DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

UDISE PEN Number Necessary On TC


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग 
समग्र शिक्षा
निपुण भारत
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई

जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/२०२४-२५/११४८

दिनांक : 04 JUL 2024

प्रति,
१) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.

विषयः सन २०२४-२५ यु-डायस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थी कमी करण्याच्या अनुषंगाने शाळांना देण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना.

महोदय,
सन २०२४-२५ यु-डायस प्लस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही शाळास्तरावरून सुरू आहे. विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करीत असताना शाळा सोडून गेलेले विद्यार्थी Dropbox मध्ये जातात, जेणेकरून ज्या शाळेत प्रवेश घेतलेला आहे त्या शाळेला विद्यार्थी Import करणे सोयीचे होईल. यु-डायस प्लस प्रणालीमधील दि. ०४ जुलै, २०२४ रोजीच्या अहवालानुसार ३१,९६,७८६ एवढे विद्यार्थी Dropbox मध्ये Import करण्यासाठी उपलब्ध आहेत.

Dropbox मधील विद्यार्थी कमी करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी शाळा सोडून जात असल्यास, विद्यार्थ्यांना Living Certificate/Transfer Certificate वर शाळेचा यु-डायस क्रमांक व Permanent Education Number (PEN) नोंदवावा, जेणे करून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांला शाळेत प्रवेश दिल्यानंतर यु-डायस प्लस प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या टी सी वर यु-डायस नंबर व पेन नंबर लिहिणे आवश्यक
Import करताना अडचण येणार नाही. तरी आपल्या स्तरावरून Dropbox शून्य करण्यासाठी योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.

सोबत : Dropbox Report.

(प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से.) 
राज्य प्रकल्प संचालक, म.प्रा.शि.प., मुंबई.

प्रत : माहितीस्तव सविनय सादर,
१) मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२) मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत : उचित कार्यवाहीस्तव - -
१) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
२) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
४) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व उच्च माध्यमिक), जिल्हा परिषद, सर्व.
५) शिक्षणाधिकारी/प्रशासनाधिकारी, महानगरपालिका, सर्व.
६) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती (सर्व).
UDISE And PEN Number Necessary On TC of students
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon