महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
विषयः फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र
(इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत...
!! प्रकटन !!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उन्य माध्यमिक गाव्ळाने प्राचार्य, शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्याथ्यांना प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (online) पध्दतीने मंडळा-या
LINK या संकेत स्थळावर शुकवार दिनांक १०/०१/२०२५ रोजी Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
या संदर्भात कळविण्यात येते की,
१) मंडळाने उपरोक्त प्रमाणे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्रांवर (Hall Ticket) जातीचा प्रवर्ग (Caste Category) या कॉलमची छपाई करण्यात आलेली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवेशपत्रांवरील (Hall Ticket) सदरचा जातीचा प्रवर्ग (Caste Category) कॉलम रद्द करण्यात येत असून विद्याथ्यांची परीक्षेविषयक इतर माहिती आहे तशीच राहील याची नोंद घ्यावी. सदरची नव्याने तयार केलेली प्रवेशपत्र (Hall Ticket) गुरूवार दिनांक २३/०१/२०२५ पासून Admit Card या link व्दारे download करण्याकरीता उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
प्रकटन
विषय :- फेब्रुवारी - मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी - मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सर्व माध्यमिक शाळांना फेब्रुवारी मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या
या संकेतस्थळावर पासून Admit Card या Link व्दारे download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की,
१. फेब्रुवारी-मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी इ.१० वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
२. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिंटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक यांचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी.
३. ज्या आवेदनपत्रांना "Paid" असे Status प्राप्त झालेले आहे त्यांचीच प्रवेशपत्रे "Paid Status Admit Card" या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
४. अतिविलंबाने आवेदनपत्रे भरलेल्या व Extra Seat No विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे "Extra Seat No Admit Card" या पर्यायाव्दारे उपलब्ध होतील.
५. Download केलेल्या प्रवेशपत्रामध्ये नाव/आईचे नाव / जन्मतारीख / जन्मठिकाण अशा दुरूस्त्या असल्यास सदर दुरूस्त्या Online पध्दतीने करावयाच्या असून त्याकरीता Application Correction ही Link उपलब्ध करून देण्यात आलेली असून विहित दुरूस्ती शुल्क भरून दुरूस्त्या विभागीय मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात याव्यात व विभागीय मंडळाच्या मान्यतेनंतर "Correction Admit Card " या Link व्दारे सुधारीत Admit Card उपलब्ध होतील. विषय/माध्यम बदल असल्यास प्रचलित पध्दतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरूस्त्या करण्यात याव्यात.
वाचाल - इ. १२ वी व इ. १० वी प्रवेश पत्रामध्ये नाव/आईचे नाव/जन्मदिनांक/प्रवर्ग या दुरुस्त्या Online पध्दतीने करण्याबाबत.
६. ज्या आवेदनपत्रांना "Paid " असे Status प्राप्त झालेले नाही अशा आवेदनपत्रांचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे Status Update होवून "Late Paid Status Admit Card" या Option व्दारे त्यांची प्रवेशपत्रे उपलब्ध होतील.
७.फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
८. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
तरी फेब्रुवारी - मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.
दिनांक : १७/०१/२०२५
सचिव, राज्य मंडळ, पुणे
Also Read
तरी मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक तसेच सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.
दिनांक : २९/०१/२०२४
(अनुराधा ओक) सचिव,
राज्य मंडळ, पुणे ४.
परिपत्रक पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे
मित्रांनो Click to Download टिचकी मारा १५ सेकंद थांबा त्यानंतर
Download File वर टिचकी मारा
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon