Shaskiy Rekhakala Pariksha 2024 Update
Government Drawing (Elementary and Intermediate Drawing Grade) Examination - 2024] Result Declared
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई
Maharashtra State Board of Art Education, Mumbai
क्रमांक :- कशिमं/२०२४/पाच / 12 दिनांक :-०८.०१.२०२५.
वाचा :-
१) परिपत्रक क्रमांक कशिमं/शारेप/२०२४/५७, दिनांक १६.०७.२०२४.
२) परिपत्रक क्रमांक कशिमं/शारेप/२०२४/३०९, दिनांक २६.०९.२०२४.
परिपत्रक
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा - २०२४ निकाल जाहीर करणेबाबत.
उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी संकेतस्थळावर खालील प्रमाणे प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच प्रमाणपत्र व दुय्यम निकालपत्रक डाऊनलोड करणे / निकाल पडताळणी / ऑनलाईन नाव नोंदणी करताना विद्यार्थ्यांच्या नावामध्ये त्रुटी असल्यास नावातील त्रुटींची दुरुस्ती करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा तपशील खालील प्रमाणे.
क्र तपशील
१ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल दिनांक
२ एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा निकाल दिनांक
RESULT LINK
Intermediate Grade Exam Topper List
Published On : 10-01-2025 New
Intermediate Grade Exam Merit List
Published On : 10-01-2025 New
⏩ अधिक माहितीसाठी या ओळीला स्पर्श करा
Shaskiy Rekhakala Pariksha 2024-2025 Update Change Exam Board
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2024 Time table
Elementary and Intermediate Drawing Grade Exam
Elementary and Intermediate Drawing Grade Exam 2024
परिपत्रक
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा घेण्यात येत होत्या, तथापि, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, अधिनियम २०२३ दि. २३/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३ कलम ८ मधील तरतुदीनुसार सन २०२४-२०२५ पासून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा, मंडळाकडून घेण्यात येणार आहे.
शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४, दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ ते दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
Also Read -
संबंधित सर्व केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना दोन्ही पैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने
या संकेतस्थळावर भरावयाची असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा- २०२४ एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा वेळापत्रक
अ.क्र. |
विषयाचे नाव |
परीक्षेची वेळ |
बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ |
||
१ |
वस्तुचित्र (Object Drawing) |
१०.३० ते १.०० (२.३० तास) |
२ |
स्मरणचित्र (Memory Drawing) |
२.०० ते ४.०० (२.०० तास) |
गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर, २०२४ |
||
३ |
संकल्पचित्र-नक्षीकाम (Design) |
१०.३० ते १.०० (२.३० तास) |
४ |
कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन (Plane Geometry &
Lettering) |
२.०० ते ४.०० (२.०० तास) |
अ.क्र. |
विषयाचे नाव |
परीक्षेची वेळ |
शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ |
||
१ |
स्थिरचित्र
(Still
Life) |
१०.३०
ते १.३० (३.०० तास) |
२ |
स्मरणचित्र (Memory Drawing) |
२.३०
ते ४.३० (२.०० तास) |
गुरुवार, दिनांक २६ सप्टेंबर, २०२४ |
||
३ |
संकल्पचित्र-नक्षीकाम (Design) |
१०.३०
ते १.३० (३.०० तास) |
४ |
कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन (Plane Geometry &
Lettering) |
२.३०
ते ५.३० (३.०० तास) |
अ.क्र.१ तपशील
केंद्रांची नोंदणी / केंद्राची माहिती अद्यावत करणे ऑनलाईन पध्दतीने.
कालावधी दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ०५.०८.२०२४ पर्यंत
अ.क्र २. तपशील
केंद्राच्या अधिनस्त असलेल्या सहभागी शाळांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने.
दिनांक ०१.०८.२०२४ ते दिनांक ०५.०८.२०२४ पर्यंत
अ.क्र.३ तपशील
एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे.
दिनांक ०५.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ पर्यंत.
अ.क्र ४ तपशील
परीक्षक, समालोचक व उपमुख्य समालोचक नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करणे.
दिनांक १४.०८.२०२४ ते दिनांक ३१.०८.२०२४ पर्यंत.
ऑनलाईन पध्दतीने करावयाची नोंदणी व संबंधित माहिती लिंक या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. तसेच परीक्षा फी ऑनलाईन भरण्याबाबत स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येई
(विनोद दांडगे)
संचालक,
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई.
महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ,मुंबई
Email: director.msbae@gmail.com
क्रमांक :- कशिमं/शारेप-२०२४/५७
दिनांक:- १६.०७.२०२४
वाचावे :-
१) शासन निर्णय क्रमांक / एडीआर-२०१४/प्र.क्र.२१८/तांशि-६, दिनांक १६.०२.२०१५.
२) मराकशिमं-२०२४/आस्था/११, दिनांक ०५.०६.२०२४.
खालील पत्र सहभागी शाळेने आपल्या लेटरहेडवर परीक्षा केंद्राला द्यावे....
प्रति,
मा. केंद्र संचालक,
शासकीय रेखाकला परीक्षा 2024,
परीक्षा केंद्र क्रमांक...
शाळा
विषय - आमच्या शाळेचे शासकीय रेखाकला परीक्षा 2024 साठी रजिस्ट्रेशन करून यूझरनेम व पासवर्ड मिळणेबाबत...
महोदय,
आमच्या शाळेतील विद्यार्थी आपल्या परीक्षा केंद्रावर शासकीय रेखाकला परीक्षा 2024 ला प्रविष्ट होऊ इच्छितात. तरी आमच्या शाळेचे रजिस्ट्रेशन करून आम्हाला विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी यूझरनेम व पासवर्ड मिळावा ही विनंती. रजिस्ट्रेशनसाठी आमच्या शाळेची माहिती खालीलप्रमाणे...
• शाळेचा यूडायस नंबर
• शाळेचे नाव
• शाळेचा पत्ता
• पिनकोड
• मुख्याध्यापकाचे नाव
• मुख्या. मोबा. नंबर
• शाळेचा इमेल आयडी
• कलाशिक्षकाचे नाव
• कलाशिक्षकाचा मोबा. नंबर
• कलाशिक्षक इमेल आयडी
आपला विश्वासू,
मुख्याध्यापक सही व शिक्का
शासकीय रेखाकला परीक्षा 2024 च्या ऑनलाईन कामासाठी नवीन लिंक...
Shaskiy Rekhakala New Online Apply link -
जुनी लिंक कुणीही वापरू नये
👉 Here for center registration and student registration
👉 Here for affiliation registration form
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon