DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Voice Of Vote Competitions

Voice Of Vote Competitions


मतदार जनजागृती स्पर्धा 

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे     

     पध्दतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीकरीता राज्यातील मास मिडीया आणि सर्वच प्रकारच्या सर्जनशील कलांचे शिक्षण देणारी कला शिक्षण महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती मतांची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेत पोस्टर निर्मिती

स्पर्धा,घोषवाक्य लेखन स्पर्धा आणि जाहिरात निर्मिती स्पर्धा या विषयावर स्पर्धा घेण्यात येणार आहे.

'Voice Of Vote' Competitions

प्रती,

मा प्राचार्य/प्राध्यापक

महोदय/महोदया 

आपल्या सर्वांना विनंती करण्यात येते की, वाशिम जिल्ह्यात मतदार जनजागृती करण्यासाठी वरील ऑनलाईन लिंक मध्ये जाऊन महाविद्यालयातील विद्यार्थी यांना राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता सदर स्पर्धा राज्य निवडणुक आयोगाने आयोजित केलेला आहे. तरी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यंत ही माहिती द्यावी ही विनंती. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२३ ही आहे. सदर संदेश हा प्रत्येक महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी यांचेपर्यंत पोहचविण्यात यावा.

     निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सक्रीय सहभाग असणे हेच प्रागतिक लोकशाहीचे महत्वाचे लक्षण आहे. त्या अनुषंगानेच आगामी लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्याची मतदानाची टक्केवारी चांगली असावी यासाठी मतदारांपर्यंत पोहचून त्यांचे प्रभावी पद्धतीने प्रबोधन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांचा भाग म्हणूनच मतदानाचे महत्व अधोरेखीत करणारी घोषवाक्ये तसेच मुद्रीत माध्यमांसाठीच्या जाहीराती तसेच दूरचित्रवाणी आणि समाजमाध्यमांवर प्रसारीत करता येतील अशा चित्रफीत स्वरुपातील जाहीरातींचा वापर करण्याचा आमचा मानस आहे. अर्थात असे साहित्य नाविन्यपूर्ण आणि कल्पक असावे, त्याद्वारे दिले जाणारे संदेश सहजसोप्या भाषेत मतदारांच्या मनाचा ठाव घेणारे असावे आणि पर्यायाने ते मतदारांना प्रत्यक्षात मताधिकार बजावण्यास उद्युक्त करणारे असावे असे आम्हाला वाटते. स्पर्धेच्या माध्यमातून अशा वैविध्यपूर्ण साहित्याची निर्मिती होऊ शकेल असे वाटत असल्यानेच आम्ही राज्यातील मास मिडीया आणि सर्वच प्रकारच्या सर्जनशील कलांचे शिक्षण देणारी कलाशिक्षण महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती मताचीही स्पर्धा आयोजीत केली आहे.

Voice Of Vote Competitions

            तर चला, या स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपली निवडणूक प्रक्रिया आणि पर्यायाने आपली लोकशाही सक्षम करण्याच्या प्रयत्नात आपले स्वतःचेही योगदान द्या! 

           या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२३ आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियमावली व पारीतोषिकाबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळाच्या

CLICK HERE 👇

या लिंकवर माहिती उपलब्ध आहे

. पोस्टर स्पर्धा २०२३- Poster Making Competition 2023

विषय- Subject

भाषा मराठी / हिंदी / इंग्रजी

पात्रता

स्पर्धेचा कालावधी

नियम आणि अटी

पारितोषिके

पहिले पारितोषिक रु. ५०,०००/-

दुसरे पारितोषिक रु. २५,०००/-

तिसरे पारितोषिक रु. १०,०००/-

दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु. ५,०००/-

स्पर्धेसाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातूनच अर्ज दाखल करावा. गुगुल फॉर्मचा स्वतंत्र दुवा खाली दिला आहे.

 CLICK HERE 👇

२ घोषवाक्य लेखन स्पर्धा- Slogan Writing Competition

विषय- Subject

भाषा मराठी / हिंदी / इंग्रजी

पात्रता

स्पर्धेचा कालावधी

नियम आणि अटी

पारितोषिके

पहिले पारितोषिक रु. २५,०००/-

दुसरे पारितोषिक रु. १५,०००/-

तिसरे पारितोषिक रु. १०,०००/-

दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु. ५,०००/-

स्पर्धेसाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातूनच अर्ज दाखल करावा. गुगुल फॉर्मचा स्वतंत्र दुवा खाली दिला आहे.

 CLICK HERE 👇

 Voice Of Vote Competitions

३ जाहिरात निर्मिती (ध्वनीचित्रफीत स्वरुपात) स्पर्धा- Ad Film Making Competition

विषय- Subject

भाषा मराठी / हिंदी / इंग्रजी

पात्रता

स्पर्धेचा कालावधी

नियम आणि अटी

पारितोषिके
पहिले पारितोषिक रु. १,००,०००/-
दुसरे पारितोषिक रु. ७५,०००/-
तिसरे पारितोषिक रु. ५०,०००/-
दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु. १०,०००/

स्पर्धेसाठी गुगल फॉर्मच्या माध्यमातूनच अर्ज दाखल करावा. गुगुल फॉर्मचा स्वतंत्र दुवा खाली दिला आहे.

CLICK HERE 👇

Voice Of Vote Competitions

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon