DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

PavitraPortal Shikshak Bharti Nivad Yadi

Pavitra Portal Shikshak Bharti Nivad Yadi Update 

दिनांक २५/०१६/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) -२०२२ नुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी दिनांक २५/०२/२०२४ रोजी ११,०८५ उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर ६,१८२ शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे.

निवड यादीसाठी आणि पुढे अधिक वाचण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 



🟥 शिक्षक भरती अपडेट 🟥
📌गुणवत्ता यादी पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी या शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रका नंतर दिल्या आहेत फक्त ह्व्या असलेल्या ओळीला स्पर्श करा

दिनांक २५/०२/२०२४
शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनातील निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आज दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व अभियोग्यताधारकांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास सर्वांना शुभेच्छा.

मित्रांनो खालील महत्वपूर्ण परिपत्रक नक्की वाचा 
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬

 
दिनांक : २५ /०२/२०२४
उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशीबाबत.

१. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता व बु‌द्धिमता चाचणी २०२२ नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवारांकडून दिनांक ०५/०२/२०२४ ते १४/०२/२०२४ या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत.

२. त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत त्यांची गुणवतेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे.

३. मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

४. उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय तसेच विविध न्यायनिवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवतेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे.

५. ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत, त्यांना लॉगीन केल्यानंतर अॅप्लिकेशन फॉर्म (Application Form) मेनू अंतर्गत अॅप्लिकेन्ट रिकमंडेड स्टेटस (Applicant Recommended status) यावर क्लिक केल्यावर सलेक्ट राऊंड (Select Round) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून फेज-१ (Phase-1) यानंतर सलेक्ट इंटरव्हिव टाईप (Select Inteview Type) या ड्रॉपडाऊन (Dropdown) मधून विदाआऊट इंटरव्हिव (without Interview) मेनू निवडावा. त्यानंतर सबमिट (submit) वर क्लिक करावे त्यानंतर व्हिव रिकमंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट (View Recommended Institute list) या मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास, सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. व्हिव प्रेफरेन्स वाईस स्टेटस (View Preferencewise status) यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल.

६. नियुक्ती प्राधिकारी/व्यवस्थापन यांनादेखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाहीबाबत सूचना देण्यात येत आहेत.

७. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच अशा उमेदवारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.

८. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

९. उमेदवारांच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर 'तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आपणास edupavitra२०२२@gmail.com या ईमेल वर सबळ पुराव्यांसहित अर्ज सादर करता येईल.

१०. उमेदवारांना अन्य काही अडचणी edupavitra2022@gmail.com या email वर संपर्क साधता येईल. आल्यास

११. ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या उडवून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु ते सर्व प्रयत्न सनदशीर मार्गाने व ठामपणे प्रशासनाने हाणून पाडले आहेत.

१२. निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा, शिक्षक होणे ही आयुष्यातील सर्वोतम घटना आहे, याची जाण ठेवावी व सेवा निवृत्तीपर्यंत जतन करून ठेवावी.
(सूरज मांदरे भाप्रसे)
आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र

गुणवत्ता यादी पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त ह्व्या असलेल्या ओळीला स्पर्श करा




General Merit List Phase-1 Without Interview (ZP)

General Merit List Phase-1 Without Interview (NP)

General Merit List Phase-1 Without Interview (MNP)

General Merit List Phase-1 Without Interview (Private Mgmt)

Approved Advertisement Phase:1 - With Interview

Approved Advertisement Phase:1 - Without Interview
 
सर्वसाधारण गुणवत्ता यादी टप्पा-1 मुलाखतीशिवाय (ZP)

मुलाखतीशिवाय सामान्य गुणवत्ता यादी फेज-1 (NP)

सामान्य गुणवत्ता यादी टप्पा-1 मुलाखतीशिवाय (MNP)

मुलाखतीशिवाय सामान्य गुणवत्ता यादी फेज-1 (खाजगी Mgmt)

मंजूर जाहिरात टप्पा:1 - मुलाखतीसह

मंजूर जाहिरात टप्पा: 1 - मुलाखतीशिवाय

अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा



पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 

मुलाखत व डेमो संदर्भात महत्वपूर्ण माहिती

👇

अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

पुढील अद्यावत माहिती तुमच्यापर्यंत येण्यासाठी आपल्यासमूहास सामील व्हा

समूहात सामील होण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

दिनांक २३/०२/२०२४

शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक

• पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे काम प्रगतिपथावर आहे. सद्यःस्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी / अडचणी समोर येताना दिसून येत नाहीत.

• दिनांक २१/०२/२०२४ रोजीच्या बुलेटिनमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत. त्याची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे.

• याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्यात आहे. त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तरी देखील अपवाद म्हणून कोणाचे काही गाऱ्हाणे असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी 'तक्रार निवारण व दुरूस्ती समिती गठीत करण्यात आली आहे. त्याद्वारे सर्व बाबींची यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण केले जाईल.

• सन २०१९ च्या भरतीच्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यास दि. ३० जून, २०१९ मुदत होती व दिनांक ०९/०८/२०१९ रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. म्हणजेच ४० दिवसांचा कालावधी लागला होता. यावेळी त्या तुलनेत तिपटीहून अधिक पदांची भरती असूनही शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच या याद्या प्रसिध्द होतील. त्यामुळे या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शवू नये.

• अभियोग्यताधारकांनी शिक्षक पदभरती-२०२२ साठी वापरात असलेल्या edupavitra2022@gmail.com या ईमेलवरच त्यांची विहित प्रपत्रातील निवेदने आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावीत. निवेदनासंबंधीचे नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठविल्या गेलेल्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात येईल.

पवित्र पोर्टल शिक्षक भरती रिट पिटीशन न्यायालयात दाखल

मुलाखत प्रमाण 1:3 या शासन निर्णय विरोधात न्यायालयात याचिका दाखल असून पुढील सुनावणी या तारखेला ठेवण्यात आली आहे

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY NAGPUR BENCH, NAGPUR.

WRIT PETITION NO. 7627 OF 2023

Ideal Education Society and others -Vs.- The State of Maharashtra and others

Office notes, Office Memoranda of Coram, appearances, Court's orders Court's or Judge's Orders. or directions and Registrar's orders.

Mr.A.R.Deshpande, counsel for the petitioner. Mrs.K.R.Deshpande, AGP for the respondents-State.

CORAM: AVINASH G. GHAROTE & SMT. M. S. JAWALKAR, JJ.


DATE : 22ND FEBRUARY, 2024


The learned AGP in her reply has stated that the eligible candidates for the vacancies shall be provided in a ratio of 1:10. That apart, what is really a matter of concern is that different arms of the State are involved in the matter of appointment of teachers. One department deals with the sanctioned strength/sanch manyata, the other department deals with the roster system and the third department deals with the portal. It is therefore necessary that the information from all the three departments should be integrated, so that the time for filling in the vacancies, which may occur on any ground whatsoever, would be minimized, which would in turn result in effective education being provided to the students. As of now the situation is dismal in the sense, that there are as many as 5727 vacancies of teachers in private schools and 21678 vacancies in schools run by the municipal councils, zilla

parishads/State. This naturally has an adverse effect upon the education being imparted to the children and the commitment of the State under the Right to Education Act. The integration is also necessary to ensure minimum interference by the School Management, apart from reducing the time lag. The learned AGP shall take instructions in that regard and make a statement to this Court on 04/03/2024.

(SMT.M.S.JAWALKAR,J) (AVINASH G.GHAROTE,J)

KHUNTE

माननीय न्यायालयाची ऑर्डर पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon