DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

UPDATE YOUR AADHAAR Information

 UPDATE YOUR AADHAAR Information

AADHAAR UPDATE Mudatvadh Information

UPDATE YOUR AADHAAR Mudatvadh New Information

UIDAI ने आता आधार कार्ड मोफत अद्यावत / अपडेट करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड अद्यावत / अपडेट करण्यासाठी सलग पाचव्यांदा मुदतवाढ दिली आहे. 
तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी आधार कार्ड मोफत अद्यावत / अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२३ पर्यंत निश्चित करण्यात आली होती. 
त्यानंतर ती १४ सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली होती. अशातच आता पुन्हा एकदा UIDAI ने ही सुविधा १४ डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. 

आता ही सुविधा 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढविण्याची घोषणा केलेली आहे 

मुलांचे आधार काढून पाच वर्षे झाली अपडेट केले का? दोनदा करावे लागतात बायोमेट्रिक बदल

AADHAAR CARD 

आधार कार्ड आता आपल्यासाठी उपयुक्त कागदपत्र बनले आहे. आधार जारी करणारी संस्था 'युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया' UIDAI (यूआयडीएआय) नवजात मुलांसाठीदेखील आधार कार्ड जारी करते. परंतु, ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी आधार कार्ड बनविले गेले तर त्यात दोनदा बायोमेट्रिक बदल करावे लागतात. हे अपडेट वयाच्या ५ व्या वर्षी आणि दुसरे १५ व्या वर्षी केले जावे. हे अपडेट करणे अनिवार्य आहे.

ज्या मुलांचे आधार कार्ड ५ वर्षांपूर्वी बनलेले आहे त्यांचे बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते. म्हणून,अशा लहान मुलांच्या नावनोंदणी दरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत. म्हणूनच, यूआयडीएआयने ५ वर्षांनंतर हे अपडेट करणे बंधनकारक केले आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मूल पौगंडावस्थेत प्रवेश करते तेव्हा त्याच्या बायोमेट्रिक पॅरामीटर्समध्ये बदल केले जातात. म्हणूनच, यूआयडीएआयने पुन्हा वयाच्या १५ व्या वर्षी बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक केले आहे.

आधार सेवा केंद्रात बनवू शकता आधार कार्ड

पालक कोणत्याही सेवा केंद्राला भेट देऊन मुलाचा जन्माचा दाखला म्हणजेच जन्म प्रमाणपत्र किंवा डिस्चार्ज कार्ड/ हॉस्पिटलद्वारे जारी केलेल्या स्लिपद्वारे आधार कार्ड बनवू शकतात.

पाचव्या आणि पंधराव्या वर्षी करा अपडेट

जेव्हा आपले मूल ५ वर्षांचे असेल तेव्हा त्याचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, मूल १५ वर्षांचे असतानादेखील बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक आहे.

किती खर्च येईल?

मुलाच्या आधारमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे पूर्णपणे विनामूल्य आहे, तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तसेच, जेव्हा जेव्हा आपण तपशील अपडेटसाठी जाता तेव्हा तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज प्रदान करणे आवश्यक नसते. पालक जवळच्या आधार केंद्रावर जाऊन त्यांच्या मुलाच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करू शकतात. आपण आपल्या जवळच्या आधार केंद्राची माहिती यूआयडीएआय वेबसाइटवरून मिळवू शकता. ५ व्या वर्षी आणि १५ व्या वर्षी अपडेट करताना शुल्क लागणार नाही. परंतु, त्यापेक्षा अधिकच्या वयाचे असताना अपडेट करण्यासाठी मात्र नाममात्र शुल्क द्यावे लागते.


असे करा तुमचे आधार कार्ड अद्यावत / अपडेट 
सर्वात आधी UIDAI च्या वेबसाइटवर / संकेत स्थळावर जाण्यासाठी 
खालील दिलेल्या वर CLICK HERE टिचकी मारा
👇👇👇👇👇👇 

या वेबसाइटवर जा. त्यानंतर १२ अंकांचा आधार कार्ड क्रमांक जो तुमच्या आधारवर आहे 


आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा. पुढे ओटीपीचा पर्याय निवडा, त्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी टाकून 
अपडेट आधार ऑनलाइन’ Update Aadhaar Online हा पर्याय निवडा. प्रोसीड टू अपडेट आधारहा पर्याय निवडा, विचारलेली माहिती भरा. त्यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल


Also read - 

👇👇👇👇👇👇 

Also read - 

👇👇👇👇👇👇 

Check Your Aadhaar Validity तुमचे आधारची वैधता तपासा तपासण्यासाठी फक्तया ओळीला स्पर्श करा 

👇👇👇👇👇👇 

तुमचे बंद Pan Card तर झाले नाही ना 

Check Your Aadhaar Pan Card link Status  करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्श करा

👇👇👇👇👇👇 

आधार व मतदान कार्ड लिंक करा 

Link Your Voter Card And Aadhaar card करण्यासाठी फक्त या ओळीला स्पर्शकरा 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon