DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Ganeshotasv

 Ganeshotasv

!!जय गणेश देवा!!

सन २०२४ च्या गणेशोत्सवात सहभागी होणा-या राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा
सन २०२४ च्या गणेशोत्सवात सहभागी होणा-या राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रमांक: पुलदे-२०२४/प्र.क्र.१११/सां.का.२ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई

दिनांक : ३१ जुलै, २०२४

संदर्भ-संचालक, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचे पत्र क्र. जा.क्र. पुलदे-५९०, दिनांक ०३.०७.२०२४

प्रस्तावना:

लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, याकरीता सन २०२३ मध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात आले होते. त्याच धर्तीवर सन २०२४ च्या गणेशोत्सवात सहभागी होणा-या राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

शासन निर्णय :

सन २०२४ च्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभागी व्हावे, याकरीता दि.०७.०९.२०२४ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

०२. सदर पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी कार्यपध्दती पुढीलप्रमाणे राहिल :-

२.१ सदर स्पर्धेत, धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल.

सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड पुढील निकषांच्या आधारे करण्यात येईल
राज्यातील पहिल्या ३ विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुढीलप्रमाणे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल.

प्रथम क्रमांक
रु.५.०० लक्ष

द्वितीय क्रमांक
रु. २.५ लक्ष

तृतीय क्रमांक
रु.१.०० लक्ष

राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हास्तरीय निवड समितीने निवड केलेल्या ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी वरीलप्रमाणे ३ विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून उर्वरित ४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रु.२५,०००/- चे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.



🌐 👉 उर्वरित शासन निर्णय वाचण्यासाठी किंवा पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी फक्त 


गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा

सांस्कृतिक कार्यमंत्रालय

राज्य शासनाने ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी केले आहे.

पारितोषिक व प्रमाणपत्र

            या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक

                उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना ०७ सप्टेंबर २०२४ पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. 👉 CLICK HERE    या ई - मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 

 Ganeshotasv

            राज्य शासनाच्या 👉 CLICK HERE   या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या👉 CLICK HERE   या ई- मेल अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी केले आहे.

अंतिम तारीख - दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ पर्यंत सहभाग नोंदवावा

गणेशोत्सवावर आधारित प्रश्नमंजुषा नक्की सोडवा 👇

प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी 👇

CLICK HERE 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon