Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education
S.R.No.832-A, Final Plot No. 178,179, Near Balchitrawani, Behind Agharkar Research Institute, Bhamburda, Shivajinagar,
Pune-411004.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे-४११००४
Tel: Chairman (P): STD. (020)-25651751 Secretary(P): 25651750 | EPABX -25705000।
Email: secretary.stateboard@gmail.com
जा. क्र.रा.मं./परीक्षा-७/२६१
दिनांक - १९/०१/२०२४
प्रति,
१) मा. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-४०००३२
२) मा. विभागीय प्रसिध्दी उपसंचालक, पुणे/नागपूर/औरंगाबाद/मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण
३) मा. संचालक, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई-४०००३०
४) मा. संचालक, आकाशवाणी, मुंबई केंद्र, नवीन प्रसारण भवन, बॅकबे रेक्लेमेशन, आमदार निवासाजवळ, मुंबई- ४०००२०
५) मा. संचालक, आकाशवाणी केंद्र पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर / मुंबई/जळगांव/रत्नागिरी/सांगली/कोल्हापूर/सातारा/सोलापूर/नाशिक
६) सर्व जिल्हा प्रसिध्दी अधिकारी
७) मा. संपादक, सर्व वृत्तपत्र / वृत्तवाहिन्या
विषयः फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket).
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे
महोदय,
(Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रकटन सोबत जोडले आहे. सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रानी त्यांच्या वृत्तपत्रात / प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.
आपली विश्वासू,
(अनुराधा ओक)
सचिव,
प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी :-
राज्य मंडळ, पुणे - ०४
१) विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर /मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर /कोकण विभागीय मंडळ,
पुणे/नागपूर / छत्रपती संभाजीनगर /मुंबई/कोल्हापूर/अमरावती/नाशिक/लातूर/कोकण त्यांनी स्थानिक स्तरावर प्रकटन प्रसिध्द करावे व सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणावे.
२) व्यवस्थापक, गणकयंत्र विभाग, राज्य मंडळ, पुणे
३) अस्वीस व सस्वीस राज्यमंडळ, पुणे ४) ग्रंथालय, राज्यमंडळ, पुणे ५) ऑनलाईन विभाग
प्रत माहितीसाठी सविनय सादर-
१) मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२ २) मा. खाजगी सचिव, मा. मंत्री, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२
५) मा. आयुक्त शिक्षण, शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे-४११००१
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ४११००४. प्रकटन
विषय :- फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्रांबाबत (Hall Ticket)...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने मंडळाच्या
या संकेतस्थळावर सोमवार दिनांक २२/०१/२०२४ रोजी college login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रवेशपत्रे (Hall Ticket) उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, १. फेब्रुवारी-मार्च २०२४ साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी इ.१२ वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत.
२. प्रवेशपत्र (Hall Ticket) उघडताना (Open) काही त्रुटी (Error) आल्यास सदर प्रवेशपत्र Google Chrome मध्ये उघडावे.
HSC परीक्षा SSC परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ अंतिम वेळापत्रक
३. प्रवेशपत्र (Hall Ticket) ऑनलाईन (Online) पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा/प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी.
४. प्रवेशपत्रामध्ये (Hall Ticket) विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
५. प्रवेशपत्रावरील (Hall Ticket) फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे.
६. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावयाची आहे.
७. प्रवेशपत्र विद्याथ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनःश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत (Duplicate) असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे.
Also Read
तरी फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.
दिनांक : १९/०१/२०२४
(अनुराधा ओक) सचिव,
राज्य मंडळ, पुणे ४.
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon