Teachers promotion only on performance
Teachers are promoted on performance not on seniority
Teachers promotion only performance not on seniority
सेवा जेष्ठतेनुसार नाही तर शिक्षकांना परफॉर्मन्सवर पदोन्नती
शिक्षकांना परफॉर्मन्सवर पदोन्नती
• आता सेवाज्येष्ठता विसरा
• शिक्षकांना परफॉर्मन्सवर पदोन्नती
• बदल्याही बंद होणार
🙋
आपणही वाचाल - विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर शिक्षकांची होणार मूल्यमापन अधिक जाणून घेण्यासाठी किंवा वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
शालेय शिक्षणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने एकेक तरतुदी लागू केल्या जात आहेत.
उर्वरित तरतुदी लागू झाल्यास भविष्यात शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळणार नाही. त्यांनाही कार्पोरेट सेक्टरप्रमाणे कामगिरीवरच पदोन्नती दिली जाईल. यासोबतच शिक्षकांच्या बदल्याही बंद होणार आहेत.
केंद्र सरकारने २०२० साली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मंजूर केले.
मात्र, कोरोनामुळे या धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकली नाही.
आता टप्प्याटप्प्याने त्याची अमलबजावणी सुरू झाली आहे.
गतवर्षी पदव्यूत्तर स्तरावर हे धोरण लागू झाले.
येत्या वर्षात पदवीस्तरावरही त्याची पूर्ण अंमलबजावणी सुरू होणार आहे.
दुसरीकडे शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक धोरणातील तरतुदींची टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे.
यंदा काही तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. यंदापासून आता इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू झाले आहे.
त्यामुळे उर्वरित तरतुदीही हळूहळू लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसे झाल्यास शिक्षकांना सेवाज्येष्ठते ऐवजी कामगिरीच्या आधारावरच पदोन्नती मिळू शकणार आहे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एन.ई.पी. ) च्या ५ व्या प्रकरणात मुद्दा क्रमांक १५ ते २१ यामध्ये याबाबत सविस्तर उल्लेख केलेला आहे. यात म्हटले आहे की, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक झाले पाहिजे, त्यांना पदोन्नती दिली पाहिजे.
तसेच उत्तम कामगिरी करणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पगारवाढ दिली पाहिजे.
म्हणून कार्यकाळ, पदोन्नती आणि वेतनमान यांचा समावेश असलेली, शिक्षकांच्या प्रत्येक टप्प्यावर एकाहून अधिक स्तर असलेली आणि उत्कृष्ट शिक्षकांना सन्मानित करणारी गुणवत्तेवर आधारित सशक्त व्यवस्था विकसित केली जाईल.
कामगिरीचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी अनेक मापदंडांची, पॅरामीटर्सची यंत्रणा राज्य शासनाद्वारे विकसित केली जाईल.
हे मूल्यांकन सहकाऱ्यांद्वारे केले जाईल.
उपस्थिती, वचनबद्धता तास आणि शाळा व समाजासाठी केलेली इतर प्रकारची सेवा यावर आधारित असेल. कार्यकाळ किंवा वरिष्ठता याच्या आधारावर पदोन्नती किंवा पगारवाढ होणार नाही.
तर ती फक्त अशा प्रकारच्या मुल्यांकनाच्या आधारावर केली जाईल, असेही यात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
सध्या ठराविक कालावधीनंतर शिक्षकांच्या बदल्या होतात.
मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार या बदल्याही बंद होणार आहेत.
तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना दरवर्षी प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.
हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार असून दरवर्षी ते किमान ५० तासांचे असणार आहे.
🙋आपण हेही वाचाल
👇👇👇👇👇
"विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे पगार"
मागे काही शिक्षण तज्ज्ञांनी व्हाउचर सिस्टम सुरू करावी असा सल्ला राज्य सरकारला दिला होता तो लागू करण्याचा प्रयत्नही सुरू झाला होता परंतु सर्व स्तरातून विरोध झाल्यामुळे तो प्रयोग गुंडाळून टाकावा लागला.पाश्यात्य ज्या देशांनी हा प्रयोग केला त्या देशांमध्ये व्हाउचर सिस्टम सपशेल फेल झाली होती असे असतानाही येन केन प्रकारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शिक्षकांचा पगार याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो शिक्षणाला फायदा देणारी कंपनी समजली की आशा भानगडी होतात शिक्षण आरोग्य आणि सार्वजनिक वाहतूक या क्षेत्रात सरकारला भरभक्कम गुंतवणूक कायम करावी लागते कल्याणकारी राज्याची ती आवश्यक बाब आहे
आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचे मूल्यमापन व त्याची आर्थिक पगारवाढ अवलंबून असे वर्तमानपत्रात आल्याचे वाचले सरकार जरी बदलले तरी शिक्षण क्षेत्रात काम करणारा अधिकारी वर्ग मात्र तोच आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असो अथवा शिक्षण क्षेत्रातील नवीन स्थित्यंतरे, मुलं परीक्षार्थी बनवू नयेत असा उद्देश असतो या वर्षी तर पहिली ते दहावीच्या परीक्षा देखील रद्द केल्या गेल्या आहेत बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे भारतभरात परीक्षेचे महत्त्व कमी होताना दिसत आहे किंबहुना विद्यार्थी क्षमता कौशल्य प्रावीण्य,अभिरुची,अभिवृत्ती यावर भर दिला जात असताना शिक्षण विभागाने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे मागचा अनुभव पाठीशी असताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला शिक्षकाच्या अर्थार्जनाशी जोडणे आणि त्यावर शिक्षकांचे मूल्यमापन करणे अतिशय धोक्याचे आहे याचे गंभीर परिणाम राज्यातील शिक्षण क्षेत्रावर होतील
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon