DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

MahaTeacher Bharti selection list

 MahaTeacher Bharti selection list


दिनांक २५/०६/२०२४


शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक


पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) -२०२२ नुसार मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी दिनांक २५/०२/२०२४ रोजी ११,०८५ उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी आज अखेर ६,१८२ शिक्षक शाळांमध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची कार्यवाही त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे.


वरील प्रमाणे यादी प्रसिद्ध केल्यानंतर समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे जागा रिक्त आहेत. सदर रिक्त जागा त्या त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारण मध्ये रूपांतरित करून पदभरतीची पुढील कार्यवाही करण्याची परवानगी मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.


शासनाकडे सादर केलेल्या या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक ०७/०६/२०२४ व १४/०६/२०२४ अन्वये माजी सैनिक पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा नाही याची पडताळणी सैनिक कल्याण विभागाकडून करून घेण्याबाबत तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याची पुन्हा पडताळणी करून पदभरतीची कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले.


माजी सैनिक या प्रवर्गातील रिक्त पदांबाबत माजी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागविली. जिल्हा सैनिक कार्यालयाकडून प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने शासनाकडे सादर केली त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागाच्या नियंत्रक विभागाने म्हणजेच सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक २५/०६/२०२४ रोजी माजी सैनिकांची ४८४ पदे रिक्त ठेवून उर्वरित रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे.


तसेच भूकंपग्रस्त या समांतर आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध आहेत किंवा कसे याबाबतची पडताळणी पवित्र पोर्टलवर नोंद केलेल्या स्व-प्रमाणपत्रातील माहितीच्या आधारे करण्यात आली.


स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात शासन पत्र दिनांक १०/०६/२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.


माजी सैनिक या प्रवर्गासाठी दहा टक्के जागा रिक्त ठेवून तसेच भूकंपग्रस्त या प्रवर्गातील रिक्त जागा प्रकल्पग्रस्त या प्रवर्गातील पात्र उमेदवारांसाठी विचारात घेऊन एकंदरीतच विविध प्रवर्गाच्या परस्पर विरोधी मागण्या व शिक्षक पदभरतीची निकड लक्षात घेता समांतर आरक्षणातील उर्वरित रिक्त पदे त्या त्या सामाजिक प्रवर्गात सर्वसाधारणमध्ये रूपांतरीत करून पदभरती करण्यात येत आहे.


शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे रूपांतरित राऊंड घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तीन आठवड्यात पूर्ण करण्यात आली.


'रूपांतरित फेरीमध्ये एकूण ५.७१४ रिक्त पदांपैकी ३,१५० पात्र उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस होत आहे. रिक्त राहणाऱ्या २.५६४ पदांच्या विषयांसाठी त्या त्या आरक्षणाचे पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदे रिक्त राहत आहेत. शिफारस


होत असल्याबाबतचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे आहे. इयत्ता पहिली ते पाचवी या गटातील इंग्रजी माध्यम-७०२, उर्दू माध्यम-१५. हिंदी माध्यम-११. मराठी माध्यम-७६०, कन्नड माध्यम-


९. अशी एकूण- १,६५७ रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे .


इयत्ता सहावी ते आठवी या गटातील सर्व माध्यमांची गणित-विज्ञान, गणित, विज्ञान- १,३८२, सामाजिक शास्र ३. भाषा-९८ अशी


एकूण- १,४८३ रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे.


इयत्ता नववी ते दहावी या गटातील सर्व माध्यमांतील १० रिक्त पदांवर उमेदवारांची शिफारस होत आहे. मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाचाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४ व २५८५/२०२४ मध्ये दिनांक ०७/०३/२०२४ रोजी


दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक पदभरतीची प्रक्रिया याचिकेतील निर्णयाच्या अधीन राहून पुढे चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.


तदनंतर, मा. उच्च न्यायालयात शिक्षक पदभरतीशी संबंधित याचिका दाखल आहेत. यात मा. उच्च न्यायालय खंडपीत नागपूर येथे याचिका क्रमांक २७८४/२०२४, २७५२/२०२४ व अन्य याचिका दाखल आहेत. सदरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथील दाखल याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे.


शिक्षक पद भरतीच्या मुलाखतीशिवाय या प्रकारातील रूपांतरित फेरीतील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केली आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यताधारकांच्या स्वतःच्या निवडीबाबत तक्रार असल्यास त्याबाबत अशा उमेदवारांना तक्रार निवारण व दुरुस्ती समिती (Grievance Redressal and Correction Committee) कडे pavitra2022groc@gmail.com या ईमेलवर सबळ पुराव्यासह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसांच्या आत अर्ज सादर करता येईल. या ईमेल पत्त्यावर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नयेत उमेदवाराव्यतिरिक्त इतर व्यक्तींनी, संस्थांनी संघटनांनीही या ईमेलवर मेल पाठवू नयेत, पाठविल्यास असे मेल दुर्लक्षित करण्यात येतील, वाशिवाय याबाबत कोणत्याही अधिकाऱ्यांशी मोबाईलवर अथवा व्यक्तिगत संपर्क साधू नये विहित मुदतीनंतर प्राप्त ई-मेल तसेच अन्य मार्गानी प्राप्त तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


सदर निवड प्रक्रिया ही संगणकीय प्रणाली द्वारे होत असल्याने यामध्ये मानवी हस्तक्षेपास वाव नाही त्यामुळे उमेदवारांनी याबाबत


कोणत्याही व्यक्तीशी अथवा यंत्रणेशी कोणत्याही माध्यमातून संपर्क साधू नये. सदरच्या पदभरती प्रक्रियेत मुलाखती शिवाय भरतीतील विविध टप्प्यांवर विविध कारणांमुळे रिक्त राहिलेली पदे, राखून ठेवलेली


पदे तसेच मुलाखतीसह पदभरतीतील पदे लवकरात लवकर भरण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे.


स्व-प्रमाणपत्रांमध्ये चुकीची अर्धवट / अपूर्ण माहिती नोंद केल्यामुळे ज्या उमेदवारांची शिफारस प्रसिद्ध झालेल्या याद्यांमध्ये झाली


नसेल, अशा व अन्य उमेदवारांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीपूर्वी त्यांच्या स्व-प्रमाणपत्रात योग्य त्या दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.


नव्याने जाहिराती घेऊन निवडप्रक्रिया करताना स्व. प्रमाणपत्रामध्ये केलेले बदल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. 'माजी सैनिक' या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी 'माजी सैनिक' यांचेसाठी स्वतंत्र फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे.


निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा. आपल्या हातून होणाऱ्या उत्तम शैक्षणिक कार्यामुळे अनेक सुसंस्कृत पिढ्या घडतील याची खात्री आहे.


न्यूज बुलेटीनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल. याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी.



दिनांक : २९/११/२०२३

उमेदवारांसाठी सूचना

सन २०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी उमेदवारांच्या निवडीच्या शिफारशीबाबत.

१. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पद भरतीसाठीची कार्यवा करण्यात आलेली आहे.

Also read 

उमेदवारांसाठी सूचना

सन २०१९ मधील शिक्षक पद भरतीच्या वेळी अपात्रगैरहजररुजू न होणे इत्यादी कारणास्तव रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत.

२. सन २०१९ मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे.

३. पुणे महानगर पालिका माध्यमिक विभाग- २ पदे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक विभाग - ६ पदे (इ. ६ वी ते इ ८ वी गटातील इंग्रजी माध्यमाची इंग्रजी भाषा विषयाची ) यासाठी संबंधित व्यवस्थापनाने कळविल्यानुसार पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेली नाही.

४. शासन पत्र दिनांक १२/०६/२०२३ नुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या पदांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदभरतीसाठी शिफारस झालेली नाही.

Also Read 

शिक्षकपदभरती - २०२२ शिक्षक पदभरतीसाठी बिंदूनामावली अद्ययावत करण्याबाबत.

५. उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर Applicant Recommended status वर क्लिक केल्यावर View Recommended Institute list मध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. View Preferencewise status यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम दिसेल. त्यानुसार आपण शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा.

६. उमेदवाराच्या निवडीसाठी रिक्त पदांच्या जाहिरातीतील त्याच्या प्रवर्गाचे/ खुल्या प्रवर्गाचे (समांतर आरक्षण ) गुण व जाहिरातीच्या संबंधित गटातील विषयाचे गुण Cutoff  गुणापेक्षा अधिक गुण आवश्यक आहेत.

७. मूळ रिक्त पदांच्या यादीतील उमेदवारांच्या शिफारस यादीनंतर शिल्लक राहिलेल्या माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या पदापैकी १० टक्के पदे माजी सैनिक या समांतर आरक्षणात ठेऊन उर्वरित पदे त्या त्या प्रवर्गाच्या प्युअरमध्ये (समांतर आरक्षणाव्यतिरिक्त) वर्ग करून पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

८. निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्राची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.



९. उमेदवारांना काही अडचणी आल्यास email वर संपर्क साधता येईल.

अधिकृतसंकेतस्थळाला जोडले जाण्यासाठी या ओळीला स्पर्श करा

परिपत्रक वाचण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी या ओळीला स्पर्श करा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon