DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

PMeVidya DTH TV Available on SCERT YT CH

PMeVidya DTH TV Available on SCERT YT CH



महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र

७०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

संपर्क क्रमांक (०२०) २४४७ ६९३८

E-mail: itdept@maa.ac.in

जा.क्र. राशैसंप्रपम/आय.टी./PMeVidya DTH cha. /२०२४/०३४१९

दिनांक : १५/०७/२०२४

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),

२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व).

३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),

४. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका,

५. शिक्षणाधिकारी, प्राथमिक/माध्यमिक/योजना (सर्व),

६. शिक्षण निरिक्षक (पश्चिम, दक्षिण, उत्तर) मुंबई,

७. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी म.न.पा. (सर्व),

विषय :- PMeVidya शैक्षणिक वाहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, अधिकारी यांना उपलब्ध करून देणेबाबत...

संदर्भ :-

१. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र File No.२०.१९/२०२२-२३/eVidya/CIET

October ३,

२०२२.

२. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र File No.२०.१९/२०२२-२३/eVIDYA/CIET

January १०, २०२३.

३. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र F. No.-२०.१९/२०२३-२४/CIET/eVidya

Cell ०४th May, २०२३.

४. एनसीईआरटी, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक २९/०७/२०२३ रोजी

झालेला सामंजस्य करार (MoU).

५. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांची मान्य टिपणी दिनांक १०/०६/२०२४.

उपरोक्त संदर्भीय क्र. १ अन्वये देशातील अनेक राज्यांमध्ये (उदा. केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात)

महोदय,

विद्यार्थ्यांसाठी ई- शैक्षणिक साहित्याचे प्रक्षेपण राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या स्वतःच्या शैक्षणिक DTH

वाहिनी मार्फत करण्यात येते. उपरोक्त संदर्भीय क्र. २ व ३ अन्वये राज्यासाठी ५ शैक्षणिक DTH वाहिन्या मंजूर

झालेल्या आहेत. उपरोक्त संदर्भीय क्र. २ व ३ पत्रातील सूचनांनुसार सध्या ५ शैक्षणिक वाहिन्यांवर प्रस्तुत

वाहिन्यांवर इयत्ता ९ वी ते १२ वी, शिष्यवृत्ती व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास यासाठी आवश्यक ई-साहित्य

प्रक्षेपणासाठी दिनांक २९/०७/२०२३ पासून प्रक्षेपण करण्यात आलेले आहे,

उपरोक्त संदर्भ क्र. ०५ नुसार दिनांक ०५ ते ०७ जून २०२४ दरम्यान आयोजित कार्यशाळेत केंद्र शासनाच्या

सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी सध्या ५ शैक्षणिक वाहिन्यांवर प्रक्षेपणासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले
अ. क्र.
वाहिनी क्र.
इयत्ता/ क्षेत्र

प्रक्षेपणासाठी आशय

माध्यम

वेळ

०१ PM VIDYA_MH११३ _०१_MAHARASHTRA 
इ. १ ली, २ री, ३ री, ४ थी 

सर्व शालेय विषय 
मराठी 

स. ९ ते १२ नियमित प्रक्षेपण. दर ३ तासात दिवसभर चक्राकार पुनर्प्रक्षेपण पद्धतीने

०२ PMEVIDYA_MH११४ _०२_ MAHARASHTRA

इ. ५ वी, ६ वी, ७ वी

सर्व शालेय विषय

मराठी

स. ९ ते १२ नियमित प्रक्षेपण. दर ३ तासात दिवसभर चक्राकार पुनर्प्रक्षेपण पद्धतीने

०३ PMeVIDYA_MH११५-०३ MAHARASHTRA

इ. ८ वी, ९ वी, १० वी

सर्व शालेय विषय

मराठी

स. ९ ते १२ नियमित प्रक्षेपण. दर ३ तासात दिवसभर चक्राकार पुनर्प्रक्षेपण पद्धतीने

०४ PMeVIDYA_MH११६०४ MAHARASHTRA

इ. ११ वी, १२ वी

कला/ विज्ञान/वाणिज्य

मराठी/ इंग्रजी

स. ९ ते १२ नियमित प्रक्षेपण. दर ३ तासात दिवसभर चक्राकार पद्धतीने पुनर्प्रक्षेपण

०५ PMEVIDYA_MH११७ _०५_ MAHARASHTRA

CPD/इ. ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती

इ.५ वी, ८ वी शिष्यवृत्ती, कार्यशाळा, प्रशिक्षण, सुलभीकरण

मराठी/ इंग्रजी

स. ९ ते १२ नियमित प्रक्षेपण. दर ३ तासात दिवसभर चक्राकार पुनर्प्रक्षेपण पद्धतीने आहे, प्रस्तुत नियोजन सन २०२४-२५ अंतर्गत दिनांक १५ जून २०२४ ते ३०/०४/२०२५ दरम्यान लागू राहणार आहे.
संदर्भ क्र. ५ नुसार राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरुपात ५ शैक्षणिक DTH वाहिन्यावर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही पूर्ण करून महिनावार नियोजन करण्यात आलेले आहे. सध्या दिनांक १५/०६/२०२४ पासून भारत सरकारने BISAC संस्था, अहमदाबाद यांच्या मदतीने वरील ०५ शैक्षणिक DTH वाहिन्यावर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही सुरु केलेली आहे. आपणास प्रस्तुत ०५ शैक्षणिक चॅनेल पुढीलप्रकारे Dish Tv, DTH Tv व यु-ट्यूब द्वारा लाभ घेण्यास उपयुक्त असतील, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,

उपरोक्त ०५ वाहिन्या आपणास खालील यु-ट्यूब लिंक वर क्लिक करून ही पाहण्यास उपलब्ध असतील. आपण वाहिनीनिहाय पुढीलप्रमाणे यु-ट्यूब द्वारा आशय बघून सोबत दिलेल्या ई-मेलवर आपले बहुमुल्य अभिप्राय देवू शकतात.
वाहिनी निहाय यु-ट्यूब लिंक व अभिप्रायसाठी ई-मेल २०२४-२५
उक्तप्रमाणे राज्यासाठी मंजूर ०५ PMeVidya शैक्षणिक वाहिनीसाठी सन २०२४-२५ अंतर्गत इयत्ता १ ली ते १२ वी, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास व इ. ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती विषयासाठी दिनांक १५/०६/२०२४ ते ३०/०४/२०२५ दरम्यान महिनानिहाय प्रपत्रे व मासिक वेळापत्रक करून कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक, अधिकारी व शिक्षण तज्ज्ञ यांना उपरोक्त ०५ शैक्षणिक चॅनेलचा लाभ घेण्यास आपल्या स्तरावरून आवाहन करण्यात यावे. याबाबत काही अडचणी आल्यास उपरोक्त ई-मेल वर सविस्तर लिहिण्यास आदेशित करण्यात यावे.

सोबत - माहे जून २०२४ वेळापत्रक

आपला विश्वासू,

(राहूल रेखावार, भा. प्र. से.) संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.



Also Read 👇 

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ०८ सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे ४११०३०

संपर्क क्रमांक (०२०) २४४७ ६९३८

E-mail: itdept@maa.ac.in

जा.क्र.: राशैसंप्रपम/आयटी/eVidyadthytube/२०२४/०१५०१


दि. २२/०३/२०२४.


प्रति,

१. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

२. शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका, मुंबई

३. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/योजना) सर्व

४. शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम/उत्तर/दक्षिण)

५. प्रशासन अधिकारी, मनपा/नपा (सर्व)


विषय : - PMeVidya DTH TV वाहिन्यावरील प्रसारण परिषदेच्या युट्यूब चॅनल वर उपलब्ध असल्याबाबत....


संदर्भ :-

१. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र जा.क्र. २०.१९/२०२२-२३/eVidya/CIET दि. ३/१०/२०२२.

२. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र जा.क्र. २०.१९/२०२३-२४/CIET/eVidya Cell दि. ४ मे २०२३.

३. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र जा.क्र. २०.१९/२०२३-२४/CIET/eVidya Cell दि.१०/१/२०२३.

    उपरोक्त संदर्भ पत्रानुसार महाराष्ट्र राज्यास एकूण ५ PMeVidya DTH TV वाहिन्या प्राप्त आहेत. या वाहिन्यांवरून इ. ९ वी ते १ २वी आणि शिष्यवृत्तीसाठी अध्यापनाचे प्रक्षेपण केले जात आहे. या पाचही DTH TV वाहिन्यांचे प्रक्षेपण विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सुविधेसाठी प्रस्तुत परिषदेच्या युट्यूब चॅनलवरूनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. युट्यूब चॅनल व प्रक्षेपण लिंक खालीलप्रमाणे,

ALSO READ - 

⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬

युट्यूब चॅनलचे नाव




⏩ SCERTM C114   लाइव्ह प्रक्षेपण लिंकला जोडले जाण्यासाठी या ओळीला स्पर्श करा





⏩ SCERTM C116   लाइव्ह प्रक्षेपण लिंकला जोडले जाण्यासाठी या ओळीला स्पर्श करा



⏩ SCERTM C117   लाइव्ह प्रक्षेपण लिंकला जोडले जाण्यासाठी या ओळीला स्पर्श करा



तरी, याबाबत आपणास कळविण्यात येते की, उपरोक्त युट्यूब चॅनल व संबंधित लिंक आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांपर्यंत पोहोच होतील, तसेच सर्व संबंधित घटक सदर चॅनल सबस्क्राइब करतील व या चॅनल वर उपलब्ध करून दिलेल्या अध्यापनाचा जास्तीत जास्त लाभ घेतील याबाबत आपल्या अधिनस्थ यंत्रणेशी पत्रव्यवहार करून कार्यवाही करावी.
राहूल रेखावार (भा.प्र.से.) 
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon