MDM Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana
प्राथमिक शिक्षण संचालनालय प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना लाल देऊळ समोर, डॉ. आंबेडकर रोड, पुणे-४११००१.
ईमेल- mdmdep@gmail.com
दूरध्वनी (०२०-२६१२८१५७)
जा.क्र. प्राशिस/पीएमपोषण/ऑनलाईन/२०२४/०३४८५ कारणे दाखवा नोटीस
दि. ०९ मे, २०२४.
प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत Annual Data Entry आणि MIS data entry संदर्भातील करावयाच्या कामकाज संदर्भात..
संदर्भ :-
१. केंद्रशासनाचे दि. ३०.०४.२०२४ रोजीच्या आढावा बैठकीतील निर्देश.
२. संचालनालयाने आयोजित केलेल्या विभाग निहाय आढावा बैठका
३. संचालनालयाचे निर्देश पत्र क्र. ०३२५४ दि. २३.०४.२०२४.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या खालील दोन विविध पोर्टलवर शाळा, तालुक्यांना माहिती भरणे आवश्यक आहे.
उक्त नमूद दोन पोर्टलवर शाळा व तालुक्यांनी खालील माहिती भरणे अनिवार्य आहे.
1. Annual Data Entry
11. Monthly Data Entry
इ. MDM daily attendance
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता योजनेस पात्र प्रत्येक शाळेची एम.आय.एस पोर्टलवर Annual Data Entry
बाबत माहितीचा नमुना शाळांकडून अचूकपणे भरून घेऊन दि. ३०.०४.२०२४ पर्यंत पोर्टलवर अद्यावत करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या होत्या, तथापि सोबत जोडण्यात आलेल्या माहितीनुसार अद्यापही अनेक जिल्ह्यांनी सदरचे Annual Data Entry चे काम गांभीर्याने घेत नसलेबाबत निदर्शनास येत आहे.
याव्यतिरिक्त माहे एप्रिल, २०२४ महिन्याच्या अखेरीस पोर्टलवर भरावयाचा मंथली एमआयएस डाटा मे महिन्याच्या दि. ०५ पर्यंत अद्यावत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले होते. तथापि सोबत जोडण्यात आलेल्या
माहितीनुसार अद्यापही अनेक जिल्ह्यांनी सदरचे Monthly mis Data Entry चे काम गांभीर्याने घेत नसलेबाबत निदर्शनास येत आहे.
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देश देण्यात येते की, आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांची Annual Data Entry monthly mis data entry अद्यापही पूर्ण न होण्याच्या कारणासह आपला स्वयंस्पष्ट खुलासा, सदरची माहिती पूर्ण करुन संचालनालयास दि. १३.०५.२०२४ पर्यंत सादर करावा, अन्यथा सर्व संबंधितांविरोधात उचित कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
उपरोक्त परिपत्रक पीडीएफ मध्ये हवे असल्यास फक्त या ओळीला स्पर्श करा
👆👆👆👆👆
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्रत माहितीस्तव सादर: मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मुंबई यांना
आपण हे ही वाचा
Also Read 👇
प्राथमिक शिक्षण संचालनालय प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना लाल देऊळ समोर, डॉ. आंबेडकर रोड, पुणे- ४११ ००१.
दूरध्वनी (०२०-२६१२८१५३)
ईमेल-depmah२@gmail.com
जा.क्र. प्राशिस/ऑनलाईन /२०२४/03251
दि. २३/०४/२०२४.
प्रति,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व
2 3 APR 2024
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांच्या ऑफलाईन देयकांच्या माहिती बाबत.
संदर्भः शासन निर्देश क्रः शापोआ-२०१८/प्र.क्र. १५३/एस.डी. ३ दि. १३.०३.२०२४.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पात्र शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ नियमितपणे देण्यात येतो. सदर लाभाची दैनंदिन माहिती राज्यामधील प्रत्येक जिल्हयातील शाळांनी शासनाने सरल प्रणालीअंतर्गत विकसित केलेल्या एम.डी.एम पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. तथापि अनेक शाळांना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणामुळे विहित वेळेत दैनंदिन उपस्थितीची माहिती भरता आलेली नसल्यामुळे अशा शाळांना एमडीएम पोर्टलमार्फत जनरेट करण्यात आलेल्या ऑनलाईन देयकांचा लाभ मिळालेला नाही.
त्यानुषंगाने सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना निर्देशित करण्यात येते की, सदर योजनेंतर्गत काही शाळांनी विहित • वेळेत ऑनलाईन माहिती भरलेली नसल्यामुळे, अशा शाळांनी आहार शिजवून देखील संबंधित शाळांना अनुदान मिळालेले नाही, अशा शाळांची माहिती खालील विहित नमुन्यामध्ये संचानालयास दि. ०८.०४.२०२४ पर्यंत विनाविलंब सादर करण्यात यावी. सदर माहिती सादर करतांना प्रस्तुत संस्थांना देय रक्कम नियमानुसार देय असलेबाबतचे प्रमाणपत्र व कोणत्याही देयकाची दुबार अदायगी होत नसलेबाबतचे प्रमाणपत्र देखील सोबत सादर करण्यात यावे. सदर बाबत विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सोबत : परिशिष्ठ अ
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्रत माहितीस्तव सादर : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व
आपण हे ही वाचा
महाराष्ट्र शासन
Pradhan mantil Poshan Shakt Närmas PIM POSHANI
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, १७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे ४११ ००१.
ई-मेल mdmdep@gmail.com
जा.क्र. प्राशिसं/पीएम-पोषण / २०२३-२४/०३१८८
दि. १९/०४/२०२४
प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
विषयः- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत.
संदर्भ:-
१. शासन पत्र क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.४, दि.१९/०४/२०२४.
२. शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा-२४ (ओ-०१)/ उन्हाळी सुट्टी / एस.-१/२२०६, दिनांक १८/०४/२०२४.
३. शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं / ड-३०१/२०२४/३१८४, दिनांक १९/०४/२०२४.
उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे संदर्भात शासनाने संदर्भिय पत्र क्र. १ मधील मुद्दा क्र. १ नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२/०४/२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत दिली आहे. संदर्भिय पत्र क्र. २ नुसार संचालनालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक ०२/०५/२०२४ पासून सुट्टी जाहीर केलेली आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनाकरीता नियमानुसार देय असणारा तांदुळ व धान्यादी माल कोरडा शिधा स्वरुपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावेत. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे.
प्रत माहितीस्तव सविनय सादर,
१. मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
२. मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
३. मा. आयुक्त, महानगरपालिका, सर्व.
४. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
प्रत - आवश्यक त्या कार्यवाहीस्तव-
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, विभाग सर्व.
आपण हे ही वाचा
MDM Back Dated सुविधा उपलब्ध झाले बाबत...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
महाराष्ट्र शासन शालेय पोषण आहार योजना (स्वतंत्र कक्ष) प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे ४११ ००१
दुरध्वनी क्र. (०२०) २६१२८१५७
ई-मेल :- mdmdep@gmail.com
जा. क्र. प्राशिसं/पीएमपोषण/ऑनलाईन/२०२४/०१५३६
दि. २७/०२/२०२४
प्रति, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
जिल्हा परिषद, सर्व
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत एमडीएम पोर्टलवर मागील कालावधीतील दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे बाबत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत योजनेस पात्र असणा-या शाळांनी शाळास्तरावर आहार घेणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती मोबाईल अॅप तथा वेबसाईटच्या माध्यमातून नियमितपणे संकेतस्थळावर नोंदविणे आवश्यक आहे. प्रस्तुत माहितीच्या आधारे शाळांची ऑनलाईन देयके जनरेट होत आहेत. याबाबत सर्व जिल्ह्यांना पत्र व व्हॉट्सअॅप द्वारे वेळोवेळी सुचना देऊन देखील काही शाळांची माहिती भरणे प्रलंबित असल्याने, सदरची सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत विनंती संचालनालयाकडे करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांना (केंद्रीय स्वयंपाकगृह आणि ग्रामीण भागातील) माहे एप्रिल, २०२३ ते जानेवारी २०२४ अखेरच्या कालावधीतील प्रलंबित माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर सुविधा दि. ०६.०३.२०२४ पर्यंत उपलब्ध असेल, तदनंतर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव पुन:श्च बैंक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार नाही. याबाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळाप्रमुखांना अवगत करुन देण्यात यावे. तसेच निर्धारित कालावधीमध्ये प्रलंबित शाळांकडून माहिती भरली जाईल याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना माहितीस्तव
२. मा आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव
Date 27 February 2024
MDM Portal वर शाळा लॉगिन वरून Back Dated माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली आहे.
लॉगिन केल्यावर Daily Attendance मध्ये मागील महिना निवडून आपल्याला पाहिजे ती तारीख निवडून माहिती भरू शकता.
🚫 MDM BACK Dated Entry ...!!!_🏃🏼♂️
MDM Back Dated
दि 27 फेब्रु ते दि 6 मार्च 2024
_______________________________________
Regarding payment of fuel and vegetable dues under Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana.
Mid Day Meal
महाराष्ट्र शासन
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
दि. २६/१०/२०२३
शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व.
विषय:- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत इंधन व भाजीपाला देयके अदायगीबाबत.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शाळा वगळून उर्वरित शाळांच्या खात्यावर माहे एप्रिल २०२२ ते माहे ऑगस्ट २०२३ कालावधीतील इंधन भाजीपाला अनुदान व माहे सप्टेंबर २०२३ ते माहे डिसेंबर २०२३ कालावधीकरीता देय अनुदानाच्या ७५% अनुदान अग्रीम स्वरुपात शाळा स्तरावर वर्ग केले आहे. सदरचे इंधन भाजीपाला अनुदान आहार शिजविणाऱ्या यंत्रणांना अदा करण्याकरीता संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये आपणास कार्यवाही करणेबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुनश्च: आपणास कळविण्यात येते की, संदर्भिय पत्र क्र. २ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार आपण स्वतः लक्ष घालून तातडीने तालुका स्तरावर विशेष शिबिराचे आयोजन करुन कार्यवाही पूर्ण करावी. योजनेंतर्गत सर्व शाळांच्या बँक स्टेटमेंट व ऑनलाईन देयकांनुसार ताळमेळ घेऊन समायोजनाची कार्यवाही करावी. संदर्भ क्र. २ चे पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न केल्यामुळे इंधन व भाजीपाला अनुदानापासून आहार शिजविणारी यंत्रणा वंचित राहिल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
MDM Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana
योजनेंतर्गत पात्र असलेल्या सर्व शाळांना विहित कालमर्यादेत निधी मिळण्याच्या अनुषंगाने शासन नियमानुसार MDM Portal च्या आधारे तयार झालेल्या देयकांनुसार PFMS प्रणालीद्वारे इंधन व भाजीपाल्याची रक्कम आहार शिजविणान्या यंत्रणांना जिल्हा परिषद स्तरावरुन अदा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार माहे सप्टेंबर २०२३ कालावधीची इंधन भाजीपाला देयके आपल्या एमडीएम पोर्टलच्या जिल्हा लॉगीनवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदरची देयके संबंधितांना तात्काळ अदा करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन देण्यात यावेत.
तसेच यापुढील कालावधीतील प्रत्येक महिन्याचे इंधन व भाजीपाला देयके डाऊनलोड करुन नियमानुसार जिल्हा परिषद स्तरावरुन पीएफएमएस प्रणालीद्वारे देयके संबंधित शाळांच्या खात्यावर विहित कालावधीत वर्ग होईल, याची दक्षता आपल्या स्तरावरुन घेण्यात यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक)
सविस्तर पत्र पीडीएफ मध्ये वाचण्यासाठी
👇👇👇👇👇
Also read
👇👇👇👇👇
महाराष्ट्र शासन
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना
प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
दि. १६/१०/२०२३.
प्रति,
१. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई,
२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व
विषय:- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेबाबत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत एमडीएम पोर्टलमध्ये शाळांनी भरलेल्या दैनंदिन उपस्थितीच्या नोंदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे देयके तयार करून अदायगी करण्याची कार्यपद्धती राबविली जाते. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरु होण्यापूर्वी राज्यातील सर्व कार्यालयांना संचालनालय स्तरावरून संदर्भ क्र.२ च्या पत्रान्वये निर्देश देण्यात आलेले होते, तथापि संचालनालय स्तरावरुन देण्यात आलेले निर्देश क्षेत्रीय स्तरावर निर्गमित होत नसल्याची बाब निदर्शनास आलेली आहे.
त्यानुषंगाने आपणास नक्षः एकदा खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. १. संचालनालय स्तरावरून संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये देण्यात आलेल्या निर्देशानुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
२. नागरी भागातील शाळांनी भरलेल्या दैनंदिन लाभार्थी संख्येच्या आधारे सद्यस्थितीत एमडीएम पोर्टलमधून माहे एप्रिल २०२३ ते माहे ऑगस्ट २०२३ या कालावधीतील देयके डाउनलोड करण्याची सुविधा व कार्यपद्धती संबंधित जिल्ह्यांना
उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यवाही पुर्ण करावी. ३. नागरी भागात माहे एप्रिल २०२३ ते माहे ऑगस्ट २०२३ या कालावधीतील दैनंदिन लाभार्थी संख्येच्या नोदी एमडीएम पोर्टलमध्ये घेण्यासाठी (Back Dated Data Entry) संचालनालय स्तरावरुन दि.२१/०८/२०२३ ते दि.२८/०८/२०२३- आणि दि. २९/०८/२०२३ ते दि.०३/०९/२०२३ या कालावधीत दोन वेळा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.
४. पुनश्चः एकदा माहे एप्रिल २०२३ ते माहे सप्टेंबर २०२३ या कालावधीतील दैनंदिन लाभार्थी संख्येच्या नोंदी एमडीएम पोर्टलमध्ये घेण्यासाठी (Back Dated Data Entry) संचालनालय स्तरावरुन दि. १९/१०/२०२३ ते दि.३१/१०/२०२३ या कालावधीत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उक्त कालावधीतील माहिती भरण्यासाठी अंतिम संधी देण्यात येत आहे.
५. संचालनालय स्तरावरून देण्यात आलेल्या निर्देशानुसार व एमडीएम पोर्टलमध्ये देयके अदायगी करण्यासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार यापुढील कालावधीत केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांची देयके एमडीएम पोर्टलमध्ये नोंदविण्यात आलेल्या दैनंदिन लाभार्थी संख्येनुसार ऑनलाईन पद्धतीनेच अदा केली जातील याची दक्षता घ्यावी.
६. शासनाच्या
या संकेतस्थळावर विविध आवश्यक माहिती वेळच्या वेळी अद्ययावत होईल याची खातरजमा जिल्ह्यानी करणे आवश्यक आहे. याकरीता नियमितपणे संकेतस्थळावरील माहितीचा तालुकानिहाय आढावा घेण्यात यावा व आवश्यक सूचना तालुक्यांना देऊन सर्व ऑनलाईन कामकाज विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी. योजनेंतर्गत केंद्रीय स्वयंपाकगृह संस्थांची शाळानिहाय दैनंदिन लाभार्थीची माहिती एमडीएम पोर्टलमध्ये भरण्याबाबत
आपल्या स्तरावरुन तात्काळ क्षेत्रीय कार्यालयांना व शाळांना आवश्यक ते निर्देश देऊन विहित कालावधीत कामकाज पुर्ण करण्यात यावेत.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक
(प्राथमिक)
सविस्तर पत्र पीडीएफ मध्ये वाचण्यासाठी
👇👇👇👇👇
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon