इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या
विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अध्ययन शैलीनुसार मुल्यांकनाबाबत
व शैक्षणिक सवलती संदर्भात मार्गदर्शक सूचना
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय
दिनांक २६ ऑक्टोबर २०२३
प्रस्तावना :-
विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापन व मूल्यमापनामध्ये गरजेनुसार अध्ययनार्थी दृष्टीकोनातून अध्ययनशैलीनुसार अध्यापन व अनुकूलित (Adaptive) मूल्यांकन पध्दतीचा उपयोग करण्यासंदर्भात शासन स्तरावरुन समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यां अध्ययन शैलीनुसार सुलभ अध्ययन, अध्यापन व अनुकूलित (Adaptive) मूल्यांकन पध्दतीचा व शैक्षणिक सवलतींचा उपयोग करण्याबाबत दि.१६.१०.२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये तरतूद करण्यात आली आहे.
२. आता, टाईप १ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस संदर्भ क्र.११ अन्वये करण्यात आली आहे. त्यानुषंगाने पुढीलप्रमाणे शासन पूरकपत्र निर्गमित करण्यात येत आहे.
शासन पूरकपत्र:-
संदर्भ क्र.१० येथील शासन निर्णयासोबतच्या प्रपत्र "अ" मधील मुद्दा क्र.२२ - इतर आजारांमुळे शालेय शिक्षणात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्याबाबत • या अंतर्गत मुद्दा क्र.२२.१ ते २२.१७ नुसार तरतुदी करण्यात आल्या आहेत.
२. आता, टाईप १ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना प्रपत्र "अ" मुद्दा क्र.२२ मध्ये २२.१८ ते २२.२४ अंतर्गत खालील प्रमाणे अधिकच्या सोयी सुविधा अनुज्ञेय असतील.
* टाईप १ मधुमेह असणाऱ्या विद्यार्थ्याकरिता आरोग्यविषयक अतिरिक्त सोयी सुविधा.
२२.१८ टाईप १ मधुमेह (Diabetes mellitus type) असणारे विद्यार्थी ज्यांना शाळेच्या सकाळच्या किंवा दुपारच्या सत्रामध्ये खाद्यपदार्थांची (Snaks) आवश्यकता भासल्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांनी बाळगलेले खाद्यपदार्थ (Snaks) शाळेच्या वर्गखोलीत खाण्याची परवानगी वर्गशिक्षकांनी द्यावी.
Divyang Vidyarthishaikshanik Mulyakan GR
२२.१९ मधुमेह असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी खेळामध्ये भाग घेण्यास परवानगी दिली असेल अशा विद्यार्थ्यांना तशा आशयाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर शालेय खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी द्यावी.
टाईप १ मधुमेह असणाऱ्या विद्यार्थ्याकरिता स्पर्धापरीक्षा आणि शाळेच्या इतर परीक्षेच्यावेळी देय असणाऱ्या अतिरिक्त सोयी सुविधा.
२२.२० टाईप १ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना मधुमेहाच्या गोळ्या (Diabetes Tablet) सोबत नेण्याची परवानगी द्यावी.
२२.२१ अशा विद्यार्थ्यांनी सोबत आणलेले औषधे/फळे, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, बिस्किटे /शेंगदाणे/सुकामेवा इत्यादी परीक्षेच्या हॉलमध्ये शिक्षकांकडे ठेवण्यात याव्यात, आवश्यक असल्यास या बाबी अशा विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान द्याव्यात.
२२.२२शाळेतील कर्मचाऱ्यांनी टाईप १ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना ग्लुकोमीटर आणि ग्लुकोज चाचणी पट्ट्या सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्यावी. ग्लुकोमीटर आणि ग्लुकोज चाचणी पट्ट्या परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये निरीक्षक/ शिक्षकांकडे ठेवण्यात येतील.
Divyang Vidyarthishaikshanik Mulyakan GR
२२.२३ टाईप १ मधुमेह (Diabetes mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना रक्तातील साखरेची चाचणी करण्याची आणि आवश्यकतेनुसार वर नमूद केलेल्या पदार्थांचे सेवन करण्याची परवानगी द्यावी.
२२.२४CGM (Continuous Glucose Monitoring), FGM (Flash Glucose Monitoring) आणि / किंवा इन्सुलिन पंप वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान ही उपकरणे ठेवण्याची परवानगी द्यावी. जर Glucose Monitoring साठी स्मार्ट फोन वापरण्यात येत असेल तर तो स्मार्ट फोन शिक्षक/निरीक्षक यांच्याकडे ठेवण्यात यावा.
सदरचे शासन निर्णय पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या
लिंक वर टिचकी मारा
विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या परीक्षेमध्ये सोयी-सवलती देण्याबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय
Concessions for students with special needs divyang in examinations from class 1st to class 12th
शासन आदेश pdf स्वरुपात Download करण्यासाठी
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon