Generating Students APAAR ID from U DIDE Plus System MPSP Guidelines
MPSP Guidelines for Generating Student's APAAR ID from U-DICE Plus System.
दिनांक : 25 SEP 2024
विषयः यु-डायस प्लस प्रणालीमधून विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना.
संदर्भ : भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४ रोजीचे पत्र.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये केंद्र शासनाकडून राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी तयार करून घेण्याकरिता कळविले आहे. APAAR आयडी तयार करण्यासाठी केंद्र शासनाने यु-डायस प्रणालीच्या विद्यार्थी प्रणालीमध्ये (SDMIS) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालावधीमध्ये प्रथम प्राधान्याने इयत्ता ९वी ते इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भिय पत्रात नमूद आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमधून APAAR आयडी तयार करण्यासाठी राज्य कार्यालयाकडून पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहे.
APAAR आयडी उपयोगिता :-
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
APAAR आयडी हा १२ अंकी असून एकमेव असणार आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत कार्यान्वित असणार आहे.
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार Validation झाले आहे त्याच विद्यार्थ्यांचे APAAR आयडी Generate होतील.
APAAR आयडीमुळे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा, प्रगती अहवाल, शाळाबाह्य मुलांचा (OOSC) मागोवा घेणे, गळतीचे प्रमाण कमी करण्यात मदत करणे, इ. बाबीं डिजिटल नियंत्रित करण्यात येतील.
APAAR आयडी तयार झाल्यानंतर Digi locker ला जोडण्यात येणार आहे. Digi locker ला जोडल्यामुळे विद्यार्थ्यांने शिक्षण क्षेत्रामध्ये साध्य केलेले लक्ष्य, इयत्ता १०वी व १२वी बोर्ड परीक्षेचे निकाल, holistic report card and extracurricular accomplishments ऑनलाईन पध्दतीने बघता येईल.
Also Read -
डिजिलॉकर खाते कसे तयार करावे आणि कसे वापरावे
How to Create a DigiLocker Account And Use
APAAR आयडी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रेकॉर्ड एका शाळेतून दुसऱ्या शाळेत इतर जिल्हा व राज्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने पाठविणे सुलभ होईल.
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी विद्या समिक्षा केंद्रामध्ये जोडण्यात येणार असून त्या माहितीवर Graphical Analysis करण्यात येईल व प्रगती करण्याच्या अनुषंगाने नवीन उपक्रम राबविण्यात येतील.
जबाबदारी :-
महाराष्ट्र राज्याकरिता राज्यस्तरावरून राज्य प्रकल्प संचालक समग्र शिक्षा महाराष्ट्र राज्य हे Nodal Officer असणार आहेत.
APAAR आयडी तयार करण्याबाबत राज्यस्तरावरील MIS-Coordinator, जिल्हा स्तरावरील Coordinator यांचे APAAR आयडी Creation बाबतचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
शाळा स्तरावर APAAR आयडी Create करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी Parent Teacher Meeting आयोजित करून Consent by Father/Mother/Legal Guardian of Student for APPR ID Generation हा फार्म भरून घेवून पुढील कार्यवाही करावी. याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना
👆 या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
यु-डायस प्लस प्रणाली व विद्या समिक्षा केंद्रामार्फत राज्यामध्ये APAAR आयडी तयार करणे व व्यवस्थापन करणे याकरिता सहकार्य करण्यात येणार आहे.
APAAR आयडी तयार करणे व वापर करण्याबाबत राज्य व जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देऊन सर्वांना APAAR आयडीबाबत संकेत स्थळावरून माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने APAAR आयडी संदर्भात किंवा तांत्रिक सहाय्य मिळण्यासाठी
👆 या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
हे पोर्टल विकसित केले आहे व १८००-८८९-३५११ हा टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सोबत : केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले संदर्भिय पत्र.
APAAR Parental Consent Form (Marathi)
APAAR Important Information (Marathi)
Circular pdf Copy Link
(आर. विमला, भा.प्र.से.)
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प.,
मुंबई.
💳 Dise Plus मध्ये विद्यार्थ्याचा APAAR ID तयार करा* मराठी मध्ये मार्गदर्शक व्हिडिओ
अगदी सहज सोपे
👁👇👁मार्गदर्शक व्हिडिओ नक्की बघा
प्रत : माहितीस्तव सविनय सादर, मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रत : उचित कार्यवाहीस्तव -
१) मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
५) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
६) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व.
७) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व).
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व किडा विभाग
समग्र शिक्षा
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४-२५/२४४।
प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon