SSC Maharashtra State Board Examination Feb/Mar 2024 Geography Question Answer Paper
1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा :
(1) पँटानल या दलदलीच्या प्रदेशात ........................ आढळतात.
(i) कोंडोर
(ii) गुलाबी डॉल्फिन
(iii) महाकाय अॅनाकोंडा
(iv) मकाव
योग्य उत्तर - (iii) महाकाय अॅनाकोंडा
(2) लोकसंख्येच्या वितरणावर ........................ हा घटक परिणाम करतो.
(i) प्राकृतिक रचना
(ii) लिंग गुणोत्तर
(iii) साक्षरता
(iv) आयुर्मान
योग्य उत्तर - (i) प्राकृतिक रचना
(3) ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ........................ वाहतूक आढळते.
(i) हवाई
(ii) जल
(iii) रस्ते
(iv) लोह
योग्य उत्तर - (iii) रस्ते
(4) क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ........................ साहित्याची आवश्यकता असते. या
(i) खुर्ची
(ii) फळा
(iii) पाण्याची बाटली
(iv) प्रश्नावली
योग्य उत्तर - (iv) प्रश्नावली
2. वेगळा घटक ओळखा :
(1) ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये -
(i) रिओ दी जनेरीओ
(ii) पराईबा
(ⅲ) आमापा
(iv) आक्रे
योग्य उत्तर - (iv) आक्रे
(2) भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश -
(i) पश्चिम राजस्थान
(ii) पश्चिम घाट
(iii) मेघालय
(iv) अरुणाचल प्रदेश
योग्य उत्तर - (i) पश्चिम राजस्थान
(3) अॅमेझॉन नदीच्या उपनद्या -
(i) पारू नदी
(ii) पुरुस नदी
(iii) पॅराना नदी
(iv) जुरूका नदी
योग्य उत्तर - (iii) पॅराना नदी
(4) भारताच्या द्वीपकल्पीय प्रदेशात आढळणारे प्राणी -
(i) गवा
(ii) हरिण
(iii) काळवीट
(iv) याक
योग्य उत्तर - (iv) याक
३. थोडक्यात टिपा लिहा (कोणतेही दोन) :
(1) परतीचा मानसून
योग्य उत्तर -
(i) भारतात प्रामुख्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. नैऋत्य
मोसमी वारे भारताच्या दक्षिण
भागातून भारतात प्रवेश करतात व टप्प्याटप्प्याने
उत्तरेकडे वाहत जातात.
(ii) भारताच्या मुख्य भूमीवरून वाहणारे नैऋत्य मोसमी वारे हे हिमालयाच्या
शिवालिक व हिमाचल
रांगांद्वारे अडवले जातात तेथून हे वारे परत हिंदी महासागरावर
फिरतात.
(iii) ईशान्य दिशेकडून वाहणाऱ्या या ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही
भारताच्या द्वीपकल्पीय भागांत पुन्हा
मान्सून परतीचा पाऊस पडतो.
(2) भारतातील पानझडी वने
योग्य उत्तर -
(१) १००० मिमी ते २००० मिमी
पर्जन्याच्य प्रदेशांत पानझडी वने आढळतात
(२) भारताच्या बहुतांश भागात
पर्जन्याचे प्रमाण १ मिमी ते २००० मिमी आहे.
(३) उन्हाळ्यात बाष्पीभवनाने पाणी कमी
होऊ नये म्हणून भारताच्या बहुतांश भागात कोरड्या ऋतूत
(उन्हाळ्यात) वनस्पतीची
पाने गळून पडतात परिणामी भारतात पानझडी वने आढळतात
(३) विसाव्या शतकात ब्राझीलने विविध स्वरूपांच्या जागतिक वित्तीय
समस्यांना तोंड दिले आहे व त्यातून
हा देश सावरला आहे.
(3) ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी
योग्य उत्तर -
(१) ब्राझील देशात सुमारे तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांची
राजवट होती. या देशास ७ सप्टेंबर
१८२२ रोजी स्वातंत्र्य प्राप्त झाले.
(२) १९३० पासून १९८५ पर्यंत ब्राझील देशात लष्करी राजवट होती. १९८५
पासून या देशाने राष्ट्रपती
नियंत्रित प्रजासत्ताक शासनप्रणालीचा अवलंब केला आहे.
Also read -
⏫⏫⏫⏫⏫⏫⏫
4. (अ) ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा (कोणतेही चार) :
(1) ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
योग्य उत्तर - पिको दि नेब्लीना
(2) साओ फ्रान्सिस्को नदी
योग्य उत्तर -
(3) माराजों बेट
योग्य उत्तर -
(4) पंपास
योग्य उत्तर -
(5) विषुववृत्त
योग्य उत्तर -
(6) ब्राझीलची राजधानी
योग्य उत्तर -
(आ) खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा (कोणतेही चार) :
प्रश्न :
(1) वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
योग्य उत्तर - भारत राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख बंदरे
(2) कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
योग्य उत्तर - उत्तर भारतीय मैदान
(3) पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
योग्य उत्तर - कोची मुंबई पोरबंदर
(4) पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
योग्य उत्तर - पश्चिम पूर्व महामार्ग
(5) कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.
योग्य उत्तर - न्यू मूर बेट
5. भौगोलिक कारणे लिहा (कोणतेही दोन) :
(1) हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.
योग्य उत्तर -
i) हिमालयाच्या उंच भागात तापमान अतिशय कमी असते. काही ठिकाणी तापमान 0
से पेक्षाही
कमी आढळते. हिमालयात उंच भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात.
ii) अतिथंड हवामान व बर्फाचे थर यांमुळे हिमालयात वनस्पतींची मोठ्या
प्रमाणात वाढ होत नाही.
iii) उन्हाळ्यात हिमालयातील तापमान तुलनेने अधिक असते व या प्रदेशातील
बर्फही वितळू लागते. त्यामुळे हिमालयात उन्हाळ्यात हंगामी फुलझाडे उगवतात, परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश
होतो. अशा प्रकारे हिमालया च्या उंच भागात वनस्पत संख्या विरळ असते.
(2) ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.
योग्य उत्तर -
i) ब्राझीलच्या
किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानात फारसा फरक पडत नाही.
ii) या
प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊर्ध्व दिशेने वहन होते
(3) किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत प्रदेशात अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या अधिक विरळ
होत जातात.
योग्य उत्तर -
(१) ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात तापमान तुलनेने अधिक असते.
(२) या भागातील पर्जन्याचे प्रमाणही तुलनेने जास्त असते. या प्रदेशात
रोगट स्वरूपाचे हवामान आढळते.
(३) अॅमेझॉन नदीखोऱ्याच्या प्रदेशात घनदाट सदाहरित विषुववृत्तीय
वर्षावनांमुळे हा भाग अतिशय दुर्गम बनला आहे.
(४) या भागातील नैसगिक साधनसंपत्तीच्या शोधावर व वापरावर निसर्गतःच
मर्यादा पडतात.
(५) या भागात वाहतुकीच्या सोईसुविधाही मर्यादित स्वरूपात आढळतात.
(६) रोगट हवामान, प्रदेशाची
दुर्गमता, वाहतुकीच्या
सुविधांचा अभाव इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे ब्राझील मधील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ व विखुरलेल्या मानवी वस्त्या आढळतात.
(4) भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे.
योग्य उत्तर -
i) खाऱ्या
पाण्यातील आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत भारत अग्रणी आहे.
ii) भारताला
एकूण सुमारे ७५०० किमीचा सागरी किनारा लाभला आहे. यो किनाऱ्यालगत मासेमारी केली
जाते. मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास ४०%
आहे.
iii) आहारातील
एक घटक, रोजगारनिर्मिती, पोषणस्तर वाढवणे आणि परकीय चलन
मिळवण्या करिता मत्स्यव्यवसायाचा उपयोग होतो
iv) देशाच्या
एकूण मत्स्य व्यवसायापैकी सुमारे ६०% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातौल
मासेमारीतून मिळते.
v) केरळ, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील
किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा घटक
आहे.
6. (अ) खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
भारत - नागरीकरणाचा कल
(1961-2011)
वर्ष नागरीकरण % (टक्के)
1961 18.0
1971 18.2
1981 23.3
1991 25.7
2001 27.8
2011 31.2
प्रश्न :
(1) 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते?
योग्य उत्तर - 18.0%
(2) कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते?
योग्य उत्तर - 1961 ते 1971
(3) 1991 साली नागरीकरण किती टक्के झाले होते?
योग्य उत्तर - 27.7%
किंवा
(आ) खालील आलेखाचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
भारत आणि ब्राझील
राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या
प्रश्न :
(1) आलेखात कोणती क्षेत्रे दर्शविलेली आहेत?
योग्य उत्तर - तृतीयक द्वितीयक प्राथमिक
(2) भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे?
योग्य उत्तर - तृतीयक
(3) ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
योग्य उत्तर - १०%
(4) दोन्ही पैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे?
योग्य उत्तर - ब्राझील
(5) राष्ट्रीय उत्पादनात तृतीयक क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे?
योग्य उत्तर - भारत
(6) ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे?
योग्य उत्तर - द्वितीयक
खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा (कोणतेही दोन ):
(1) कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
योग्य उत्तर -
(i) या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
(ii) कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती?
(iii) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची
आवश्यकता असते?
(iv) कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनास् लागणारा कच्चा माल कोणत्या
ठिकाणाहून आणला जातो?
(v) कारखान्यात
उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो?
(vi) कारखान्यातील
कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते ?
(vii) पर्यावरणास
हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात ?
(viii) कारखान्यातील
कामगारांचा विशिष्ट पोशाख आहे का ?
(ix) कारखान्याची
संदेशवहनाची साधने कोणती आहेत?
(x) कारखान्यातील
कचऱ्याची व्यवस्था कशी केली जाते ?
(xi) कारखान्यात
सांडपाण्याची व्यवस्था आहे का ?
(2) ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा.
योग्य उत्तर -
(१) ब्राझीलला सुमारे 7400 किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या
किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व
पूर्व किनारपट्टी असे दोन विभाग केले जातात.
(२) उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्ते
पर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिकचा
किनारा म्हणून ओळखला जातो. तेथन पढे टक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा म्हणून ओळखला जातो.
(३) ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर अॅमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या
येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ उपसागर व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजॉ हे किनारी बेट अॅमेझॉन व टोकँटिस या नद्यांच्या दरम्यान तयार झाले
आहे.
(४) ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही
मोठ्या नद्या येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक
महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय
वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवॉळकट्टे आणि प्रवाळबेटे यांमुळे
रक्षण होते.
(3) भारतातील लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
योग्य उत्तर -
अ) लोकसंख्येवर परिणाम करणारे अनुकूल घटक : प्राकृतिक रचना, सागरी
सान्निध्य, समशीतोष्ण
हवामान नवीन शहरे आणि नगरे, खनिजे, शेतीस उपयुक्त जमीन.
ब) लोकसंख्येवर परिणाम करणारे प्रतिकूल घटक : रस्त्यांची कमतरता,
उद्योगधंदयांची उणीव,
उष्ण कटिबंधीय आर्द्र वने, निम-शुष्क हवामान.,
वाळवंट, घनदाट
वनक्षेत्र
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon