DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली संदर्भात माहिती अर्ज महाराष्ट्र शासन Z P Primary Teacher Transfer Application

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली संदर्भात माहिती अर्ज महाराष्ट्र शासन  
Z P Primary Teacher Transfer Application 

Primary Teacher Transfer Portal ortal Update 
प्राथमिक शिक्षक बदली पोर्टल सुरू झालेले आहे खालील लिंक ला टच करून आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करून आलेला ओटीपी टाकून कॅप्चा कोड टाकावा
     प्राथमिक शिक्षक बदली पोर्टलवर आपले अपडेट करण्यासाठी मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकावा व अपडेट करावे खालील अधिकृत लिंक वर क्लिक करून अपडेट करा.
     सदर पोर्टलवर या परिषद प्राथमिक शिक्षकांनी आपला वापरात असलेला मोबाईल नंबर नोंदवून लॉगीन करावे. आपली माहिती/प्रोफाईल तपासून घ्यावी व माहिती अचुक असल्याची खात्री करावी. सदर माहिती मध्ये तफावत असल्यास दुरुस्ती बाबत गटशिक्षणाधिकारी यांचे कडे अपील करावे, गटशिक्षणाधिकारी यांनी सबंधित शिक्षकांची माहिती सेवा पुस्तक व सबंधीत आवश्यक दस्ताऐवज पडताळणी करून शिक्षकांचा डेटा पोर्टलवर अद्यावत करण्याची कार्यवाही करावी. पोर्टलवरील कार्यवाही वेळोवेळी करण्यासाठी शिक्षकांनी दिलेला मोबाईल क्रमांक व email ID चा वापर करणे आवश्यक आहे.
     पोर्टलवर माहिती अद्यावत करण्याठी येणाऱ्या अडचणी पंचायत समिती स्तरावरुन सोडविण्यात याव्यात, शिक्षकांची बदली संदर्भात माहीती अद्यावत करण्यासाठी पं.स. स्तरावर कार्यरत क.प्र.अ. व सबंधित लिपीक यांना लेखी निर्देश देण्यात यावे. व त्यांचे कडून अचुक कार्यवाही करुन घेण्यात यावी. तसेच पर्यवेक्षकिय यंत्रणेतीत वि.अ.शि व केंद्र प्रमुख यांचे मार्फत सुध्दा योग्य ती कार्यवाही करुन घेण्यात यावी. सदर कामात दिरंगाई होणार नाही याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.
बदली पोर्टलवील शिक्षकांच्या माहिती बाबतचा डेटा अद्यावत करण्याची कार्यवाही करण्याबाबत सर्व शिक्षकांना लेखी कळविण्यात यावे. सदर कार्यवाही ७ दिवसाचे आत पुर्ण करावयाची असल्याने या बाबत तसे नियोजन करुन अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच पोर्टलवरील चुकिची माहिती दुरुस्ती करण्याबाबत काही अडचणी येत असल्यास त्याबाचत तात्काळ या कार्यालयाशी संर्पक करावा. बदली पोर्टलवरील माहिती सबंधित शिक्षकांनी स्वतः पडताळणी करणे व अचुक असल्याची खात्री करणे अत्यावश्यक आहे.सदर कार्यवाही ही कोणत्याही परिस्थीतीत ७ दिवसाचे आत करावयाची असल्यामुळे या बाबत दक्षता घेण्यात यावी. अन्यथा याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली तसेच बदली प्रक्रिये सबंधीत सर्व कर्मचारी यांची राहील याची नोंद घ्यावी.
Primary Teacher Transfer Portal अधिकृत लिंक येथे पहा
अधिकृत लिंक ला जोडले जाण्यासाठी फक्त 

Also Read 👇 
महाराष्ट्र शासन 
ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांकः जिपब-२०२३/प्र.क्र.११८/आस्था-१४ २५, मर्झबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट, मुंबई-४०० ००१, 
दिनांक : १८ जून, २०२४.

pdf DOWNLOAD करा 👇


महाराष्ट्र शासन

ग्रामविकास विभाग मुंबई 

दिनांक : २७ ऑक्टोबर, २०२३

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

विषय :- सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक.

Schedule regarding inter-district transfers of Zilla Parishad primary teachers in the year 2022.

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे २३/०५/२०२३ च्या शासन जिल्हा परिषदेतील प्राथमिक आलेल्या आहेत.

२. शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि. विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिव च्या शासन निर्णयान्वये सन २०२२ मधील , अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत. त्यानुषंगाने सन-२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते मात्र रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती, फक्त अशाच सन २०२२ च्या बदली प्रक्रीये मधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यां बाबतची कार्यवाही सुरु

अधिक वाचण्यासाठी 

उप सचिवमहाराष्ट्र शासन

करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा

pdf DOWNLOAD करा 👇


हे ही वाचा 👇

महाराष्ट्र शासन

ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर्झबान रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१

दिनांक : १३ सप्टेंबर, २०२३

विषय:- सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक.

संदर्भ :-

(१) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. आजिद- ४८२०/प्र.क्र.२९१/आस्था-१४, दि. ०७/०४/२०२१

(२) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. आजिन-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४, दि.२३/०५/२०२३

(३) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/ टीएनटी-१, दि.२१/०६/२०२३

महोदय,

     उपरोक्त विषयाबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि. ०७/०४/२०२१ व दि.२३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या आहेत.

२. आता शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि. २१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये सन २०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत. त्यानुषंगाने सन २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदली प्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते, मात्र, रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती. फक्त अशाच सन २०२२ च्या बदली प्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु आज करण्यात येत आहे. सदर बदली प्रक्रियेकरीता E.O. लॉगीन आज मध्यरात्री पासून सुरु करण्यात येणार असून मंजूर केलेली बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी दि.१४/०९/२०२३ ते दि. १७/०९/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी,

 (पो.दे. देशमुख)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

करण्यासाठी खालील CLICK HERE वर टिचकी मारा

pdf DOWNLOAD करा 👇


शिक्षक सर्वसाधारण बदल्या 2022
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला प्रारंभ
आंतरजिल्हा बदली फार्म भरण्याचा कालावधी दिनांक 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट 2022
 फॉर्म भरण्यासाठी 


रिक्त पदे  बिंदू नामावली 
रिक्त पदे  बिंदू नामावली   VACANCY ROSTER pdf DOWNLOAD करा  
VACANCY ROSTER
pdf DOWNLOAD करा 


जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ऑनलान  बदली दि. १० जून २०२२ चे परिपत्रक 
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली संदर्भात माहिती अर्ज महाराष्ट्र शासन  Z P Primary Teacher Transfer Application 

 

DOWNLOAD 

LINK -

वरील लिंकवरुन बदली पोर्टलवर माहिती अपडेट करणे सुरू झालेले आहे. अगोदर सोबतच्या नमुन्यातील कागदावर स्वतःची माहिती भरून ते दोन-तीन वेळा तपासा. नंतरच पोर्टलवर भरा म्हणजे माहितीत चूक होणार नाही.

 

DOWNLOAD 

CLICK HERE

 बदली पोर्टल अपडेट -

Profile Update ची सुविधा सुरू झाली आहे. परंतु जोपर्यंत अधिकृत सूचना मिळत नाहीत तोपर्यंत कोणीही माहितीत बदल करू नये. तशा अधिकृत सूचना शिक्षण विभागाकडून आपणास मिळतील किंवा वेळापत्रक प्रकाशित होईल

सदर पोर्टल नव्यानेच असल्याने व एकाच वेळी अनेक शिक्षक पोर्टलला भेट देत असल्याने सुरुवातीला काही अडचणी येणे संभव आहे.*

आतापर्यंत अनेकजणांना लॉगिन करताना सुरूवातीला OTP प्रॉब्लेम येत आहे. तो दूर झाला आहे. तरीही मोबाईलवर OTP येत नसेल तर दिलेल्या मेल आयडी मधील inbox किंवा spam फोल्डर चेक करावे.*

आतापर्यंत जवळपास ८१ हजार शिक्षकांनी पोर्टल ला भेट दिली आहे. पैकी ३५ हजार शिक्षकांनी आपली सेवा विषयक माहिती अपडेट केली आहे. असे महितीद्वारे कळाले आहे*
 

 प्रोफाईल अपडेट कोणी करायची ?
बदली पात्र असो वा नसो प्रत्येक शिक्षकाने म्हणजे 100% शिक्षकाने पडताळून पाहणे आवश्यक आहे. आपली सेवा विषयक माहिती अपडेट केल्यावर गटशिक्षणाधिकारी स्तरावरून पुन्हा पडताळणी होणार आहे.

माहिती अपडेट करणे म्हणजे आपली बदली होणारच असे कदापीही नाही.

बदली पोर्टलला लॉगीन कसे करावे ?

बदली पोर्टलला लॉगीन केल्यानंतर काही सूचना वाचायच्या आहेत. आणि Accept करा.

बाजूला Profile दिसते. त्यावर Click करा.

Profile दोन पेज मध्ये आहे. Personal Details व Employment Details.

 profile अपडेट करण्याची सुविधा दि. 13-06-2022 ते 22-06-2022 पर्यंत आहे, असे कळते

Personal Details मधील माहिती आपल्याला बदलवता येणार नाही.

Employment Details मधील माहिती ही प्रत्येकाने चेक करुन अचूक भरावयाची आहे. तरी काळजीपूर्वक भरा. यासाठी शक्य होत असल्यास जवळील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.

Date of Apponitment- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. प्रत्यक्ष शाळेवरील रुजू दिनांक भरावा.
Cast category - ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा. आपल्या मूळ नियूक्ती आदेशावर दिलेली आहे.

Appointment category- ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.

Current District Joining Date- यामध्ये सेवेत रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये. आंतरजिल्हा बदली शिक्षकांनी या जिल्ह्यातील रुजू दिनांक भरावा.

Udise Code of Current School कार्यरत शाळेचा युडायस नंबर चेक करुनच भरावा. Current School Joining Date- यामध्ये सध्याच्या कार्यरत शाळेतील रुजू दिनांक भरावयाचा आहे. ऑर्डर वरील दिनांक भरू नये.
Current Teacher Type Graduate / Under Graduate / Headmaster यापैकी ड्रॉप डाउन लिस्ट मधून सिलेक्ट करा.

Teaching Subtype- यामध्ये Graduate Teacher असेल त्यांनी भाषा / गणित-विज्ञान / समाजशास्त्र यापैकी सिलेक्ट करा. इतरांनी Not Avaible हे ऑप्शन निवडा

Teaching medium या मध्ये Marathi निवडा.

 Last Transfer Category - सध्याच्या शाळेत आपण कोणत्या संवर्गातून बदली होवून आलात तो संवर्ग ड्रॉप डाउन मधून सिलेक्ट करा.

Last Transfer Type - सध्याच्या शाळेत आपण आंतरजिल्हा की जिल्हांतर्गत बदली होवून आलात तो प्रकार ड्रॉप लिस्ट मधून सिलेक्ट करा लागून नसल्यास N/A सिलेक्ट करा

 बदली पोर्टल संदर्भात माहिती ही माझ्या सद्सद्विवेक बुद्धीने, प्राप्त माहितीआधारे  आपणास मदत व्हावी म्हणून दिली आहे. सर्व सूचना प्रशासनाच्या अंतिम राहील.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी सुधारित धोरण

CLICK HERE


CLICK HERE

मित्रांनो     Click to Download    टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर 

          Download File           वर टिचकी मारा 


Download File




जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक  जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात 

 


जिल्हा परिषदेतील एम एड व एम ए एज्यू  शासनाने राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शिक्षकांना प्रशासकीय वर्ग एक व दोन शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी प्राचार्य व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण विस्ताराधिकारी इत्यादी पदावर प्राधान्याने सामावून घेणे बाबत

 

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली संदर्भात माहिती अर्ज महाराष्ट्र शासन  Z P Primary Teacher Transfer Application 

Z P Primary Teacher Transfer Application 

   बदलीच्या पोर्टलवर शिक्षकांचे प्रोफाईल तयार करण्यासाठी इथे जोडण्यात आलेला हा एक नमुना फॅार्म आहे. शिक्षकांचे प्रोफाइल तयार करण्यासाठी हा फॅार्म वापरण्याचा प्रस्ताव आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी शासनाच्या निर्णयनुसार हा फॉर्म तयार करण्यात आला आहे. आपणांस विनंती आहे की कृपया या फॉर्मचा अभ्यास करुन शुक्रवार ११ जून २०२१ पर्यंत या बद्दल काही सुधारणा असल्यास सुचवा.

आपण आपल्या सूचना या पुढे नमुद केलेल्या ई-मेल वर पाठवू शकता Click Here

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon