DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Employees cast validity Invalidated GR




Employees cast validity Invalidated Guidelines

Guidelines for employees whose cast validity is invalidated

अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या सेवेसंबंधी मार्गदर्शक सूचना देणेबाबत.

Regarding issuance of guidelines regarding classified service in majority posts of officers/employees whose caste claims of Scheduled Tribes have been invalidated

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: बीसीसी-११२४/प्र.क्र.४५/आरक्षण-२ (१६-ब) हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई ४०००३२. दिनांक : ०७ मे, २०२४.

वाचा :

१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.३०८/१६-ब, दि.२१.१२.२०१९.

२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. बीसीसी २०१९/प्र.क्र.५८१ ए/१६-ब, दि.१४.१२.२०२२.

शासन परिपत्रक:-

सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२१.१२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात ११ महिन्याकरीता अथवा ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
😀 हेही वाचायला आपल्याला आवडेल

☝☝☝☝☝
२. सदर अधिसंख्य पर्दाना दि.२१.१२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेला ११ महिन्याचा कालावधी संपल्यानंतर पुढील ११ महिने किंवा ते सेवेत राहिले असते तर ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते त्या दिनांकापर्यंत किंवा अभ्यास गटाच्या शिफारशी शासनास प्राप्त होऊन त्यावर शासनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत दि.२७.११.२०२०, दि.२८.१०.२०२१ व दि.१४.१०.२०२२ च्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

३. मंत्रिमंडळाच्या दि.२९.११.२०२२ च्या बैठकीतील निर्णयानुसार दि. १४.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये खालील आदेश देण्यात आले आहेत.

१) अधिसंख्य पदावरील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सेवा विषयक तसेच सेवा निवृत्ती विषयक लाभ देण्यात यावेत. यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण याचा लाभ मिळणार नाही. २) अधिसंख्य पदावर कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मानवतावादी दृष्टीकोनातून व त्यांनी केलेल्या सेवेचा विचार करुन १ दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा ११ महिन्याच्या कालावधीकरीता त्यांच्या सेवा, सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरु ठेवाव्यात. ४. अधिसंख्य पदावरील अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक ११ महिन्याच्या सेवेनंतर १ दिवसाचा तांत्रिक खंड असल्यामुळे वार्षिक वेतनवाढ तसेच, इतर सेवाविषयक लाभ अनुज्ञेय ठरत नाही. तसेच, अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती विषयक लाभांसाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावी.


WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करून जॉईन करा..👇🏻

WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now


शासन परिपत्रक क्रमांका बीसीसी-११२४/प्र.क्र.४५/आरक्षण-२ (१६-ब)

५. दि.२१.१२.२०१९ च्या शासन निर्णयामधील तरतूदीनुसार दि.२१.१२.२०१९ नंतर अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मंजूर केली असल्यास ती रद्द करण्यात यावी आणि वेतनवाढीमुळे देय ठरलेली रक्कम संबंधितांकडून वसुल करण्यात यावी. ६. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी स्पर्श करा  या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२४०५०७१२४०५९९९०७ असा आहे. सदर शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

SUDAM EKNATH ANDHALE

(सु. ए. आंधळे) 
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon