DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Pension Amendment Rules 2024 NOTIFICATION


NOTIFICATION

RNI No. MAHBIL/2009/31732
सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्ष १०, अंक ३]

गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६ फाल्गुन २, शके १९४५

[पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ८ फेब्रुवारी २०२४.

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक सेनिवे-२०१८/प्र.क्र.४४/सेवा-४. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्राचे राज्यपाल महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ ला सुधारणा करणारे पुढील नियम करीत आहेत :-

१. या नियमास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) (सुधारणा) नियम, २०२४ असे म्हणावे.

२. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ याच्या नियम ११६ मधील, पोट-नियम (५) मध्ये, -

(अ) खंड (तीन) ऐवजी, पुढील खंड दाखल करण्यात येईल:-

"(तीन) अविवाहित मुलीच्या बाबतीत (मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीव्यतिरिक्त), ती चोवीस वर्षे वयाची होईपर्यंत किंवा तिचा विवाह होईपर्यंत, यांपैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अथवा विधवा किंवा घटस्फोटित असलेल्या व ती स्वतःची उपजिविका करत नाही अशा मुलीच्या बाबतीत;";

(ब) परंतुकामध्ये परिच्छेद (पाच) नंतर, पुढील परिच्छेद जादा दाखल करण्यात येईल:-

"(सहा) शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्युपूर्वीच अस्तित्वात असलेली विकलांगता;

(सात) जेव्हा मयत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तिवेतनधारक त्याच्या पश्चात खंड (एक) किंवा खंड (दोन) किंवा खंड (तीन) अन्वये कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधुर किंवा मुलगा किंवा मुलगी

भाग चार-अ-१
Join our social media for next update


(१)
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६ फाल्गुन २, शके १९४५

नसेल त्याबाबतीत अथवा जर, खंड (एक) किंवा खंड (दोन) किंवा खंड (तीन) अन्वये कुटुंब निवृत्तिवेतनासाठी पात्र असलेली विधवा किंवा विधुर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल किंवा त्या खंडामध्ये विहित केलेल्या कुटुंब निवृत्तिवेतनास पात्र राहणार नसेल तर, अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीला, चोवीस वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभरासाठी किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजिविकेस सुरुवात करीपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत, पुढील शर्तीच्या अधीन राहून, कुटुंब निवृत्तिवेतन, मंजूर करण्यात येईल किंवा नियमितपणे प्रदेय होईल :-

(ए) शेवटचे अपत्य विहित वयाचे होईपर्यंत, परिच्छेद (दोन) ते (चार) मध्ये निर्धारित केलेल्या

क्रमानुसार अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय असेल;

(बी) परिच्छेद (एक) आणि (दोन) ला अनुसरुन, कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्यासाठी विकलांगता असलेले पात्र अपत्य;

(सी) अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा, तो किंवा ती किंवा ते हयात होते तेव्हा, तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून होती;

(डी) जेव्हा मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकपेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुली असतील तेव्हा, जी मुलगी, त्याच्या जन्मक्रमानुसार या पोट-नियमान्वये कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्याच्या पात्रतेच्या अटी पूर्ण करील अशा मुलीला, प्रथम कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय होईल;

(इ) सर्वात मोठी मुलगी, तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजिविकेस सुरुवात करीपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत, कुटुंब निवृत्तिवेतनास हक्कदार असेल आणि सर्वात धाकटी मुलगी, तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर किंवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या उपजिविकेस सुरुवात केल्यानंतर किंवा मृत झाल्यानंतर, कुटुंब निवृत्तिवेतनास पात्र होईल;

(एफ) विधवा मुलीच्या बाबतीत, तिच्या पतीचा मृत्यु किंवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास :

परंतु, जर घटस्फोटाची कार्यवाही, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल, परंतु, त्यांच्या मृत्युनंतर घटस्फोट झाला असेल तर, घटस्फोटित मुलीला, घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय राहील :

परंतु आणखी असे की, जर शासकीय कर्मचाऱ्याचा किंवा निवृत्तिवेतनधारकाचा आणि त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर, मुलीच्या घटस्फोटाच्या दिनांकापूर्वी कुटुंबातील इतर कोणत्याही पात्र सदस्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय झाले असेल तर, कुटुंबातील पूर्वोक्त सदस्य कुटुंब निवृत्तिवेतनाकरिता पात्र असल्याचे बंद किंवा मयत होण्यापूर्वी, अशा घटस्फोटित मुलीला कुटुंब निवृत्तिवेतन सुरु केले जाणार नाही.";

(क) स्पष्टीकरणातील, परिच्छेद (बी) मध्ये, "मुलीचा ज्या तारखेस विवाह होईल" या मजकुराअगोदर, "मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीखेरीज," हा मजकूर दाखल करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

मनिषा यु. कामटे, 
शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२९, २०२४/माघ २६ फाल्गुन २, शके १९४५

राजपत्र पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध

FINANCE DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, Dated 8th February 2024.

CONSTITUTION OF INDIA.

NOTIFICATION

No. PEN-2018/CR.44/SER-4. In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules further to amend the Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982, namely:-

1. These rules may be called the Maharashtra Civil Services (Pension) (Amendment) Rules, 2024.

2. In Rule 116 of Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982, in sub-rule (5),-

(a) for clause (iii), the following clause shall be substituted, namely:

"(iii) in the case of an unmarried daughter (other than a daughter suffering from a mental or physical disability), until she attains the age of twenty-four years or until she gets married, whichever is earlier or widowed or divorced and not earning her livelihood;"

(b) in the proviso, after paragraph (v), the following paragraphs shall be added, namely:-

"(vi) the disability existed before the death of Government servant or pensioner and his or her spouse;

(vii) where a deceased Government servant or pensioner is not survived by a widow or widower or son or daughter eligible for family pension under clause (i) or clause (ii) or clause (iii) or if a widow or widower or son or daughter eligible for family pension under clause (i) or clause (ii) or clause (iii) dies or ceases to fulfill the eligibility conditions for family pension prescribed in those clauses, the family pension shall be granted or continued to be payable to an unmarried or widowed or divorced daughter beyond the age of twenty-four years for life or until she gets married or remarried or until she starts earning her livelihood, whichever is the earliest, subject to the following conditions, namely:-

(a) the family pension shall be initially payable to the children in the order set out in paragraphs (ii) to (iv) until the last child attains the prescribed age;

(b) there is no disabled child eligible to receive family pension in accordance with paragraphs (i) and (ii);

(c) the unmarried or widowed or divorced daughter was dependent on her parent or parents when he or she or they were alive;

(d) where a deceased Government servant or pensioner leaves behind more than one unmarried or widowed or divorced daughter beyond the age of twenty- four years, family pension shall first be payable to such daughter, who fulfill the eligibility conditions for grant of family pension under this sub-rule, in the order of their birth;

(e) the elder daughter shall be entitled to the family pension till she has got married or remarried or has started earning her livelihood, whichever is earlier and the younger of the daughters will be eligible for family pension after the elder next above her has got married or remarried or has started earning his or her livelihood or has died;

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १५-२१, २०२४/माघ २६ फाल्गुन २, शके १९४५

(f) in the case of widowed daughter, death of her husband and in the case of divorced daughter, her divorce took place during the lifetime of the Government servant or pensioner or his or her spouse:

Provided that, the family pension shall be payable to a divorced daughter from the date of divorce if the divorce proceedings were filed in a competent court during the life time of the Government servant or pensioner or his or her spouse but the divorce took place after their death:

Provided further that, if, consequent on the death of the Government servant or pensioner and his or her spouse, the family pension to any other eligible member of the family has become payable before the date of divorce of daughter, the family pension to such divorced daughter shall not commence before the aforesaid member of the family ceases to be eligible for family pension or dies.";

(c) in the Explanation, in paragraph (b), after the words "she gets married" the words "except daughter suffering from a mental or physical disability" shall be added.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

MANISHA Y. KAMTE, Deputy Secretary to Government.
Join our social media for next update

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR: DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon