DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

ZP Teachers Revised Policy Intra District Transfers GR


Schedule of intra-district transfers of Zilla Parishad teachers

Schedule of intra-district transfers of Zilla Parishad teachers


महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

क्रमांक : जिपब-२०२३/प्र.क्र. ११८/आस्था-१४.

दिनांक:- ०२ डिसेंबर, २०२४.

प्रति,
मे. विन्सीस आय टी सर्विसेस प्रा. लि., पुणे.

विषय :- बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना मुद्दा क्र. ४.४.७ अन्वये पती-पत्नी एक युनिटचा लाभ देण्याच्या अनुषंगाने मागदर्शन करणेबाबत

संदर्भ:- आपले दिनांक ३०.११.२०२४ रोजीचे ई मेल द्वारे प्राप्त पत्र.

महोदय,
उपरोक्त विषयावरील आपल्या संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांनी मुद्दा क्र. ४.४.७ अन्वये पती-पत्नी एक युनिटचा लाभ घेण्याची मागणी केली असेल, तर त्यांनी दिलेल्या ३० प्राधान्यक्रम शाळांमध्ये दोघांची रिक्त जागांवर बदली होणे आवश्यक आहे. यापैकी एका शिक्षकाची बदली करता येणार नाही. त्यामुळे एक युनिटचा लाभ मिळत नाही. सबब, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या (टप्पा क्र. ४) या टप्प्यावर संबंधित शिक्षक यांनी मुद्दा क्र. ४.४.७ अन्वये एक युनिटचा लाभ देण्याची मागणी केली असल्यास सदर पती-पत्नी शिक्षक या दोघांचीही त्यांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन बदली करण्याची कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी.


कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

हे ही वाचा 👇 

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग, मंत्रालय, 
मुंबई

क्रमांक : न्यायाप्र-२०२४/प्र.क्र. १०५/आस्था-१४

दिनांक:- ७ नोव्हेंबर, २०२४

प्रति,
१) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).
२) मे. विन्सीस आय टी सर्विसेस प्रा. लि., पुणे.

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक

महोदय,
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारित धोरण दिनांक १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार तसेच यापूर्वी शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या धोरणानुसार शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रीया ऑनलाईन पोर्टल द्वारे राबविण्यात येते.

२. मा. उच्च न्यायालय, नागपूर येथे दाखल अवमान याचिका क्र.२१६/२०२४ वरील दि.२५.१०.२०२४ रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान मा. उच्च न्यायालयाने बदल्यांसाठीचे ऑनलाईन पोर्टल हे संपूर्ण बदली प्रक्रीयेदरम्यान संपूर्ण राज्यासाठी विहीत वेळापत्रकानुसार कार्यान्वित (functional) असावे, असे निदेश दिलेले आहेत.

Also read -

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषदे अंतर्गत करावयाच्या पदभरती संदर्भात रिक्त पदे निश्चित करण्याबाबत व नियुक्त शिक्षकांच्या बदली बाबत सुधारीत अटी लागू करणेबाबत.वाचण्यासाठी किंवा पीडीएफमध्ये हवा असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा 

३. तद्नुषंगाने आपणांस असे कळविण्यात येते की, यापुढे दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी सर्वसाधारणपणे संचमान्यतेची प्रक्रीया पूर्ण होऊन शाळांमधील शिक्षकांची संख्या निश्चित झाल्यानंतर, संबंधित जिल्हा परिषदेने ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी आवश्यक माहितीची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरु करावी. तसेच जिल्हा परिषदेने अवघड क्षेत्र घोषित अथवा घोषित क्षेत्र प्रसिध्द करण्याची कार्यवाही करावी.

४. तद्नंतर खालील वेळापत्रकानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात यावी:-

अ. क्र. बाब दिनांक पासून पर्यंत

१ शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे (बदली पात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक इत्यादी याद्या) व त्यानुषंगाने प्राप्त आक्षेप यावर निर्णय घेणे
दिनांक १ जानेवारी पासून पर्यंत २८ फेब्रुवारी

२ समानीकरणांतर्गत रिक्त पदे तसेच बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने निश्चित करणे
दिनांक १ मार्च  पासून पर्यंत  ३१ मार्च

३ बदलीसाठी आवश्यक सर्व डाटा जिल्हा परिषदेने तयार करून तो डाटा विन्सीस कंपनीस उपलब्ध करून देणे
दिनांक  १ एप्रिल पासून २० एप्रिल पर्यंत 

४ टप्पा क्र. १ शासन निर्णय दि.१८.६.२०२४ मधील अ.क्र. ४ (४.१) मध्ये नमुद केल्यानुसार समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्चित करणे
दिनांक २१ एप्रिल पासून २७ एप्रिल पर्यंत 

५ टप्पा क्र. २ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे
दिनांक  २८ एप्रिल पासून पर्यंत ३ मे

६ टप्पा क्र. ३ विशेष संवर्ग शिक्षक भाग-२ शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे
दिनांक ४ मे पासून ९ मे पर्यंत 

७ टप्पा क्र. ४ बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे
पासून १० मे पर्यंत १५ मे

८ टप्पा क्र. ५ बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे

१६ मे पासून  २१ मे पर्यंत 

९ टप्पा क्र. ६ विस्थापित शिक्षकांसाठी बदल्यांसाठी रिक्त जागा घोषित करणे, त्यांना पसंतीक्रम भरण्यास वेळ देणे, व त्यांच्या बदल्या करणे

पासून २२ मे २७ मे पर्यंत 

१० टप्पा क्र. ७ - अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे
दिनांक  पासून पर्यंत 
पासून २८ मे ३१ मे पर्यंत 

५. बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे/अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दि.२८ फेब्रुवारी पर्यंत अंतिम करण्यात यावी. बदली प्रक्रिया सुरु झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.

६. सदर वेळापत्रक सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहील. उपरोक्त वेळापत्रकानुसार पोर्टल व्यवस्थितरित्या सुरु ठेवणेबाबतची जबाबदारी मे. विन्सीस आयटी प्रा.लि. पुणे यांची राहील.

७. तथापि, एखाद्या वर्षी काही अपरिहार्य कारणास्तव बदली प्रक्रीया राबविणे शक्य नसल्यास व तसे शासनाने स्वतंत्रपणे कळविल्यास त्या विशिष्ट वर्षासाठी सदरचे वेळापत्रक लागू राहणार नाही. तसेच एखाद्या शिक्षकाने चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुध्द शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात यावी.


परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोडसाठी लिंक

आपला,
(नितीन स. पवार) 
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन


जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण


Revised Policy for Intra District Transfers of Zilla Parishad teachers
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण

Revised policy for intra-district transfers of Zilla Parishad teachers

महाराष्ट्र शासन 
ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांकः जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ २५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई-४०० ००१, 
दिनांक : १८ जून, २०२४.

वाचा :-

१) शासन निर्णय क्र. जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, दिनांक ०७ एप्रिल २०२१.

२) शासन पत्र क्र. जिपब-२०२२/प्र.क्र.२९ (भाग-२)/आस्था-१४, दिनांक १३ जानेवारी २०२३.

३) शासन निर्णय क्र. जिपब-२०२२/प्र.क्र.२९/आस्था-१४, दिनांक १४ मार्च २०२३.

४) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/ प्र.क्र. १७४/ टीएनटी-१, दि. २१ जून २०२३.

प्रस्तावना :-

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन वाचा क्र.१ येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना/निवदने शासनास प्राप्त झाली आहेत. तसेच शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील काही तरतूदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून रिट याचिका क्र. ६७७/२०२३ मध्ये संदर्भ क्र. २ येथील दि.१३.०१.२०२३ रोजीच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन, जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील तरतूदी व त्याअनुषंगाने प्राप्त सूचना/निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचा क्र. ३ येथील दि. १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला. सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय

अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या जिल्हांतर्गत बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारीत धोरण निश्चित करण्यात येत आहे.

व्याख्या :-

१.१ अवघड क्षेत्र :- परिशिष्ट १ मध्ये नमूद असणाऱ्या ७ बाबींपैकी किमान ३ बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येईल.

१.२ सर्वसाधारण क्षेत्र: वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील.

१.३ बदली वर्ष:- ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.

१.४ बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्र निहाय व सर्वसाधारण क्षेत्र निहाय बदली वर्षाच्या दिनांक ३१ मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा.

१.५ शिक्षक :- या शासन निर्णयाचे प्रयोजनार्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक / पदवीधर शिक्षक / मुख्याध्यापक.

१.६ सक्षम प्राधिकारी:- शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील.

१.७ बदली अधिकार प्राप्त शिक्षक :-
१.७.१ बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक.

१.७.२ अवघड क्षेत्रातील शाळांची सुधारित यादी प्रसिध्द केल्यानंतर सर्वसाधारण क्षेत्र म्हणुन घोषित झालेल्या मात्र पूर्वी अवघड क्षेत्रामध्ये मोडणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची सलग सेवा ३ वर्ष झालेली असेल तर, त्यांना पुढील बदली वर्षामध्ये बदली अधिकार प्राप्त करण्यासाठी ग्राहय धरण्यात येईल.

१.७.३. बदली प्रक्रीयेमधून वगळण्यात येणारे शिक्षकः-

१) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणार आहेत असे शिक्षक.

२) बदली प्रक्रीया सुरु असताना निलंबित / सेवेतून कार्यमुक्त केलेले शिक्षक.

१.८ विशेष संवर्ग शिक्षक भाग-१: खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ म्हणून गणले जातील.

हे ही वाचाल 
Revised Policy for Inter-District Transfers of Teaching Cadre of Zilla Parishad

महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक: आंजिब-२०२३/प्र.क्र. ११७/आस्था-१४ २५, मुंबई

दिनांक : १२ जून, २०२४.




१.८.१ पक्षाघाताने आजारी शिक्षक (Paralysis)
१.८.२ दिव्यांग शिक्षक (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.१.२०११ मधील नमूद प्रारुपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक

१.८.३ हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक

१.८.४ एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले शिक्षक / डायलीसीस शिक्षक

१.८.५ यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक

१.८.६ कॅन्सरने (कर्करोग) आजारी शिक्षक

१.८.७ मेंदुचा आजार झालेले शिक्षक

१.८.८ यॅलेसेमिया / कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase deficiency व इतर आजार) (पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ), तसेच ज्या शिक्षकांचे आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे शिक्षक

१.८.९ माजी सैनिक तसेच आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा

१.८.१० विधवा शिक्षक

१.८.११ कुमारिका शिक्षक

१.८.१२ परित्यक्ता / घटस्फोटीत महिला शिक्षक

१.८.१३ वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले शिक्षक

१.८.१४ स्वातंत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

खालील आजाराने ज्या शिक्षकांचे जोडीदार व्याधिग्रस्त आहेत असे शिक्षक :

१.८.१५ हृदय शस्त्रक्रिया झालेले

१.८.१६ एकच मूत्रपिंड (किडनी) असलेले / मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले

१.८.१७ यकृत प्रत्यारोपण झालेले

१.८.१८ कॅन्सरने (कर्करोग) आजारी असलेले

१.८.१९ मेंदूचा आजार झालेले.

१.८.२० यॅलेसेमिया विकारग्रस्त असलेले
--
--

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon