DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Sanch Manayata Sudharit Nikash 2024

Sanch Manayata Sudharit Nikash 2024

शिक्षण मंत्री ना दिपक केसरकर यांचेसोबत संच मान्यतेच्या निकषावर सकारात्मक बैठक संपन्न.

    आज दि 6ऑगस्ट रोजी 15 मार्च 2024 च्या संच मान्यता नवीन निकषाबाबत जवाहर बालभवन, मुंबई येथे शिक्षण मंत्री ना दिपक केसरकर यांचेसोबत बैठक होऊन  मुख्याध्यापक  महामंडळाचे कार्याध्यक्ष तथा कोकण विभाग शिक्षक आमदार मा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्याध्यापक पदाचे निकष व मुख्याध्यापक पदास सेवानिवृत्त होईपर्यंत संरक्षण यासाठी जोरदार युक्तिवाद केला त्या नंतर मुख्याध्यापक पदासाठी 150 पट संख्येऐवजी  100  पट संख्या गृहीत धरून मुख्याध्यापक पद मान्य केले जाईल, तसेच मुख्याध्यापक पद रद्द झाल्यास त्या पदाला  संबंधित मुख्याध्यापक सेवानिवृत्त होईपर्यंत  किंवा पटसंख्या वाढ होईपर्यंत संरक्षण दिले जाईल, अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश मा केसरकर साहेबांनी दिले.  माझ्या कार्यकाळात आपल्या अनेक मागण्या मी मान्य केल्या आहेत परंतु शाळेची गुणवत्ता हे प्रत्येकाचे पहिले कर्तव्य असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली 
    या बैठकीत संचमान्यतेच्या इतर निकषावर चर्चा होऊन, सध्या अस्तित्वात असलेली पदे टिकविण्याचे निकष वेगळे असतील व वाढीव पद मिळण्यासाठीचे निकष वेगळे असतील हे मान्य करण्यात आले.
    संचमान्यता दुरुस्तीचे प्रलंबित प्रस्ताव ऑगस्ट अखेर निकाली काढण्याचे, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रीय कार्यालयात प्रलंबित असलेले शालार्थ आय डी मिळण्याचे प्रस्ताव योग्य असल्यास तात्काळ मंजूर  व्हावेत  याबाबत सुचना निर्गमित करण्यात येतील असे मा आयुक्त मांढरे साहेब यांनी सांगितले.
    आर टी ई  नियमाचे उल्लंघन न होता शिक्षक पदे मंजूर करावी याबाबत मुंबई चे शिक्षक आमदार अभ्यंकर साहेब यांनी मागणी केली.
    पुणे विभागाचे शिक्षक आमदार मा आसगावकर  व नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांनी चर्चेत सहभाग घेऊन आवश्यक सूचना केल्या.
    या बैठकीला राज्याचे आयुक्त मांढरे साहेब,शिक्षण संचालक प्राथ गोसावी साहेब, संचालक माध्यमिक सूर्यवंशी साहेब, उपसचिव तुषार महाजन, तसेच मुख्याध्यापक महामंडळाचे प्रतिनिधी माजी अध्यक्ष आदरणीय जे के पाटील सर व डॉ  रवींद्र निकम सर  हे उपस्थित होते जे के पाटील सर यांनी आपल्या युक्तीवादातून 4.1 व 4.2 मध्ये कशी विसंगती आहे व मुख्याध्यापक पद कसे अतिरिक्त ठरते व त्याच शाळेतील उपमुख्याध्यापक पदास मात्र सरंक्षण आहे. याचा अर्थ त्रुटी आहे. यावर माननीय मंत्री  महोदयांनी दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या सदर सभेला इतर अधिकारी सुद्धा  उपस्थित होते.
    कोकण विभागाचे शिक्षक आमदार व राज्य मुख्याध्यापक महामंडळचे कार्यध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे.

जा. क्रर मंत्री/शा.शि., म.भा. व्हीआयपी / ५३८२०२४ दिनांक ०५८०८12020

मंत्री शालेय शिक्षण, मराठी भाषा यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई 

दिनांक : ०५/०८/2024

मा. मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री, मुंबई शहर यांच्या निर्देशानुसार खाली नमूद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात यावे.

विषय दि. १५ मार्च २०२४ च्या संच मान्यता शासन निर्णयात सुधारणा करणेबाबत.

वार व दिनांक

मंगळवार, दि.०६/०८/२०२४.

वेळ सकाळी ११.०० वाजता.

स्थळ महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सभागृह, १ ला मजला, जवाहर बालभवन, चर्नी रोड, मुंबई...

बैठक आयोजन करणारा विभाग निमंत्रितांची यादी

शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.

१. मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानपरिषद सदस्य.
२. मा. श्री. विक्रम काळे, विधानपरिषद सदस्य,
३. मा. श्री. जयंत आसगावकर, विधानपरिषद सदस्य.
४. मा. श्री. किरण सरनाईक, विधानपरिषद सदस्य.
५. मा. श्री. किशोर दराडे, विधानपरिषद सदस्य.
६. मा. श्री. ज. मो. अभ्यंकर, विधानपरिषद सदस्य.
७. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
८. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
९. शिक्षण संचालक, (प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.
१०. विषयाशी संबंधित सर्व अधिकारी.

> उपरोक्त बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे व उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे सर्व संबंधितांना तसेच विषयाच्या गरजेप्रमाणे आवश्यक तपासणी करुन इतर संबंधित अधिकारी यांना बैठकीस उपस्थित राहण्याकरीता निमंत्रित करावे.

> सदर बैठकीमधील विषयांची टिपणी व निमंत्रितांची यादी min.schedul@maharashtra.gov.in या ई-मेल आयडी वर व या कार्यालयास ३ प्रतीत आजच आगाऊ पाठविण्यात यावी, > सदर बैठकीकरिता खालील नमून्यात कार्यवृत्तांत लिहिण्याकरीता लघुलेखकाची संबंधित विभागाने व्यवस्था करावी. तसेच बैठकीचे कार्यवृत्तांत मा. मंत्री महोदयांचे मंजूरीकरिता एक आठवड्याच्या आत पाठविण्यात यावे, ही विनंती.

अ.क्र.

विषय

मा. मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश

कार्यवाहीचा कालावधी

संबंधित जबाबदार विभाग / अधिकारी

(सुशात खांडेकर) विशेष कार्य अधिकारी

प्रति,

मा. प्रधान सचिव,

शालेय शिक्षण विभाग,

मंत्रालय, मुंबई

Also Read 👇 
Under the Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009 of all managements (local bodies, government, private aided, partially aided etc.) to start new schools, add classes accordingly, make structural changes in schools and prescribe revised criteria for accreditation.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२ मादाम कामा रोड,

हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १५ मार्च, २०२४

 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- एसएसएन २०१५/(प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२ मादाम कामा रोड,

हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १५ मार्च, २०२४

वाचा :-

१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसएन २०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२

दि. २८.०८.२०१५

२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसएन २०१५/प्र.क्र.१६/१५/ टीएनटी-२

दि. ०८.०१.२०१६

३. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसएन २०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२

दि. ०२.०७.२०१६

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसएन २०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२

दि. ०१.०१.२०१८

५. आयुक्त (शिक्षण) यांचा क्र. आशिका २०२२/संच मान्यता निकष/आस्था क्र. माध्य/४०४९/ 

दि. ०७.०७.२०२२ चा प्रस्ताव

प्रस्तावना :-

केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या धर्तीवर महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ तयार करण्यात आलेले आहेत. सदर नियम संपुर्ण महाराष्ट्र राज्याला लागू असतील. सदर नियमातील कलम एक (m) नुसार नजिकची शाळा म्हणजे neighbourhood school means a school in respect of children in classes I -V, a school shall be established as far as possible within a distance of 1 km of the neighbourhood and has a minimum of 20 children in the age group of 6 to 11 years available and willing for enrollment in that school and in classes VI to VIII, a school shall be established as far as possible within a distance of 3 km of the neighbourhood and which has not less than 20 children in class v th of the feeding primary schools, taken together, available and willing for enrollment in that school." राज्यातील वय वर्षे ६ ते १४ या वयोगटातील जात, वर्ग, लिंग मर्यादा ओलांडून सर्व बालकांना मोफत शिक्षण मिळावे या हेतूने उपरोक्त नियम तयार करण्यात आलेले आहेत,

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक शाळांतील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी, अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे

त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक १ अन्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय दि. २८.०८.२०१५ निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामध्ये दि.०८.०१.२०१६, दि.०२.०७.२०१६ आणि दि.०१.०१.२०१८ च्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. तथापि सदर शासन निर्णयान्वये करण्यात येणाऱ्या पदनिश्चतीच्या प्रचलित निकषांमध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने, सर्व बाबींचा सर्वंकष विचार करण्याकरिता तत्कालीन अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांनीदि. ११.०८.२०२० रोजी दिलेल्या मान्यतेनुसार समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या बैठकींमध्ये झालेल्या निर्णयानुसार मा.आयुक्त (शिक्षण) यांनी विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संच मान्यता निकषाबाबत चर्चा केल्यानंतर दि.०७.०७.२०२२ च्या पत्रान्वये संच मान्यता निकषाबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इ. बाबत निकष विहीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करणे, नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे, शाळांमध्ये संरचनात्मक बदल करणे इ. बाबत संदर्भाधीन शासन निर्णय आणि या पूर्वी अस्तित्वात असलेले या आधीचे सर्व शासन निर्णय जे या निर्णयाशी विसंगत असतील ते अधिक्रमित करण्यात येत असून शासन आता पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे :-

शासन निर्णय :- बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील तरतूदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे मंजूर करणे, एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षक पदे मंजूर करणे इ. बाबचे निकष पुढील प्रमाणे विहीत
करण्यात येत आहेत :-


१.१ इयत्ता १ ली ते ५ वी या गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आरटीईच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या ३० विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच (१५+१) १६ विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल.

१.२. इयत्ता १ ते ५ वी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल.

१.३ इ.१ ली ते ५ वी या गटातील २१० पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदांची गणना करताना २१०

विद्यार्थ्यापर्यत ७ शिक्षक व त्यावरील (म्हणजेच २१० च्या पुढील विद्यार्थी संख्येनंतर) प्रति ४० विद्यार्थी संख्येवर १

पद देय होईल. १.४ इ. ६ वी ते ८ वी गटामध्ये आरटीईच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या ३५ विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा

जास्त विद्यार्थी म्हणजेच (१७+१) १८ विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल.

१.५:-इयत्ता ६ ते ८ वी च्या गटामध्ये नव्याने पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील.

१.६-इयत्ता ६ ते ८ वी च्या गटामध्ये मंजूर असलेले पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल.

१.७ संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करुन देतांना इयत्ता ६ वी ते ८ वी या गटासाठी मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत विषयनिहाय येणारा कार्यभार विचारात घ्यावा.

१.मुख्याध्यापक पदे (प्राथमिक व उच्च प्राथमिक) (इ.१ली ते ४/५वी किंवा इ. १ली ते ७/८ वी)

पुढे अधिक वाचा किंवा सदर शासन निर्णय पीडीएफमध्ये डाऊनलोडसाठी उपलब्ध

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या स्पर्श करा  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४०३१५१७२९१६०६२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon