DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Kala krida ICT Teachers Posts Sanction


Kala krida ICT Shikshak pade manjuri gr

Maharashtra Govt Decided to sanction posts of art sports Music Work Experience ICT subjects Teachers

Kala krida sangeet ICT karyanubhav Vishesh Vishay shikshak padana manjuri

Govt Decided to sanction posts of art sports Music Work Experience ICT Teachers

Maharashtra Government's education department decided to sanction posts of art sports Music Work Experience ICT Teachers

क्रीडा कला संगीत कार्यानुभव आयसीटी विषयांच्या शिक्षक पदांना मंजुरी
क्रीडा कला-संगीत कार्यानभव शिक्षकांना मंजुरी

पदांना नऊ वर्षांनी संचमान्यता भरतीचा मार्ग मोकळा

Sports Art Music Work Experience Approval for Teacher Posts of ICT Subjects
क्रीडा, कला-संगीत, कार्यानुभव- आयसीटी या विषयांच्या शिक्षकपदांना शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात संच मान्यतेनुसार पुन्हा एकदा या पदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडा, कला-संगीत, कार्यानुभव-आयसीटी या विषय शिक्षकांच्या पदांचे संचमान्यतेत तब्बल नऊ वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्यातील कला-क्रीडा शिक्षकांत आनंदाची लाट निर्माण झाली आहे.

अधिक जानून घ्या 


राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारुळकर यांच्या नेतृत्वाखाली शासन दरबारी याबाबत आवाज उठवण्यात आला होता. यात आंदोलनाच्या माध्यमातून क्रीडा व कला शिक्षकांच्या पदांचा संचमान्यतेत समावेश करावा आणि ही पदे भरावीत अशी मागणी शिक्षकांनी केली होती. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षक आमदार किशोर दराडे यांनीदेखील विधान परिषदेच्या सभागृहात हा प्रश्न मांडला होता. अखेर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या
शाळांतील संचमान्यतेत बदल करणारा आणि संचमान्यतेत सुधारित निकष विहित करणारा निर्णय जाहीर केला.
काही शाळांत विद्यार्थी संख्या पुरेशा प्रमाणात असूनही केवळ संचमान्यतेत पद उपलब्ध नसल्याने क्रीडा व कला सध्या शिक्षकांची पदभरती रखडली होती. आता या शाळांत शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.

अशी आहे प्रक्रिया

पूर्णवेळ शिक्षकांच्या पन्नास टक्के शारीरिक शिक्षण विषयाचा कार्यभार क्रीडा शिक्षकास आवश्यक असेन. तर उर्वरित कार्यभार हा त्यांच्या पदवी स्तरावरील अभ्यासाच्या विषयाचा राहील.

■ कला-संगीत शिक्षक नियुक्तीसाठी त्या-त्या विषयाचा पूर्णवेळ कार्यभार असेल तरच नियुक्ती करता येणार आहे.

■ ज्या शाळांत कार्यभाराअभावी विशेष शिक्षक मंजूर होऊ शकणार नाहीत अशा शाळांना नजीकच्या शाळांतील विशेष शिक्षक मॅपिंग करून उपलब्ध करून दिले जातील.

■ जिल्हा परिषदेसाठी गटस्तरावर दोन, तर केंद्र स्तरावर एक क्रीडा शिक्षक मिळणार आहे.

■ 'सरल' प्रणालीत केवळ आधार क्रमांक प्रमाणित ३० सप्टेंबरची पटसंख्या गृहीत धरून १५ ऑक्टोबरपर्यंत शिक्षणाधिकारी संचमान्यता शाळांना देणार आहेत.


WhatsApp GroupJoin Now
Telegram GroupJoin Now

 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon