DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

भारत निवडणूक आयोग पुरस्कृत "मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) Quiz "कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांकरीता निवडणूक साक्षरता मंच (Electoral Literacy Club) स्थापन करण्याबाबत

Voter Awareness Competition - ECI SVEEP 

SWEEP Quiz 

Voter Awareness Campaign

मतदान जनजागृती प्रश्नमंजुषा नक्की सोडवा शेवटी दिली आहे   

    भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २५ जानेवारी २०२२ हा १२ वा राष्ट्रीय मतदार दिन संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जात आहे.
    १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या  २५ जानेवारी२०२२ निमित्ताने  ज्ञानयात्री तंत्रस्नेही संकेतस्थळाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन भारत निवडणूक आयोगाने १२ व्या राष्ट्रीय मतदार दिनाचे "सुलभ,सर्वसमावेशक आणि सहभागक्षम निवडणुका"  हे घोषवाक्य प्रसारीत केलेले आहे.SVEEP(स्वीप) म्हणजे Systematic Voters’ Education and Electoral Participation-" सुव्यवस्थित मतदार साक्षरता व मतदारांच्या मतदान प्रक्रियेतील सकारात्मक सहभागासाठी जनजागृती अभियान" असा अर्थ होतो

अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा !

उत्सव आजादी का !

संपूर्ण वर्षभर ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.कॉम या वेबसाईट तर्फे राबविले जात आहेत उपक्रम

     परकियांच्या गुलामगिरीतून मुक्तता व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या,स्वराज्याच्या यज्ञकुंडात आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य वीरांची ओळख भावी पिढीला व्हावी तसेच स्वराज्याची ज्योत अखंड तेवत राहावी तसेच संपूर्ण भारताचा सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक इतिहास व विविधतेची ओळख तसेच महत्प्रयासाने प्राप्त झालेली,निर्माण केलेली लोकशाही व तिच्या आधार स्तंभाची माहिती व्हावी यासाठी दि. १५ ऑगस्ट २०२१ ते दि १५ ऑगस्ट २०२२ या संपूर्ण वर्षभराच्या कालखंडात दररोज खालील प्रमाणे आयोजन केलेले आहे तरी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक समाजातील सर्वच घटकांनी या उपक्रमात सामील व्हावे असे ज्ञानयात्री तंत्रस्नेही शरद देशमुख आवाहान करत आहेत.
सत्र पहिले - महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख

सत्र दुसरे - भारताच्या संपूर्ण घटक राज्याची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख

सत्र तिसरे - गाथा बलिदानाची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात शूरवीरांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख

सत्र चौथे -  लोकशाहीचे आधारस्तंभ कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ ,न्यायमंडळ,स्वायत्त संस्था,समाज माध्यमे / पत्रकारिता यांची प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून ओळख

सत्र पाचवे - बेटी बचाव बेटी पढाव,पढेगा भारत तो ही बढेगा भारत,तंत्रज्ञान विषयक मोफत कार्यशाळा जसे वेबसाईट,यूटुब चानेल ,इ-कॉमर्स वेबसाईट निर्मिती  इत्यादी

संपूर्ण वर्षभर एकही दिवस न चुकता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव https://www.dnyanyatritantrasnehi.com उत्साहात साजरा केल्या जात आहे त्यामुळे सर्व ज्ञानचक्षूनी या उपक्रमात सामील होऊन आपले योगदान द्यावे


    निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे. विशेषत: निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक आहे. या निवडीवरच विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असते. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.            

      भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान  देश आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लोकशाहीच्या माध्यमातून जनतेच्या आशा आकांक्षाची पूर्तता करण्याचे अनेक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. ‘जनतेचे राज्य’ ही संकल्पना स्वीकारून जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्य चालविले जात आहे. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. 

        यादृष्टीने मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने स्विप SVEEP अर्थातच Systematic Voters' Education and Electoral Participation program  कार्यक्रम राबविला जातो. तसेच नवमतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी याकरिता राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविले जातात.

    मतदानाच्या वेळी मतदार यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर युवक-युवतींना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रोत्साहित करावयास हवे. नोंदणीसाठी नेमका अर्ज कोठे करावा याची माहिती त्यांना उपलब्ध करून दिल्यास वेळेवर नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. भारत निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणी होऊन मतदारयादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. भारत निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावरही नोंदणी संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकते. तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेतही यासंदर्भात वेळोवेळी नोंदणीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांची माहिती मिळू शकते

     निवडणूक आयोगाने मतदानातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक ओळखपत्र तयार करण्याची विशेष मोहीम राबविली. मात्र अशा मोहिमेत ‘शासनाचे काम’ अशा पद्धतीने याकडे लक्ष न देता देशाप्रतीचे महत्त्वाचे कर्तव्य म्हणून या मोहिमेस आपला सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. केवळ आपले ओळखपत्र करून न थांबता समाजातील इतरही घटकांना याविषयीची माहिती देण्यात सुजाण नागरिकांचा पुढाकार अपेक्षित आहे.   

        महाविद्यालयातील युवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अशा स्वरूपाचा जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवू शकतात. यात मतदार जनजागृतीपर रॅली, प्रभात फेरी, विविध स्वरूपाच्या स्पर्धा यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा सहभाग घेण्यात येतो.मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकारांबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. अशा स्वरूपाची जागृती घडवून आणण्यासाठीच निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून नवीन मतदारांना समारंभपूर्वक छायाचित्र मतदार ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.  

     यावर्षीच्या राष्ट्रीय मतदान दिनाचे समावेशात्मक आणि गुणात्मक निवडणूक सहभाग हे घोषवाक्य आहे. या निमित्ताने विविध मतदारजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे उपक्रम यशस्वी करून देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदारजागृतीच्या प्रयत्नात सहभागी व्हायला हवे आणि मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानासाठी सज्ज व्हायला हवे.


      भारत निवडणूक आयोग पुरस्कृत "मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP)"कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांकरीता निवडणूक साक्षरता मंच (Electoral Literacy Club) स्थापन करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाचा आजचा शासन निर्णय...दिनांक: २७/०९/२०२१

 

मतदान जनजागृती  प्रश्नमंजुषा सोडवा 

हेही वाचा 


Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon