजन करून जिल्ह्यातील इयत्ता ९ ते १२ वीच्या जास्तीत जास्त शाळांना भेटी देण्यास सूचना देण्यात याव्यात. या भेटी दरम्यान प्रस्तुत परिषदेमार्फत प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३ ते ४ या दरम्यान आयोजित करिअर मार्गदर्शक वेविणारबद्दल माहिती देण्यात यावी. सदर भेटीसंदर्भात लिंकद्वारे भेटीचा अहवाल संकलित करण्यात येणार आहे.


संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे 
Career Guidance Program for Students By SCERT Guidelines


कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील करिअरच्या संधी

       राज्यातील इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील 2024-25 या वर्षातील  
14 वे सत्र दि.20.12.2024  रोजी उपलब्ध करण्यात येत आहे.
    राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन सदर वेबिनारचे प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सदर वेबिनारचा लाभ *विदयार्थी,पालक उपलब्ध वेळेनुसार घेऊ शकतात.*

 समुपदेशक 
श्री श्रीकृष्ण निहाळ 
    सहशिक्षक 
जि.प.प्रा.शाळा देवपिंपळगाव जि.जालना 
 
 विषय - कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील करिअरच्या संधी

 दि:20 डिसेंबर 2024
    दुपारी:3:00 ते 4:00
 युट्युब लिंक


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारचा लाभ घ्यावा.

(राहूल रेखावार भा.प्र.से.)
        संचालक,
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे
Career opportunities in the field of artificial intelligence (AI)

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील २०२४-२५ या वर्षातील पहिले सत्र दि. २०.०९.२०२४  रोजी आयोजित करण्यात आले आहे.

सत्र पहिले 
 विषय - अभ्यास कसा करावा?
 दि -   २० सप्टेंबर २०२४
 वेळ दुपारी ३.०० ते ४.००

समुपदेशक  मा श्री कैलास वाघमारे  सहा.शिक्षक

Diploma Course In Guidance and Counseling (NCERT,New Delhi)

जि. प. प्राथ. शाळा पिंपळे ता. संगमनेर, जि- अहमदनगर 

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

SCERT PUNE आयोजित यापूर्वी झालेले सर्व वेबिणार या ओळीला स्पर्श करून बघू शकता  


( राहूल रेखावार भा.प्र.से.)

संचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

प्रति,

१) विभागीय शिक्षण उपसंचालक 

(सर्व)

२) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)

४) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व)

५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng