Mantralaya Pravesh Navin Niyam
वाचा :- शासन निर्णय, गृह विभाग, क्रमांक: पीईएस-०४२१/प्र.क्र.१०८/विशा-४, दिनांक २४/१२/२०२१. प्रस्तावना :- मंत्रालय हे राज्यातील प्रशासकीय
मुख्यालय आहे. सदर आस्थापनेमध्ये मा. मुख्यमंत्री, मा. मंत्री, मा. राज्यमंत्री यांची कार्यालये तसेच सर्व महत्त्वाची प्रशासकीय
विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे मंत्रालय ही अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची
आस्थापना असल्याने या आस्थापनेची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.
त्याअनुषंगाने शासन निर्णय दिनांक २४ डिसेंबर, २०२१ अन्वये
मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना
पारित करण्यात आल्या होत्या. तथापि, तद्नंतरच्या
कालावधीत मंत्रालयात घडलेल्या आपत्कालीन घटना विचारात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने
मंत्रालय परिसराचा घेण्यात आलेला आढावा, अभ्यागतांची वाढती
संख्या व मंत्रालयात उपलब्ध असलेली वाहनतळांची मर्यादित जागा, इत्यादी बाबी विचारात घेतल्यानंतर मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने
सुधारीत मार्गदर्शक सूचना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. |
शासन निर्णय:- मंत्रालयीन सुरक्षा आणि मंत्रालयात प्रवेश
करणारे अभ्यागत हा संवेदनशील विषय असल्याने मंत्रालयीन सुरक्षेच्या दृष्टीने
खालील उपाययोजना हाती घेण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. त्याअनुषंगाने
संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करुन आवश्यक त्या सूचना आपल्या स्तरावरुन
पारित कराव्यात. |
१) वेब पोर्टल वें मोबाईल अप / फ्लॅप
बॅरियर बसविणे- मंत्रालय सुरक्षा भाग दोन (Phase-II) यामध्ये वेब पोर्टल व मोबाईल अॅप "द्वारे अभ्यागतांची पूर्व नोंदणी
करून नोंदणी केलेल्या वेळाप्रमाणे (टाइम स्लॉट) मंत्रालयामध्ये अभ्यागतांची
संपूर्ण सुरक्षा तपासणी करून प्रवेश देण्याची कार्यवाही पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा यांनी करावी. तसेच अभ्यागतांना ज्या विभागात जायचे आहे
त्याच विभागात प्रवेश देण्यात यावा. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मजल्यावर
प्रवेश प्रतिबंध करण्यासाठी येण्या-जाण्याच्या प्रत्येक मार्गावर फ्लिप बॅरियर
बसविण्यात येऊन प्रवेश प्रतिबंध करण्यात यावा. त्याचप्रमाणे माननीय आमदार महोदय
आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत येणाऱ्या व्यक्तीकरिता पूर्वनियोजित टाइमिंग स्लॉट
बुकिंग करणे आणि मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी प्रवेश पास बंधनकारक
करण्यात येत आहे. मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने Phase-II कार्यान्वित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. जोपर्यंत Phase-II
अंमलात येत नाही तोपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या कार्यपध्दतीचा
अवलंब चालू ठेवण्यात यावा. या उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी पोलीस उपायुक्त,
मंत्रालय सुरक्षा यांनी तातडीने कार्यवाही करावी. उपरोक्त कार्यवाही
शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्यात करण्यात यावी.... |
२) अद्ययावत व्हिजीटर प्लाझा- मंत्रालयातील गार्डन गेट येथील
मोकळ्या जागेत अद्ययावत सुरक्षा तपासणी कक्ष (व्हिजीटर प्लाझा) पास काउंटर, अभ्यागतांसाठी
वेटिंग रूम, मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींच्या बॅगा
ठेवण्यासाठी बॅगेज लॉकर, स्कॅनर इत्यादी सुविधांसह सुसज्ज
प्लाझा तयार करण्यासाठी व त्याबाबतचे रेखांकन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम
विभागामार्फत कार्यवाही एक महिन्यात करण्यात यावी. |
३) मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या
अभ्यागतांची संख्या मर्यादीत करणे- मंत्रालयामध्ये प्रत्येक दिवशी
येणाऱ्या अभ्यांगतांची संख्या ३५०० पेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. तसेच
मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या दिवशी मंत्रालयामध्ये येणाऱ्या अभ्यांगातांची संख्या
५००० पेक्षा जास्त असल्याचे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. “मंत्रालय"
इमारतीध्ये येणारे अभ्यागत तसेच त्यांच्या वाहनांची संख्या विचारात घेता,
इतक्या मोठया प्रमाणावर एकाच इमारतीमध्ये एकाचवेळी गर्दी गर्दी
झाल्यास मा. मुख्यमंत्री / मा. उप मुख्यमंत्री/ मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री
तसेच प्रशासकीय विभागाच्या दैनंदिन कामकाजावर निश्चितच परिणाम होत असल्याचे
दिसून आले आहे. त्यामुळे मंत्रालयामध्ये प्रवेश करण्याऱ्या अभ्यागतांची संख्या व
वाहनांची संख्या मर्यादीत करण्यात येत आहे, जेणेकरुन
मंत्रालयातील सोयी-सुविधांवर अनावश्यक ताण येणार नाही व अति-महत्वाच्या
व्यक्तींची सुरक्षा अबाधित राहील. यावर मंत्रालयामध्ये दर दिवशी किती
अभ्यागतांना प्रवेश देण्यात यावा, याबाबत निश्चित
कार्यप्रणाली पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा यांनी तयार
करावी व ती एक महिन्यात गृह विभागास सादर करावी. |
४) Online प्रवेश पास- नजीकच्या कालावधीमध्ये अभ्यांगतांना
प्रवेश पत्रिका देण्याची ऑन लाईन कार्यवाही सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
जोपर्यंत ऑन लाईन प्रवेश पत्रिका देण्याची प्रक्रिया सुरू होत नाही, तोपर्यंत
पारंपारीक पध्दतीने प्रवेश पत्रिका देण्यात यावी. Online प्रवेशपास
बाबत NIC ने स्वागतम पोर्टलद्वारे आवश्यक ती कार्यवाही १५
दिवसांत करावी. ५) वाहन पार्किंग/प्रवेश / निर्गमन- मंत्रालयात मुख्य प्रवेशद्वाराने
फक्त माननीय मुख्यमंत्री,
मा. उपमुख्यमंत्री व इतर मंत्री महोदय यांची वाहने तसेच ताफ्यातील
सुरक्षा वाहनांना प्रवेश देण्यात येईल. सदर वाहनांसाठी निश्चित केलेल्या जागेवर
पार्किंग तसेच या वाहनांना पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराने बाहेर जाण्यासाठी
परवानगी राहील. या व्यतिरिक्त मुख्य प्रवेशद्वाराने इतर कोणत्याही वाहनास प्रवेश
व बाहेर जाण्यास परवानगी राहणार नाही. Mantralaya Pravesh Navin Niyam सचिव गेट येथून फक्त सनदी अधिकारी
यांच्या वाहनांना प्रवेश देण्यात येईल. मंत्रालयात प्रवेशासाठी ज्या वाहनांना
पार्किंग व ड्रॉपिंग प्रवेशीका पास आहे त्यांना व इतर खाजगी वाहनांना योग्य त्या
परवानगीनंतर) मंत्रालयात येण्यासाठी गार्डन गेट येथुन प्रवेश देण्यात येईल व
मंत्रालयाबाहेर जाण्यासाठी आरसा गेटने बाहेर जाण्यासाठी नियोजन करण्यात येईल. ही
कार्यवाही पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा यांनी तातडीने करावी.
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची वाहने उभी असतात त्या ठिकाणी इतर
कोणत्याही वाहनांना उभे राहण्यास मज्जाव करण्यात यावा. कॉनव्हॉय मधील अधिकारी व
अंमलदार यांना गाडी सोडून जाऊ नये याबाबत सूचना द्याव्यात. सदरची कार्यवाही शासन
निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून करण्यात यावी. ६) वाहन चालकांना सुचना- मंत्रालयात पार्किंग आणि
मंत्रालयाबाहेर पार्किंग असणाऱ्या वाहन चालकांना वाहनाच्या सुरक्षेबाबत अवगत
करून त्यांना वाहन सोडून इतरत्र न जाण्याबाबत पोलीस उपायुक्त, मंत्रालय
सुरक्षा यांनी सूचित करावे. संबंधीत वाहन चालकाने त्यांच्या वरिष्ठ
अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय त्यांच्या वाहनामध्ये अन्य कोणत्याही
अभ्यागतांना घेऊन मंत्रालयामध्ये प्रवेश करु नये. |
संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी
किंवा pdf copy Download करण्यासाठी खालील CLICK HERE वर
टिचकी मारा |
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon