DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Shikshan Saptah Celebration Upkram SCERT


Shikshan Saptah Sajra Upkram  tracker upload Link


Shikshan Saptah Sajra Upkram Link 

Celebration of Education Week

Celebration of “Shikshan Saptah” from 22nd to 28th July, 2024 on the eve of 4th anniversary of National Education Policy (NEP) 2020

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
शिक्षण सप्ताह

विषय : "शिक्षण सप्ताह" साजरा करणे बाबत.. दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४

संदर्भ: १. मा. सचिव, भारत सरकार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.D.O. No. ०२-०५/२०२४-IS.१४, दिनांक ०९ जुलै, २०२४. २. मा. उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२२८/ एस.डी. ४, दिनांक १२ जुलै, २०२४

हे ही वाचा 👇 
महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत,
पुणे
क्र.प्राशिसं/८०२/संकीर्ण/शिक्षण सप्ताह /२०२४
दिनांक- १९/०७/२०२४

प्रति,
विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व जिल्हे) प्रशासन अधिकारी, मनपा/नपा/नप (सर्व)

विषयः- राज्यात दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत... या अंतर्गत Eco Clubs for Mission Life/School Nutrition Day साजरा करणेबाबतच्या सविस्तर सूचना.........

उपक्रमाच्या अनुषंगाने-

१. जिओटॅग केलेले फोटो अपलोड करणे शाळांनी वक्षारोपण मोहिमेचे जिओटॅग केलेले फोटो, सहभागी विद्यार्थी आणि लावलेल्या रोपांची संख्या शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, भारत सरकार यांच्या खालील गुगल ट्रॅकर लिंकवर अपलोड करावेत.

शिक्षण सप्ताह, बाबतचा अहवाल/ फोटो व व्हिडिओ सादर करण्याबाबतची लिंक आता प्राप्त झालेली आहे 

मार्गदर्शक व्हिडिओ पहा

Gateway to Shiksha Saptah events media submission 

सर्व शाळांनी यावर दिनांक निहाय माहिती न चुकता भरावी👇👇

👆
संदर्भ :- 
१) उप सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कडील कार्यालयीन पत्र जा.क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र. २२८/एस. डी.४, दिनांक-१२ जुलै, २०२४
२) मा. प्रधान सचिव, यांचे कडील कार्यालयीन पत्र जा.क्र. बैठक-२०२४/प्र.क्र. १६६/एस. डी.४, दिनांक-१६ जुलै, २०२४
३) मा. आयुक्त (शिक्षण) पुणे, यांच पत्र शिआ/२०२४/संकीर्ण/आस्था-क-माध्य/२०२४/ ४३९१, दि १६.०७.२०२४
४) मा. संचालक, राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट, पुणे यांचे पत्र क्र रा. शै. सं.प्र.प.म./NEP/शिक्षा सप्ताह/२०२४-२५/०३४५५ दिनांक १६.०७२०२४
५) या कार्यालयाचे समक्रमांक जा.क्र. प्राशिसं८०२/ संकीर्ण / शिक्षण सप्ताह४९१९/२०२४. दि १६.०७.२०२४
६) केंद्र सरकार, नवी दिल्ली (शिक्षण व साक्षरता विभाग) यांच्या सविस्तर सूचना (Concept Note) 
७) केंद्र सरकार, नवी दिल्ली (शिक्षण व साक्षरता विभाग) यांच्या दिनांक १८.०७.२०२४ च्या व्हिसीमधील दिलेल्या सूचना

उपरोक्त विषयाबाबतची संदर्भ क्र १ ते ६ ची पत्रे पहावीत व अभ्यासावित. (प्रत संलग्न)

संदर्भ क्र. १ ते ६ पत्रात नमूद केल्याप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत पत्रान्वये कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.
अ.क्र.
दिनांक
उपक्रम
शिक्षण सप्ताहामध्ये खालील प्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.

संपूर्ण परिपत्रक वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण२०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्र. १ नुसार कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.

शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम रावण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.

अनु. क्र दिनांक                          उपक्रम

१ सोमवार, दि. २२ जुलै, २०२४  अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day) (परिशिष्ट १)

मार्गदर्शक व्हिडिओ नक्की बघा फक्त या ओळीला स्पर्श करा 

२ मंगळवार, दि.२३ जुलै, २०२४  मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day) (परिशिष्ट २)
मार्गदर्शक व्हिडिओ नक्की बघा फक्त या ओळीला स्पर्श करा 


३ बुधवार, दि. २४ जुलै, २०२४ क्रीडा दिवस (Sports Day) (परिशिष्ट ३)

मार्गदर्शक व्हिडिओ नक्की बघा फक्त या ओळीला स्पर्श करा 


४ गुरुवार, दि. २५ जुलै, २०२४ सांस्कृतिक दिवस (Cultural Day) (परिशिष्ट ४)
या दिवसाच व्हिडिओ नक्की बघा फक्त या ओळीला स्पर्श करा 

मार्गदर्शक व्हिडिओ नक्की बघा फक्त या ओळीला स्पर्श करा 

५ शुक्रवार, दि. २६ जुलै, २०२४ कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day) (परिशिष्ट-५अ ४५व)

६ शनिवार, दि.२७ जुलै, २०२४ मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम / शालेय पोषण दिवस (Eco Clubs for Mission LIFE/ School Nutrition Day) (परिशिष्ट ६)

७ रविवार, दि. २८ जुलै, २०२४ समुदाय सहभाग दिवस (Community involvement Day) (परिशिष्ट ७)

संदर्भ क्र. १ तसेच सोबतच्या परिशिष्ट १ ते ७ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षण सप्ताहामधील उपरोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करावी.

शिक्षण सप्ताहादरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती Tracker वर upload करणेबाबत दिलेल्या विहीत नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी व मा. आयुक्त (शिक्षण) यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी.

(राहूल रेखावार)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र, पुणे.

सोबत : सदरचे परिपत्रक व सोबतचे उपक्रम माहिती पुस्तिका आपल्याला पीडीएफ मध्ये हवी असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 


परिशिष्ट क्र. १ अध्यापन-अध्ययन साहित्य (TLI 1) दिन
दिवस पहिला सोमवार दि. 22 जुलै, 2024

प्रस्तुत दिन साजरा करण्यासाठी आणि त्यानुषंगाने वर्गनिहाय उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना/तत्त्वेः

3.1 माध्यमिक स्तर (इयत्ता 11 वी आणि 12 वी):

1. घोपवाक्ये असलेले पोस्टर्सः "पाणी कसे वाचवायचे" आणि "इतरांना कशी मदत करावी" यासारख्या विषयावर आधारित पोस्टर्स बनविणे. या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

2. कोडी: विज्ञान आणि गणित या विषयांवर अधिक लक्ष केंद्रित असणारी कोडी तयार करायला सांगणे.

गणित या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

विज्ञान या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

3. खेळ (मैदानी/शारीरिक आणि डिजिटल स्वरूपाचे): सामाजिक शास्त्रे, विज्ञान, गणित आणि भाषां इत्यादी विषयांशी संबंधित खेळांचे आयोजन करणे. 

⏩ खेळ या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

4. त्रिमितीय प्रतिकृती (मॉडेल्स): ऐतिहासिक वास्तू, शारीरिक रचना किंवा भौमितिक आकारांचे त्रिमितीय मॉडेल तयार करण्यासाठी माती किंवा पेपर-मॅचे (कागदी लगदा) यासारख्या नैसर्गिक साहित्याचा वापर करणे.

5. बोर्ड गेम्स (पटावरील खेळ): अध्ययन निष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने फॅन्त्रिक किंवा कार्डबोर्डवर (कापड किंवा पुठ्यावर) खेळ विकसित करून शिकण्याच्या उद्देशांसह पटावरील खेळ तयार करणे.

6. भिंतीवरील तक्तेः महत्वाच्या संकल्पना किंवा ऐतिहासिक कालखंड/सनावळ्या सारांशित करणारे तक्ते तयार करण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे किंवा कापड वापरणे.

7. वाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.

⏩ वाचन क्लब स्थापन करणे या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

3.2 पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक स्तर (इयत्ता 6 वी आणि 10 वी): 1. कोडी आणि आव्हानात्मक कार्ड तयार करणे.

2. खेळः ल्युडो सारखे इतर खेळ तयार करणे.

3. खेळणीः कागद आणि वांबूच्या कांड्या यासारख्या किंवा तत्सम प्रकारच्या स्थानिक साहित्यापासून खेळणी बनविणे.

4. कठपुतळी/बाहुलीनाट्यः कपडे आणि टाकाऊ वस्तूंनी कठपुतळी किंवा बाहुली बनविणे.

5. गोष्टीचे कार्डस (Story Cards): पाच ते सहा स्व-स्पष्टीकरणात्मक गोष्टींचे कार्डस तयार

6. तक्ते बनविणेः "अन्न आणि भाजीपाला", "स्थानिक जारपेठ", "माझे कुटुंब" इत्यादी

विषयावर आधारित तक्ते बनविणे करणे.

7. वाचन कट्टा (क्लब): वाचन संस्कृती विकसित होण्यासाठी वाचन क्लब स्थापन करणे.

1. तक्ते बनविणेः "अन्न आणि भाजीपाला", "स्थानिक बाजारपेठ", "माझे कुटुंब" इत्यादी विषयाचे तक्ते बनविणे.

3.3 पूर्वतयारी स्तर (इयत्ता 3 री ते 5 वी):

2. रंगीत पेटी घन आणि आयताकृती पेटीच्या बाजूला रंगीत कागद चिकटवून मुले अशा पेट्या तयार करू शकतात.

3. काउंमः फळे, भाज्या, प्राणी इत्यादींचे कार्ड बनवणे.

4. मुखवटेः प्राणी, पक्षी इत्यादींचे मुखवटे बनवणे.

5. वाचन कट्टा आणि कथाकथन सत्र यांचे आयोजन करणे.

3.4 पायाभूत स्तर (अंगणवाडी / बालवाडी (वय वर्ष 3 ते 6) आणि इयत्ता 1 ली व 2 री):

1. आपणास उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्य पेट्या उदा. PSE Kit, महाराष्ट्राचा जादुई पिटारा, भाषा व गणित पेटी, इंग्रजी साहित्य पेटी (ELCRLM) तमेच इतर साहित्याच्या माध्यमातून कृती घ्याव्यात.

2. पालक व शिक्षक यांच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या छोट्या नाटिकांचे वैयक्तिक अथवा गटामध्ये सादरीकरण घ्यावे.

3. विविध माध्यमांच्या सहाय्याने ठसेकाम करून घ्यावे. उदा. पाणी, फुले, भाज्या, बोटांचे व हातांचे ठसे याप्रमाणे वैविध्यपूर्ण साहित्याचे ठसे घेता येतील. 4. पालक/शिक्षक/विद्यार्थी यांच्या माध्यमातून लोकगीते, लोकनृत्य, लोकसंगीत यांचे सादरीकरण घ्यावे.

5. गोष्टींचा कट्टा बालकांना स्थानिक व वैविध्यपूर्ण गोष्टी सांगण्यासाठी पालकांना शाळेत निमंत्रित करण्यात यावे.

प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM DAY) साजरा करणे विषयी मार्गदर्शक सूचना शाळेत वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्यांचे स्टॉल म्हणून प्रदर्शन भरवावे. या प्रदर्शनामध्ये पुढील प्रमाणे स्टॉल्स मांडावेत.

1. वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल्स वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य दर्शविणारे स्वतंत्र स्टॉल्स मांडण्यात यावेत. प्रत्येक स्टॉलला आकर्षक नावे द्यावीत. उदा. विविध भित्तीपत्रके असलेल्या स्टॉलला "चला शिकूया भित्तिपत्रकातून" तर गोष्टीच्या स्टॉलला, "चला गोष्टी ऐकूया", कठपुतळी किंवा पपेटच्या स्टॉलला "जर खेळणी बोलू लागली तर" अशी वैविध्यपूर्ण नावे द्यावीत.

2. शायरी बनवलेले शैक्षणिक साहित्य आशय शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी उपयुक्त असणारे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध शैक्षणिक साहित्य यांचे प्रदर्शन भरवावे.

3. संगीतमय शैक्षणिक साहित्य या स्टॉलवर शिक्षक व विद्यार्थी यांनी गाणी व संगीत वाद्ये यांचा अध्ययन - अध्यापनात प्रभावी वापर होण्याच्या दृष्टीने दिग्दर्शन करावे.

4. हस्तलिखितांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या गोष्टी व कविता प्रदर्शित कराव्यात.

5. शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन विविध विषयाच्या अनुषंगाने प्रतिकृती, चार्ट्स, फ्लॅश कार्ड,
तरंगचित्र, वाहुल्या अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य तयार करून प्रदर्शनात मांडावे.

6. दिग्दर्शन वर्ग - जवळची अध्यापक विद्यालये अथवा अध्यापक महाविद्यालये येथील छात्राध्यापकांच्या मदतीने नाविन्यपूर्ण अशा शैक्षणिक साहित्याच्या साहाय्याने असे वर्ग घ्यावेत अथवा त्यांना तसे स्टॉल लावण्याची संधी द्यावी.
परिशिष्ट क्र.२
शिक्षा सप्ताह दिवस दुसरा
मंगळवार दि.२३ जुलै २०२४

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान :

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्राथमिक स्तरावर सन २०२७ पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. सदर धोरणातील महत्वपूर्ण कार्यनिती पुढीलप्रमाणेः

१) पूर्व बाल्यावस्थेतील संगोपन व शिक्षण (ECCE) याला प्राधान्यक्रम

२) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या राष्ट्रीय अभियानाची निपुण भारत अभियान म्हणून अंमलबजावणी (शासननिर्णय २७ ऑक्टोबर २०२१)

३) उच्च दर्जाच्या वैविध्यपूर्ण अध्ययन व अध्यापन साहित्य चे विकसन

४) पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान गतिमान करण्यासाठी नियमित मूल्यांकन

५) बालकांच्या घरातील अध्ययनाकरिता पालकांचा व समुदायाचा सक्रीय सहभाग

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाचे महत्व

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता २ री च्या अखेरीस आकलनासह वाचन व मुलभूत गणितीय क्रिया करण्याची क्षमता प्राप्त करणे होय. संबंधित कौशल्ये ही पुढील बाबीच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतात.

बोधात्मक विकास व सर्व अध्ययन क्षमतांचे विकसन

अध्ययनासाठी सकारात्मक दृष्टीकोन व आत्मविश्वास निर्मिती

समतामूलक शिक्षणाची खात्री व अध्ययन अंतर कमी करणे.

शिक्षणाच्या विविध स्तरावर विद्यार्थ्यांना प्रगती करण्यासाठी सक्षम करणे

IT सप्ताहाचा दुसरा दिवस हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा.

उदिष्टे : 

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या दृष्टीने जाणीव जागृती निर्माण करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक यशस्वी उपक्रम व कृती कार्यक्रम यांचे प्रदर्शन करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अनुषंगिक उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाण- घेवाण करणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये शिक्षण तज्ञ, पालक व समुदाय यांचा सक्रीय सहभाग घेणे.

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवसाकरीता आयोजित करावयाचे उपक्रम :

कार्यशाळा व परिसंवाद आयोजन: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्ययनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाच्या संदर्भाने शाळेमध्ये शिक्षकांनी कार्यशाळा / परिसंवाद यासारख्या आंतरक्रियात्मक सत्राचे आयोजन करावे. बालकांसाठी आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन :

1. शालेय परिपाठादरम्यान निपुण प्रतिज्ञा घेण्यात यावी. 

NIPUN PRATIGYA
  निपुण प्रतिज्ञा

आम्ही प्रतिज्ञा करती की, आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहीत.
आपण सारे मिळून, आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी, अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी, मुक्त छंद जीपासणारी, नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया.. आपण सारे मिळून अशी शाळा आणि घर बनवूया.. जिथे बालके अर्थपूर्ण वाचन, हेतुपूरक लेखन व गणिती व्यवहार प्रत्यक्ष जीवनात उतरवतील आणि आयुष्यभर विद्यार्थी राहतील...
अशाप्रकारे, महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन 'निपुण बालक' घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत.


TAKING OF NIPUN PLEDGE / NIPUN ANTHEM VIDEO LINK


२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान संबंधित कौशल्याच्या विकसनाकरिता राज्याद्वारे विकसित व वितरीत करण्यात आलेल्या भाषिक खेळ पुस्तिका (मराठी, इंग्रजी, उर्दू) व जादुई गणित यामध्ये दिलेले भाषिक व गणितीय खेळ घेतले जावू शकतात. शाळेच्या सकाळच्या सत्रातील ३० मिनिटे भाषेचे तसेच ३० मिनिटे गणिताचे खेळ घेतले जावू शकतात.

३. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता कथाकथनाचे व गणित तज्ञाच्या गोष्टीचे सत्र आयोजित करता येतील व संख्याज्ञानाची आवड निर्माण करण्याकरिता शालेय स्तरावर गणित अभ्यास मंडळ तयार करता येईल.

४. जादुई पिटारा/PSE कीट : शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले PSE कीट / महाराष्ट्र शासनाचा जादुई पिटारा यामधील साहित्याच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक स्तरावर लेखनपूर्व व गणनपूर्व कृती करून घेण्यात याव्यात.

जादुई पिटारा या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा 

५. वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता गोष्टीचा शनिवार या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावरील संपर्क अधिकारी (नोडल अधिकारी) हे शास्त्रीय पद्धतीने कथाकथन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारे सत्र घेवू शकतात.

६. विद्यार्थ्याना वर्गात, शाळेमध्ये समुदायाद्वारे विविध गोष्टीचे ऐकवाव्यात तसेच त्याचे वाचन करावयास लावावे व विद्यार्थ्यांना त्या गोष्टीवर आधारित्त. विविध प्रकारे अभिव्यक्त होण्यास प्रोत्साहन देता येईल.

७. राज्याद्वारे पुरविण्यात आलेल्या विविध अध्ययन साहित्याच्या माध्यमातून (जादुई पिटारा. पीएसइ संच) खेळाधारित अध्ययन / उपक्रम घेण्यात यावे तसेच बाहुलीनाट्याचे सत्र आयोजित करता येईल.

८. शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित भूमिका अभिनय, नृत्याचे कार्यक्रम तसेच मुळाक्षराची व अंकांची गाणी, विविध मुळाक्षराच्या व भौमितिक आकृत्याच्या रांगोळ्या, भाषा व गणित विषयातील संकल्पनेवर आधारित वर्ग सजावटी, पोस्टर निर्मिती यासारख्या कला व हस्तकौशल्य निगडीत कृतीचे प्रदर्शन भरविण्यात यावे व याबाबत पालकांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कला व हस्तकौशल्याचा समावेश का करण्यात आला आहे या संदर्भाने जाणीव जागृती करता येवू शकते.

९. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याची उदिष्टे, महत्व व जाणीव जागृती या अनुषंगाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या चित्र फितीचे प्रक्षेपण करण्यात यावे.

Foundational Literacy and Numeracy (FLN) 1


Foundational Literacy and Numeracy (FLN) - 2



१०. शाळेमधील ग्रंथालयातील पुस्तके स्तरनिहाय विद्यार्थ्यांना देण्यात यावीत व शाळेच्या सकाळच्या सत्रामध्ये घड्याळी एक तास वाचन तासिका घेण्यात यावी.

११. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या संदर्भाने निर्माण केलेले साहित्य व तदनुषंगिक बाबीच्या साह्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.

१२. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या अभियानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी निपुणोस्तव कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रस्तुत कार्यालयातील गणित या विभागामार्फत दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र यामधील उपक्रमांचा देखील समावेश करता येईल.

समुदायाचा सहभाग :- शाळांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले माता पालक गटांचा शाळेतील सदर उपक्रमात सक्रीय सहभाग घेण्यात यावा .

- उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक ८,११ यामध्ये नमूद बाबीनुसार उपक्रमाचे आयोजन करून पालक व समुदायाचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा

पुढील उपक्रम दिवस निहाय याच ठिकाणी अद्यावत केले जातील त्यामुळे आपण दिवस निहाय उपक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी भेट द्यावी

परिशिष्ट क्र.३
शिक्षा सप्ताह दिवस तिसरा शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव
बुधवार दि.२४ जुलै २०२४
क्रीडा दिन 
Shiksha Saptah: A Celebration of Educational Excellence
Sports Day: Day 3 - 24th July 2024

नवीन राष्ट्रीय धोरण (NEP 2020) गध्ये खेळांना शालेय अभ्यासक्रम व क्रीडा आधारित अध्ययन याचा माहत्यपूर्ण भाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नवीन राष्ट्रीय धोरणारा स्वदेशी खेळांना अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. या खेळांच्या गाध्यमातून देशाची संस्कृती, लोककला यांचा परिचय उत्तम रितीने होऊ शकतो असे या धोरणात अधोरेखित करण्यात आले आहे.
या अनुषंगाने केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील शालेय शिक्षण व शाक्षरता विभागाने २१ ऑगस्ट २०२३ रोजी मार्गदर्शक सूचनां विकसित केल्या आहेत.

उद्दिष्ट्ये:- 
विद्यार्थ्यांच्या पायाभूत अवरथेपासूनच खेळ आणि फिटनेसचे महत्त्व पटवून देणे यासाठी-
१. खेळ आणि तंदुरुस्तीच्या महत्त्वावद्दल जागरुकता वाढविणे.
२. समकालीन खेळांच्या समांतर देशी खेळांना प्रोत्साहन देणे.
३. तरुणांच्या मनात सांघिक भावना आणि शिस्तीची भावना जागृत करणे.
४. राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे
५. खेळ हा विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे.
६. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. (विशेषतः
भारताचे स्वदेशी खेळ)
७. विद्यार्थ्यांमध्ये अभिमान, खिलाडूवृत्ती आणि नैतिक वर्तनाची राकारात्मक वृत्ती विकसित करणे
८. विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक दृष्ट्या तंदुरुस्त बनवणे.
९. विविध सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींना एका सामायिक व्यासपीठावर एकत्र आणून विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना वाढवणे.
१०. खेळातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व नैतिक मूल्ये रुजविणे.
शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हंटले आहे. या अनुषंगाने पुढील गार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.
> शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील १ ते २ तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे.
> इयत्ता १ ली ते ५ वी साठी सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या अश्या प्रकारचे खेळ घ्यावेत.
> इयत्ता ६ वी ते १२ वी साठी बुद्धिबळ, सारीपाट, खो-खो, कबड्डी, विटी दांडू, भालाफेक, मल्लखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, ३ पायांची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझीम, हे खेळ घ्यावेत
> तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या ७५ स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी.
> शक्य झाल्यास स्थानिक खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा, खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा.
> स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी.
> पालक आणि नागरी समाज संस्था यांचे मदत्त घेण्यात यावी.
> सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समवेश करण्यात यावा.
अपेक्षित परिणाम:-
अपेक्षित परिणामः-
विद्यार्थी आणि समाज यांच्यात खेळाच्या महत्त्वाविषयी अधिक चांगली समज निर्माण होईल.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खेळाची भावना विकसित होईल.
वर्गाबाहेरील शिक्षणाचा अनुभव येईल.
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती, निष्पक्षता, संघकार्य आणि एकता ही मूल्ये रुजविली जातील.

परिशिष्ट-४
शिक्षा सप्ताह: शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव दिवस चवथा
गुरुवार दि. २५ जुलै २०२४
सर्व शाळांमध्ये २५ जुलै २०२४ रोजी सांस्कृतिक दिन साजरा करणे.

NEP २०२० मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आली आहे. २२-२८ जुलै २०२४ दरम्यान शिक्षा सप्ताहाचा चौथा दिवस म्हणजेच दि. २५ जुलै २०२४ रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा. हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा. सांस्कृतिक दिनाची उद्दिष्टे
१. सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता, जागतिक जागरुकता, परस्पर आदर, सर्जनशीलता, अंतर्दृष्टी आणि सामुदायिक भावनेच्या प्रचार करणे..
२. कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक बनविणे.
३. शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे.
हा उपक्रम सुसंवाद आणणे, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे, विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे, अभिव्यक्तीला चालना देणे, सौहार्दपूर्ण वातावरणास प्रोत्साहन देणे आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल.
त्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करावा.
> शाळांमध्ये विविध भाषा, वेशभूषा, खाद्यपदार्थ, कला, वास्तुकला, स्थानिक खेळ, चित्रकला,
नृत्य, गाणी, नाट्य, लोक आणि पारंपारिक कला, पथनाट्य (नुक्कड नाटक), कठपुतळीचे
कार्यक्रम, कथा-कथन यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. > लोक, प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम, सामुदायिक गायन, लोकनृत्य, शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इ. कलाप्रकारांतून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे.
> स्थानिक आणि पारंपारिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे. किंवा शाळा स्थानिक कलाकार/कारागीर आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटींचे आयोजन देखील करू शकतात.
> संपूर्ण शाळेत पेंटिंग डे' किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे. जेथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमांसह काम करण्याचा आनंद घेऊ शकतात.
> सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात. स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बाल भवन आणि बाल केंद्र, पुरातत्व स्थळे, विविध प्रकारची संग्रहालये इत्यादींचे सहकार्य घेण्यात यावे.
उत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे
१. राज्य/संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबवले जातील. तथापि, अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा.
२. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण, सर्जनशील असावा
३. सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे
४. विशेष गरजा असलेल्या मुलांचा (CWSN) सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात यावी.
परिशिष्ट क्र. ५ अ
शिक्षण सप्ताह
दिवस पाचवा
शुक्रवार दि. २६ जुलै २०२४
कौशल्य दिवस
सक्षम आणि स्पर्धात्मक कार्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य शिक्षण
प्रस्तावना
शिक्षणाबद्दल जागृती व महत्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षा सप्ताह हा कार्यक्रम या वर्षी भारतात साजरा करण्यात येत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रम घ्यावयाचे आहे. या उपक्रमांतर्गत एक दिवस कौशल्य आणि डीजीटल शिक्षण यांतर्गत विविध उपक्रमाद्वारे २१ व्या शतकातील क्षमता व कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये साध्य करून त्यांना सक्षम करू शकतो.
कौशल्य शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यामध्ये रोजगारक्षमता वाढते, व्यक्तिमत्व विकास होतो व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यामध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रमामुळे त्यांना नेमके काय करायचे आहे याची दिशा मिळते, त्यांच्या करिअर मध्ये प्रगती करण्यास सहाय्य मिळते, उद्योजकीय कौशल्य निर्माण होऊन रोजगार निर्मिती करता येते. यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी योगदान देऊ शकतो. विद्यार्थ्यांमधील क्षमता व आवडीनुसार त्यांच्यामध्ये कौशल्य निर्मिती केल्यास व्यवसाय शिक्षणाचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य होऊ शकतात.
पार्श्वभूमी



महाराष्ट्र शासन 
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, 
महाराष्ट्र पुणे

जा.क्र./रा.शै.सं. प्र.प म./NEP/शिक्षा सप्ताह/२०२४-२५/०३४५५

दिनांक: १६/०७/२०२४

प्रति, शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, सर्व प्रशासन अधिकारी, नपा/नप/मनपा, सर्व शिक्षण निरीक्षक, (दक्षिण, पश्चिम व उत्तर)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
शिक्षण सप्ताह अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस वेबिनार सत्र

दि. ३ जुलै २०२४

शिक्षण सप्ताह दुसरा दिवस : पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस ऑनलाईन वेबिनार

पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस ऑनलाईन वेबिनार





Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon