DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Science Research Award Competition 2024 for Students

Science Research Award Competition 2024 for Students 


Science Research Award Competition 2024 for Students Registration Link 

मराठी विज्ञान परिषद मुंबई 
विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा - २०२४

१) विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा ही महाविद्यालयीन युवकांत संशोधनाची आवड निर्माण होऊन, ती वाढीस लागावी, या उ‌द्देशाने घेतली जाणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी 
(अ) परशुराम बाजी आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार, 
(ब) लीला परशुराम आगाशे विज्ञान संशोधन पुरस्कार आणि 
(क) शरद नाईक विज्ञान संशोधन पुरस्कार, असे प्रत्येकी रु. १५,००० रकमेचे तीन पुरस्कार दिले जातात.

२) या स्पर्धेत महाराष्ट्र व गोवा राज्यातील कोणत्याही महावि‌द्यालयातील विद्यार्थी भाग घेऊ शकतील. तसेच गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील व कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील कोणत्याही महावि‌द्यालयातले वि‌द्यार्थी या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहेत. (या दोन्ही जिल्ह्यांत मराठी विज्ञान परिषदेचे विभाग आहेत.)

हेही वाचाल 

               "विद्यार्थी विज्ञान मंथन" २०२४-२५
    विद्यार्थ्यासाठी घेतली जाणारी सर्वात मोठी विज्ञान प्रज्ञा शोध परीक्षा



३) दिनांक ३१ डिसेंबर २०२४ या तारखेपर्यंत, वयाची २५ वर्षे पूर्ण न करणाऱ्या महावि‌द्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली आहे. महाविद्यालयात कोणत्याही शाखेत पदवी/पदविका परीक्षेसाठी (पदव्युत्तर पदवी नव्हे) शिक्षण घेणारे वि‌द्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. थेट पदव्युत्तर परिक्षेचा अभ्यासक्रम (इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स) स्वीकारलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, पहिल्या तीन वर्षांतील वि‌द्यार्थ्यांनाच या स्पर्धेत भाग घेता येईल.
४) विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या क्षेत्रांशी संबंधित कोणत्याही विषयातील संशोधन प्रकल्प स्पर्धेसाठी पाठवता येईल. नमुन्यादाखल पूर्वीच्या विजेत्या प्रकल्पांची यादी या माहितीपत्रकाच्या शेवटी दिली आहे.
५) मराठी/इंग्रजी/हिंदी यापैकी कोणत्याही भाषेतला प्रकल्प स्पर्धेसाठी स्वीकारार्ह असेल.
६) विजेता प्रकल्प हा तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली केला गेला असल्यास, त्या तज्ज्ञालाही रु. २,००० रकमेचे विशेष पारितोषिक दिले जाईल.
७) स्पर्धेसाठी प्रकल्प पाठवण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर, २०२४ ही आहे.
८) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.
९) एका प्रकल्पात जास्तीत जास्त तीन स्पर्धकांचा समावेश करता येईल. मात्र सर्व स्पर्धक एकाच महाविद्यालयातले हवेत. एकच स्पर्धक एकाहून अधिक प्रकल्पात सहभागी होऊ शकतो.
१०) अर्ज ऑनलाईन भरायचा असून, अर्जाची जोडणी परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
११) अपुरी वा संदिग्ध माहिती भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
१२) अर्ज भरताना आपल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट), पीडीएफ फाईलच्या स्वरूपात संकेतस्थळावर अपलोड करायचा आहेत. सदर फाईल अपलोड करण्याबद्दलची सूचना अर्जातच दिली आहे. या अहवालाची पृष्ठसंख्या, ए४ आकाराच्या तीन पानांपेक्षा अधिक असू नये. तसेच फाईलचा
आकार दोन एमबीपेक्षा अधिक असता कामा नये. १३) प्रकल्प अहवाल पुढील भागांत स्पष्टपणे विभागलेला असावा (क) प्रकल्पाचे शीर्षक, (ख) स्पर्धकांची नावे (ग) मार्गदर्शक असल्यास, मार्गदर्शकाचे नाव, (घ) महावि‌द्यालयाचे नाव, (च) संशोधनामागचा
उद्देश, (छ) संशोधन करताना वापरलेली पद्धत, (ज) संशोधनातून निघालेले निष्कर्ष, (ज) अनुमान. * मार्गदर्शकाचे नाव (मार्गदर्शक असल्यास) प्रकल्प अहवालातील स्पर्धकांच्या नावांत समाविष्ट केले जाऊ नये. मार्गदर्शकाचे नाव प्रकल्प अहवालात स्वतंत्रपणे दर्शवले जावे.
(अर्जाची प्राथमिक छाननी या अहवालावर आधारलेली असल्याने, हा अहवाल अत्यंत काळजीपूर्वक तयार करावा.)
१४) स्पर्धेसाठी आलेल्या प्रकल्पांची प्राथमिक छाननी केली जाऊन, त्यातील मोजके प्रकल्प हे अंतिम सादरीकरणासाठी निवडण्यात येतील. या प्राथमिक छाननीचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर जानेवारी (२०२५) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाहता येईल. अंतिम सादरीकरणासाठी निवड झालेल्या प्रकल्पांशी संबंधित स्पर्धकांना, सादरीकरणाची तारीख वैयक्तिकरीत्या कळवली जाईल.
१५) प्रकल्पांचे अंतिम सादरीकरण हे जानेवारी (२०२५) महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी (२०२५) महिन्याच्या सुरुवातीस मुंबईत आयोजित केले जाईल. सादरीकरणासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांना मराठी विज्ञान परिषदेतर्फे, परिषदेच्या नियमांनुसार जाण्या-येण्याचा खर्च दिला जाईल. सादरीकरणाच्या वेळी सर्व स्पर्धकांना आपले, महावि‌द्यालयाने दिलेले ओळखपत्र आणावे लागेल.
१६) प्रत्येक प्रकल्पाच्या सादरीकरणाचा कालावधी हा जास्तीत जास्त १५ मिनिटांचा असेल. प्रकल्पाचे सादरीकरण हे मराठी/इंग्रजी/हिंदी यापैकी कोणत्याही भाषेत करता येईल. या सादरीकरणानंतर परीक्षकांकडून प्रश्न विचारले जातील.
१७) हे सादरीकरण एकाच स्पर्धकाकडून केले जाईल. परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे मात्र त्या प्रकल्पातील कोणताही स्पर्धक देऊ शकेल.
१८) स्पर्धक वा मार्गदर्शक म्हणून नोंद न झालेल्या कोणाचाही समावेश संशोधक/मार्गदर्शक म्हणून सादरीकरणात करता येणार नाही. श्रेयनामावलीत मात्र स्पर्धक, आपल्या कोणत्याही व कितीही सहकाऱ्यांचा उल्लेख करू शकतील.
१९) प्रकल्पाचे मूल्यमापन करताना लक्षांत घेतल्या जाणाऱ्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत
(क) प्रकल्पातील नावीन्य, (ख) संशोधनामागचा उद्देश, (ग) संशोधनामागच्या संकल्पनेतील सुस्पष्टपणा, (घ) संशोधनात वापरलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना, (च) संशोधन करताना वापरलेली पद्धत (संदर्भ, निरीक्षणे, प्रयत्न, परिश्रम, वगैरे), (छ) निरीक्षणांचा दर्जा, (ज) निरीक्षणांपासून काढलेले निष्कर्ष, (झ) प्रकल्पाची उपयुक्तता, (त) सादरीकरण, इत्यादी.२०) स्पर्धेसाठी आलेल्या एकूण प्रकल्पांची संख्या पुरेशी नसल्यास आणि/किंवा प्रकल्प अपेक्षित दर्जाचे नसल्यास, पारितोषिकांची संख्या कमी केली जाईल.
२१) अंतिम सादरीकरणासाठी तसेच पारितोषिकांसाठी निवडलेल्या संशोधन प्रकल्पांच्या बाबतीत, ती निवड करणाऱ्या तज्ज्ञांचा निर्णय अंतिम राहील. त्या संदर्भात स्पर्धकांच्या बाजूने झालेला, कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार हा अस्वीकारार्ह असेल.
२२) पारितोषिकांचे वितरण परिषदेच्या २०२५ सालच्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस साजऱ्या होणाऱ्या वार्षिकदिनी केले जाईल.
२३) वरील सूचनांमध्ये व्यवस्थापनाच्या दृष्टीने काही बदल करावे लागल्यास, तसे बदल करण्याचा अधिकार मराठी विज्ञान परिषद आपल्याकडे राखून ठेवत आहे.
२४) स्पर्धेसाठी काही अधिक माहिती हवी असल्यास वा अर्ज भरताना काही अडचणी आल्यास

  या इ-पत्त्यावर संपर्क साधावा.
स्पर्धेत विजेते ठरलेले, गेल्या काही वर्षातले प्रकल्प

प्रकल्पाचे अहवालः



१) लोहाच्या ऑक्साइडच्या अतिसूक्ष्मकणांचा, मक्याच्या रोपाच्या वाढीसाठी पोषक पदार्थ म्हणून वापर
२) खुणांच्या भाषेचे, इतरांना समजू शकेल अशा भाषेत रूपांतर करणाऱ्या हातमोज्यांची निर्मिती
३) कचऱ्यातून मिळालेल्या कायटिनच्या वापरा‌द्वारे जमिनीच्या सुपिकतेतील वाढ
४) बाळाला अंगावरचे दूध पाजणाऱ्या मातांसाठी शक्तिपूर्ण न्यूट्रिबारची निर्मिती आणि त्याचे मूल्यमापन
५) आनुवंशिक व्याधींचे शिशुवयातच निदान करण्यासाठी वापरता येणाऱ्या, नखांवर आधारलेल्या पद्धतीचा पडताळा
६) पाण्याचे साठे प्रदूषित करणाऱ्या जड धातूंचा शोध घेण्यासाठी, 'बोंबील' या माशातून मिळवलेल्या
जीवाणूंचा वापर
७) मधुमेह, पंडुरोग आणि उच्च रक्तदाब, या व्याधींच्या निदानासाठी गणिती प्रारूप
८) गायी-गुरांच्या रक्तद्रवातील कॅल्शियमचे प्रमाण शोधणारा चाचणी संच
९) विविध नैसर्गिक स्रोतांपासून व कचऱ्यापासून तयार केलेल्या निर्जतुककांची चाचणी
१०) शेगडीतील वाया जाणाऱ्या उष्णतेपासून विजेची निर्मिती
११) वर्मिवॉशमधील, वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणारे जीवाणू वेगळे करण्याच्या पद्धतीचा वापर
१२) इलेक्ट्रोफोरेसिसच्या तंत्राने वेगळे केलेल्या प्रथिनांच्या अभिरंजनाची नवी पद्धत
१३) अँड्रॉइड प्रणालीद्वारे नियंत्रित करता येणारे स्वच्छता यंत्र
१४) साबुदाणा आणि राखेपासून तयार केलेले, पॉलिथिनला पर्याय ठरणारे जैविक-प्लास्टिक १५) हृदयातून येणाऱ्या विविध आवाजांची नोंद करणारे साधन
१६) साखरेच्या कारखान्यात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे उत्प्रेरकाच्या मदतीने नैसर्गिक सूर्यप्रकाशाद्वारे विघटन
१७) शेंगदाण्यांच्या टरफलांतून सेल्यूलोज निष्कर्षण आणि जैविक इंधनाची निर्मिती
१८) यीस्ट या जीवाणूंतील मॅनन या पिष्टमय पदार्थाचा अभ्यास
१९) विविध झाडांपासून उत्सर्जित केल्या गेलेल्या जैवरसायनांचा मुगाच्या वाढीवर होणारा परिणाम
२०) पिझोइलेक्ट्रिक फलाटाचा विद्युतनिर्मितीसाठी उपयोग
२१) प्लास्टीक नष्ट करू शकणारे सूक्ष्मजीव मातीतून वेगळे करण्याची क्रिया


Circular pdf Copy Link 


विद्यार्थ्यांनी खालील ओळीला स्पर्श करून आपली नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी 

Science Research Award Competition 2024 for Students Registration Link 


मराठी विज्ञान परिषद मुंबई 
🌐 संकेतस्थळ: 


विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा - २०२४


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon