DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Religious Minority Pre Matric Sch Scheme

Religious Minority Pre Matric Scholarship Scheme

शिक्षण संचालनालय (योजना),

महाराष्ट्र राज्य, डॉ. आंबेडकर रोड

पुणे ४११००१

दूरध्वनी क्रमांक :-०२०/२६१२६७२६/२६१२३पर

दि. ०६/०५/२०२४

महाराष्ट्र शासन Government of Maharashtra

Regarding Preparation and Implementation of Pre-Matric Scholarship Scheme for Religious Minority Students 2024-25

Directorate of Education, (Scheme)

Maharashtra State,

17. Dr. Ambedkar Road, Pune - 411 001

E-mail Id:-directorscheme.mh@gmail.com

जा.क्र.शिसंयो/एन.एस.पी/२०२४-२५/यो-०२/०११२२


WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि इतर महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करून जॉईन करा..👇🏻
WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
२) शिक्षणाधिकारी (माध्यमिक/योजना)
३) शिक्षण निरिक्षक (उत्तर/ दक्षिण/पश्चिम) मुंबई
४) शिक्षणाधिकारी मुंबई मनपा, शिक्षण प्रमुख पुणे मनपा/शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी मनपा/नपा/नप (सर्व)
५) गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती (सर्व)

विषय :- धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सन २०२४-२५ साठी पूर्वतयारी व अंमलबजावणीबाबत.

संदर्भ :-
१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय दि. २३/०७/२००८ २. अल्पसंख्याक कार्यमंत्रालय केंद्रशासन यांचे पत्र क्र. SS-15/4/2021-Scholarship-MoMA दि. २९/११/२०२२ चे पत्र.
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना दि. २३ जुलै, २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात येते. ही शिष्यवृत्ती योजना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौध्द व जैन या इ. १ली ते १०वी च्या धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी आहे.
केंद्रशासनाच्या दिनांक २९.११.२०२२ रोजीच्या पत्रान्वये सदर योजना शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ पासून फक्त इयत्ता ९वी व इयत्ता १०वी साठी लागू राहील. परंतू अद्याप प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीच्या नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त नाही. केंद्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त होतच कळविण्यात येईल.
धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्याथी / विद्यार्थीनींचे जास्तीत जास्त अर्ज NSP 2.0 या पोर्टलवर भरण्याबाबत विविध माध्यामातून जाहिरात करुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच कार्यालयाच्या व शाळेच्या दर्शनीभागामध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावेत.
प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सन २०२४-२५ साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावयाची प्रक्रिया केंद्रशासनाकडून NSP 2.0 या पोर्टलवर सुरू करण्यात आल्यानंतर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
सन २०२४-२५ या वर्षासाठी सर्व इच्छूक तसेच मागील वर्षीच्या लाभार्थी विद्याथी / विद्यार्थीनींनी केंद्र शासनाच्या www.scholarships.gov.in (NSP 2.0 Portal) या संकेतस्थळावर आपले अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत. सन २०२४-२५ या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मिळालेली आहे अशाच विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Renewal student म्हणून भरावयाचे आहेत.
(नुतनीकरण विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध आहे.) तसेच पात्र नवीन इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Fresh student म्हणून भरावयाचे आहेत.
प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे वाटप केंद्रशासनाकडून DBT (Direct Benefit Transfar) मोडद्वारे विद्यार्थी / विद्यार्थीनींच्या आधार लिंक बँक खात्यावर होत असल्याने विद्याथी / विद्यार्थीनींचे आधार कार्ड असणे व विद्यार्थी / विद्यार्थीनींच्या बँक खात्यास लिंक असणे आवश्यक आहे.
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे

पात्रतेचे निकष

१. शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील इयत्ता ९वी  १०वी मध्ये शिकणारे / शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील पात्र विद्यार्थी / विद्यार्थिनी.
२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे.
३. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असावे. (सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.)
४. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
५. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
६. आधारकार्ड नंबर असणे आवश्यक आहे.
७. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे

१. विद्यार्थी शाळेत शिकत असल्याबाबतचे मुख्याध्यापकांचे बोनाफाईड प्रमाणपत्र.
२. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक.
३. धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.
४. पालकांच्या उत्पन्नाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
५. रहिवासाचा पुरावा
६. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत / चेकची प्रत.
७. विद्यार्थ्याचा स्वयंसाक्षांकित फोटोग्राफ.
८. आधारकार्ड.

सन २०२४-२५ मध्ये NSP 2.0 या पोर्टलवर एका विद्यार्थ्याला कोणतीही एका शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल. तसेच कॉमन स्टेंडर्ड अॅप्लिकेशन फॉर्म एन.आय.सी कडून विकसित करण्यात आलेला आहे. तसेच केंद्र शासनाकडून लाभार्थ्याच्या आधार लिंक बैंक खात्यामध्ये Aadhar base Payment System (ABPS) द्वारेच शिष्यवृत्ती जमा करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आधार हा ओळखीचा पुरावा म्हणून आवश्यक आहे. एन.एस.पी पोर्टलवर विद्यार्थ्याच्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी विद्यार्थ्याच्या लॉगिन मध्ये डॅशबोर्ड उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच वेळोवेळी SMS द्वारे अपडेट्स पाठविले जातील.
विद्याथी / विद्यार्थीनींचे नविन अर्ज रजिस्टर करण्यासाठी :-
१. एन.एस.पी पोर्टलवर Applicant Corner मध्ये New Registration या लिंकवर क्लिक करणे. २. सर्व मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा व Continue बटणावर क्लिक करा.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon