DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

SSC Board Exam 2024 History Ques Answer

SSC Board Exam 2024 History Ques Answer

SSC Board Exam 2024 Question Answer History And Political Science

SOCIAL SCIENCES (73) HISTORY & POLITICAL SCIENCE-PAPER 

(REVISED COURSE)

2024 III 22 Time: 2 Hours Max. Marks: 40


1. (अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा : गुण 3

(1) मधुरा शिल्पशैली ....................... काळात उदघाला आली.

(अ) कुशाण (ब) गुप्त (क) राष्ट्रकूट (ड) मौर्य


योग्य उत्तर -  (अ) कुशाण


(2) महाबळेश्वर जवळील भिलार हे ...................... गाव महणून प्रसिद्ध आहे.

(अ) पुस्तकांचे (ब) वनस्पतींचे (क) आंब्याचे (ड) किल्ल्यांचे

 
योग्य उत्तर - (अ) पुस्तकांचे


(3) "मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,"  .......................असे मत या तत्त्वज्ञाने मांडले
आहे.

(अ) व्हॉल्टेअर (ब) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल (क) लिओपॉल्ड व्हॉन रांके  (ड) कार्ल मार्क्स


योग्य उत्तर - (ड) कार्ल मार्क्स
 

(ब) पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :  गुण 3

                        गट 'अ'                         गट 'ब' 
1       (i) कुटियट्टम                    - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा

         (ii) रम्मन                         - पश्चिम बंगालमधील नृत्य
       
         (iii) रामलीला                  - उत्तर भारतातील रामायणाचे परंपरागत सादरीकरण

         (iv) कालबेलिया              - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य


योग्य उत्तर -  (ii) रम्मन               - पश्चिम बंगालमधील नृत्य


(2)    (1) दशावतार                    - त्यागराज

(ii) खंजिरी                               - भजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

(ⅲ) कीर्तन                                - संत नामदेव

(iv) भारूड                                - संत एकनाथ


योग्य उत्तर -  (1) दशावतार            - त्यागराज


(3) (1) जेम्स मिल                    - स्त्रीवादी इतिहासकार

(ii) फ्रेडरिक मॅक्सम्युलर             - प्राच्यवादी इतिहासकार

(m) न्या. महादेव गोविंद रानडे    - राष्ट्रवादी इतिहासकार

(iv) दामोदर कोसंबी                  - मार्क्सवादी इतिहासकार


योग्य उत्तर -  (3) (1) जेम्स मिल                       - स्त्रीवादी इतिहासकार


2. (अ) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन ) :

(1) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

पर्यटनाचे प्रकार
-------------------------
-------------------------
-------------------------
-------------------------

योग्य उत्तर - 

धार्मिक पर्यटन

कृषी पर्यटन

सांस्कृतिक पर्यटन

भौगोलिक पर्यटन

(2) पुढील कालरेषा पूर्ण करा :

भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळे

      इ. स. -------            1987           -------              2014 
                           
     <--------|--------------|------------|-----------------|------>

  स्थळे      काझीरंगा        ---------       पश्चिम घाट       ---------
              राष्ट्रीय उद्यान


योग्य उत्तर - 

      इ. स. 1985           1987          2012         2014 
                           
     <-------- |--------------|------------|-----------------|------>

  स्थळे      काझीरंगा        सुंदरबन      पश्चिम घाट      ग्रेट हिमालयन पार्क
              राष्ट्रीय उद्यान    राष्ट्रीय उद्यान3) पुढील तक्ता पूर्ण करा :


 

ललित

भारूड

गुणवैशिष्ट्ये

 

 

उदाहरणे

 

 


योग्य उत्तर - 

(3) पुढील तक्ता पूर्ण करा :

 

ललित

भारूड

गुणवैशिष्ट्ये

१) उत्सवप्रसंगी देवतेकडे 'मागणेमागीतले जाते. (२) नाट्यप्रवेशाप्रमाणे राम-कृष्णाच्या कथा सादर करणे.

(१) आध्यात्मिक व नैतिक शिकवण 

(२) सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते.

उदाहरणे

गोवाकोकण या भागांत मोठ्या प्रमाणात प्रचलित.

 (१) ज्ञानेश्वरनामदेव यांची भारुडे. 

(२) संत एकनाथांची भारुडे सर्वांत लोकप्रिय आहेत.


(ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) : 4

(1) स्थळ कोश

योग्य उत्तर - 

(१) भूप्रदेशाच्या आधारेच इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात.

(२) महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद 'स्थानपोथी' या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.

(३) सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी 'प्राचीन भारतीय स्थलकोशा'ची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्ये, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी फारशी-ग्रीक साहित्य यांतील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे.

(४) स्थल कोशांमुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास कळतो. स्थल कोश हे इतिहासलेखनाचे महत्त्वाचे साधन आहे.

Also Read -


⏫⏫⏫⏫⏫⏫⏫⏫

(2) प्राच्यवादी इतिहासलेखन

योग्य उत्तर - 

(१) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना 'प्राच्यवादी अभ्यासक' असे म्हणतात.

(२) या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहासलेखन केले. या लेखनाला 'प्राच्यवादी इतिहासलेखन' असे म्हणतात. (३) या प्राच्यवादी अभ्यासकांत छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले.   


(3) वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य

योग्य उत्तर - 

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले.

(१) लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली.

(२) सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला.

 (३) पाश्चात्त्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवूनसमाजप्रबोधनाचे काम केले.

(४) तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन ): 4

1) फुको त्यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्त्व' असे म्हणत असत.

योग्य उत्तर - 
(१) मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धती चुकीची ठरवली.

(२) त्यांच्या मते, अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे, हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसते.

(३) भूतकाळातील स्थित्यंतरांचे, म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्त्वाचा प्रयत्न असतो.

(४) फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला; म्हणून त्यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्त्व' असे म्हटले आहे.


2) चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.

योग्य उत्तर - 

(१) कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साहाय्याने रामायण- महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे 'चित्रकथी परंपरा' होय.

(२) ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यान्पिढ्या टिकवून ठेवली आहे.

(३) चित्रकथी कुटुंबांमध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत.

(४) नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथीसारख्या या परंपरांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे; कारण या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून, तो आपला वैभवशाली वारसा आहे.


(3) खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो.

योग्य उत्तर - 

मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे

खेळणी ही इतिहास- लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे.

(१) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.

(२) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून

किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.

(३) उत्खननात पाँपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन

संबंधांवर प्रकाश पडतो.

(४) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार

आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.

(4) जागतिक वारस्याच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते.

योग्य उत्तर - 

(१) पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती, परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्यांविषयी आपल्या मनात आपुलकी असते.

(२) हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्याचे संवर्धन होणे गरजेचे असते.

(३) काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये.

(४) यासाठी त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक शैक्षणिक व्हिडिओज तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा यांची यादी 'युनेस्को' या जागतिक संघटनेकडून जाहीर केली जाते. 


4. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :

मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना 'पद्मभूषण' या सन्मानाने विभूषित करण्यात आले.

प्रश्न :

(1) 'हॉकीचे जादूगार' कोणाला म्हणतात?

योग्य उत्तर - 

उत्तर : मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचे जादूगार' म्हणतात.


(2) भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो?

योग्य उत्तर - 

भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय क्रीडादिवस' म्हणून साजरा केला जातो.

(3) मेजर ध्यानचंद यांची ऑलिंपिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा.

योग्य उत्तर - 

१) मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते.

२) नेतृत्वाखाली १९३६ साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.

5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) : 

(1) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय?

योग्य उत्तर - 

(१) स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय.

(२) इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता.

(३) त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमाँ-द-बोव्हा हिने मांडली.

(४) त्यानंतर स्त्रीवादी इतिहासलेखन हा विचार स्वीकारला गेला.

(५) स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन्स, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वांवर सविस्तर संशोधन सुरू झाले.

(६) १९९० नंतर 'स्त्री' हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनालाच 'स्त्रीवादी इतिहासलेखन' असे म्हणतात.


(2) ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे?

योग्य उत्तर - 

ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे. संग्रह केलेल्या ग्रंथांचे व्यवस्थापन होणे महत्त्वाचे असते.

(१) ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात.

(२) कोणते पुस्तक नेमके कोठे ठेवले आहे, ते त्वरित सांगता येऊ शकते.

(३) त्यामुळे पुस्तकांचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकांचा दोन्हींचाही वेळ फुकट जात 

नाही.

(४) उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धनही चांगल्या प्रकारे होते. पुस्तकांचा विद्ध्वंस होत नाही.

(५) व्यवस्थापन जाणकार असेल; तर ग्रंथालयात उत्तम दर्जाच्या ग्रंथांचे संकलन केले जाते. त्यामुळे 

चोखंदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात.

(६) एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकांचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकांना ग्रंथालयात स्थान 

मिळते.

(७) उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध 

होऊ शकतात.

(3) कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा 

योग्य उत्तर - 

विविध कलाक्षेत्रांत व्यवसायाच्या पुढील संधी उपलब्ध असतात

(१) कलेच्या अभ्यासकांना संग्रहालये, अभिलेखागारे, ग्रंथालये, पुरातत्त्वीय संशोधन आणि भारतीय विद्या 

या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात.

(२) कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात.

(३) औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूंच्या खरेदी-विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची 

आवश्यकता असते.

(४) चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य, कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाशयोजना इत्यादी 

कलाकारांची आवश्यकता असते.

(५) मुद्रणक्षेत्रात तसेच घरसजावटीच्या साहित्यनिर्मितीत कला- क्षेत्रातील जाणकारांची गरज असते.

(६) दागदागिने, धातूंच्या वा लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडी कलापूर्ण 

वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रांतही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध असतात.


(4) दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा.

योग्य उत्तर - 

(१) दशावतारी नाटक हे विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित असते. पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा 

यांच्या साहाय्याने ही नाटके सादर केली जातात.

(२) देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या 

कृतीने होतो.

(३) नाटकातील बहुतेक भाग पदयमय असून, काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीन बोलतात.

(४) महाराष्ट्रातील लोकनाट्याचाच हा एक प्रकार आहे. शेतीत पीकपाणी आल्यावर सुगीच्या दिवसांत 

कोकण व गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग -गावोगावी केले जातात.


(ब) दिलेल्या सूचनेनुसार कृती करा (कोणतेही एक ):

(1) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण कराः

निवडणूक प्रक्रिया

मतदारसंघाची निर्मिती
            
----------------------
            ↓

उमेदवारांकडून नामांकन पत्र व त्यांच्या अर्जाची छाननी
            
----------------------
            
प्रत्यक्ष मतदान
            
----------------------
            ↓
निवडणुकांचे निकाल
----------------------
            ↓

योग्य उत्तर - 

निवडणूक प्रक्रिया

मतदारसंघाची निर्मिती
            

मतदार याद्या निश्चिती

            ↓
उमेदवारांकडून नामांकन पत्र व त्यांच्या अर्जाची छाननी
            

निवडणूक प्रचार

            
प्रत्यक्ष मतदान
            

मतमोजणी

            ↓
निवडणुकांचे निकाल+
            ↓

निवडणकीसंबंधीच्या वादांचे निराकरण


(2) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :

भारतीय लोकशाही समोरील आव्हाने
-------------------------
-------------------------
-------------------------
-------------------------

योग्य उत्तर - 

भारतीय लोकशाही - समोरील आव्हाने

वाढता उग्रवाद

जमातवाद

नक्षलवाद

भ्रष्टाचार

राजकारणाचे गुन्हेगारीकरण

सामाजिक आव्हाने

दहशतवाद

9.पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तर लिहा (कोणतेही एक ):

(1) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?

योग्य उत्तर - 

(१) ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाबी वा ते

विचार नष्ट करणे.

(२) व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे.

(३) जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेद न करता

समान वागणूक देणे.

(४) सर्वांना विकासाची समान संधी देणे.


(2) मध्यावधी निवडणुका म्हणजे काय?

योग्य उत्तर 

निवडून आलेलसरकार मुदत पूर्ण होण्याआधीच अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. पर्यायी सरकार स्थापनकरण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याआधीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्यामध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात.

6. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा : 2

(1) 73 व्या व 74 व्या संविधान दुरुस्तीने खूप मोठी वाढ झाली. च्या अधिकारात

        (अ) विधानसभा

        (ब) स्थानिक शासनसंस्था

        (क) लोकसभा

        (ड) राज्यसभा

योग्य उत्तर - (ब) स्थानिक शासनसंस्था

(2) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे

        (अ) धार्मिक संघर्ष

        (ब) नक्षलवादी कारवाया

        (क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे

        (ड) गुंडगिरीला महत्त्व

योग्य उत्तर -  (क) लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे

7 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन ): 4

(1) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात.

योग्य उत्तर -  हे विधान बरोबर आहे; कारण

(१) काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्यआपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो.

(२) एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. हांडे

(३) निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले, तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या

मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो; म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी 

पोटनिवडणूक घेतो.

(2) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते.

योग्य उत्तर -  हे विधान चूक आहे;

कारण (१) १९८९ च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व 

राज्यात अधिकारावर आली.

(२) पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन है पक्ष सरकार चालवू लागले.

(३) १९७७ चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या 

प्रकारे काम करीत आहेत. म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते, हा समज खोटा ठरला आहे.


(3) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली.

योग्य उत्तर - 

हे विधान बरोबर आहे; कारण 

(१) अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांदर परिणाम होत असतो. 

(२) भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक 

किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड दयावे लागते. 

(३) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात 

आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 'ग्राहक चळवळ

अस्तित्वात आली.

8. (अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक): 2 

(1) राजकारणाचे गुन्हेगारीकरण

योग्य उत्तर - 

(१) राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे, म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होय. हे 

गुन्हेगारीकरण विविध मार्गांनी होत असते. 

(२) पैसा आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात. 

(३) निवडणुकांच्या काळात हिंसाचार घडवून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना 

निवडणुकीचे तिकीट देतात. 

(४) असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात. आर्थिक घोटाळे करतात. विरोधकांना त्रास 

देतात. काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले की लोकशाही कमकुवत होते.

(2) हक्काधारित दृष्टिकोन
.
 योग्य उत्तर - 

(१) स्वतंत्र भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी,

प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेवर आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले.

(२) लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकांकडे केवळ 'लाभार्थी' म्हणून पाहण्याचा सुरुवातीला

या सरकारांचा दृष्टिकोन होता.

(३) मात्र इ.स. २००० नंतरच्या काळात मात्र 'नागरिकांचा हक्क' ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ

लागल्या.

(४) म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्नसुरक्षेचा केवळ लाभ व्हावा; म्हणून कायदे

केले गेले नाहीत; तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेलाच 'हक्काधारित दृष्टिकोन' असे म्हणतात.


Previous
Next Post »

1 comments:

Click here for comments
March 22, 2024 at 4:58 PM ×

Very nice

Congrats bro नितीन परीट you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon