Divyang Vidyarthi Pariksha Savlati
विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पयंतच्या परीक्षेमध्ये सोयी-सवलती देण्याबाबत
विशेष
गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या
परीक्षेमध्ये सोयी-सवलती देण्याबाबत.
महाराष्ट्र
शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय
क्रमांक : संकीर्ण २०१५/(११९-अ) / एस.डी. ६ :
मंत्रालय
विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२.
दिनांक :
०८ जानेवारी, २०१६
Concessions for students with special needs divyang in examinations from class 1st to class 12th
Concessions
for students with special needs divyang in examinations from class 1st to class 12th
प्रस्तावना :
Divyang Vidyarthi Pariksha Savlati
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार
अधिनियम,
२००९ व भारतीय संविधान कलम ४५ नुसार शिक्षण हा प्रत्येक मुलाचा
मूलभूत हक्क आहे. वय वर्ष ६ ते १४ वर्षाच्या प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे
शिक्षणविषयक सुविधा देणे आवश्यक आहे. विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग)
विद्यार्थ्यांचे अध्ययन, अध्यापन पद्धती व मूल्यमापनाची
तंत्रे हे देखील वेगळी असणे आवश्यक आहे. विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) म्हणजे
अंशत: अंध /पूर्णत: अंध, मतिमंद, कर्णबधिर,
अस्थिव्यंग, बहुविकलांग, स्वमग्न, सेरेब्रल पाल्सी, अध्ययन
अक्षम अशा सर्व विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत शिक्षण देताना सर्वच गोष्टींचा सखोल
अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणून या विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या
बरोबरीने प्रत्येक घटकामध्ये मूल्यमापन होऊ शकत नाही, म्हणून
त्यांच्या ज्ञानाच्या, भाषेच्या मूल्यमापनाच्या पद्धती
सामान्य मुलांपेक्षा वेगळया असणे अपेक्षित आहे.
Divyang Vidyarthi Pariksha Savlati
संदर्भिय शासन निर्णयाद्वारे विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांसाठी
सर्वसाधारण विद्यार्थ्यांना असलेल्या परीक्षा योजनेपेक्षा परीक्षा पद्धतीमध्ये
काही सोयी-सवलती देणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यास क्षेत्राची
ओळख होणे, बुद्धि कौशल्य, हस्त कौशल्य,
उद्यम शिलता या सर्व बाबींचा म्हणजेच सर्वंकष विकास होणे आवश्यक
आहे. याकरीता या विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सामान्य शाळेत सामान्य
मुलांबरोबर शिक्षण घेता यावे याकरीता प्राथमिक स्तरावर इयत्ता १ ली ते ८ वी करीता
सर्व शिक्षा अभियान अपंग (दिव्यांग) समावेशित शिक्षण (IED Inclusive
Education for Disabled) व ९वी ते १२ वी - पर्यंतच्या
विद्यार्थ्यांकरीता राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अपंग (दिव्यांग) समावेशित
शिक्षण माध्यमिक स्तर (IEDSS Inclusive Education for Disabled at
Secondary Stage) सुरु करण्यात आलेले आहे. या विद्यार्थ्यांचे
मूल्यमापन व परीक्षा पद्धती सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा वेगळी असणे आवश्यक
आहे. यासाठी विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व परीक्षा
पद्धतीमध्ये काही सोयी-सवलती देऊन त्यांना सामान्य विद्यार्थ्यांच्या पातळीपर्यंत
आणणे हा सोयी-सवलती देण्यामागील मुख्य उद्देश आहे.
विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग)
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मुल्यमापनामध्ये गरजेनुसार सोयी-सवलत देण्यासंदर्भात
शासन स्तरावरुन समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार इ. १ ली
ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोयी-सवलती देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन
होती. त्यानुसार खालील निर्णय घेण्यात येत आहे.
शासन निर्णय:
इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या
विद्यार्थ्यांचे इतर सामान्य विद्यार्थ्यांच्या बरोबरीने प्रत्येक घटकामध्ये
मूल्यमापन होऊ शकत नाही,
म्हणून त्यांच्या ज्ञानाच्या, भाषेच्या
मूल्यमापनाच्या पद्धती सामान्य मुलांपेक्ष वेगळया असणे अपेक्षित आहे. त्यानुसार
खालील नमूद केल्याप्रमाणे प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर (इ. ली ते ८ वी)
पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीमध्ये आणि
माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील (इ. ९ वी ते १२ वी) पर्यंतच्या परीक्षा
पद्धतीमध्ये सोयी-सवलती देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) इयत्ता
१ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी खाली नमूद केलेल्य
Divyang Vidyarthi Pariksha Savlati
सवलतींचा गरजेनुसार लाभ देण्यात यावा.
१) अंशत: अंघ / पूर्णत: अंध
विद्यार्थ्यांकरीता सवलती
२) कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी सवलती :
३) अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी सवलती
४) बहुविकलांग (Spastic) विद्यार्थ्यांसाठी सवलती
५) अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी
सवलती
६) ऑटिस्टिक (स्वमग्न)
विद्यार्थ्यांसाठी सवलती
७) सेरेबल पाल्सी मुलांसाठी मूल्यमापन
पध्दती
८) मतीमंद मुलांसाठी मूल्यमापन पध्दती
शासन आदेश pdf स्वरुपात Download करण्यासाठी
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon