DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

VSK Smart Attendance Swift Chat LinK


महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई 
(MPSP, Mumbai)
अंतर्गत विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे
Attendance Bot बाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या समस्यांची उत्तरे

सध्या स्मार्ट उपस्थिती या Bot मध्ये मागील वर्षाचे विद्यार्थी दिसत आहेत
👉विद्यार्थी Swiftchat वर Promote झालेले दिसत नाहीत

👉 Swift Chat App Login तांत्रिक अडचण
या आणि अशा प्रकारच्या इतर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 👉 या ओळीला स्पर्श करून प्राप्त करता येतील 

विद्यार्थांची उपस्थिती / हजेरी नोंदविण्यासाठी स्विफ्टचॅट ॲप्सवर शिक्षकांनी नोंदणी कशी करावी


विद्या समीक्षा केंद्र,
SCERT, महाराष्ट्र, पुणे


महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 

दिनांक: ०१/०७/२०२४

जा.क्र. राशसंप्रपन/आय.टी./VSK/आदेश/२०२४-२५/०३१८८

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व
२. शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.), जि. प. सर्व
३. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा. सर्व
४. शिक्षण निरीक्षण, मुंबई (पश्चिम, उत्तर व दक्षिण)

विषय : विद्या समीक्षा केंद्रांतर्गत स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नॉदविणेबाबत...

VSK Smart Attendance Swift Chat Application

संदर्भ : १) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र.मप्राशिप /सशि/संगणक / VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३ नोव्हेंबर २०२३

२) शासन निर्णय क्र. समग्र २०२४/प्र.क्र. ३३/ एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांकः १२ मार्च, २०२४.

उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.

संदर्भ क्र. १ अन्वये, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात आलेली होती, परंतु जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेणे, तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून आली आहे.

विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

संदर्भ क्र. २ च्या शासन निर्णयानुसार, सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी आपल्या अधिनस्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर

विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी आदेशित करावे. तसेच सदर उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत आपल्या स्तरावरून आढावा घेण्यात यावा.

सोबत : मार्गदर्शक सूचना
👇👇👇👇👇


राहूल रेखावार भा.प्र.से.

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२. मा. आयुक्त, शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

३. मा. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

प्रत कार्यवाहीस्तव :

१. मा. आयुक्त, मनपा, सर्व

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सर्व

३. शिक्षण संचालक (प्राथ. व माध्य.), शिक्षण संचालनालय, पुणे


विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती - मार्गदर्शक सूचना

१. Google play store वरून Swift Chat हे Application download करावे.

२. यापूर्वी प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी नोंदवावी.

३. उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा.

४. सर्व शिक्षकांनी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.

५. सद्यस्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ आय. डी. उपलब्ध असलेल्या शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. सेवार्थ व इतर प्रणालीमध्ये वेतन असणाऱ्या शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर उपस्थिती नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.

६. एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.

७. काही शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय. डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी.

८. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ पोर्टल, सरल पोर्टल व यु- डायस या सर्व पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर सर्व पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

९. या Attendance Bot (चॅटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी.

१०. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून
कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती स्मार्ट उपस्थिती या Bot वर नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.

११. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी 
👇
👆
 या लिंकवर सादर कराव्यात.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon