DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Rajarshi Shahu Maharaj Essay Competition


राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४



दिनांक: १२/०७/२०२४

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे आयोजित तालुका व महानगरपलिका स्तरावर प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी "राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४" आयोजन करणेबाबत...

Rajarshi Shahu Maharaj Essay Competition 2024 Marathi Information 

संदर्भः- मा. व्यवस्थापकीय संचालक यांची मान्य टिपणी दिनांक :- १०/०७/२०२४

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची कर्तृत्वसंपन्न कारकीर्द ही महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व ठरली आहे. सुख विलासाची सर्व साधने पायी घोटाळत असताना कोल्हापूर संस्थानाच्या शाहू महाराजांनी उपभोगशून्य स्वामित्त्व गाजविले. सत्तेचे साधन हाती ठेवून प्रजेचा उत्कर्ष घडविण्यासाठी त्यांनी महत् प्रयास केले. जनतेच्या सर्वांगीण उन्नत्तीचे त्यांनी स्वप्न पाहिले व ते साकार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची सर्व विद्यार्थ्यांना ओळख कावी व त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाची उन्नती करावी, यासाठी सारथी संस्थेमार्फत प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय व महानगरपालिकास्तरीय निबंधस्पर्धा २०२४" आयोजित करण्यात येत आहे. हो निबंध स्पर्धा पुढील ४ वर्ष चालू ठेवण्याचा सारथी संस्थेचा मानस आहे.

सारथी सस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सदर निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. इ. ३ री ते ५ वी तसेच इ. ६ वी ते इ. ७ वी व ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा यासाठी सदरची स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व तालुका व महानगरपालिका स्तरावर घेण्यात येणार आहे.

तालुकास्तरीय निबंधस्पर्धा विषय, नियम व अटी-

🙋👇

 छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण मराठी माहिती 
⦿ जन्म : 
⦿ मृत्यू : 
⦿ अधिकारकाळ
⦿ अधिकारारोहण
⦿ राज्यव्याप्ती : 
⦿ राजधानी : 
⦿ पूर्ण नाव : 
⦿ पूर्वाधिकारी : 
⦿ उत्तराधिकारी :
⦿ वडील : 
⦿ आई : 
⦿ पत्नी : 
⦿ राजघराणे :
⦿ राजब्रीदवाक्य :
⦿ जीवन
⦿ कार्यजातिभेदाविरुद्ध लढा
⦿ शैक्षणिक कार्य
⦿ शैक्षणिक वसतिगृहे
⦿ इतर कार्ये
⦿ कलेला आश्रय
⦿ स्वातंत्रलढ्यातील योगदान
⦿ पारंपिरिक जातिभेदाला विरोध
⦿ शाहूंवरील प्रकाशित साहित्य
⦿ चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका
⦿ पुरस्कार
⦿ सन्मान

👉तालुकास्तरीय निबंधस्पर्धा विषय, नियम व अटी - वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 👈

गट क्र.१:- इयत्ता ३ री ते इयत्ता ५ वी

विषयः- 
शब्द मर्यादा वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

क्र.२:- इयत्ता ६ वी ते इयत्ता ७ वी

गट विषय - 
शब्द मर्यादा वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


गट क्र.३:- इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी
विषयः- 
शब्द मर्यादा वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


१. राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४ आयोजनाची दि. १५ जुलै २०२४ ते १७ सप्टेंबर २०२४ ही आहे. या कालावधीत निबंध स्पर्धेचे आयोजन तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी व म.न.पा स्तरावर प्रशासनाधिकारी यांनी करावे.

२. तालुकास्तरीय निबंध स्पर्धा गट क्रमांक १ ते ३ चे आयोजन संबधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांनी करावे.

३. म.न.पा स्तरावर गट क्रमांक १ ते ३ चे आयोजन प्रशासनाधिकारी (शिक्षण) यांनी करावे.

४. छत्रपती शाहू महाराजांचा विचार व कार्य सर्व विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावे यासाठी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना निबंधस्पर्धेत सहभागी करून घ्यावे म्हणून निबंधस्पर्धा तालुका स्तरावर तसेच मनपा स्तरावर घेण्यात येत आहेत. प्रत्येक गटात प्रत्येक तालुक्यातील किमान १००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होतील असे नियोजन शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी करावे. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी तसेच प्रशासनाधिकारी यांनी आवश्यक कार्यवाही करावी.

५. राजर्षी शाहू महाराज निबंधस्पर्धा २०२४ ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व माध्यमाच्या, सर्व मान्यताप्राप्त शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे.

६. निबंध लेखन स्पर्धाचे माध्यम मराठी असेल.

७.विद्यार्थ्यांनी स्वतः शिकत असलेल्या इयत्तानिहाय गटातून एकाच विषयावर स्वतः निबंध लिहावानिबंधावर विद्यार्थ्याने स्वतःचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव व निबंधाचा विषय नमूद करावा. तसेच निबंधाच्या शेवटी शब्द संख्या नमूद करावी,

८. प्रत्येक शाळेतील निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे निबंध शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी एकत्रित करावेत व तद्नंतर सदर निबंध शाळेच्या लेटर हेडवर मुख्याध्यापकांच्या शिफारशीने व सही शिक्क्यानिशी सदर निबंध गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी म.न.पा यांना दिनांक ३० सप्टेबर २०२४ पर्यंत सादर करावेत.

९. निबंध स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिक प्राप्त करणाऱ्या १ ते ३ गटातील विजेत्या १ ते १० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैंक खातेवर बक्षिसाची रक्कम सारथी, पुणे मार्फत अदा केली जाणार असल्याने संबंधित विद्यार्थ्यांचे स्वतःचे नावे राष्ट्रीयकृत बँकेच्या खाते असलेल्या पहिल्या पानाची सत्यप्रत निबंधासोबत जमा करणे आवश्यक आहे.

१०. सारथी मार्फत तालुकानिहाय व मनपानिहाय यशस्वी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात येईल. प्रत्येक तालुका व म.न.पा कार्यालयाकडे प्रशस्तीपत्रे पोस्टाद्वारे पाठविण्यात येतील.
कायर्यालयाकडे प्रशस्तीपत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात येतील,

पारितोषिके

गट क्र.१:- ३ री ते ५ वी
पारितोषिके क्रमांक

प्रथम रु.

द्वितीय रु.

तृतीय रु.

उत्तेजनार्थ 

गट क्र.२:- ६ वी ते ७ वी
पारितोषिके क्रमांक

प्रथम रु

द्वितीय रु

तृतीय रु

उत्तेजनार्थ 

गट क्र.३:- ८ वी ते १० वी
प्रथम रु.

द्वितीय रु.

तृतीय रु

उत्तेजनार्थ 
पारितोषिके काय आहेत जाणून घ्या त्यासाठी / वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 

११. तालुका स्तरावरील निबंध स्पर्धेच्या प्रत्येक गटासाठी गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांनी तीन तज्ञ परीक्षक शेजारच्या तालुक्यातील नियुक्त करावेत. त्यांचेकडून निबंध स्पर्धेचे परीक्षण करून १ ते १० क्रमांक घोषित करावेत. निबंध स्पर्धेचे परीक्षण आशय २५ गुण, अभिव्यक्ती ५ गुण, भाषाशैली- ५ गुण, शुद्धलेखन- ५ गुण, वळणदार हस्ताक्षर व प्रभाव १० गुण एकूण ५० गुणांच्या आधारे मूल्यमापन करावे

१२. निबंध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या तिन्ही गटातील प्रत्येकी गुणानुक्रमे १ ते १० विद्याथ्यांची यादी सारथी संस्थेस ३० सप्टेबर २०२४ पर्यंत सादर

करावी. (त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नांव, शाळेचे नांव व पत्ता, ई-मेल, स्पर्धेचा विषय, प्राप्त क्रमांक, विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक, बैंक तपशील, नांव, खाते क्रमांक, IFSC Code, बँकेचे नांव, शाखा इ. माहिती सादर करावी.) तसेच व पारितोषिक प्राप्त असणाऱ्या १ ते ३ गटातील विजेत्या १ ते १० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचे निबंध सारथी कार्यालयास सादर करावेत.

१३. निबंधस्पर्धेत विजेत्या ठरलेल्या १ ते ३ गटातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन माहिती इंग्रजी भाषेतच खाली दिलेल्या लिंकवर अचूक भरावी. लिंकवर माहिती भरणे आवश्यक आहे.

A) गट क्रमांक १ इयत्ता ३ री ते ५ वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी

LINK  ही लिंक आहे. 

B) गट क्रमांक २ इयत्ता ६ वी ते ७ वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी  LINK  ही लिंक आहे. 
LINK

C) गट क्रमांक ३ इयत्ता ८ वी ते १० वी च्या विजेत्या स्पर्धकांसाठी ही LINK   लिंक आहे.

१४. गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी म.न.पा यांनी निबंधस्पर्धा संपन्न होताच स्पर्धेविषयी आपला संक्षिप्त अहवाल निकाल पत्रकासोबत पुढील नमुन्यात सादर करावा. तसेच सदर स्पर्धेविषयी आपला अभिप्राय सुमारे १० ओळीत सही शिक्क्यासह सादर करावा.

तालुक्याचे नाव :-
जिल्ह्याचे नाव :-

गट क्र.१: ३ री ते ५ वी 

गट क्र.२:६ वी ते ७ वी 

गट क्र.३:- ८ वी ते १० वी

तपशिल
निबंधस्पर्धा सहभागी शाळांची संख्या
निबंधस्पर्धा सहभागी विद्याची संख्या
एकूण

१५. गटशिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी यांनी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत निबंध स्पर्धेचा निकाल व स्पर्धा सहभाग अहवाल सह व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी उपकेंद्र बचत गंगा इमारत कसबा बावडा रोड, रमणमळा, ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क शेजारी कोल्हापूर ४१६००३ या पत्त्यावर खास दूताकरवी समक्ष अगर स्पीड पोस्टाने सादर करावा.

१६. प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक निबंध (गट क्र. १ ते ३) मिळून प्राप्त होणाऱ्या तालुक्याच्या गट शिक्षणाधिकारी व मनपा प्रशासनाधिकारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सारथी मार्फत गौरविण्यात येईल.

१७. छत्रपती शाहू महाराज निबंधस्पर्धेविषयी उपरोक्त नमूद केलेल्या अटी व शतीमध्ये कोणताही बदल करण्याचे व निर्णय घेण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक मुख्यालय सारथी पुणे यांनी राखून ठेवलेले आहेत.

शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच खाजगी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना या निबंधस्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गट शिक्षणाधिकारी व प्रशासनाधिकारी मनपा मार्फत परिपत्रकाद्वारे व आढावा बैठकीद्वारे सर्व शाळांना कळविण्यात यावे. प्रत्येक तालुक्यातून व मनपा स्तरावरून प्रत्येक गटातून किमान १००० निबंध इयत्ता (३री ते ५वी.६ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी) प्राप्त होतील याबाबतचे नियोजन गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांनी करावे,

महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचा सदर निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा व राजर्षी शाहू विचारांची चळवळ गतिमान व्हावी यासाठी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेची माहिती द्यावी. राजर्षी शाहू विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या अधिनस्त सर्व गट शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी (न.पा.म.न.पा.) अधिकाऱ्यांना सदर स्पर्धेविषयी कळविण्यात यावे व सदर राजर्षी शाहू महाराज तालुकास्तरीय व म.न.पा स्तरीय निबंधस्पर्धा यशस्वी करावी.
👇👇👇👇👇
👆👆👆👆👆
श्री. अशोक काकडे (भा.प्र.से.)
व्यवस्थापकीय संचालक छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था
बालचित्रवाणी इमारत, गोपाळ गणेश आगरकर रोड, सेनापती बापट रोडच्या मागे, पुणे (महाराष्ट्र) - ४११००४

CIN U74999PN2018NPL177394

जा.क्र.सारथी/शिक्षण/निबंध स्पर्धा/१२४५/२०२४-२०२५

दिनांक: १२/०७/२०२४

प्रति, 
शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद (सर्व) शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद (सर्व)
प्रत

मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे.

माहितीसाठी व कार्यवाहीसाठी प्रत

१. संचालक, प्राथमिक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे. 
२. संचालक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे. 
३. शिक्षण संचालक, योजना संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १७ डॉ. आंबडेकर मार्ग, पुणे
४. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
(बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सोलापूर, मीरा-भाईंदर, धुळे, भिवंडी-निजामपूर, अमरावती, नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, अकोला, उल्हासनगर, सांगली, मिरज, कुपवाड, मालेगाव, जळगांव, लातूर, अहमदनगर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी, जालना.)
५. प्रशासनाधिकारी, (शिक्षण) महानगरपालिका (सर्व)
Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARATHI) Pune regarding organizing Rajarshi Shahu Maharaj Essay Competition 2024 for primary and secondary students at Taluka and Municipal Corporation level...
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon