Implementation of school education schemes online on MahaDBT Portal
Implementation of school education department schemes online in the academic year 2024-2025 on MahaDBT Portal
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र राज्य
१७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे-४११ ००१.
E-mail Id:- directorscheme.mh@gmail.com
दूरध्वनीक्रमांक :-०२०/२६१२६७२६/२६१२३५१५
जा.क्र. शिसंयो/महा डिबीटी/२०२४-२०२५/यो-४०३/०१११९
दिनांक : ०६ मे, २०२४
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व
२. शिक्षणाधिकारी (माध्यमिक / योजना) जिल्हा परिषद सर्व
३. शिक्षण निरीक्षक (उत्तर/दक्षिण/पश्चिम) मुंबई
४. प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप सर्व
५. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व
विषय : महाडीबीटी पोर्टलवर शालेय शिक्षण विभागाच्या योजनांची शैक्षणिक वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये ऑनलाईन पद्धतीने प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत...
Regarding effective implementation of school education department schemes online in the academic year 2024-2025 on MahaDBT portal...
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करून जॉईन करा..👇🏻
राज्याच्या विविध विभागाच्या शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. महाडिबीटी पोर्टलवर शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या खालील ०२ शिष्यवृत्ती योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे.
१) कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील गुणवत्ता शिष्यवृत्ती (२२०२०३७१)
२) आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती (२२०२१२५१)
महाडिबीटी पोर्टलवर विदयार्थांना शिष्यवृत्तीचे अर्ज भरणेसाठी सहाय्य व्हावे तसेच कनिष्ठ महाविदयालयातील लिपीक, प्राचार्य व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयांना अर्जाची पडताळणी करणेसाठी सहाय्य व्हावे या साठी महाडिबीटी पोर्टलवर मॅन्युअल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
😀 हेही वाचायला आपल्याला आवडेल
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ साठी पूर्वतयारी व अंमलबजावणीबाबत. वाचण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा
उपरोक्त प्रमाणे कार्यवाही करत असतांना उक्त दोन्ही योजनांसाठी महाडिबीटी पोर्टलवर कार्यवाही करतांना सदर योजनेची माहिती ही आपल्या क्षेत्रिय स्तरावरील सर्व विदयार्थांना व कनिष्ठ महाविदयालयांना ही प्राप्त होणे व त्याचा प्रसार होणे महत्वाचे असल्याने योजनेचे स्वरूप थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या शासकीय खुली गुणवत्ता या शिष्यवृत्ती संदर्भात सन १९७६-७७ पासून कनिष्ठ महाविद्यालयातील टप्पा अस्तित्वात आल्यापासून या स्तरावरील विद्यार्थ्यांना खुल्या गुणवत्ता शिष्यवृत्या देण्यात येतात. माध्यमिक शालांत परिक्षेत कमीत कमी ६० टक्के गुण मिळविणाया विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार ही शिष्यवृत्ती देण्यात येते. समाधानकारक प्रगती आणि कनिष्ठ महाविद्यालय पहिल्या वर्षाच्या (इ. ११ वी च्या) अखेरीस घेण्यात येणाऱ्या परीक्षेत किमान ४५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्या इयत्ता १२ वी पर्यंत चालू राहते. सदर योजना ही डीबीटी पोर्टलवर कार्यान्वित असून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती साठी जिल्हयानुसार संच संख्या ठरवून देण्यात आलेली आहे.
इयत्ता ११ वी व १२ वी चे करना, बाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्याध्यांनी महाडीबीटी पोर्टलवर
👇
शिष्यवृत्ती मिळणेकरिता अर्ज करण्यात येतो. विद्याव्योनी DBT PORTAL बर उपरोक्त योजनांसाठी भरलेले अर्ज कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर पडताळणी केले जाते.
कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरुन पडताळणी केलेले अर्ज जिल्हास्तरावरुन पडताळणी झाल्यानंतर जिल्हयांना दिलेल्या शिष्यवृत्तीच्या संचनिहाय एकदाच गुणवत्ता यादी पोर्टलद्वारे तयार केली जाते. व गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना PFMS द्वारे विद्याथ्यांच्या आधार लिंक बैंक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग केली जाते. या दोन्ही योजनांचे जिल्हास्तरावरील प्रलंचित अर्जाची पडताळणी तात्काळ करणे आवश्यक आहे. सदर योजना ही डीबीटी पोर्टलवर कायर्यान्वित असून विद्याच्यांना शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या बैंक खात्यात जमा करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती साठी जिल्हयानुसार शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक १०९५/(८५/९५) माशी ८ दिनांक १५ ऑक्टोबर १९९६
अन्वये संच संख्या ठरवून देण्यात आलेली आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती संदर्भात आर्थिकदृष्टया
मागसवर्गातील हुशार मुले मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्याच वेळी शेकडा ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत अशाना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. इयत्ता ११वी मध्ये ५० टक्के गुण मिळवून पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना हो शिष्यवृत्ती १२ जो पर्यंत चालू राहते. हो शिष्यवृत्ती फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरासाठी उपलब्ध आहे. ही शिष्यवृत्ती योजना डीबीटी पोर्टलमार्फत कार्यान्वित आहे.
सदर योजनेचे सर्व शाखांचे प्रस्ताव संबंधित शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे प्राप्त होतात. सदर प्रस्तावाची तपासणी संचालनालयाच्या स्तरावर करण्यात येते. व मेरोटनुसार त्यास मंजुरी संचालनालय स्तरावरून देण्यात येते. सदर योजनेचा लाभ विद्यार्थ्यांच्या बैंक खात्यामध्ये डीबीटी पोर्टलमार्फत जमा करण्यात येतो. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच/८५/९५/माशि-८ दिनांक १५/१०/९६ च्या निर्णयाअन्वये ३२०० शिष्यवृत्या मंजूर केल्या आहेत. शिष्यवृत्तीचे दर वसतीगृहात राहणारे विद्यार्थी व वसतीगृहात न राहणारे विद्यावी यांचे वेगवेगळे आहे. आर्थिकदृष्ट्या मागसवर्गातील हुशार मुले मुली जे माध्यमिक शालांत परीक्षेत पहिल्याच वेळी शेकडा ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत अशाना पुढील उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही शिष्यवृत्ती देण्यात येते. इयत्ता ११वी मध्ये ५० टक्के गुण मिळवून पहिल्याच वेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना हो शिष्यवृत्ती १२ वो पर्यंत चालू राहते. ही शिष्यवृत्ती फक्त कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरासाठी उपलब्ध आहे. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच/८५/९५/माशि-८ दिनांक १५/१०/९६ च्या निर्णयाअन्वये शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. शिष्यवृत्तीचे दर वसतीगृहात राहणारे विद्यार्थी व वसतीगृहात न राहणारे विद्याची यांचे वेगवेगळे आहे.
उक्त दोन्ही योजना राबविण्यात येतांना सर्वसाधारण महत्वाच्या सूचना आहेत, त्या खालील प्रमाणे
आहेत.
विदवार्थासाठी सूचना :-
उपरोक्त शिष्यवृत्तीसाठी या लिंकद्वारे महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीचे शासन निर्णय अटी-शती देव लाभ यांचे अवलोकन केले असता, विदयार्थानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा
विद्यार्थी महातिबीटी पोर्टलद्वारे लागू असलेल्या एकापेक्षा अधीक शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरू शकतात तथापि संबंधित विदद्याचास त्यांनी निवडलेल्या पसंतीक्रमानुसार शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार असल्याने शिष्यवृत्तीचा पसंतीक्रम काळजीपूर्वक नोंदविण्यात यावा.
विदयार्थानी अर्जासोबत शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
विदयार्थ्यांनी ऑनलाईन अर्जामध्ये गुण नोंदवितांना गुण टक्केवारीमध्ये नोंदविणे आवश्यक आजे. संच निर्धारित असलेल्या शिष्यवृत्तीसाठी लाभार्थ्यांची निवड शिष्यवृत्तीच्या अटीनुसार करण्यात येते याची नोंद घेण्याचावत निर्देशित करणे.
शिष्यवृत्तीसाठी आधार क्रमांकाचा वापर करून अर्ज भरता येतो, विदद्याचांना शिष्यवृत्तीच रक्कम आधार संलग्नित बैंक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यासाठी विद्याथांना त्यांचे बैंक खात्याशी आधारक्रमांक संलग्ण करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज भरतांना काही अडचणी निर्माण झाल्यास महाविदयालय/संस्थेच्या मदतीने पूर्ण करून घेण्यात यावा.
विद्यार्थ्याने ऑनलाईन अर्ज भरतांना विचारण्यात आलेली माहिती पूर्णपणे अचूक भरून ऑनलाईन अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांसह आपल्या महाविदयालयांकडे पुढील ती कार्यवाही करीता सादर करावी
कनिष्ठ महाविदयालयांसाठी सूचना :-
विद्याथ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरलेला शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणीसाठी प्रथम संबंधित महाविदयालयाच्या
लिपिक लॉगीनमध्ये पडताळणीसाठी उपलब्ध होतात.
लिपीकांनी विदयार्थाच्या अर्जाची पडताळणी करावी
शिष्यवृत्ती निहाय आवश्यक कागदपत्रे विद्यच्व्यांनी पोर्टलवर अपलोड केली असल्याची खात्री करावी. तसेच
सबंधित विदयार्थाने अर्जामध्ये भरलेली माहिती (अभ्यासक्रमाचे नाव, अभ्यासक्रमाचा प्रकार (अनुदानित
शिष्यवृत्तीचे शासन निर्णय अटी-शती लाभ आदि बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करून महाविदयालयातील
/विनाअनुदानित) अभ्यासक्रम कालावधी, प्रवेशाबाबतची माहिती, टक्केवारी, शिष्यवृत्तीचा लाभ, इत्यादी काळजीपूर्वक पडताळणी करणे आवश्यक आहे.) महाविदयालयाच्या लिपीकांनी त्यांचे लॉगीनवर आलेल्या
अर्जावर तातडीने कार्यवाही (Approve/Reject/Sent Back) करणे आवश्यक आहे.
कनिष्ठ महाविदयालयाच्या लिपीकांनी मंजूर (Approve) केलेले शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणीसाठी संबंधित
कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य लॉगीनवर उपलब्ध होतात.
कनिष्ठ महाविदयालयातील प्राचायांनी महाविदयालयाच्या लिपीकांप्रमाणेच विदयार्थीच्या शिष्यवृत्ती अर्जाची
पडताळणी करून सदर अर्जावर तातडीने (Approve/Reject/Sent Back) कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच विदवार्थाच्या अर्जाची प्रत आवश्यक कागदपत्रांसहीत जतन करून ठेवण्यात यावी.
शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयांबाबत सूचना :-
प्राचार्य लॉगीनमधुन अनुक झालेले उपरोक्त शिष्यवृत्तीचे अर्ज पडताळणीसाठी शिक्षणाधिकारी
(माध्यमिक/योजना) मध्ये पडताळणीसाठी उपलब्ध होतात. शिक्षणाधिकारी (माध्यमिक/योजना) यांनी त्यांचे लॉगीन मध्ये शिष्यवृत्तीनिहाय पडताळणीसाठी उपलब्ध अगांवर
तातडीने कार्यवाही (Approve/Reject/Sent Back) करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची जोडलेल्या कागदपत्रांवरून छाननी करणे
आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीसाठी (शासन) यांनी निश्चित केलेल्या शुल्काच्या प्रमाणानुसार लाभ देयत आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयांनी शिष्यवृत्ती अर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित विद्याथ्यास अर्जामध्ये वर्शविण्यात आलेल्या शुल्काप्रमाणे शिष्यवृत्ती लाभ देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्जाची पडताळणी करतेवेळी विद्याव्यांच्या अर्जामध्ये शुल्काबाबतची माहिती बरोबर असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीच्या अटी-शर्ती पूर्ण करणारे आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणारे व ज्या विद्यार्थासाठी शिष्यवृत्ती रक्कम बरोबर दर्शविली आहे अशाच विद्यार्थ्यांचे अर्ज संचालनालयाच्या लॉगीनवर मंजूरीसाठी पाठविण्यात यावेत.
शिष्यवृत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी शिष्यवृत्ती योजनांबाबतची सर्वसाधारण माहिती सर्व अधिनस्त कनिष्ठ महाविदयालयांना त्यांचे नोटीसबोर्डवर प्रसिध्द करणेबाबत तसेच महाविदयालयांनी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्ज करणेसाठी आवश्यक ती मदत करणेबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेसाठी आवश्यक कागदपत्रे (उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला इ.) त्वरीत प्राप्त होण्यासाठी तहसिलदार कार्यालयांमार्फत कनिष्ठ महाविदयालयात कैम्प आयोजित करण्यात यावेत, तसेच आधार लिंक बाबतही मा. जिल्हाधिकारी कार्यालयांशी संपर्क साधून कॅम्प आयोजित करण्याबाबत विनंती करण्यात यावी, झालेल्या कार्यशाळा, बैठका आयोजित केल्याबाबतचे इतिवृत्त वेळावेळी संचालनालयास सादर करावे. तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी खालील Flow Chart प्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर जिल्हास्तरावरील प्रलंबित अर्जाची पडताळणी करावी. तसेच ज्यांचेकडे महाडीबीटी पोर्टलवरील लॉगीन आयडी व पासवर्ड नसेल त्यांनी directorscheme.mh@gmail.com या मेल आयडीवर मेल करुन उपलब्ध करुन घ्यावा.
Mahadbtmahait.gov.in ---→ Institute/Dept./DDo Login ----→ Scrutiny ---→ Select Department and Scheme ----→ Scheme Wise Pending Application for Scrutiny-- ---→ View Application ---→ Scrutiny Remark---→ Declaration---→ Forward for Approval.
सोबत :
१. योजनांचे वार्षिक वेळापत्रक
२. शाळांकडून द्यावयाचा प्रमाणपत्राचा नमुना
३. योजनांची संक्षिप्त माहिती
(डॉ. महेश पालकर)
शिक्षण संचालक (योजना) महाराष्ट्र राज्य, पुणे-१
प्रत : विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना माहती व आवश्यक त्या कार्यवाहीस्तव
प्रत : माहितीस्तव सविनय सादर
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
२. मा. आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे १
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon